यंदा कर्तव्य आहे?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 August, 2013 - 03:49

मनोगत
काय! तुम्ही पण अंधश्रद्धाळूच की राव ! लग्नाला एक तप पूर्ण झाल्याचे निमित्त म्हणा औचित्य म्हणा साधून हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय मी व्यक्त केल्यावर आमच्या एका स्नेहयांनी ही प्रतिक्रिया दिली. मला मोठी गंमत वाटली. मुहूर्त या प्रकाराविषयी मानसिकता अशी पण रुजत गेली त्याचा हा आगळा वेगळा पैलू. अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते.

आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही. म्हणूनच विवाह ठरवताना पत्रिका बघावी की नाही? हे कोणी अमुक प्रसिद्ध व्यक्ति सांगते म्हणून न ठरवता संबंधितांनी स्वत: पत्रिका बघण्याची, जुळविण्याची पद्धत समजून घेउन मगच ठरवावे एवढीच या पुस्तकाच्या निमित्ताने नम्र विनंती.

प्रकाश घाटपांडे
prakash.ghatpande@gmail.com

सदर पुस्तक आता आपल्याला खालील लिंकवरुन डाउनलोड करुन घेता येईल.
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/yanda%20kartavya%20aahe.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाश राव, पुस्तक छान आहे. वाचते आ हे. प्रीती ष डाआष्टक योग बद्दल जास्त माहिती दे णार का? un wittingly I was at the receiving end of such a yog. so just want to know more about this. I have not downloaded the book it just opens and one can read it as it is.

समजा तुमची जन्मरास मेष आहे व तुम्हाला सांगून आलेल्या जोडीदाराची रास कन्या आहे. मेषेपासून कन्या रास ६ वी येते. कन्येपासून पुढे मोजल्यास मेष रास आठवी येते. सहा-आठ म्हणजे षडाष्टक. पत्रिकेतील षष्ठ स्थान ह शत्रूचे आणि अष्टम स्थान हे मृत्यूचे आहे. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. ज्योतिष्यांचे एकूण धोरण काय तर विवाह या गोष्टीसंबंधात मंगळ, मृत्यूषडाष्टक, एकनाड असे काहीतरी प्रश्न वा अडचणी आपणच आधी निर्माण करायच्या व आपणच त्याला 'शास्त्राधार` देउन मार्गदर्शन करण्याचा आव आणायचा व स्वत:च्या तुमड्या भरायच्या. काही षडाष्टकांमध्ये दोन्ही राशीचे राशीस्वामी एकच असतात किंवा त्यांची मैत्री असते अशावेळी ती षडाष्टके मृत्यू षडाष्टके न होता प्रीती षडाष्टके होतात व ती ग्राहय धरली जातात. उदा. मेष पासून आठवी रास वृश्चिक त्यामुळे षडाष्टक झाले पण दोहोचा राशीस्वामी मंगळ हा एकच असल्याने मृत्यू षडाष्टक ही विसंगती होईल म्हणून हे झाले प्रीती षडाष्टक. बालकथेतले काही राक्षस मुलांना आवडतात कारण ते त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. थोडे शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो तो मजा जिनेका और भी आता है। अस हे प्रीती षडाष्टक

<<स्थळ व्यावहारिक दृष्ट्या नाकारायचे असल्यास पत्रिका जुळत नाही असे सांगणे हे उभयपक्षी सोयीस्कर असते >> हे मात्र एकदम खरे आहे. नकार द्यायला काहीतरी कारण तर पाहिजे आणि पत्रिका बघून ठरलेली लग्न सुद्धा घटस्फोटा पर्यत जातात Happy

६ फेब्रुवारीला अनुरुप चा एक कार्यक्रम पुण्यात झाला. धास्तावलेल्या वरमाया व अचंबित वर .कार्यक्रमाला बहुसंख्य विवाहेच्छुक वधुवरांचे पालक आले होते. त्यात सुरुवातीला अनेक लोकांनी प्रश्न विचारले. एकाने प्रश्न विचारला विवाहाच्या वेळी पत्रिका पाहणे कायदेशीर आहे का? गौरी कानिटकर या अनुरुपच्या संचालक. त्यांनी सांगितले कि विवाहाच्या वेळी पत्रिका पहाणे हे कायदेशीर नाही. पण बहुसंख्य लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात. तो त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे. यावर ते पत्रिकेचे गौडबंगाल असा कार्यक्रम घेणार आहेत. ज्योतिषी विजय केळकर कार्यक्रमासाठी येणार आहे.
यंदा कर्तव्य आहे या पुस्तकाच्या प्रकाशना वेळी अनुरुपचे महेंद्र कानिटकर यांना परिसंवादासाठी बोलावले होते.त्या वेळी पण त्यांनी हेच सांगितले होते. आता जवळपास याला १० वर्षे झाली. सामाजिक परिस्थितीत फारक पडलेला नाही. तो इतक्या लवकर पडणार पण नाही. पत्रिकेला अवास्तव महत्व देउ नका, खर तर महत्वच देउ नका अशी भूमिका विवाह संस्था घेउ शकत नाही कारण तो त्यांच्या व्यवसाय नीतीचा भाग असतो. ग्राहकांच्या श्रद्धास्थानाला तडा देण्याचे काम त्यांना परवडणारे नसते. कारण त्या व्यावसायिक संस्था असतात.

<<एकाने प्रश्न विचारला विवाहाच्या वेळी पत्रिका पाहणे कायदेशीर आहे का? गौरी कानिटकर या अनुरुपच्या संचालक. त्यांनी सांगितले कि विवाहाच्या वेळी पत्रिका पहाणे हे कायदेशीर नाही. पण बहुसंख्य लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात. तो त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे. यावर ते पत्रिकेचे गौडबंगाल असा कार्यक्रम घेणार आहेत.>> Happy
पत्रिकेचे गौडबंगाल?

Patrika julawatana gun melana nantar patrikecha (vadhu/var) abhays kasa karava. I mean pudhe patrika kontya aadharavar match karavyat. Pls. guide.

Patrika julawatana gun melana nantar patrikecha (vadhu/var) abhays kasa karava. I mean pudhe patrika kontya aadharavar match karavyat. Pls. guide.

एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट 'भाग्य` दिवाळी ९७ च्या अंकात म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.
सांगायचा मुद्दा हा कि गुणमेलना नंतर पत्रिकेचा अभ्यास कसा करावा हा मुद्दा व्यक्ति सापेक्ष आहे. गुणमेलना व्यतिरिक्त मंगळ दोष,आरोग्य, अर्थकारण या बाबी स्वतंत्रपणे ज्योतिषी पहातात.

manswini, दाते पंचांगात पान क्र. ११ वर (गुणमेलन कोष्टकाच्या आधीचे पान) स्पष्ट सांगितलेले आहे की "१८ पेक्षा जास्त गुण असले तरी एकमेकांचे लग्नेश, पंचमेश, सप्तमेश व भाग्येश शुभयोगात असणे आवश्यक आहे", अर्थात ते तपासले पाहिजे.
सुस्थापित गृहस्थी करता (एकमेकांच्या अनुरुपतेकरता, वंशवृद्धीकरता व समृद्धीकरता) ही स्थाने/यांचे कारकत्व आत्यंतिक महत्त्वाचे असल्याने ही स्थाने/स्थानेश/भावाधिपति प्राधान्याने बघितले जातात.
पण, कोणता एक योग चांगला असेल, तर वाईट योग असणारच नाहीत असे कधीही नसते. पूर्णत्वाने परिपूर्ण उत्तम अशी कुंडली वा कुंडली मेलन असू शकत नाही. हे ध्यानात घ्यावे लागते.

माझे एक मत एकमेकाच्या लग्नी शनि विरूद्ध रवि नको.दोघांच्या विचारांची पद्धत पार टोकाची वेगळी असते.
अमुक एक ग्रह अमुक एक स्थानी असला की लग्नाच्या बाबतीत काही तरी न्युन येतेच.असे ग्रहमान असलेल्यांची लग्ने एकमेकांशी झालेली सापडतात.पत्रिका न पाहिली तरी असे होणारच असते फक्त ते ज्योतिषाला अगोदर कळते परंतू सांगून काही उपयोग नसतोच .
थोडक्यात-फार खोलात आणि फार चिकित्सा न करणे.

>>> पत्रिका न पाहिली तरी असे होणारच असते फक्त ते ज्योतिषाला अगोदर कळते परंतू सांगून काही उपयोग नसतोच . थोडक्यात-फार खोलात आणि फार चिकित्सा न करणे. <<<< सहमत.
अन उपयोग तेव्हाच होतो जेव्हा जातकासहित त्याच्या पालकांचीही पूर्वपुण्याई शाबुत असते. असो.

>>>Patrika julawatana gun melana nantar patrikecha (vadhu/var) abhays kasa karava. I mean pudhe patrika kontya aadharavar match karavyat. Pls. guide.>>>
यातलं एक उदाहरण शनि-रवि परस्परांच्या कुंडली त लग्नस्थानी दिलं आहे.परंतू आणि स्पष्टपणे काही सांगातले आणि। तेही गांभीर्याने ज्योतिष न शिकणाय्रास तर दुरुपयोग होतो.---"अरे/अग तुझ्या कुंडलीतअमुक स्थापित अमुक ग्रह बसलेत लग्नजीवनाचे तीन तेरा होणार असे काही तरी तोंडावरच न सांगण्याचा शहाणपणा येणे अथवा आपल्याच मुलामुलीचे भाकीत कळलेतरी दु:ख गपचुप सहन करायचे धारिष्ट्य येणे अपेक्षित आहे.विस्तवाशी खेळ आहे.

माझ्यामते गुणमेलाना पेक्षा सुद्धा पत्रिकेतील सप्तमेश, सप्तम स्थान आणि शुक्रशी होणारे पापग्रहांचे योग तसेच पुढील काळात येणाऱ्या दशा मुखत्वे तपासाव्यात . हे सर्व योग्य असेल तर गुणमेलनला महत्व देऊ नये .

लिंबू मला एक पालक भेटले होते कि ते म्हणाले अहो माझ्या लग्नाच्या वेळी मी पत्रिका पाहिली नव्हती पण मुलीच्या लग्नाच्या वेळी मात्र मला ही पत्रिका त्रास देत आहे.खूप ठिकाणी पत्रिका जुळतच नाही.पत्रिका न पहाण्याचा आग्रह धरला तर मुलीचे लग्न जुळत नाही. काय करु बोला? मी त्यांना पत्रिका पहायची नाही अशी जाहिरात देउन पहा. असा सल्ला दिला. पुढे काय झाल माहित नाही.

Srd, अगदि बरोबर लिहिलेत.
प्रकाशजी, बरेचदा असेही बघितले आहे की "बुडत्याला काडीचा आधार " या न्यायाने, किंवा आपण घेत असलेल्या लग्नासारख्या महत्वाच्या निर्णयाचे खापर फोडायची वेळ आलीच तर आधार असावा या निमित्तानेही कुंडली बघणारे कमी नाहीत. इतकेच काय, तर कुंडली कशी बघा, गुण जुळवुन द्या, हव तर वेळा बदला अशागत विनंती करणारेही भेटतात.
रस्त्यावरून जाताना, समोर खड्डा आहे हे दिसल्यावर आपण खड्डा टाळतो, कित्येकदा खड्डा टाळूही शकत नाही, पण म्हणुन जेव्हातेव्हा खड्डा दिसलारे दिसला की आपण घाबरूनही जात नाही, तर रस्त्यावर खड्डे असतातच या सत्याला सहज भावनेने सामोरे जातो, तद्वतच, आयुष्याच्या मार्गावरही चढ उतार, सुखदु:खे येणारच असतात, रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या सत्याला जितक्या सहजपणे सामोरे जाऊ तितक्याच सहजपणे आयुष्यातील भावी घटनांच्या "सत्यास" सामोरे जायची मानसिक/बौद्धिक कुवत असेल, तरच ज्योतिषाची पायरी चढावी हे माझे मत.
याव्यतिरिक्त, मानसिक आधार/आशादायक मनःस्थिती करण्यास ज्योतिषाचा उपयोग होऊ शकतो, पण त्याकरता वर Srd यांनी लिहीले तसे ज्योतिषी देखिल तारतम्याचा असावा लागतो.

अन्विता, हे सगळे बरोबर असले तरीही, एखाद्याच्या कुंडलीत (प्रथम) संततीस धोका आहे असे स्पष्ट दिसत असले तरी त्यास तसे कसे सांगावे, सांगितले तरी मग लग्नच करू नकोस असा तरी सल्ला कसा काय द्यावा वगैरे अनेक प्रश्न असतात. यामुळेच बरेचदा बर्‍याच ज्योतिषांना "मोघमही" बोलावे लागते. किंवा स्पष्ट बोलले तरी त्याचा रोख बदलत बोलावे लागते.

Dhanyavaad, tumhi sarvani dileli mahiti khupach upayukta aahe. Patriket 1,4,7,8,12 ya sthani shani aslyavar mangalachi patrika aslyavar jase niyam (gun milanasathi) astat tase Shani karita astat ka ?