शाळा/कॉलेजातील अविस्मरणीय किस्से.

Submitted by Ekvilan on 13 July, 2019 - 06:58

मी 9 वी ला होतो। आमच्या वेळेस कॉपी पण खूप चालयाच्या। शेवटची परीक्षा होती। पेपर हिंदीचा होता। आम्ही पेपर सोडवत होतो। काही मूल कॉपी करत होती। पण शाळेच्या मुख्याध्यापिका खुपच कडक होत्या। त्या नेहमी चेकिंग साठी फिरत असत। त्या आमच्या वर्गाकडे येताना दिस्ताच काही मुलांनी कॉपी लपवल्या व कही मुलांनी कॉपी इकडे तिकडे फेकून दिल्या। त्या वर्गात आल्या। माझा बेंचजवळ आल्यावर त्यांना बेंचखाली कॉपी दिसली। त्यांनी मला उभ केल व तब्बल दहा ते बारा झापड़ कानाखाली वाजवल्या। डोळ्यातुन आसु आले। मी खुप सांगितल की कॉपी माझी नाही म्हणून पण त्यांनी काहीच एकल नाही व् पेपर हिस्कावुन तिथे असलेल्या मैडम कड़े दिला। व मला घरी जायला सांगितल व् त्या निघुन गेल्या। पण नंतर वर्गतल्या मैडम ने पेपर सोडवायला परत दिला। कारण त्यांना माहिती होत मी कॉपी केली नव्हती म्हणून।
पण माझा मित्रा व् मैत्रिणी समोर झालेला अपमान मला सहन झाला नाही व् मी पेपर न सोडवता निघुन गेलो।
असा हा प्रसंग न विसरण्या सारखा आहे।। या विषयावरील आधीच धागा असेल तर मला कोणी लिंक सोडा हा लेख मी डिलिट केला जाईल माझा पहिला लेखनाचा प्रयत्न चुकीला माफी असावी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा किस्सा मी जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाचा आहे. त्याशाळेच्या शेवटच्या वर्षाला म्हणजे सातविला होतो. निदान त्या काळात तरी आम्ही बऱ्याच गोष्टींबाबत अज्ञानी होतो.

एकदा मुलींची कबड्डीची मॅच चालू होती. आमच्या वर्गाचा संघ त्यात होता. अचानक आमच्या वर्गाच्या संघातील बेस्ट कबड्डी प्लेयर मुलगी खेळ अर्धवट सोडून शाळेत पळत निघाली अन तिच्याबरोबर तिच्या 7-8 मैत्रिणीही... आधी आम्हाला नक्की काय चाललंय ते कळलं नाही , मग सगळी मुलं मुलीही त्यांच्या मागून पळत शाळेत गेली. आधी पळालेल्या त्या मुली सरळ वर्गात शिरल्या नि त्यांनी दार आतून बंद करून घेतलं. इथे आम्हा 4-5 मुलांचा गट "ही काय फालतुगिरी चाललीये" म्हणून वैतागलो, नि त्या दरवाजावर "दरवाजा खोल कलमूही, कहा मूह काला करने गयी थी" वगैरे डायलॉग मारत फिल्मी स्टाईलमध्ये लाथा मारू लागलो. थोड्या वेळाने गावकरी जसे दरोडेखोरांना पकडतात तसे आम्हाला काही आडदांड मुलांनी व शिपायांनी शिक्षकांच्या सांगण्यावरून मानगुटीला धरले व मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये नेले. त्यानंतर किमान 2 तास आम्ही ओणवे उभे होतो व पुढील 3 दिवस झाडू घेऊन शाळेच्या व्हरांड्याची साफसफाई करत होतो.

पुढे बऱ्याच वर्षांनी आमचा ग्रुप जमला तेव्हा दरवाजावर लाथा मारण्यात सामील असलेला माझा मित्र म्हणाला की खेळताना अचानक तिची मासिक पाळी सुरू झाली असावी व म्हणूनच तिने वर्गात धाव घेतली असावी.

त्यावेळी अज्ञानातून आम्ही केलेल्या टगेगिरीचे मला फार वाईट वाटले. पण सध्या ती पोलीसांत असल्याने माफी वगैरे मागून, जुन्या जखमेवरची खपली काढण्याचा मूर्खपणा मात्र केला नाही.

Pages