शेती करण्यात अर्थ नाही...

Submitted by मी_अनामिक on 25 July, 2019 - 09:57

पिढीजात आहे म्हणून धंदा करण्यात अर्थ नाही
शेतकरी बाप माझा, शेती करण्यात अर्थ नाही...

बाजारात भाव ठरवणाऱ्यांना एवढेच कळावे
अजून ह्यांना आता पिडण्यात अर्थ नाही...

ज्याच्या दावणीची जनावरं, बायकापोरं उपाशी
त्यास 'जगाचा पोशिंदा' म्हणण्यात अर्थ नाही...

चार-चौघात ज्याची माय निलाम होते
त्याला 'भुमीपुत्र' म्हणण्यात अर्थ नाही...

सदा परिस्थिती खेळे त्याच्या नशिबाशी
गुलामच तो,'बळीराजा' म्हणण्यात अर्थ नाही...

योजना सगळ्या फायलींत अन् कागदोपत्रीच
हत्याच ती, 'आत्महत्या' म्हणण्यात अर्थ नाही...

सदा हात पसरलेले याच्या ना त्याच्या पाशी
याचक म्हणावे, 'दाता' म्हणण्यात अर्थ नाही...

मोत्यांच्या राशींचे छदाम न ठरविता येणाऱ्याला
'अनामिक' ठेवावे, 'शेतकरी' म्हणण्यात अर्थ नाही...

Group content visibility: 
Use group defaults

शेती विकून एफडी करायचा दिडशहाणा सल्ला देणार्याने व्याजदर सांगावे. ६ ते ७ टक्के व्याजदरात काय होणार? मग अधिक व्याजाच्या हव्यासापोटी शेतकरी पतसंस्थेत पैसे ठेवतात व पतसंस्था पुढारी बुडवतात व शेतकर्याकडे काय राहतं?

आणि मुख्य म्हणजे शेती ही आई की कमोडिटी हे एकदा ठरवून घ्यावे, कर्ज मागताना कमोडिटी आणि बुडवताना काळी आई , असला भंपकपणा नको

सुरज थोरात तुमची कविता मनाला भिडली.

@ थॅनोस आपटेमी इथे काहीच कमेंट करणार नव्हते.कारण मला शेती या विषयातले काही practical ज्ञान नाही.तरी तुम्ही मला लक्षात ठेवुन माझी कमेंट येण्याची आगाऊ तक्रार आधीच admin ला केलीत. धन्यवाद!

Black cat this is not right. Majority of farmers are undergoing exploitation by system. For example onion is a only crop of farmers from dry area of Nashik. The rates are made to drop by govt.policy. same with dairy. The profit in farming is very little. The rates of input goes high day by day.

मन्या
मला मेन्शन करण्याची गरज नाही. मी अ‍ॅडमिनकडे जावे किंवा नाही हे तुम्ही सांगू नये. तुम्ही कुणाला विचारून जात होतात ? बरेच दिवस गोंधळ घालणारे अनेक आयडीज असताना अ‍ॅडमिनच्या विपूत तुम्ही या आयडीने जात नाहीत याचा अर्थ न कळंण्याइतके लोक दूधखुळे आहेत असा समज असेल तर शुभेच्छा !

काही लोकांची इतकी बुध्दी आटली की इथे धागा कुणाचा, कविला तक्रार असती तर त्याने केली असती ना तक्रार एडमीन यांच्या कडे. पण मुर्खांना कोण समजावून सांगेल. व अक्कल असेल तर ना.

Pages