शाळा/कॉलेजातील अविस्मरणीय किस्से.

Submitted by Ekvilan on 13 July, 2019 - 06:58

मी 9 वी ला होतो। आमच्या वेळेस कॉपी पण खूप चालयाच्या। शेवटची परीक्षा होती। पेपर हिंदीचा होता। आम्ही पेपर सोडवत होतो। काही मूल कॉपी करत होती। पण शाळेच्या मुख्याध्यापिका खुपच कडक होत्या। त्या नेहमी चेकिंग साठी फिरत असत। त्या आमच्या वर्गाकडे येताना दिस्ताच काही मुलांनी कॉपी लपवल्या व कही मुलांनी कॉपी इकडे तिकडे फेकून दिल्या। त्या वर्गात आल्या। माझा बेंचजवळ आल्यावर त्यांना बेंचखाली कॉपी दिसली। त्यांनी मला उभ केल व तब्बल दहा ते बारा झापड़ कानाखाली वाजवल्या। डोळ्यातुन आसु आले। मी खुप सांगितल की कॉपी माझी नाही म्हणून पण त्यांनी काहीच एकल नाही व् पेपर हिस्कावुन तिथे असलेल्या मैडम कड़े दिला। व मला घरी जायला सांगितल व् त्या निघुन गेल्या। पण नंतर वर्गतल्या मैडम ने पेपर सोडवायला परत दिला। कारण त्यांना माहिती होत मी कॉपी केली नव्हती म्हणून।
पण माझा मित्रा व् मैत्रिणी समोर झालेला अपमान मला सहन झाला नाही व् मी पेपर न सोडवता निघुन गेलो।
असा हा प्रसंग न विसरण्या सारखा आहे।। या विषयावरील आधीच धागा असेल तर मला कोणी लिंक सोडा हा लेख मी डिलिट केला जाईल माझा पहिला लेखनाचा प्रयत्न चुकीला माफी असावी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉलेजला असताना आम्हाला इंगवले म्हणून महाखडूस सर होते. एका सेमिस्टरमध्ये पुर्ण दिवस काहीही शिकवलं नाही. आणि शेवटी पेपर काढला. मला प्रश्न जो आला तो विषय मी कधीच कुठेही वाचला नव्हता. मी त्यांना प्रश्न नेमका काय आहे हे समजावून सांगायला सांगितले,तर सर्व मुलांदेखत माझी अक्कल काढली.
मलाही राग आला. मी बोललो पुर्ण सेमीस्टर काही शिकवलं नाही आणि परिक्षा घ्यायला लाज वाटते का तुम्हाला? पेपर तिथेच फाडून चोळामोळा करून चेंडू सारखा त्यांच्या अंगावर फेकून रागाने निघून गेलो.
इतर मुलांना ते म्हणाले मी याला नापासच करणार. पण झक मारत बी ग्रेड देऊन पास केले. मी त्यांची तक्रार डीनकडे करणार होतो पण मुलांनी मला अडवले.

कॉलेजात आमच्या वर्गात घडलेला किस्सा, तेव्हा गंमतीदार वाटला नव्हता, आता वाटतोय.

आम्हाला अल्जेब्रा की जॉमेट्री, ज्यात साइन कोसाईन अल्फा थिटा बीटा इत्यादी मंडळी असतात ते शिकवायला शर्मा नावाचे सर होते. ते अतिशय हुशार होते, शिकवायचेही चांगले पण त्यांचे उच्चार अगदी तिकडचे होते, उत्तर प्रदेशी. त्यामुळे वर्गात काही मुले कायम हळू आवाजात हसायची. सरांनी कायम याकडे दुर्लक्ष केले. एकदा त्यांच्या तासाच्या आधीचा तास ऑफ मिळाला म्हणून ह्यांचा तासही मास बंक करायचे अचानक ठरले. वर्गात जे ठरले ते निमूट मान्य करून आनंदाने आम्ही सगळे घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत ह्यांचा तास होता. वर्गात आल्यासरशी यांनी रुद्रावतार धारण करून 'I will not bunk class again' हे वहीत शंभरदा लिहा आणि मला दाखवा, अन्यथा आपापल्या पालकांना घेऊन या हे जाहीर केले व बसून राहिले. त्या दिवशी काहीच शिकवले नाही. सगळ्यांची इतकी तंतरली. माना खाली घालून सगळे वहीत काय लिहीत होते देव जाणे. कोणीही वही दाखवायला गेले नाही. पूर्ण तास वर्गात स्मशानशांतता पसरली होती. तास संपायची घंटा वाजल्यावर सर उठून निघून गेले. त्यांच्या पुढच्या तासाला ते आले आणि नेहमीसारखे शिकवायला सुरवात केली. आदल्या तासाला जे घडले त्याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढले नाही, जणू काही घडले नव्हतेच. त्यानंतर त्यांना कोणी कधी हसले नाही, ना कधी त्यांच्या तासाला मास बंकिंगचा विचार केला... Happy Happy

आम्हाला पेंग ला सुश्रुत सर होते. एकदा त्यांना वर्गात काही मुलांनी उलट उत्तरे दिली होती तर दुसऱ्या दिवशी त्यांनी नोटीस बोर्ड वर त्या मुलांना एक अवघड assignment दोनदा करून आणायला सांगितली तर त्याच्या शेवटी त्यातल्या एका मुलाने त्यांचंच नाव लिहिलं होतं नंतर त्यांनी हे कोणी लिहिलं विचारल्यावर कोणीच तयार होईना हसून मात्र वाट लागली होती.

Happy पूर्ण वर्गाने मास बंक केला. मग प्रोफेसर भडकले आणि सर्वांच्या सहीचा माफीनामा आणून द्या म्हणाले. दुसर्‍या दिवशी क्लास रिप्रेझेंटेटीव्हने त्यांना सर्वांच्या सह्यांनिशी माफीनाम्याची झेरॉक्स दिली. फक्त तारीख निळ्या शाईत. प्रोफेसर "काय रे हे?" क्लास रिप्रे. "सर, पुन्हा मास बंक केल्यावर नव्या तारखेची कॉपी देवू ना." म्हणाला... दुसर्‍या दिवशी वर्गात प्रिंसीपॉल आले. "बाळांनो असे करू नये" म्हणाले Biggrin पण मग त्यांनी जे काही ७-८ मिनीटे भाषण दिले ते आजही मनावर आहे. त्यामुळे आजही कुठे पाट्या टाकाव्याशा वाटत नाहीत. जमत नसेल तर नाही जमणार सांगून मोकळं व्हायचं पण पाट्या टाकायच्या नाही!

संपादन करून धाग्याचे शिर्षक 'शाळा/कॉलेजातील अविस्मरणीय किस्से' असे करा.

आम्ही १२वी ला असतानाचा किस्सा आहे. आमची D तुकडी. सगळे इंग्रजी माध्यम शाळेतून आलेले, १०० मार्कांची हिंदी भाषा घेतलेले विद्यार्थी.
इंग्रजीचा तास चालू होता. सर फळ्याकडे तोंड करून लिहित होते. मग नक्की काय झाले माहित नाही पण बॅकबेंचर्सपैकी ४-५ जणांनी हुटींग केलं. सरांनी भाषणबाजी केली, खरं सांगा कोणी आवाज केला- मी शिक्षा करणार नाही - be man- take responsibility of your actions वगैरे. आमच्या गावातल्या एकमेव कॉन्व्हेंट शाळेतून दहावीला पहिला आलेला मुलगा उठून उभा राहिला. सरानी त्याला पुढे बोलावलं आणि बोलताबोलता अचानक सणकन ठेऊन दिली. धडपडलाच तो मुलगा, तोंडातून रक्त वगैरे आलं. मग त्याला प्रिन्सिपलकडे घेऊन गेले ते सर.
त्यानंतर मी त्या सरांचे क्लासेस अटेंड केले नाहीत. इंग्रजीला दुसऱ्याएक (चिकण्या) मॅडमदेखील होत्या, त्यांचे सगळे क्लास अटेंड केले आणि नियमानुसार गरजेची असलेली 50%+ हजेरी भरली.

यानंतर काही दिवसांनी हेच सर A तुकडीतील ४-५ जणांना प्रिन्सिपलकडे घेऊन जाताना दिसले. ती इलेक्ट्रॉनिक्स किंवा १०० मार्कांचे संस्कृतवाली तुकडी. नंतरची ऐकीव माहिती की एक मुलगी खाली पडलेले पेन उचलत होती आणि सर काय झालं म्हणत वाकूनवाकून बघत होते. बॅकबेंचर्सनी हुटींग केलं. तिथेदेखील सरांनी पुढे या- be man वगैरे प्रकार ट्राय केला, पण तो विद्यार्थीगट फुटला नाही, एकत्र राहिला.

आमच्या एका नवशिक्षक, बावीशीतल्या सरांनी वर्गात आल्यावर "काल मी वहीत जे काही लिहून दिले ते पान उघडा. सगळ्यांनी उघडलं कारे? बघू बरं, .....ए तू....तु उघड....बरं आता सर्वांनी ती पानं फाडून टाका." असं सांगीतलं. आम्ही सगळे ह्याला वेड लागलंय का असं बघतोय.....नंतर समजलं की कालच्या दिवशी त्यांनी एका मुलीला प्रपोज केलं होतं आणि तेव्हा मनःस्थिती नीट नव्हती म्हणून त्या मनःस्थितीत लिहायला लावलेलं फाडायला लावलं सगळ्यांना.

बारावीचा किस्सा आहे. एक मास्तर पोरींशी जास्तच लगट करायचा पण पोरी कोणी तक्रार करायला धजत नव्हत्या. म्हणून आम्ही आधी मास्तर ला चोपायचा प्लॅन केलता पण रिस्क आहे म्हणून कॅन्सल केला. रविवारी एकदा फक्त त्यांचाच एक्सट्रा क्लास ठेवला होता सिलॅबस कव्हर करायला. तिथं फक्त मास्तर,पोरं आणि शिपाई होता. कॉलेज मोठं होत आणि वर्ग वरच्या माळ्यावर चालायचे. तास संपल्यावर जसा मास्तर लॅट्रिनमध्ये आत गेला आम्ही बाहेरून कडी लावली आणि बाहेर चिट्ठी लिहून वेगळ्या भाषेत समज दिली. सगळे घरी निघून गेले पण आम्ही लांबून वाट पाहत होतो. शेवटी ४५ मिनीटांनी त्याच कोणीतरी ओळखीचं आलं कॉलेजात (बहुतेक शिपायाचा नम्बर नव्हता त्याकडे) त्याला सोडवायला आणि मास्तर सुटला. प्रशासनाकडे त्याने तक्रार करायचा विषयच नव्हता. कॉलेजच्या काही गमतीशीर आठवणी आहेत पण त्या अनरेटेड आहेत.

आमच्या काॅलेज मधे क्रिकेटचे interdepartmental सामने असायचे. एकदा अशाच एका सामन्यादरम्यान एका संघाची टीम ठरवताना प्रचंड हमरातुमरी झाली. टीम फायनल होइना. काहींचे म्हणणं होते टीम मेरीटवर निवडली पाहीजे. तर शेवटच्या वर्षाला असलेले म्हणत होते आम्हीच खेळणार. मॅच सुरू व्हायची वेळ झाली तरी घोळ संपेना. शेवटी कॅप्टन टाॅस करून आला. दुसर्या टीम ने औदार्य दाखवून आम्हाला बॅटींग दिली. इकडे टीम निवडीचा गोंधळ चालूच. अंपायरने तंबी दिल्यावर त्यातल्या त्यात एकमत होते अशी दोन मुले ओपनिंगला गेली आणि मॅच चालू झाली. पण खरी धमाल एक विकेट पडल्यावर झाली जेंव्हा तीन वन डाउन बॅट्समन एकाच वेळी ग्राउंड वर गेले. Happy

अजून एक ,,,मी जेव्हा 9 वि च्या वर्गात होतो तेव्हा एक गणित चे सर होते आम्हाला . ते खूप कडक होते.फक्त त्यांना मारण्याचा बहाणा हवा असायचा .आम्ही एका बेंच वर तिघे बसायचो लास्ट दोन बेंच जे खिडकी जवळ होते ते बेंच आमचीच असायची ,कोणी दुसरा मुलगा तिथे बसायचा नाही आणि बसला तरी त्याच्या शर्टवर तास चालू असताना लिहायचो त्याचे नाव किंवा त्याच्या प्रियसी चे नाव लिहायचो त्याला ना कळता. किंवा पेन ने टोचायचो. त्या मुळे आमच्या बेंच वरती कोणी बसत नसत. आणि आम्ही कधी ही दिलेला होम वर्क घरी करतच न्हवतो. सर्व तास चालू असताना लिहित बसायचो. चला मुद्याकडे वळूया. तर झाले असे की त्या सरांचा तास होता. ते सर 5 ते 10 मिनिट time करून आले होते. आम्ही त्याची वाट बघत बसलो होतो .आम्हाला कंटाळा आला म्हणून मी फळ्याकडे पाठ करून पाठी मागे माझ्या मित्रा बरोबर बोलत बसलो होतो. आणि आम्हाला आजू बाजूला काय चाललंय याचं भान सुद्धा न्हवत. सर वर्गात आले सर्व मुलं मुली शांत झाली. पण आमचं सुरूच होत ना त्याच लक्षात आलं नाही माझ्या लक्षात. आपली गप्पा रंगत होती. थोड्या वेळाने लक्ष्यात आलं की एवढी भयाण शांतता का पसरली आहे. मागे वळून बघतो तर सर माझ्या बेंच जवळ येऊन थांबले आहेत. मला तर आत्ता काय करू काय नको काही समजत न्हवते .तेवढ्यात सर दोघांचे शर्टाचा कॉलर धरून वर्गाच्या बाहेर हाकलून दिलं. भर उन्हात वाकून थांबविले आणि पाठीवर 15 कोलोचे पोते ठेवले. जर पोत खाली पडले तर आणि 15 kg पोत ठेवण्यात येईल असं संघीतल. पहिला 5 मिनिट काही वाटलं नाही. पण नंतर कानशील गरम झाली. जस जसे time जात होते वेदना खूप होत होत्या. सर तर कधीच वर्गात गेले होते. मग मी आणि माज्या मित्रांनी एक प्लॅन केला शाळेच्या मागे 200 पावलावर्ती ओढा होता. मग काय कोणाचं लक्ष नाही बघून तिथून पळत सुटलो आम्ही ओढ्या कढे. संध्याकाळी 5 वाजे परियांत आम्ही तितेच होतो. आम्ही पळून तर आलो होतो पण आमचं दफतर शाळेतच राहिले होते. घरात काय कारण सांगायचे काही कळत न्हवते. पण सरांच्या जेव्हा लक्षात आले की आम्ही पळून गेलेलो आहे म्हणून तर त्यांनी आमची दफतर हेडमास्तररांच्या खोली मध्ये ठेवण्यासाठी संघीतले .पण आमच्या मित्रांनी ठेवतो सर असे सांगून सरांच्या पाठी मागे गेले सरांनी हेड मास्तरांच्या खोली मध्ये प्रवेश केला. त्याच्या मागे माझा मित्र सुद्धा होता सर म्हणाले तिजोरी मध्ये ठेवून दे आणि किल्ली सुद्धा दिली ड्रॉवर मधून काडून. हेडमास्तर न्हवते ते कुठे बाहेर काही कामासाठी सकाळीच गेले होते. माझ्या मित्रांनी सारकडून किल्ली घेतली तिजोरी सुद्धा उघडली पण तिजोरीत ना ठेवता सरांचं लक्ष त्याच्या कडे नाही बघून हळूच दोन पावला एवढ्या लांब खिडकीतून बाहेर टाकले. खिडकी बाहेर गूढग्या बरोबर गवत उगवले होते तर कोणाला दिसण्याचे कारणच न्हवते. मग् तिजोरीत लवकर झाकून सरांच्याकडे किल्ली सोपविण्यात आली. आपलं काम झालं होतं सर सुद्धा काही विचारले नाहीत फक्त वर्गात जाऊन बस इतकेच संघीतले. मग काय शाळा सुठल्यावर्ती अर्धा तासांनी आम्ही हळूच बाहेर पडलो दुरूनच आम्हाला आमची मित्र दिसत होते. त्यातला एकट्याने आम्हाला येताना पाहून हातवारे करत आमच्याकडे धावत येत होता. आम्ही पण त्याच्याकडे धावत गेलो झालेले सर्व हकीकत आमच्या मित्रांनी आम्हाला संघीतली आम्ही त्याचे आभार मानले. आम्ही खूप खुश होतो मग काय 5ते 6 दिवस आम्ही दांडी च दिली शाळेला. घरी शाळेला जातो म्हणून सांगायचो पण आम्ही 8 km सायकल मारून डोंगरावरती जाऊन बसायचो. पण नंतर आम्ही शाळेला गेलो तेव्हा कोणी काही विचारले नाहीत सर सुद्धा काहीच म्हंटले नाहीत 'तेरी मेरी यारी -----गेली दुनियादारी लेख मध्ये काहीतरी चुका असतील तर माफ करा वे

मी साधारण बारावीला असतानाच प्रसंग आहे. एक सर बदली होऊन आमच्या गावी आले होते. त्यांनी एक रूम घेतली होती. बरेचसे साहित्य आणून ठेवले होते. अर्थात कुटुंब सोबत नव्हते. हाताने स्वयंपाक करत असत. एकटेच असल्याने बरीचशी कामे ते मुलांना सांगत. कुणाला मळ्यातून भाजी आणायला सांगत, कुणाला वाणसामानाची यादी देऊन घरी पोहचवायला सांगत. आमच्या वर्गातली एक मुलगी त्यांच्या रूमच्या शेजारी राही. तिला रोज त्यांच्या दारापुढे रांगोळी काढावी लागे. त्यांनी यातून आमचा ग्रुप वगळला होता तरीही मला खूप राग येई. एक दिवस कुणाला तरी रॉकेल आणायला सांगितले होते, ते त्या मुलाने आणले. तो पाच लिटरचा डबा त्यांनी एका मुलाकडे दिला आणि घरी रिकामा करून यायला सांगितले. मी मधेच उठलो आणि "मी जातो" सांगून तो डबा घेतला आणि त्यांच्या घरी गेलो. (कॉलेज गावाबाहेर होते)
मी रॉकेलचा डबा घेऊन सरांच्या घरी गेलो आणि दिसेल ते भांडे रॉकेलने भरून ठेवले. चहाचा कप, सगळ्या बशा, पाणी प्यायची फुलपात्रे, जेवणाची ताटे, तसेच साखर व चहा पावडर वर्तमानपत्रावर ओतून त्या डब्यातही भरले. तेथे दोन पितळी समया होत्या त्याही रॉकेलने भरून ठेवल्या. खाली सांडलेले रॉकेल त्यांच्या इस्त्री केलेल्या कपड्याने पुसून घेतले. अर्ध्या तासात डबा आणून सरांकडे दिला.
त्यानंतर सरांनी कुणालाच घरचे काम सांगितले नाही.
(या सरांना त्यांच्या कर्मामुळे लवकरच रात्रीतून गाव सोडून जावे लागले.)

माझ्या लहानपणी माझ्याबाबतीत शाळेत घडलेला हा एक गमतीदार किस्सा.
          मी तेव्हा इयत्ता चौथीत होतो. आणि वर्गात इतिहासाचा तास चालू होता. वर्गात वीसेक मुलं आणि वीसेक मुली असतील. सर्व चिडीचूप बसून सरांचे शिकवणे ऐकत होते. मी वर्गातल्या मधल्या भागातील बेंचवर बसलो होतो. हातातल्या पेन्सिल आणि खोडरब्बरशी माझा चाळा चालू होता.
         आणि अचानक माझ्या हातातला खोडरब्बर माझ्या हातातून निसटून माझ्या बेंचखाली कुठेतरी पडला. मी बेंचखाली वाकून दोन पायावर बसलो आणि माझा खोडरब्बर शोधू लागलो. मी इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय. पण तो मला काही सापडेना. मी बसल्या बसल्या सरकत पुढच्या बेंचखाली गेलो.
         मी खोडरब्बर शोधण्यात इतका गुंग होऊन गेलो, की मी कुठे आहे आणि काय करतोय याचे मला भानच राहिले नाही. मी माझ्या मनातच एवढा रमलो की खोडरब्बर शोधता शोधता माझ्या तोंडून मी हळूहळू आवाज करू लागलो. कसा माहितेय!!? 
         "म्यांव! म्यांव!! म्यांव!!!" असा मांजरीसारखा! मला हे 'म्यांव म्यांव' फारच आवडले. हळूहळू माझं 'म्यांव म्यांव' फारच जोरात व्हायला लागले. मी बेंचखाली रांगु लागलो. सर तिकडे शिकवत होते आणि इथे माझे तोंडाने 'म्यांव म्यांव' करत खोडरब्बर शोधणे चालू होते.
         आणि कोण जाणे मला अचानक सारं शांत शांत वाटायला लागलं. सरांचा शिकवण्याचा आवाज मला ऐकू येईनासा झाला. मी भानावर आलो. म्हटलं सगळे गेले कुठे? म्हणून मी बेंचखालून डोके बाहेर काढून वर बघितले तर काय!!?......
          सरांसकट सर्व मुलं मुली माझ्या बेंचभोवती कोंडाळं करून मला गुपचूप पाहताहेत. माझी बोलती बंद!!! हे पाहून सर्व मुलं मुली माझ्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागले. सरांनी माझ्या कानाला धरून मला उभे केले. आणि मग त्यांनी माझे काय हाल केले असतील याची तुम्ही कल्पनाच न केलेली बरी!!! Rofl

आमच्या सरांनी सांगितलेला किस्सा बहुधा काल्पनिक असावा. नववी ड च्या वर्गात साबळे सर गणित शिकवित होते. सर्वात मागे कोपऱ्यातल्या बेंचवर किसन बसला होता. ती त्याची नेहमीची जागा होती. तिथं भिंतीला एक बिळ होते, आणि त्यात एक उंदीर आत बाहेर करत होता. आत जायचा पण शेपटी बाहेर रहायची. किसन तल्लीन होऊन उंदराची गंमत पहात होता.
इकडे साबळे सरांचं गणित शिकवून झालं नि पोरांना समजलं का विचारत निघाले. समजलं का? डोक्यात शिरलं का.. असे विचारत रांगेत जाऊ लागले. पुढे पुढे फक्त शिरलं का एवढंच विचारत जाऊ लागले. शेवटी किसन जवळ आल्यावर शिरलं का विचारले तर किसन म्हणाला " नाही सर, शेपूट अजून बाहेरच आहे.

आम्ही नववी दहावीच्या वर्गात असताना 'अमक्याच्या बैलाला बो.' असे बोलण्याची फॅशन आली होती. एकदा तास संपून दुसऱ्या तासाचे सर येणे बाकी होते. मुलांची मस्ती सुरू होती. कुणीतरी संदिप गोरेच्या पाठीत गुद्दा मारला. तो ओरडला मारणाऱ्या च्या बैलाला बो.. . इतक्यात भुजबळ सर वर्गात आले . त्यांनी संदिपला ओरडताना ऐकलं होतं. त्याला धरून मारायला लागले. " मारणाऱ्या च्या बैलाला बो? दाखवतोच आता.
तेवढ्यात खेड्यात राहणारा भानुदास भोकनळ सरांना म्हणाला. " सर तुम्ही त्याला मारताय. आता तुमच्या बैलाला बो.
मग काय भुजबळ सर इतके चिडले की संदिपला सोडलं नि भानुदासला जाम धुतलं.

मी अकरावीला ठाण्याच्या N.K..T काॅलेजला होतो.. त्यावेळी जगताप नावाचे सर होते आम्हाला...हे सर मिलीटरीतून रिटार्यड होऊन आलेले.
त्यामूळे त्यांना पॅसेजमध्ये मधली सुट्टी सोडून कोण भटकताना दिसला की, काठीने फोडून काढत..ते काठी घेऊनच फिरायचे.. मी नवीन होतो आणि पहिलाच frndship day होता....माझा पूर्ण हात बॅण्डनी भरलेला..

आणि त्यादिवशी मी मधली सुट्टी संपली तरी बाजुच्या वर्गातच होतो..मित्र सोडतच नव्हते ..इतक्यात त्या क्लासच्या मॅडम आल्या आणि मला जायलाच मिळालं नाही म्हणून लेक्चर तिथेच लपून कसंतरी काढलं ...लेक्चर संपल्यावर पटकन मी माझ्या वर्गात जाणार तोच जगताप सर माझ्याच वर्गातून बाहेर येताना दिसले...मी खुप घाबरलो पण चेहरावर काही न दाखवता चालत राहीलो...सरांनी मला हटकलेच...हे काय हातावर ...इकडे फालतू धंदे चालणार नाही ..frndship day चालणार नाही ..काढ ते सगळं ...असं म्हणून जोरजोरात ते ओढून ताणून काढू लागले...मी कसातरी हात बाजूला घेतला आणि हिंमतीने बोललो...सर आम्ही आर्मीत नाही काॅलेजात आहोत...आणि मित्रांसाठी काय पण तुम्हाला मारायचं असेल तर मारा पण हे काढू देणार नाही...सर भडकले कारण सरांना असं उत्तर कुणी दिलचं नव्हतं ..सरांनी पॅसेजमध्येच शक्य तेवढ्या जोरात काठीने हातावर मारायला सुरूवात केली...मी शांतच मार किती मारतो ते...सरांची बडबड आणि तो काठीचा ऐकून आजूबाजूच्या वर्गातली मुले इतकेच कशाला शिक्षक पण जमा झाले...

सर मला मारतायेत....आता पाठीवर कमरेवर पायावर जिथे भेटेल तिथे मारतायेत...पण मी शांतच ...डोळ्यांतून पाणी येतय...पण हू की चू नाही केलं...शेवटी इतर शिक्षकांनी मध्ये पडून माझी सुटका केली..

नंतर त्याच सरांनी मला cultural representetive बनवलं...
नंतर छान बाॅडींगही झालं होतं...त्यांना मला त्यादिवशी मारल्याचं खुप वाईट वाटलं नंतर...हे इतर शिक्षकांनी मला सांगितलं...

अजुन एक..

डिग्रीला असताना...मी खुप फॅशन करायचो...एकदा मी लांब म्हणजे पोटावर येईत इतपत क्रोस घातलेला...आणि त्यावरून सगळे वर्गातले पोरं मला चिडवयाला लागले...बाबा..बाबा...पुढे सगळेच मला बाबा म्हणून हाक मारायला लागले..मग कुणीतरी अज्जूबाबा म्हणायला सुरूवात केली...नंतर मी एकदा कविता सादर केलेली तेव्हापासून कुणीतरी यो यो अज्जूबाबा म्हणायले लागले...हे नाव इतकं फेमस झालं की, शिक्षक आणि मी यायच्या आधी कुणीतरी पांचट कविता चारोळी लिहायचं आणि खाली यो यो अज्जूबाबा....बाथरूममध्येसुद्धा घाण घाण कविता..शिक्षकांवर कमेंट वैगेरे लिहून खाली माझं नावं..

पण मी हे केलं नाही हे सांगायची मला कधी गरज पडली नाही...शिक्षकांचा विश्वास होता माझ्यावर...पण एक झालं अख्ख काॅलेज मला ओळखायला लागलं...काहीतर माझे फॅनही झाले...

मी डिप्लोमाला असताना अप्पलाईड मेकॅनिक्स ला एक प्रोफेसर होते जे सकाळी सकाळी दारू पिऊन यायचे. शिकवताना बेंचच्या जवळ आले की भपकार्यावरून ते समजून यायचं. वर्ष सुरू झाल्यावर पहिल्या दोन महिन्यांच्या काळात कधीतरी मी त्यांच्या पिऊन येण्यावर काहीतरी जोक केला (आता नीट आठवत नाही) आणि तो त्यांनी ऐकला. मग ते माझ्यावर डूख धरून राहिले. त्यानंतर वर्षाच्या शेवटपर्यंत त्यांनी माझ्या प्रॅक्टिकलच्या शिट्स वर सहीच दिली नाही. शेवटी परीक्षेला बसण्याआधी या शिट्स प्रोफेसराच्या सहिनीशी सबमिट केल्या नाहीत तर परीक्षेला बसू दिले जात नव्हते. अनेक वेळा विनंती करूनही ते सही करायला नकार देत होते व कारणही सांगत नव्हते. मी दर 1 दिवस आड करून लॅब ला भेट देणे व सहीसाठी विनंती करणे चालूच ठेवले होते.

त्यानंतर एक दिवशी ते लॅब मध्ये झोपा काढताना मला व माझ्या मित्राला दिसले. लॅब असिस्टंट ला खुणेने विचारल्यावर तो "आज जरा जास्त झालीय" असे खुणेनेच म्हणाला.

मग मी मित्राच्या सांगण्यावरून सरांच्या सहीचा सराव केला व इंडेक्सशिवाय बाकी सगळ्या शिट्स वर स्वतःच त्यांची सही केली. नंतर एक आठवड्याने त्यांच्याकडे इंडेक्स वर शेवटची सही मागायला गेलो. आधी त्यांनी शिट्सवरील सह्या 2 मिनिटे न्याहाळल्या, मग माझ्याकडे बघून म्हणाले की "बापजन्मांत मी तुला सही दिली नसती, हे काम कोणाचं आहे? मी आता एचओडी कडे तक्रार करतो"

सुदैवाने हे अगदी त्वरित मला सुचलं " सर, मागच्या आठवड्यात तुम्हाला जास्त झाली होती, तुमचे डोळे लाल होते आणि तुम्ही खुर्चीवर रेलून झोपला होतात. तेव्हा आम्ही तुम्हाला उठवलं आणि सह्या करण्यासाठी गयावया केली, तुम्ही अर्धवट झोपेत सही केली आणि इंडेक्सवर नंतर करतो असं म्हणून परत झोपलात.". त्यावर सर : "असय का? मग आता माझ्याकडे वेळ नाही, नंतर ये" असं म्हणाले. हे ऐकल्यावर माझी सटकली नि मी म्हणालो की "मीच आज एचओडिंकडे आणि प्रिन्सिपॉल कडे लेखी तक्रार करतो की तुम्ही नेहमी दारूच्या नशेत असता आणि लॅबमध्ये झोपा काढत असता" एव्हढं म्हणून ती फाईल तिथेच ठेवून मी लॅबच्या बाहेर पडलो. त्यानंतर 15 मिनिटांनी लॅब असिस्टंट धापा टाकत आम्हाला शोधत कँटीन मध्ये आला नि फाईलवर सही झाल्याची नि सबमिशन पूर्ण झाल्याची बातमी घेऊन आला. त्याबरोबर सरांचा मेसेज की "तक्रार करू नका आणि पुन्हा कुठल्या प्रोफेसरची मस्करी करू नका"... अर्थात पुढच्या वर्षीच कुणीतरी ती लेखी तक्रार निनावेपणी केलीच, कुणी ते तुम्हाला सांगायला नकोच.

Pages