एक ड्राइवर, सिंगापूर मधला !

Submitted by तृप्ती मेहता - ... on 2 August, 2019 - 23:50

परवा रविवारी सहकुटुंब एका restaurant मध्ये जेवायला गेलो होतो. टॅक्सिने परत आलो. चिनी वंशाचा टॅक्सी ड्रायव्हर. त्याचे payment करून उतरायला लागलो होतो.

तेवढ्यात, तो टॅक्सी ड्राइवर म्हणाला, " भगवान आपको और आपके परिवार को खुश रखें "!

ते अस्स्खलित हिंदी ऐकून आम्ही चाटच !!!

"विकेट पडणं, दांडी गूल " असले जे जे काही शब्दप्रयोग असतील त्याची प्रचितीच म्हणा ना !

अशा प्रसंगी त्या कर्त्यांची जी आश्चर्याच्या धक्क्याच्या मानसिक अवस्था असते तशीच आमची झाली.

Where did you learn hindi? माझा स्वाभाविक प्रश्न.

"From Indian passengers" त्याचे नम्र उत्तर.

मजाच वाटली त्या ड्रायव्हरची. आणि कौतुकही.

मग एकूण आमचा प्रतिसाद पाहता, त्यालाही त्याच्या हिंदीचा सराव करावासा वाटला बहुतेक.

कारण त्या नंतर त्याने , " भगवन आपको लम्बी उम्र दे" असा हिंदीत आशीर्वाद देऊन आमचे मन जिंकून घेतलं.

"आप इंडिया में कहाँसे है ?,

"मै बिहार गया था"

"मैं शाकाहारी हूँ "

असली एका पाठोपाठ प्रश्न, वाक्य हिंदीत सहजपणे जणू फेकत होता नुसती आमच्या अंगावर .

आता नुसतं हिंदी बोलून थांबावं ना बाबानी ! पण नाही !!

त्याने त्याच्या जवळचा फोटोचा अल्बम माझ्या हातात टेकवला. मग मी पण गाडीतुन उतरायला निघालेली थांबले. घेतला तो अल्बम हातात उत्सुकतेने. वरवर चाळला. फोटोत स्तूप दिसले. आणि तो ड्राइवर बुद्धिस्ट भिक्षुकाच्या वेशात ! (बिहार म्हटल्यावर बोधगया असणार) त्याचा अल्बम त्याला साभार परतवला. पण थांबा ! अजून एक गंमत त्याच्या पोतडीत होती.

"में आपको मंत्र में blessings देता हूँ " म्हणाला. आणि चक्क पाली भाषेत, मंत्राच्या विशिष्ट सुरावटीसह, जवळपास १ मिनिटे, न थांबता त्याने मंत्रोच्चरण करत आमची उरली सुरली विकेट, दांडी पण उडवून टाकली. आता त्याच्यापुढे हात जोडायचेच बाकी होतं.

त्याला धन्यवाद दिले. आणि मी पण त्याच्याशी चिनी भाषेत बोलून त्याला धक्का दिला.

सगळा प्रसंग ४ एक मिनिटांचा. पण खूप काही देऊन गेला. भरपेट खाऊन आलेल्या मनावरची सुस्ती उडवून गेला.

बीजिंग मध्ये असताना समर पॅलेस मधल्या अनुभवाची आठवण देऊन गेला. तिथेही असच अचानक कानावर , "आवारा हूँ ", गाणं कानावर पडलं होतं. त्या शब्दांच्या, त्या तल्लीनतेने गाणाऱ्याच्या आवाजाच्या ओढीने त्या गाणाऱ्या जवळ गेलो होतो.

आता हे लिहितानाही ते सगळं आठवून त्या अनुभवांची पुनरावृत्ती होतेय. छान वाटतयं.

रोजचं रहाटगाडगं विसरायला लावणारी अशी माणसं आयुष्यातले काही क्षण उजळवून टाकतात. बरंच काही सांगून जातात. "भेटगाठ" घडवून आणतात. भर दुपारच्या उन्हात चालताना कुठूनतरी अचानक भेटणारा मोगऱ्याचा गंध, अचानक आलेल्या पावसाने आसमंत भरून टाकणारा तो मृदगंध, हे असलं काहीतरी मानवी रूपात साकारल्या सारखं !

अशी माणसं भेटत राहोत कायम. अजून काय मागणार ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यासोबतच त्याने तुमचा वेळ घेऊन नम्रपणे जसे त्याच्या कलेबद्दल सांगितले तसे तुम्ही त्याचा वेळ घेऊन नम्रपणे भारताबद्दल सांगावे. हे समजने एवढे कठीन आहे का?>>>>

ज्याला हिंदी बोलता येते, भारतात फिरल्याचा पुरावा म्हणून जो फोटो घेऊन फिरतोय, ज्याने मंत्रही पाठ करून लक्षात ठेवलेत, त्याला भारताबद्दल काहीही माहीत नसणार हा अंदाज कशावरून करायचा?

Singapore has 4 official languages
English, Chinese, Malay & Tamil
Submitted by mandard on 6 August, 2019 - 16:53
>>
Exactly.
This is my point.
If a Singaporean Tourist meets you in India and due to lack of knowledge you try to talk with him in Chinese thinking Singapore uses Chinese as main language,
wouldn't he correct you there on the spot - politely - that there are four official languages and one national language in Singapore?
Do you think he will choose to just stand there - to protect his personal image - in front of you - who clearly seems to posses wrong information about Singapore?
I am requesting to do exactly that.
Singapore is just a random example. Instead of language put any other misconception about any other Country.
Wouldn't that Country citizen correct you - politely?
He will or he will not?
Then why we should not? That too when Hindi=India misconception is costing India its real diverse identity and on ground level here in MH more complex Social, Political, Demographic and Jobs issues?
---
btw, हे संयत प्रतिसाद देण्याचे कौतुक काही मला समजले नाही.
त्यांनी प्रतिसाद बरोबर दिलेला असु शकतो, चुकीचा दिलेला असु शकतो, पण जर निवळ्ळ त्यांच्या संयत प्रतिसाद देण्याचे कौतुक होते आहे, - तो देण्यासाठी या धाग्यावर येऊन धाग्याच्या विषयाबद्दल काहीच म्हणने न मांडता - तर मग मला असे वाटते आहे की , मीच वयक्तीक फायद्यासाठी मोठा कानठळ्या बसवणारा डिजे लावुन नागीन डान्स करत होतो आणि हेच तेवढे संयत प्रतिसाद देत होते की काय?

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे बरोबर आहे, मग इंग्रजी राष्ट्रभाषा आहे का आपली?
यावरून बंगलोरला आल्यावर पहिल्याच वर्षी आलेला अनुभव आठवला. बिल्डिंगच्या सभेच्या नोटिसवर नोटिस मिळाल्याची सही माझ्या नवऱ्याने मराठीत केली. (त्याची आणि माझीही सही मराठीत आहे. एरवी कधीच कुठेच कुणीही आक्षेप घेतलेला नाही). तर, देवनागरी लिपीतली ती सही बघून पदाधिकारी असलेले एक ज्ये. ना. काका भडकून आमच्या घरी आले आणि म्हणायला लागले की ही 'हिंदीतली' सही चालणार नाही. तू इंग्रजीत सही कर. नवरा म्हणाला की माझी सही मराठीत आहे, मी इंग्रजीत कशी काय करणार? ते ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. भडकतच जायला लागले. शेवटी नवऱ्याने तडजोड म्हणून सहीच्या खाली इंग्रजीत आद्याक्षरं लिहिली. नंतर सोसायटीकडे तक्रार केली, सेक्रेटरीचा दिलगिरीचा फोनही आला. नंतर कधीही चुकूनही असा काही ( हिंदीद्वेष्टा) अनुभव आम्हाला आला नाही.

मुद्दा असा, की तेव्हाही आम्हाला याच गोष्टीची गंमत वाटली होती की ह्यांना हिंदी परकी वाटते हे ठीक, पण इंग्रजी बरी जवळची वाटते!!!

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे बरोबर आहे, मग इंग्रजी राष्ट्रभाषा आहे का आपली?
नवीन Submitted by वावे on 6 August, 2019 - 22:13
>>

  1. ईंग्लीश राष्ट्रभाषा नाही, ती इथली भाषाही नाही, पण भारतात इंग्लिश बोलण्यामुळे कोणत्याही एका समुहाला जास्तीचे फायदे मिळत नाही.
  2. सर्व भारतीय जनतेला इंग्लीश शिकण्यासाठी व योग्य तसे इंग्लिश बोलण्यसाठी समान मेहनत घ्यावी लागते.
  3. इंग्लिश आंतरराष्ट्रीय व्यापाराची भाषा आहे. ती बोलणाने नोकरी, उद्योगधंदे, पैसे, मान सम्नान मिळतो. हिंदीचे तसे नाही.
  4. भारताच्या संदर्भात इंग्लीशएवजी हिंदी वापरल्याने एका विशिष्ट राज्यातल्या समुहाला असमान, इतरांपेक्षा जास्त फायदे ते पण कमी मेहनतीत मिळतात.
  5. नुसते त्यांना याचे फायदे मिळत असते तरी काही तक्रार नव्हती. पण त्यांना असे असमान जास्त फायदे मिळताना लोकशाहीचे मुल्य पायदळी तुडवले जातात, केंद्रीय सम्स्थांमधे राज्याच्या स्थानीक भाषेत काम होत नाही, सेवा मिळत नाही, एवढेच नव्हे तर हिंदी भाषिक जास्तीची कुठली इतर मेहनत न घेता केंद्रीय लोकसेवा आयोग, पोस्ट, रेल्वे व ईतर परिक्षा हिंदीत देऊन पास होऊ शकतो पण इतर भाषिकांना मात्र सक्तीने ईंग्लीश ही परकी भाषा शिकुन त्यावर प्रभुत्व मिळवावे लागते तेव्हा ते पास होतात. ही असमानता हिंदीला जास्ती विशेष दर्जा देण्यामुळे आलेली आहे. असे इतर मुख्य तोटे बिगर हिंदी जनतेला सोसावे लागतात.
  6. आज महाराष्ट्रातला केंद्रईय संस्थांमधे व बँकामंधे हिंदी व ईंग्लीश यापैकी काहीच न येता काम होऊ शकते का? का नाही?
  7. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या ग्रामीण भागात, हिंदी येत नसेल तर बँकेचे काम करुन देत नाहीत. परत पाठवतात. हिंदी किंवा इंग्लीश समजणारी व्यक्ती सोबत घेऊन जावी लागते.
  8. आजघडील (तामिळनाडु वगळता) अजिबात हिंदी / ईंग्लीश न येता पूर्ण काम राज्याच्या भाषेत होते असे एक रल्वे स्थानकाचे नाव सांगा. जास्त नाही, एकच. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात अंदाजे ७००० रेल्वे स्थानकं आहेत.
  9. हिंदी माणसाचे काम हिंदी त होते तेही त्याच्या राज्याच्या बाहेर भारतात कुठेही, पण मराठी/कानडी माणसाचे त्याच्या स्वतःच्या हक्काच्या राज्यातच सरकारी, रेल्वेचे किंवा बँकेचे काम मराठी/कानडीत होत नाही हा अन्याय नाही का? आम्ही हिंदी/ईंग्लीश शिकल्याशिवाय आम्हाला प्राथमीक सेवाही हे सरकार देऊ शकत नसेल, तर आम्ही हिंदीला विरोध करणारच.
  10. म्हणजे मराठी कानडी व इतर भाषा व भाषिक या देशाचे समान नागरीक नाहीत का?
  11. पण तेच हिंदी नागरीक कुठलीही जास्तीची मेहनत न घेता हे सगळे जॉब मिळवतओ, व केंद्रीय संस्थांमधे काम करुन घेतो.
  12. म्हणून हिंदी एवजी ईंग्लीश हवी.
  13. ईंग्लीश व स्थानीक भाषा हेच द्विभाषी सुत्र योग्य आहे.

मुद्दा असा, की तेव्हाही आम्हाला याच गोष्टीची गंमत वाटली होती की ह्यांना हिंदी परकी वाटते हे ठीक, पण इंग्रजी बरी जवळची वाटते!!!
>>

  • हिंदी इतर भाषांप्रमाणेच युपी बिहारची स्थानीक भाषा आहे. ती भारताची ओळख नाही.
  • युपी बिहारच्या मुळच्या भाषा एकत्र येऊन हिंदी ही नवी भाषा तयार झालेली आहे व ती २०० वर्षांपेक्षा जुनी नाही. असे असताना हजारो किलोमिटर दूर असलेल्या बंगळुरुचा व हिंदीचा काही संबंध असेलच कसा?
  • असे असताना बंगळुरु मधल्या माणसाला हिंदी जवळची का वाटावी?
  • या प्रतिसादाच्या सुरुवातीला सांगीतलेल्या कारणांमुळे व ईंग्लीश आंतरराष्टॄय व्यापाराची भाषा असल्यामुळे ती चालेलच. बंगळुरुत कानडी + ईंग्लिश मधे व्यवहार व्हावा.

तुमचे मराठी सहीचे उदाहरणच चुकीचे आहे. त्या माणसची चूकच आहे कारण सही ही सही असते. त्याचा भाषेशी काही संबंध नाही. हिंदी भाषीकाचा अंगठ्याचा ठसा दिला तर त्या माणसाचे काय म्हणने असेल? निव्वळ मुर्खपणा आहे त्या माणसाचा.
पण तुम्ही इथे ते उदाहरण दिले ते अस्थानी आहे. असे अतिटोकाचे लोक प्रत्येक चळवळीत/संस्थेत असतात. ते काही उदाहरण नव्हे. ते काही आमचे प्रतिनिधी नव्हे.

धागा भरकटतोय.
हिंदी का इंग्लिश?? यासाठी वेगळा धागा काढुन तिथे अशीच मुद्देसुद चर्चा होऊ द्या. वाचायला आवडेल. Happy

प्रेमाने, आपुलकीने जर कुणी अनोळखी माणूस आपल्याशी आपल्याला कळणाऱ्या भाषेत संवाद साधतोय हीच खूप समाधानाची गोष्ट आहे. भले ती माझी मातृभाषा नसूदे. मी जर जपान, थायलंड, कोरिया मध्ये गेलो तर साहजिकच इंग्रजी भाषेचाच आधार घेईन. नाही तर मला तिथली भाषा अगोदर शिकून मग तिकडे जावे लागेल.

हिंदी का इंग्लिश?? यासाठी वेगळा धागा काढुन तिथे अशीच मुद्देसुद चर्चा होऊ द्या. वाचायला आवडेल.>>

पण, माझा विरोध हिंदीलाही नाही आणि इंग्रजीलाही नाही.

<<<हजारो किलोमिटर दूर असलेल्या बंगळुरुचा व हिंदीचा काही संबंध असेलच कसा?
असे असताना बंगळुरु मधल्या माणसाला हिंदी जवळची का वाटावी?
या प्रतिसादाच्या सुरुवातीला सांगीतलेल्या कारणांमुळे व ईंग्लीश आंतरराष्टॄय व्यापाराची भाषा असल्यामुळे ती चालेलच. बंगळुरुत कानडी + ईंग्लिश मधे व्यवहार व्हावा.>>

हजारो किलोमीटरचा वगैरे काही संबंध नसतो हो. इंग्लंड किती किलोमीटरवर आहे? महाराष्ट्राला गुजरात चिकटून आहे. किती मराठी माणसांना गुजराती येतं? कर्नाटकही चिकटून आहे. किती जणांना कन्नड येतं? मुद्दा एक्स्पोजरचा असतो. ते इथल्या माणसांना नक्कीच कमी होतं हिंदीचं, इंग्रजीचं जास्त असतं. आणि मी लिहिल्याप्रमाणे गेल्या १०-१२ वर्षांतला हा एकमेव अनुभव आहे.
आपली मनं मोकळी असली की भाषेचा अडसर (सर्वसामान्य लोकांच्या) संवादात येत नाही. मी आता बऱ्यापैकी कन्नडमधे बोलू शकते. मी मूळ कन्नड नाही आणि तरी कन्नडमधे बोलत आहे म्हटल्यावर बोलताना काही चुकलं तरी कुणी काही म्हणत नाही. ( म्हणजे अपमान-बिपमान नाही समजत)

बाकी अभि_नव, तुमच्या १ ते १३ मुद्द्यांपैकी काहीच फारसं पटलेलं नाही. पण त्यावर वाद घालण्यात मला स्वारस्य नाही. परदेशात एखादी परदेशी व्यक्ती आपल्याशी आवर्जून हिंदीत बोलली तर तो खरंच खूप छान अनुभव असेल. धागालेखिकेने तो खूप छान शब्दांत मांडलाय. असं असताना आपण तरीही मुद्दाम इंग्रजीत बोलावं हा मुद्दा तुम्ही वारंवार मांडला म्हणून मी वरचा प्रतिसाद लिहिला.

हजारो किलोमीटरचा वगैरे काही संबंध नसतो हो.
मुद्दा एक्स्पोजरचा असतो.
>>
तेच ते. किलोमिटर हा एक्स्पोजरचा एक मुद्दा झाला. अंतर जवळ नाही म्हणुन एक्स्पोजरही नाही.
ब्रिटिशांमुळे व नंतरच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ईंग्लीशचे एक्सपोजर आहे. म्हणुन ईंग्लीश चालेल बाहेरच्या माणसांसाठी.

पण, माझा विरोध हिंदीलाही नाही आणि इंग्रजीलाही नाही
>>
आमचा तरी कुठेय?
इथेही कुणी भाषेला विरोध करत नसुन, भाषेच्या असमान विशेष दर्जाला व त्यामुळे होणा-या अन्यायाला विरोध करत आहे.

आपली मनं मोकळी असली की भाषेचा अडसर (सर्वसामान्य लोकांच्या) संवादात येत नाही.
>>
मी कुठेही, दोन जवळच्या जीवलग मित्रांनी, शेजा-यांनी कोणती भाषा वापरावीं यावर काहीही लिहिलेले नाही. तो इथे विषयही नाही. त्यामुळे आम्ही विरोध करतो म्हणून असा काही भाषेचा अडसर वगैरे काही येत नाही.
तसेच, आम्हाला खरे काय ते पटलेले आहे व म्हणुन आम्ही एखादी गोष्ट लावुन धरतो आहोत म्हणजे आपोआप आम्ही कोणी असंवेदनशील, कोत्या मनाचे वगैरे व तुम्ही सगळे मनमिळावु छान छान गोडु गोडु नागरीक होत नाहीत. जास्तीत जास्त तुम्ही निष्काळजी असाल, तुम्हाला हिंदी अन्यायाकडे कानाडोळा करायचा असेल वगैरे.

मी मूळ कन्नड नाही आणि तरी कन्नडमधे बोलत आहे म्हटल्यावर बोलताना काही चुकलं तरी कुणी काही म्हणत नाही. ( म्हणजे अपमान-बिपमान नाही समजत)
>>
बाहेरच्या माणसाने नवी भाषा शिकताना, त्याच्याकडुन होणा-या चुका व त्याला येणवरे अनुभव याचा व मी मांडत असलेल्या मुद्याचा थोडक्यात संदर्भ स्पष्ट करा. ५ मार्क.

बाकी अभि_नव, तुमच्या १ ते १३ मुद्द्यांपैकी काहीच फारसं पटलेलं नाही. पण त्यावर वाद घालण्यात मला स्वारस्य नाही.
>>
तुम्हाला पटलेले नाही. पटवुन घ्यायचे नाही. त्यावर आणखी प्रश्न विचारायचे नाहीत. वाद घालायचा नाही. भूमिका समजुन घ्यायची नाही. तुमची भूमिका बरोबर असेल तर ती पुराव्यांसहीत पटवुन द्यायची नाही.
पण तुम्हाल आम्ही कसे गोड गोड व तुम्ही विरोधक कसे कोत्या मनाचे असंवेदनशील असे सर्टीफुकट मात्र नक्की वाटायचे आहे.
असे कसे चालेल ताई?

परदेशात एखादी परदेशी व्यक्ती आपल्याशी आवर्जून हिंदीत बोलली तर तो खरंच खूप छान अनुभव असेल.
>>
तो छान नसेल व वाईट असेल असे मी कुठे लिहिले ते दाखवा व हजार रुपये मिळवा.

धागालेखिकेने तो खूप छान शब्दांत मांडलाय.
>>
घागालेखिकेने तो खूप वाईट शब्दांत मांडलाय असे मी कुठे लिहिले ते दाखवा व हजार रुपये मिळवा.

असं असताना आपण तरीही मुद्दाम इंग्रजीत बोलावं हा मुद्दा तुम्ही वारंवार मांडला म्हणून मी वरचा प्रतिसाद लिहिला.
>>
असं म्हणजे कसं? छान शब्दांत? म्हणजे निव्वळ छान शब्दांत त्यांनी अनुभव लिहिला म्हणुन आपोआप हिंदी=भारत गैरसमजातून होणारे नुकसान टाळले जाते का? कसे?

आम्हाला खरे काय ते पटलेले आहे व म्हणुन आम्ही एखादी गोष्ट लावुन धरतो आहोत म्हणजे आपोआप आम्ही कोणी असंवेदनशील, कोत्या मनाचे वगैरे व तुम्ही सगळे मनमिळावु छान छान गोडु गोडु नागरीक होत नाहीत.>>
मी असं कुठे म्हटलंय ते दाखवलंत तर तुम्हालाही माझ्याकडून १० मार्क Happy

<भारतात इतरत्र बनत असलेला स्थानीक मांसाहारी पदार्थ जो तुमच्या नेहमीच्या आहाराचा भाग नाही, तो तुम्हाला कोणी केवळ तुम्ही भारतीय, म्हणुन परदेशात बनवुन खाऊ घातल तर तो विशिष्ट मांसाहारी पदार्थही तुम्ही छान अनुभव म्हणून खाऊन घ्यालच?>
मी जर मांसाहार करत नसेन तर मी तसं सांगेन आणि बहुतेक खाणारही नाही. पण, जर मांसाहार करत असेन, पण मी महाराष्ट्रातली आहे आणि हा विशिष्ट पदार्थ समजा पंजाबी आहे आणि तो पदार्थ अखिल भारतीय आहे असं समजून मला तो खायला घालण्यात येत असेल तर या 'गैरसमजाचा' निषेध म्हणून मी तो पदार्थ नाकारावा? छे, अजिबात नाही.

खूप छान अनुभव. आवडला लेख.

प्रतिसाद वाचून मेहतांनी मराठीत लिहिणे थांबवले नाही म्हणजे मिळवले. कृपया तसे करू नका ही विनंती.

खूप छान अनुभव. आवडला लेख.

प्रतिसाद वाचून मेहतांनी मराठीत लिहिणे थांबवले नाही म्हणजे मिळवले. कृपया तसे करू नका ही विनंती.

Submitted by हर्पेन on 7 August, 2019 - 11:26
Pages

आता तुम्ही काडी टाकू नका
त्या नक्कीच लिहीत राहतील माबोवर

हिन्दी है हम , हिन्दी है हम
वतन है हिन्दोस्ता हमारा हमारा

विसरले असतील काही भारतिय , दुर्लक्ष करायचे अशाकडे

ही काडी नव्हे!

हिन्दी है हम , हिन्दी है हम
वतन है हिन्दोस्ता हमारा हमारा

विसरले असतील काही भारतिय , दुर्लक्ष करायचे अशाकडे >> +१

हिन्दी है हम , हिन्दी है हम
वतन है हिन्दोस्ता हमारा हमारा

विसरले असतील काही भारतिय , दुर्लक्ष करायचे अशाकडे
Submitted by निलुदा on 7 August, 2019 - 12:12
>>
थोडक्यात हिंदी न येणारे व हिंदी अन्यायाला विरोध करणारे समान भारतीय नागरीक नाहीत, त्यांची भाषा पहिल्या दर्जाची नाही असेच ना?
हाच हिंदी अन्याय नाही का?
एका परकीय भाषेच्या अन्यायाबद्दल लिहिण्यामुळे मला इथे अभारतीय ठरवले जाते आहे, ते ही मराठी लोकांकडुन.

ही कवीता केव्हा लिहीली? तेव्हाचा संदर्भ काय होता? गरज काय होती?
आम्ही हिंदी नाही. आमच्या देशाचे नाव भारत आहे.

अभिनव भाऊ 'वादे वादे जायते तत्वबोध: ' हे लक्षात घेऊन कृपया प्रतिसाद थांबवा. इथे लेखिकेला आलेला अनुभव खरंच छान आहे. कदाचित आश्र्चर्यचकित झाल्यामुळे त्यांनी त्या ड्रायव्हरला हिंदी सोडून भारतात अनेक भाषा आहेत हे सांगायला विसरुन गेल्या असतील.

वावे, तुम्ही सही मराठीत करत नाहीत तर ती देवनागरीत करताय. त्या काकांना रोमन सोडून दुसरी कुठलीही लिपी सहीसाठी चालत नाही असे दिसतेय. Happy Happy

रच्याकने, माझी मुलगीही देवनागरीत सही करते. तिच्या पासपोर्टवरसुद्धा देवनागरीत सही आहे. तो वापरून ती राणीच्या देशात फिरून आली पण कोणी सहीबद्दल विचारले नाही. दक्षिणेत जायची वेळ अजून आलेली नाही. या काकांसारखे कोणी भेटले तर मजा येईल.

वावे, तुम्ही सही मराठीत करत नाहीत तर ती देवनागरीत करताय. > हो. पण आपण मराठी ही भाषा देवनागरी लिपीत लिहितो म्हणून मी देवनागरीत सही करते. आपण मराठी भाषेसाठी रोमन लिपी वापरत असतो तर रोमनमधे केली असती. म्हणजे आम्ही त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे मराठी आहे, हिंदी नाही.

Pages