पुडिंग- साधे सोपे आणि झटपट

Submitted by 'सिद्धि' on 18 July, 2019 - 08:20

साहित्य :-
गरम केलेले घट्ट दूध- पाउण लीटर
साखर - १/२ वाटी ( साधारण ८-१० टिस्पुन पुरे होते).
अंडी - ३ (पाव लिटर दुधासाठी १ अंड हे माझ प्रमाण आहे).
वेनिला एसेंस - १ टिस्पुन.
आवडत असेल तर केसर 2-3 काडी किंवा वेलची पावडर 1 चमचा.

1563435243418.jpgसजावट साहीत्य (ऐच्छिक) :-
काजू, बदाम, पिस्ते, स्ट्रॉबेरीस, काळ्या/ साध्या मनुका ई.

कृती :-
कोमट दूधमध्ये साखर मिक्स करा, व्यवस्थित मिक्स झाली पाहीजे. आता ३ अंडी व्यवस्थित फेटुन या मध्ये मिक्स करा. वेनिला एसेंस आणि केसर धालुन मिश्रण ढवळुन घ्या. वरुन वेलची पावड भुरभुरुन घ्यावी. हलक्या पिवळसर रंगाचे मिश्रण तयार होईल.

1563435579150.jpg

आता केक करण्यासाठी तुम्ही जो पसरट गोलाकार डब्बा/पातेल वापरत असाल त्यात हे मिश्रण घालुन हा डब्बा कुकर मध्ये ठेवा. मोदक उकडताना आपण जसे पाणी घालतो त्या प्रमाने तळाशी पाणी घालुन १५-२० मिनिट गॅस वरती वाफवुन घ्यावे. हे करताना प्रेशर कुकर ची शिट्टी बाजुला काढुन ठेवा. जमा झालेली वाफ त्यामधुन निघुन जाउदे. पुडिंग घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.

IMG_20190718_131544.jpg
आता तयार पुडिंग सेट होण्यासाठी १-२ तास फ्रीज मध्ये ठेवा.
यानंतर सजावट करुन पुडिंग खाण्यासाठी तयार आहे.

IMG_20190718_131619.jpg टिप :-
* दूध कोमट झाल्यावर वापरास घ्यावे, गरम दूधामध्ये अंडी फोडुन घातल्यास शिजुन अंड्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि काहितरी भयंकर रेसिपी तयार होईल (स्वानुभवावरुन).
* साखर ६-७ टिस्पुन म्हणजे कमी गोड डायबेटीस चा पेशन्ट देखिल खाऊ शकतो असे प्रमान. १० म्हणजे मिडियम गोड. यानुसार प्रमान ठरवता येते.
* वेनिला एसेंस १०० मिली ची बाटली ५०रु च्या आसपास मिळते, पुन्हा ७-८ वेळा वापरु शकता. त्यामुळे जास्त खर्च नाही.
* मिश्रण पातळ असताना कोको पावडर सुद्धा यामध्येच घालु शकता. चोकोलेट ची टेस्ट आणि मस्त कलर येतो. लहान मुल आवडीने खातात.
* या मधुन शरिराला भरपुर कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि प्रोटीन मिळते.
* हि निश्चितच झटपट रेसिपी आहे, फक्त सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो Lol Lol .

IMG_20190718_131517.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुरेख दिसतय! आणि सोपेही आहे.
खरवसाचीही आठवण झाली फोटो पाहून. त्रास आहे.

त्या भयंकर रेसिपिचाही फोटो टाका ना. Wink

@ शाली
- वेळ मिळाला की मग खरवसाची ची एक साधी सोपी रेसिपी आहे ती पण ईथे देते .

- पण त्या भयंकर रेसिपिचा फोटो काढण्याच धाडस मला होईना. Proud खुप दिवस होउन गेले त्याला, फर्स्ट ट्राय होता तो.

कॅरेमल कुठे आहे ह्यात?!

वर्शूचा धागा आठवला.

कॅरेमल व्हॅनिला, चॉकोलेट, केसर वेलची व ड्रायफ्रूट हे प्रत्येकी स्वतंत्र फ्लेवर नोट्स आहेत.

@अमा
साखर वितळू गोल्डन ब्राऊन रंग आल्यावर जे तयार होत तेच कॅरेमल आहे. पण ईथे ते वेगळ मिश्रण बनवण्याची गरज नसते, one step skip केली आहे म्हणुनच तर ही साधे सोपे आणि झटपट रेसिपी आहे.

या पद्धतीने ट्राय करुन बघा नक्की आवडेल.

फायनल प्रॉडक्ट छान दिसतंय. टेक्स्चर मस्त जमलंय.

सोपे हा शब्द पाककृतीच्या नावात आला की इथे रामायण आणि महाभारत दोन्ही होतात.
आणि इथे तर सोपं पुडिंग आहे.

सोप्या खरवसावरूनही मायबोलीवर रामायण झालेलं आहे, तेव्हा तुमची कृती लिहिण्यापूर्वी इथली जुनी कृती शोधून वाचून घ्या.

साखर वितळू गोल्डन ब्राऊन रंग आल्यावर जे तयार होत तेच कॅरेमल आहे. पण ईथे ते वेगळ मिश्रण बनवण्याची गरज नसते, one step skip केली आहे म्हणुनच तर ही साधे सोपे आणि झटपट रेसिपी आहे.>> ताई , मला कॅ रे मल काय ते माहीत आहे. व पुडिंग मध्ये तुम्ही नाव दिले आहे पन कॅरेमल बनवायची स्टेप नाही. पुडिंगच्या बेस ला कॅरेमलचा एक लेयर हवा तो इथे दिसला नाही. नुसते पुडिम्ग मध्ये साखर घातली तर ते गोड झाले पण कॅरेम ल पुडिंग म्हणता येणार नाही. साधे सोपे झटपट पुडिंग असे नाव देता येइल कदाचित. नो वरीज. कॅरेमलचा एक खमं ग वास व छान ब्राउन लेयर अस्तो तो मला जाम आवडतो. इथे खूप ठिकाणी मिळते.

देवकी-अंड्याचा वास येतो का?
नाही.

भरत - धन्यवाद लिंक दिली बर केलंत.

Sorry अमा. तुम्हाला जो प्रश्न पडला की यात केरेमल कुठे आहे ? इतरांना ही तोच प्रश्न पडू शकतो म्हणून मी ते केरेमल च एक्सप्लेन केलं आहे. बाकी काही नाही.

तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे रेसिपी आहे मा.बो. वर म्हणून मी इथे थोडी वेगळी रेसिपी पोस्ट केलेली आहे

हे कॅरामल पुडिंग नाही. यात कॅरामल नाहीय.
कुकरमधून काढून फ्रीज मध्ये गार करत ठेवायच्या आधी यावर साधं साखर वितळवून केलेलं कॅर्‍आमल तोतायचं मग पुढे गार करायचं.
किंवा सेट कराय्च्या आधीच भांड्याला कॅरामल कोट करून मग सेट करायचं... ते कॅरामल पुडिंगम्हणता येइल... Happy
(अर्थात शुगर कॅरामलाझ करतांना जपून. जाड बुडाचं नॉनस्टिक पॅन आणि अगदी कंट्रोल्ड आच याचं गणित जमायला हवं, नाहीतर ती साकहर फार पटकन जळते आणि कॅरामल ला जळकट वास लागतो.)

वर्षू.दी ने लिहिलेलं कॅरॅमल पुडिंग आहे,तुम्ही दिलेलं सोपं/झटपट पुडिंग म्हणता येईल. शुगर कॅरॅमलाईज्ड केल्याशिवाय कॅरॅमल पुडिंग कस म्हणणार?

व्हॅनिला, केशर आणि वेलदोडा शिवाय कोको पावडर हे सगळे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. तुमच्या स्टेप्स मध्ये either or लिहायचं राहिलं बहुतेक, त्यामुळे सगळ्या फ्लेवर्सची भेळ झाल्यासारखी वाटते आहे

हे कॅरॅमल पुडिंग आहे आणि हे असच बनवलं जातं कारण हे झटपट तयार होत.
पण काही जाणकारांचे मत ग्राह्य धरुन मी नावात बदल करत आहे. कारण विषयाला फाटे नकोत त्याने धाग्याची वाट लागते.

तुम्ही दिलेल्या सुचने बद्दल धन्यवाद - योकु,अमा आणि मीरा.

मीरा, हाय, हा हा, माझी आठवण काढल्या बद्दल धन्यवाद, मला माझी रेसिपी only for members, criteria मधून काढून पब्लिक करायचीये पण optionच दिसत नाहीये ीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीी

वर्षु आधी ते फोटो पुन्हा टाक बरं म्हणजे निदान करता येईल माझ्यासारख्या “ढ” लोकांना.
ही रेसिपी पण छान (आणि वेगळी नाॅन कॅरामल Wink ) आहे.

हे कॅरॅमल पुडिंग आहे आणि हे असच बनवलं जातं कारण हे झटपट तयार होत. >>>> शुगर कॅरॅमलाईज न करता कॅरॅमल पुडिंगच म्हणायचं का? बरं चालेल

हे आज करुन पाहीले. पण वर्षूतैच्या पध्दतीने. जरा गडबडले पण टेस्टी झाले होते. फोटो क्रमवार आहेत. एक पीस, मग दुसरा पीस असं संपवत फोटो काढलेत. Lol
83B67E53-4D03-4B9C-9579-7F93A18E92CF.jpeg

शुगर कॅरॅमलाईज न करता कॅरॅमल पुडिंगच म्हणायचं का? बरं चालेल>>> मलाही तेच वाटलं .
वैशाली ताई , भारी कलर आला आहे कॅरेमलचा .

@भरत, ते सोपे पुडिंग पाहता येत नाही कारण मला परवानगी नाही. कोणी टाकेल/सांगेल का ती सोप्या पुडिंगची रेसिपी.

वर्षूताईची रेसेपी आहे तशी डकवतोय.

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)
क्रमवार पाककृती: 
ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .
कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.

आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.

कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.

आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 
हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

चंपा, पाककृती आणि आहारशास्त्र ग्रुपचं सदस्यत्व घ्या.
https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes
पूर्ण धागा वाचल्याशिवाय पुडिंगला हात घालू नका.

मायबोलीवरच्या क्ष धाग्यातल्या रेसिपीने केलेल्या पदार्थाचा फोटो य धाग्यावर टाकणे - नॉट डन !

कातील !!!!
फोटो पाहुन च तों. पा.सु.
बायकोला कराय्ला सांगतो आता हे प्रकरण Wink

चंपा, मी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
(पीसीवरून येत असाल तर) उजवीकडे मोठ्या आणि ठळक अक्षरांत ग्रुपचं नाव दिसे ल. त्याच्या थोडं खाली "या ग्रुपचे सभासद व्हा" असं लिहिलेलं दिसेल . त्यावर क्लिक करा.

लिंकवर जायचीही गरज नाही. याच पानावर अगदी वर उजवीकडे सभासद होण्याचा मार्ग दिसेल.

धन्यवाद भरत. तुम्ही म्हणताय तसं मोबाईलवरून काही दिसत नाही सभासद होण्याचा पर्याय. सोमवारी ऑफिसमधून प्रयत्न करते.

युरेका Happy झाले एकदाची सभासद. फोटो दिसत नाहीत पण चालतंय. तूम्ही सांगितल्याप्रमाणे धागा वाचून काढते. मनोरंजनाची खात्री आहे. खरवस धागा मी वाचला होता Wink