पत्रिकेतील गुण Milan aani वैवाहिक जीवन कसे असेल , चांगले की वाईट ह्यावर विश्वास ठेवावा का?

Submitted by manasi0987 on 14 July, 2019 - 05:54

पत्रिका ही कितपत विश्वासार्ह आहे लग्ना मध्ये किंवा इतर आयुष्यातील प्रश्नांमध्ये ? अनुभव असल्यास कृपया सांगावे.म्हणजे माझ्या भावाची आणि मुलीचे १३ गुण जुळतात पण तिला मंगल आहे व त्याला नाही तसेच त्याचे आश्लेषा नक्षत्र आहे व भाकूत मध्ये ०\७ गुण आहेत.ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) सर्वप्रथम तुमचा भाऊ लग्नाचा आहे आणि त्यास मंगळ नाही. मुलीस मंगळ आहे व कुणी ज्योतिष शास्त्रानुसार किंतु उपस्थित केल्यावर तुम्ही साशंक झाला आहात - हे लग्न करावं का नाही. अशा परिस्थितीत करू नयेच. भले कुणाच्या तर्काने मुलाचा मंगळ तृतियात आहे चालेल म्हटले तरीही संदिग्ध वातावरणात नकोच.
२) पत्रिका दोन्हीकडून पाहिलीच गेली नाही तर आनंदी वातावरणात कार्य चांगले पार पडते. शिवाय नंतरही कुणी हा प्रश्न काढला तरी दोघांनी एकमेकास पाहून, बोलून पसंत केलंय. काही काळजी राहात नाही. शिवाय कुणाला पुढच्या साठसत्तर वर्षांचं विधिलिखित लिहून दिलेलं असतं?
३) एकदा का पत्रिका पाहिलीच की अमुक एक ज्योतिष्याचा निर्णय जो काही असेल तेच करू हे ठरवून टाका. पुन्हा सेकंड ओपिनिअन ही भानगड नको.
४) होणाऱ्या जोडप्याने अगदी ठामपणे ठरवले तर आनंद निश्चित.
५) ज्योतिष गुणमिलन ,पत्रिका जुळणे हे वाद आपल्यावर शेकत नसताना चर्चा करण्यासाठी असतात.

मी स्वत:ला फारच पुढारलेला वगैरे समजत होतो. मी एकच मुलगी पाहिली व पसंत केली. पत्रिका वगैरे थोतांड मानत होतो व आताही तितका विश्र्वास नाही. तरीही मी माझ्या पत्रिका तीन नामवंत ज्योतिषांकडून करवून घेतल्या आहेत. पत्नीची पत्रिका मला हवी वाटू लागली कारण मला थोडेफार त्यातले कळायला लागले. ती म्हणाली माझी पत्रिका गहाळ झाली आहे. मग मी तिची खरी जन्मतारीख व जन्मवेळ विचारून पत्रिका बनवली. तर तिचा जन्म अमावस्येचा असून ग्रहमान बरेच खराब आहे हे समजले. पण मला वाईट वाटले नाही. पण मनात शंका मात्र येते की यांना माहित होते म्हणूनच पत्रिका दाखवली नसेल.
पत्रिका वगैरे न मानता लग्न केले तर काहीही फरक पडत नाही. Srd यांच्याशी पुर्ण सहमत.

मनात शंका मात्र येते की यांना

मनात शंका मात्र येते की यांना माहित होते म्हणूनच पत्रिका दाखवली नसेल.
- वाईट वाटण्याची काही गरज नाही. प्रेम विवाह असतात तेव्हा काय होत असते ? आवडणे हे एकच क्रियापद सर्वोत्तम सर्वात महत्तवाचे.
प्रत्येकाची स्वत:ची कुंडलीच ठरवत असते त्याच्या भाग्यात कोणकोणती सुखदु:खं आहेत. ती जुळवून लादता येत नाहीत. आणि अशी जुळवण्याचा ज्योतीष शास्त्रात आधार मानणे म्हणजे त्यांचेच शास्त्र त्यांच्याच अनुमानास मारक नाही काय? ( सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी.)

खान99, तीनही पत्रिका सारखेच सुचवतात की वेगवेगळे? आतापर्यंतचे आयुष्य व पत्रिका यांचा मेळ जुळतोय का? सहज उत्सुकता म्हणून...नाही सांगितलेत तरी चालेल.

तुमचे आतापर्यंतचे सहजीवन सुखात गेले की त्रासात? सुखात असेल तर मग पत्रिका आता पाहून ती चांगली की वाईट का बोलावे?

मुलाची पत्रिका वाईट असल्यामुळे लग्नाच्यावेळी 'आमचा विश्वास नाही अशा गोष्टींवर, म्हणून पत्रिका पाहणार नाही, मुलाची जन्मवेळ सांगणार नाही' अशी मखलाशी करून लग्नानंतर सुनेकडून तिची जन्मवेळ विचारून तिची पत्रिका बनवून तपासणारे प्रत्यक्ष पाहिलेत. ते लग्न लवकरच तुटलेही.

लग्नानंतर आरोग्य, नोकरीधंधा,परदेशगमन इत्यादी कारणांसाठी पत्रीका काही सांगतेय का म्हणून पाहयला काहीच हरकत नाही.

बाकी मुलाचे सप्तम स्थान आणि मुलीचे चतुर्थ स्थान याचा आढावा नंतर घेण्यात काहीच उपयोग नसतो. आणि कुणी अगोदरच घेऊन कुंडल्या नाकारत राहिल्यास सोळा टक्के मुलामुलींची लग्नेच होणार नाहीत.

प्रत्येकाची स्वत:ची कुंडलीच ठरवत असते त्याच्या भाग्यात कोणकोणती सुखदु:खं आहेत. ती जुळवून लादता येत नाहीत. आणि अशी जुळवण्याचा ज्योतीष शास्त्रात आधार मानणे म्हणजे त्यांचेच शास्त्र त्यांच्याच अनुमानास मारक नाही काय?>>>>>

पहिल्या भागाशी सहमत. पण ज्योतिषी जुळवत नाहीत, असे जुळवणे शक्य नाही, कोणी जुळवून देतो म्हणत असेल तर तो फसवतोय असे खुशाल समजावे. ज्योतिषी जुळेल का नाही, जातकाच्या नशिबी विवाहसुख आहे की नाही एवढेच सांगू शकतो, त्याचा अभ्यास किती आहे ही मर्यादा आहेच.

पत्रिका बघितल्यामुळे लग्नकरी सुखाने संसार करतात व न बघणारे दुर्दैवी ठरतात असे काहीही नाही. जो तो आपले प्रारब्ध घेऊन येतो, त्याप्रमाणे आयुष्य जाते. मग ते ज्योतिषाकडे जाऊन वाचून घ्या किंवा घेऊ नका. ते बदलायचे नाही. ज्योतिषी बदलू शकला असता तर त्याने सर्वप्रथम स्वतःचेच आयुष्य बदलून घेतले असते.

Manasi0987 , तुम्ही प्रश्न विचारताना ज्योतिषास आवश्यक ती जन्मतारीख, वेळ इत्यादी माहिती दिली नाही, त्यामुळे इथे ज्योतिष जाणणारे कुणी असतील तर ते मदत करू शकत नाहीत. तुम्हाला भावाविषयी काळजी वाटत असेल तर चांगला ज्योतिषी गाठून पत्रिकेत विवाहसुख आहे का व कितपत हे जाणून घ्या. जर चांगले असेल तर जी मुलगी त्याला योग्य वाटेल तिच्याशी खुशाल लग्न लावा, आयुष्य सुखातच जाईल. जर विवाहसुखात अडचणी असतील तर कितीही पत्रिका जुळल्या तरी उपयोग नाही. पत्रिका जुळवणे किंवा जुळणे तसेही काही उपयोगाचे नाही.

साधना जी पत्रिका सारख्याच आहेत,पण अजून जाणून घेण्यासाठी तीन काढल्या. सहजीवन छान आहे. पत्नी खूप समंजस, कष्टाळू, सुगरण आहे व धार्मिक असून अन्नदान करायला तिला आवडतं. मी ही पत्रिकेची गोष्ट मनातच ठेवली आहे. कुणाला बोललो नाही की दोषारोप केलेले नाहीत. सासूरवाडीशी संबंध छान आहेत.

वती म्हणाली माझी पत्रिका गहाळ झाली आहे. मग मी तिची खरी जन्मतारीख व जन्मवेळ विचारून पत्रिका बनवली. तर तिचा जन्म अमावस्येचा असून ग्रहमान बरेच खराब आहे हे समजले. पण मला वाईट वाटले नाही. पण मनात शंका मात्र येते की यांना माहित होते म्हणूनच पत्रिका दाखवली नसेल.>>>>> तुमच्या म्हणण्यात अंशतः तथ्य आहे. तुमचा लग्नाच्यावेळी खरोखरच दृढ विश्वास असता तर तुम्ही बायकोच्या पत्रिकेचा आग्रह धरला असतात. नंतरच्या काळात तुम्हाला उत्सुकता निर्माण झालि. जर समोरच्याचा पत्रिका पहाण्याचा आग्रह नाहि तर स्वतःहून कशाला दाखवायची. उगीचच डोक्यात किडा निर्माण होण्याची शक्यता असते.

खान९९ किंवा यांनी व्यक्त केलेल्या शंका बऱ्याच जणांना येत असतात.
पण कुणीही अगोदर पत्रीका बघीतली नाही असा विचार आणूच नये असं माझं मत.
अगदी ज्योतिषी माणसाच्या कुटुंबातही ,नात्यातही फारशी चांगले ग्रह किंवा वाईट ग्रहयोगावरही जन्म होत असतातच. अशावेळी लूईस-डकवर्थ नियमांना शरण जावे लागतेच.

शकुन अपशकून, श्रद्धा/ अंधश्रद्धा, रितीरिवाज पाळणारे सर्वसामान्य लोक स्वत:ला सुधारलो आहे असे समजत असले तरी जेव्हा संकटे येतात तेव्हा ज्योतिषी गाठणे, व्रत वैकल्ये करण्याकडे वळतात हे मी पाहिलं आहे. परिस्थिती माणसाला दोलायमान करते हे माझं मत आहे.

पत्रिका ही कितपत विश्वासार्ह आहे लग्ना मध्ये किंवा इतर आयुष्यातील प्रश्नांमध्ये ? अनुभव असल्यास कृपया सांगावे >>> बाकी लोकांसारखं मीबी थोडं ज्ञानामृत पाजळणार होतो इत पण अविवाहित असल्याने धाग्याचे गुणमिलन, पत्रिका जुळवणे आणि वैवाहिक जीवनाचा अनुभव ह्या निकषात म्या बसत नाय त्यामुळे ब्रेक लावला हाताला

खरा घडलेला किस्सा आहे.मुलीचे वडील उत्तम ज्योतिषी होते.गुणमिलनामुळे मुलीचे लग्न लावले.मुलगी २-३ वर्षांत विधवा झाली.पुढे तिने, स्वतःच्या मुलाच्या लग्नावेळी पत्रिकेचा अजिबात विचार केला नाही.मुलीकडच्यांना म्हणाली"तुम्ही हवी तर पत्रिका पहा.मला पहायची नाही.पत्रिका पाहूनच माझे लग्न झाले होते. काय झाले?" नशिबात घडणार्‍या गोष्टी जर घडतच असतील तर अज्ञानी रहाण्यासारखे सुख नाही.

स्वभाव व विचार जुळतात का नाही हे पाहण्यासाठी पत्रिका नक्की पहावी.

उदाहरणार्थ मीन राशीच्या व्यक्तींचे सिंह, कन्या व तूळ राशीबरोबर फारसे जमत नाही. त्यामुळे मीनवाल्यांनी वरील ३ राशीच्या व्यक्तींशी विवाह करू नये.

तरीही किती अज्ञानी आहोत हे जाणून घ्यायची तळमळ असल्यास?>>>>> ज्ञान प्राप्त करावे.चॉईस आपापला! अर्थात तेही ज्ञानार्थीच्या नशिबात असल्यासच घडेल. Wink

माझाही आधी ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता...पण सध्या लग्नाच वय आहे आणि घरचेही मागे लागलेत म्हणून एका गुरूजीकडे गेलेलो...

त्यांनी जन्मवेळ आणि ठिकाण विचारले..आणि भराभर सगळी माहीती सांगितली..

त्यात भुतकाळातल्या काही घडलेल्या घटनाही सांगितल्या..सध्या काय चाललयं...हे ही सांगितलं..इतकचं कशाला मुलगी कुठली असेल आणि आमचा संसार कसा असेल हे ही सांगितलं..

वर्तमान आणि भूतकाळ इतकं अचूक सांगितलं की, आपसूकच माझा त्यांच्यावर विश्वास बसला..

आणि गुरूजी पैसे वैगेरे काही घेत नाही फक्त मार्गदर्शन करतात...
आणि चांगले सुशिक्षित आहेत आणि RBI मध्ये जाॅबला आहेत..

@ अजय चव्हाण
नाव सांगू शकाल का त्या गूरूंजीचे??माझे काका पण आरबीआय मुंबई त कामाला होते.

मलाही एका मुलीबरोबर लग्न करायचं होतं अगदी पक्के होते, पण मानापमान नाट्यामुळे लग्न व्हायचे रहित झाले. त्यानंतर खूप वर्षांनी एका ज्योतिषांनी हात पाहून सांगितले की तुमच्या आयुष्यात अशी कुणी मुलगी होती का जिच्याशी तुम्ही लग्न करणार होते? मी हो म्हणालो. तर ते म्हणाले वाचलात. ते लग्न मुळीच टिकलं नसते आणि सहा महिन्यांत घटस्फोट घ्यावा लागला असता. विशेष म्हणजे त्यांनी तिचे वर्णन हुबेहूब केले होते.

पत्रिकेवर विश्वास ठेवला की मग ती तयार करणाऱ्या ज्योतिषावर विश्वास ठेवावाच लागतो. जर ज्योतिषावर विश्वास ठेवला तर मग त्याने पत्रिकेत सांगितलेली बलस्थाने आणि दोष यावरही विश्वास ठेवावा लागतो. पत्रिकेत दोष आहे हे जर पटत असेल तर त्यावर ज्योतिषाने सुचवलेल्या उपायांवर, विविध विधींवर विश्वास ठेवावा लागतो. जर त्या विशिष्ट विधींवर विश्वास आहे याचा अर्थ तिर्थक्षेत्रांवर व पर्यायाने देवावर विश्वास ठेवावा लागतो. जर देवावर विश्वास ठेवला तर मग इश्वरभक्ती आणि त्यामागोमाग भक्तांवर व संतांवर विश्वास ठेवावा लागतो. जर संतांवर विश्वास ठेवला तर मग त्यांच्या शिकवणूकीवर विश्वास ठेवणे भागच आहे. आणि ज्ञानेश्वर-तुकोबांपासुन रामदासांपर्यंत कोणत्याही संतांनी "ज्योतिष, मुहूर्त, पत्रिका या सारख्या गोष्टींचे कधीही समर्थन केले नाही. त्यांनी नेहमी हेच सांगितले आहे की "प्रारब्ध कुणालाही चुकले नाही. मग तो इश्वरी अवतार असला तरीही."
जर प्रारब्ध टळत नाही तर मग पत्रिका कशाला पहायची? Happy

शाली जी मी इथे नमूद करतो की, महान विभूती टेंबे स्वामी यांनी अनेक दु:खित भक्तांना/ लोकांना मंत्रजप, अन्नदान असे अनेक उपाय सुचवुन प्रारब्ध भोगणे सुकर केले होते. प्रारब्ध टाळू शकत नाहीच. पण ज्योतिषाने पुर्वकल्पना येते. पुढे खड्डा आहे हे समजल्यावर मनुष्य सावध होऊन खड्डा ओलांडून जाईल पण माहीत नसेल तर खड्ड्यात पडेल. हेमावैम.

@अजय चव्हाण , अहो गुरुजी नका म्हणू त्यांना,वेगळच डोक्यात येत. जाणकार/अभ्यासक म्हणा.
संतांनी ह्या गोष्टी न सांगायचे कारण वेगळे होते. या संतांचा हेतू लोकांना अंधश्रद्धा,कर्मकांड यांतून बाहेर काढून ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवण्याचा होता. ह्या आणि असल्या इतर शास्त्रावरील त्याकाळात ठराविक लोकांची मक्तेदारी आणि त्यातून होणारी पिळवणुक यावर लिहायचं झालं तर मोठा प्रबंध होईल आणि जातीभेदावर चर्चा वळेल ती वेगळीच. टेम्ब्ये स्वामी सुद्धा वर्णाश्रमाचे कट्टर समर्थक होते पण त्यांची त्यामागील भूमिका कोणत्याही रॅशनालिस्टना कधीच पटणार नाही. मला पण नाही बऱ्याचदा पटत.

मी हो म्हणालो. तर ते म्हणाले वाचलात. ते लग्न मुळीच टिकलं नसते आणि सहा महिन्यांत घटस्फोट घ्यावा लागला असता>>>

तुमच्या नशिबी विवाहसौख्य होते, त्यामुळे हा योग परस्पर टळला. Happy Happy

जिद्दू जी मी प्रत्येक महापुरूषाकडून चांगली शिकवण घेतो. समर्थांनी दासबोधात उघड उघड इतर जातींचे लोक गुरू बनल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. टेंबे स्वामी जरी संन्यास धर्म व वर्णव्यवस्थेचे काटेकोर पालन करीत असले तरी कुणालाही कमी लेखले नाही. सर्वांचे हितच पाहिलं. उलट ब्राह्मण जर नितीनियम सोडून वागत असतील तर त्यांना कठोर भाषेत समजावलं होतं.

बरोबर साधना जी. प्रेम वगैरे नव्हते फक्त नात्यातील होती व ही यालाच द्यायची एवढं वडीलधाऱ्या लोकांचं मत होतं.

खानसाहेब मी ते जातीभेद करायचे असं नाही म्हणत. ज्यांच्या चिंतनाने रोज दिवस सुरु करतो त्यांना असा दोष का देईल मी ? ते आलेल्या प्रत्येकाचे हितच पाहायचे पण तेच काय दुसरे दत्तावतार नृसिंह स्वामी हेसुद्धा कडक पालन करायचे वर्णाश्रमाचे. आता त्यांची यामागील भूमिका मला माहित आहे पण कोणत्याही रॅशनॅलिस्टना हि भूमिका कधी पटणार नाही हे सांगतोय मी.

मी खरंतर इथे लिहिणार नव्हते.कारण मला याबाबतीत अनुभव नाही. तरी लिहितीये. चुभुदेघे आणि हेमावैम. Happy

आपण जेव्हा कुठल्या जोतिषीकडे पत्रिका घेऊन जातो. तेव्हा आपल्या मनात भविष्यात चांगले होईल, ही आशा आणि भुतकाळाला गाठीशी धरुन त्याचे संबंध परस्पर वर्तमानाशी जोडुन निर्माण झालेल्या शंका. ह्या घेऊनच जातो.आपल्या नकळत आपणच आपली माहिती त्यांना देत असतो.
त्याच माहितीच्या आधारावर ते आपल्याला तटस्थपणे counselling करत असतात.आणि वाईट परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी विश्वास देतात. Light 1

हेच काम आपल्याकडे एक counsellerही करत असतात.पण ते आपल्याला आपण निराश आहात. याची जाणिव करवुन देतात. तसे ज्योतिषाकडे गेल्यावर न होता ज्योतिषी फक्त परिस्थितीतुन बाहेर पडायला मार्ग दाखवतात. Happy

त्याच माहितीच्या आधारावर ते आपल्याला तटस्थपणे counselling करत असतात.आणि वाईट परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी विश्वास देतात>>>>

ज्योतिषी म्हणजे फक्त कोन्सलर नाही.

ज्योतिषी विद्येचा चांगला अभ्यासक हवाच पण तो चांगला कौंसेलरही असावा लागतोच. जातकाच्या पत्रिकेत पुढे खड्डा दिसत असला तरी तसे थेट न सांगता आडवळणाने सांगून त्याची मानसिकता तयार करणे हे ज्योतिषाला नीट जमले तरच तो उत्तम ज्योतिषी. नाहीतर पोपटाचा डोळा पाहणाऱ्या अर्जुनासारख्या निष्ठेने अभ्यास करून कोणीही ज्योतिषी बनू शकतो. बरेचदा जे अचूक ज्योतिष सांगतात ते अध्यात्माचे उपासक असतात, अनुग्रहित असतात असे बघितलेय, वाचलेय.

एखादा ज्योतिषी/जाणकार/अभ्यासक/गुरुजी वगैरे हे किती पाण्यात आहेत हे पाहण्याचा माझा हुकुमी एक्का -
"तुम्ही जुळ्या मुलांची कुंडली कशी बघता ?" ह्या प्रश्नाला जो समाधानकारक उत्तर देतो त्याला मी माझा अँप्रुव्हड चा स्टॅम्प मारतो मग भलेही त्याची प्रेडिक्शन लेवल कमी असो.

"तुम्ही जुळ्या मुलांची कुंडली कशी बघता ?" ह्या प्रश्नाला जो समाधानकारक उत्तर देतो त्याला मी माझा अँप्रुव्हड चा स्टॅम्प मारतो मग भलेही त्याची प्रेडिक्शन लेवल कमी असो.>>>> मग मिळाल का कोणाकडून समाधान्कारक उत्तर?

आहेत कि काहीजण .... छन्द म्हणूनच करतात ते ज्योतिष. नगरमध्येच एक आहेत ज्यांकडे मी स्वतः शिकलो थोडंफार. खरे नियम पुस्त्नकांत नाही सापडत. साधरणतः एका तासाला कुंडलीत लग्न बदलतं मोठ्या अंतरापर्यंत अक्षांश-रेखांश बदलत नाहीत त्यामुळे तेवढ्या काळात जी पोरं जन्म घेतात त्यांची कुंडली सारखीच असणार. हा साधासरळ विचार लोक करत नाहीत.
आता प्रत्येकाची वाढ वेगळ्या परिस्थितीत होते त्यामुळे ते सोडून देऊया. पण जुळ्या मुलांचा जन्म एक मिनिट ते काही मिनिटांच्या फरकाने होतो. आता सिझेरियन मध्ये तर अजून कमी वेळ लागू शकतो पण पहिला श्वास हि जन्मवेळ धरली तर १-५ मिनिटानंच ग्याप धरू. हि पोरं जवळपास पंधरा वर्षंतरी बरोबरच वाढतात मग त्यांची कुंडली कशी बघणार ? दोन-तीन दिवस वाट पाहू इथं कोणी तद्न्य असेल तर, नाहीतर मी हिंट देईलच.

जुळ्यांच्या कुंडलिवरून आठवले. माझ्या ऑफिसात आयडेंटिकल ट्विन्स होते. दोघेही सीए, दोघेही दोन वेगवेगळ्या खात्यात होते, त्यातला एकजण माझ्या खात्यात होता. एकाचे लग्न त्याने कॉलेजात असतानाच ठरवले होते. दुसऱ्याने ऑफिसात बायको शोधली. पहिल्याचे लग्न आधी झाले. वर्षाने दुसऱ्याचे. पहिल्याची बायकोही लगेच आमच्या ऑफिसात लागली. साधारण 2-3 वर्षे नोकरी करून तो दुसरा नोकरी सोडून दुसरीकडे गेला, सोबत त्याची बायकोही गेली. पहिला प्रयत्न करत होता, यश येत नव्हते. मला हे माहीत असल्याने मी एकदा सहज चौकशी केली तर म्हणाला 'डेस्टिनी है मॅडम, हम दोनो एक साथ तलाश कर रहे थे, लेकीन उसे मिली, मुझे नही'. शेवटी मिळाली एकदाची व हा बायकोसकट सोडून गेला, ती प्रेग्नन्ट होती म्हणून तिने ब्रेक घेतला. सहा महिन्यात याने नवी नोकरी सोडून भावाच्या कंपनीत जॉईन झाला. त्यानंतर एका वर्षात तो दुसरा परदेशी गेला बायकोसकट, तेही लाम्ब कॅनडात. सध्या तो तिकडेच आहे, हल्लीच त्याला जुळी मुले झाली.

'डेस्टिनी है' हे उद्गार ऐकले तेव्हा पहिल्यांदा हसायला आले. दोघेही ऐडेंटिकल ट्विन्स, जन्मात काही मिनिटांचा फरक असला तरी काँसिव्ह एकत्र झाले. तरीही दोघांच्या आयुष्यात इतका फरक? शिक्षण सारखे व एकत्र सुरू होऊन एकत्र संपले. पण त्यानंतर सगळे वेगळे. दोघांच्या आयुष्यात स्त्री वेगवेगळ्या वेळी आली, लग्ने वेगळ्या वेळी झाली, मुलांचे जन्म वेगवेगळ्या वेळी. सुरवातीला दोघे एकत्र जन्मस्थळ सोडून मुंबईत आले पण त्यानंतर एक सात समुद्रापार व एक इथेच.

ज्योतिष व भविष्यावर विश्वास नसलेल्यांसाठी ही क्लासिक केस, पत्रिका सारख्याच असल्या तरी आयुष्ये वेगळी. काय ज्योतिष सांगणार...

तर विश्वास असणारे लोक जातकाची पूर्वसंचिते पत्रिकेवर किती परिणाम करतात हे दाखवणारी ही क्लासिक केस आहे म्हणतील. Happy Happy

सोडून द्या .
आपल्यापुरतं भाकित बरोबर येतं का एवढंच बघायचं.

इथं एक मुद्दा मांडता येईल कदाचित तो गैरलागू वाटू शकेल.‌ प्रत्येक जीव हा आपलं पुर्वसंचित (प्रारब्ध) बरोबर घेऊन आलेला असतो. त्यामुळे त्याचं भविष्य वेगळे आहे. त्रिकालज्ञानी महापुरुषांनाच केवळ भूत भविष्य शंभर टक्के बरोबर सांगता येईल. पण ते सापडले पाहिजेत आणि त्यांनी सांगितले पाहिजे.

Pages