© प्रणयगुण

Submitted by onlynit26 on 11 July, 2019 - 02:06

© प्रणयगुण

स्नेहा बेडरूममध्ये आली. शेखरला घोरताना पाहून तिला थोडं बरं वाटले. आवाज न करता तिने पाठ बिछाण्याला लावली. पाठ टेकताच कमालीचे सुख तिला मिळून गेले. ऑफिसमधील कामाने ती फारच दमायची. आजही ती खूप दमली होती. शेखरची झोप चाळवली गेली. तो उठून वॉशरूमला जाऊन आला. तिने मात्र आपण गाढ झोपेत असल्याचे भासवत वेड पांघरले. तो तिच्या जवळ सरकला. तिच्या काहीच प्रतिसाद मिळत नसलेला पाहून तो तसाच तिच्या अंगावर हात ठेवून पडून राहीला. तिला मात्र त्याचा स्पर्श नकोसा वाटत होता. तिला एकटे राहावेसे वाटत होते. ती आता पहिली स्नेहा राहीली नव्हती हे त्याला समजून चुकले होते. त्याला आपले काय चुकतेय तेच कळत नव्हते. पूर्वी स्नेहा आपल्या साध्या स्पर्शाने सुद्धा मोहरून निघायची. आपल्या बोलण्याने पण तिच्या अंगावर काटा यायचा. लग्नाअगोदरच्या गप्पानी भरलेल्या रात्री, तेव्हा झालेल्या श्रूंगारीक बोलण्याने दोघांना पराकोटीचा आनंद दिला होता. लग्न झाले. दोघेही छान मनालीला फिरून आले. नव्याचे नऊ दिवस संपले. दोन वर्षानी सोहम झाला. स्नेहा नोकरी बरोबर कौटूंबिक जबाबदारीत गुंतून गेली. आता सोहम दोन वर्षाचा झाला होता आणि त्यांच्या संसाराला अवघी चार वर्षे! अकाली आलेला हा विरसपणा शेखरला नकोसा वाटत होता. त्याला ते पूर्वीचे दिवस हवे होते. या विषयी स्नेहाशी त्याचे वारंवार बोलणेही झाले होते. तिलाही तिचे वागणे खटकत होतेच. पण ती त्यातून बाहेर पडण्याऐवजी ती अधिकच गुरफटत चालली होती. शेखरने तिला एकदा मानसोपचार तज्ञाकडे पण नेऊन आणले. पोटात जाणाऱ्या गोळ्यांनी स्नेहाच्या मनावर काहीच परिणाम होत नव्हता.
शेखरने तिच्या अंगाभोवती लपेटलेला हात बाजूला काढून घेतला. तो उठून बसलेला पाहून तिला शरमल्यासारखे झाले. काय झालयं आपल्याला? नवऱ्याची जवळीक का नको वाट्टेय? शेखर बराच वेळ बसून होता. तिला उठून त्याच्याशी बोलावेसे वाटत होते. पण तिही मनातल्या मनात तळमळत राहीली.

सकाळी शेखर आणि ती ऑफिससाठी एकत्रच बाहेर पडले. जसे काही रात्री घडलेच नाही असे दोघे वागत होते.
" स्नेहा, आज आपल्याकडे मीरा राहायला येतेय."
" अरे हा, मी विसरूनच गेले होते." ऑटोमध्ये बसत स्नेहा म्हणाली. स्टेशन आले तसे दोघेही आपआपल्या डब्याकडे वळले.
मीरा शेखरची मोठी बहीन. श्रीपतराव आठ दिवसासाठी बाहेरगावी चालले होते म्हणून मुलाला घेऊन भावाकडे राहायला येणार होती.
मीरा एक खळखळते व्यक्तीमत्व होते. मीरा आणि शेखरमध्ये दहा वर्षाचे अंतर! शेखर शांत तर मीरा चंचल पण तेवढीच समंजस. मीरा येणार म्हणून शेखर खूप खूश होता. ट्रेनमध्ये सीट पकडल्यावर त्याने पहिला मेसेज तिलाच केला. तिने नेहमीप्रमाणे नीट उत्तर दिलेच नाही. ती ताई असल्याचा पुरपूर फायदा उठवते अशी तक्रार कायम शेखरची आईकडे असायची.
शेखर लवकरच ऑफीसमधून निघाला. तो बिल्डिंगमध्ये शिरला तेव्हा ताई आणि भाओजी हातात हात घालून जिना चढताना पाहून तो खाकरला.
" तुला आताच यायला हवं होतं का?" मीरा शेखरकडे पाहत म्हणाली.
" शेखर, तुझी ताई अजून हिरवी आहे बरं का! आणि माझाही देठ पिकू दिला नाहीये" श्रीपतरावांचे अलंकारिक बोलणे शेखरच्या डोक्यावरून गेले.
"ताई अवनी कुठेय?" आपली भाची दिसेना म्हटल्यावर शेखरने विचारले.
" ती पोचली पण घरी, आम्हीच जरा रेंगाळत चाललो होतो." श्रीपतरावांच्या हाताला पकडत मीरा म्हणाली.
हे सर्व पाहायला स्नेहा हवी होती असे शेखरला वाटून गेले.

मीरा आज पहील्यांदाच माहेरी खूप दिवस राहायला आली होती. आईला कडकडून भेटल्यावर सोहमचा गोड पा घेतला. नंतर त्याचे गोबरे गाल ओढायला विसरली नाही. त्याने भोकांड पसरले तसे बॅग मधून खाऊचा एक बॉक्स काढला आणि त्याच्यासमोर पकडला. तसा तो रडायचे थांबला. जावई आणि सासुबाई बोलण्यात गर्क झाल्या. मीरा शेखरजवळ गेली.
" बच्चा ,आता मी आलीय ना, नो टेंशन" शेखरच्या पाठीवर मीराचा हात पडताच चमकला. आपली नजर लपवत तो कपडे बदलू लागला. मीराला शेखरच्या मैत्रिणीकडून सारं काही कळाले होते.

मीरा तशी माहेरी कधी रमलीच नाही. लग्न झाल्यापासून एक किंवा दोन दिवसाच्यावर कधी तिचा पाय माहेरी टिकला नाही. आपल्या संसारात ती खूप सुखी होती. सोन्यासारखी छान एक मुलगी होती. नवरा अगदीच मदनाचा पुतळा नसला तरी सावळा उंच हँडसम होता. दोंघांचा प्रेमविवाह नसला तरी एकमेकांवर खूप प्रेम होते. कर्ज घेऊन का होईना पण त्यांचे स्वताचे घर होते. उद्या सकाळीच श्रीपतराव त्यांच्या कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जाणार होते.
स्नेहाला घरी यायला उशीरच झाला. तोपर्यंतच माय- लेकीनी जेवनाचा छान बेत केला. सारेजण स्नेहाची वाट पाहत थांबले होते. सगळ्यांच्या छान गप्पाही रंगल्या होत्या. शेखरचे बोलण्यात लक्ष नव्हतेच. तो मोबाईल वर चॅट करण्यात गुंतला होता. मीरा त्याच्या बाजूलाच बसली होती. तिने त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याला नकळत त्याचे चॅट पाहिले. तो स्नेहाशीच बोलत होता. चॅट वरून दोघांमध्ये राग रागच चालला होता. ते त्या स्माईलीच वरून कळत होते. टिव्ही वर मस्त 'हवा येऊ द्या' कार्यक्रम लागला होता. श्रीपतराव जमिनीवर बसून मनमुराद हसत होते. त्यांच्या जोडीला सोहम आणि अवनीही खिदळत होत्या. मीराला शेखरच्या संसाराविषयी खूप काळजी वाटत होती. त्यांच्या मनातील रूंदावत झालेली दरी अजून वाढण्या अगोदर तिथे कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा होता.
इतक्याच डोअरबेल वाजली. अवनी आणि सोहम दरवाजा उघडायला धावले. स्नेहाने दरवाज्यातच अवनीला उचलून घेतले, तिच्या गुबगुबीत गालांवर एक गोड पा घेत आपली बॅग खाली ठेवली. उचलून घेण्यासाठी सोहमही रडत होताच. त्यालाही उचलून घेत स्नेहा जरावेळ हॉलमध्ये थांबली. शेखर नाराज झाला होता. कारण स्नेहाला यायला साडेदहा वाजले होते.
स्नेहा लगेच फ्रेश होऊन बाहेर आली. सारेजण हास्यविनोद करत जेवत होते. स्नेहा मात्र गप्प होती.
सगळे आटपून झोपायला रात्रीचे बारा वाजले. श्रीपतरावांना सकाळी लवकर उठायचे असल्याने स्मिताजीनी सगळ्यांना गप्पा आवरत्या घेऊन झोपण्याचे आदेश दिले. नाहीतर मीरासोबत गप्पा सुरू झाल्या कि कोणालाच वेळेचे भान राहत नसे. स्नेहाला बरे वाटले. ती खूप दमली होती. बिछान्याला पाठ लावताच ती लगेच झोपी गेली. तासाभराने तहान लागली तशी तिला जाग आली. ती बेडरूममध्ये पाण्याचा थांब्या घ्यायला विसरली होती. उठून दबक्या पावलांनी किचनमध्ये जाऊ लागली. बाहेर हॉलमध्ये मीरा आणि श्रीपतराव झोपले होते. तिचा लक्ष सहज तिकडे गेला. दोन शरीरे एकमेकांना भिडली होती. त्यांचे प्रणयाधीन उसासे तिच्या हलकेच कानावर पडत होते. जे पाहू नये ते ती पाहत होती. पाप होतं ते. तिची थबकलेली पावले जड झाली होती. पण क्षणार्धात ती सावरली आणि पाणी न घेताच आल्यापावली बेडरूममध्ये शिरली. शरीराला फुटलेला घाम आणि तिच्या जोरजोरात चालू असलेल्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण मिळवत ती बेडवर बसली. उरलेली रात्र स्नेहाची जागेपणीच गेली. पहाटे उशीरा तिचा डोळा लागला.

तिला सकाळी तशी उशीराच जाग आली. श्रीपतराव कधीच निघून गेले होते आणि सोबत मीराही त्यांच्यासोबत स्टेशनला गेली होती. सासूबाई सकाळीच देवळात गेल्या होत्या. अवनी आणि सोहम त्यांच्या खोलीत झोपले होते.
ती किचनमध्ये विचारामध्येच नेहमीचं काम करत पाठमोरी उभी होती. अबोल्यामुळे निर्माण झालेला तणाव, ठळकपणे जाणवत होता.
खिडकीतून कबूतराची जोडी चोचीद्वारे एकमेकांबरोबर माना वाकड्या करून, होकार नकाराची लढाई करत होत्या.
चपाती करपल्याच्या वासाने तिचे कबुतरांवरील लक्ष उडाले. तिने शेगडी बंद केली.
एवढ्या वेळात नर कबुतराने पोजिशन घेतली होती. मादीवर स्वार होऊन गड जिंकला होता. त्वेषाने हालचाली करून स्वतःची इच्छा पूर्ण करायला तयार झाला होता. तो खाली उतरला आणि एकमेकांच्या चोचीत चोच घालून त्यांचा पुन्हा खेळ सुरु झाला. ह्यावेळी मादी चवताळून एकसारखा चोचीचा मारा करीत, नराला उपसत होती. ती दोन तीनवेळा खाली बसून त्याला संधी देत होती.
काही वेळाने नर कबुतर ताजातवाना होऊन घोडेस्वार बनून मादीचे यथेच्छ समाधान होईपर्यंत रथावर आरूढ झाला.
दोघे वेगळे झाले. आता हा समाधानाचा उच्चबिंदू होता.
तिने चपाती करण्यासाठी स्टोव पुन्हा पेटविला. मागे कसलीशी चाहूल लागली. तिच्या उघड्या पाठीवर हलकासा हात ठेवत शेखर उभा होता. तिने स्टोव्ह विझवला, तो आश्चर्यचकीत झाला. ती झरकन मागे वळून त्याच्या बाहूपाशात विसावली आणि दोघेही बेडरुमच्या दिशेने जाऊ लागले. बेडवर तिने स्वतःला झोकून दिले आणि तिने कबुतराच्या जोडीचे मनोमन आभार मानले. मीराचा प्रणयगुण घराला चांगलाच लाभला होता..
ती विचार करीत राहिली व हळू आवाजात पुटपुटली, 'फार उशीर केला मी. अगोदरच व्हायला हवे होते.'

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - डोंबिवली (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०१.०७.२०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली जमली आहे. गोतावळ्याचे वर्णन थोडे जास्तच झाले. त्यापेक्षा मीरा - श्रीपतराव ह्यांचे व्यक्तित्व व ह्यांच्यातील नातेसंबंध....... जरा अजून रंगवले असते................. तर अजून वाचनीय झाली असती!!! आणि ती नावे सुद्धा अशी का निवडलीत?! मीरा, श्रीपतराव? पार पासस्ठी क्रॉस केल्यासारखे म्हातारे वाटतात.

बादवे....... प्रणयगुण घराला चांगलाच लाभला होता............... ह्या गोड शेवटानंतर शेवटचा कायदेशीर कारवाईचा इशारा म्हणजे तूपपोळी खाताना अचानक दातात खर्रर्रकन खडा लागल्यासारखा वाटला.

छान आहे कथा! अगदीच शृंगारिक नसली तरी बांधणी चांगली आहे..

बाकी एवढा दुरावा असताना फक्त स्नेहाने पाहिल्यामुळे प्रणय होणे म्हणजे अतिशयोक्ती वाटते.. थोडे स्पष्टीकरण असते तर बांधणी झकास जमली असती.

आणि हो, वरणभात साजूक तूप लोकांच्या negative कमेंट येतील तिकडे दुर्लक्ष करा..

बाकी एवढा दुरावा असताना फक्त स्नेहाने पाहिल्यामुळे प्रणय होणे म्हणजे अतिशयोक्ती वाटते.. थोडे स्पष्टीकरण असते तर बांधणी झकास जमली असती.>> +१

पती-पत्नी मधील दुरावा, तोही लग्नाच्या ४ वर्षांत.. तो एवढ्या सहजपणे संपला, हे पटत नाही. अशा परिस्थितीत स्त्री बऱ्याचदा मनाने दुरावलेली असते. त्यामुळे नात्याची नव्याने सुरुवात ही खूपच वेळ लागणारी गोष्ट आहे.
किमान मीरा ताईंनी काही समुपदेशन केलं असं तरी दाखवायचं. कबुतरांची गरज नव्हती.

म्हणून मुलाला घेऊन भावाकडे राहायला येणार >>> मीराला मुलगा होता...मामाकडे येता येता मुलगी झाला का?

मीराला शेखरच्या मैत्रिणीकडून सारं काही कळाले होते. >> बेडरुममधल्या गोष्टी मैत्रीणीला माहित Sad

तिने त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याला नकळत त्याचे चॅट पाहिले >> सो मॅनर्सलेस! लग्न झालेल्या भावाच्या फोनमधे डोकवतात का?

पुढचं सगळं लिखाण 'अरे देवा!' कॅटेगरीतले आहे.

माहेरी कुठलीच स्त्री नवऱ्याजवळ झोपणार नाही.}}}
जर ते घर छोटे आहे आणि दोन्ही कपल्सना सेपरेट रूम्स / प्रायवर्सी देऊ शकणारे नाही तर बहुतांश अश्या प्रसंगी सर्व लेडीज कंपनी आतल्या खोलीत / बेडरूम आणि सर्व जेंट्स कंपनी बाहेरच्या खोलीत / हॉल असा पर्याय दोन्ही पार्टीना शिळोप्याच्या गप्पा मारत हितगुज करायला सोईचा ठरतो.

माहेरी कुठलीच स्त्री नवऱ्याजवळ झोपणार नाही.}}}>>> अहो तिच नवरा दुसर्या दिवशी आठ दिवसांसाठी बाहेरगावी चाललाय म्हणून रात्री दोघांना एकांत दिला असेल.
बाकी कथा नाही आवडली.

<<माहेरी कुठलीच स्त्री नवऱ्याजवळ झोपणार नाही.}}}>>> अहो तिच नवरा दुसर्या दिवशी आठ दिवसांसाठी बाहेरगावी चाललाय म्हणून रात्री दोघांना एकांत दिला असेल.>>+१
पण स्नेहाला अचानक उपरती झाली हे पटलं नाही. मीरानी थोडं समुपदेशन केलेलं दाखवायला हवं होतं

कबुतरांची गरज नव्हती.
>>> हो शमत आहे. हे मी लिहिता लिहिता राहून गेले. शिवाय कबुतरांचे जरा जास्तच वर्णन केले आहे जे वास्तविक मीरा व श्रीपतराव यांचे करायला हवे होते. बाकी असा प्रसंग जागेअभावी किंवा नवरा दुसऱ्या दिवशी जाणार आहे म्हणून नाईलाजाने हॉल मध्ये असले तरी घडणे शक्य आहे.

" बच्चा ,आता मी आलीय ना, नो टेंशन" शेखरच्या पाठीवर मीराचा हात पडताच चमकला
>>> म्हणजे रात्रीच्या कार्यक्रमाविषयी हिंट दिली का? समस्या माहित होती म्हणजे जसा मांत्रिक काय उपाय करायचा आधीच ठरवूनच येतो तसे हे दोघे ठरवूनच आले होते बहुतेक.

एकंदर पहिले मुल झाल्यावर स्नेहाचे या गोष्टीतले मन उडाले होते (घडू शकते असे) बहुतेक एवडीच समस्य होती व ती मीरा व श्रीपतराव (हे भगवान.... नांवे बदला बुवा. नावे वाचून वाचकाची इच्छाशक्ती मरते) आणि कबुतरे यांच्या संयुक्त व अथक प्रयत्नांती ती इच्छाशक्ती परत येण्यात यश मिळाले. शेखर सुद्धा हि समस्या मैत्रिणीला सांगतो म्हणजे मैत्रिणीकडून मदतीची अपेक्षा होती का त्याला?

बाकी मायबोलीवर विबांस वर झोडून चर्चा करणाऱ्यांना विवाहित जोडप्यात निर्माण झालेला शृंगाररसचे वर्णन वाचून नाके का बरे मुरडली असावीत. हा सुद्धा मराठीतला एक रस आहे. प्रतिलिपी सारख्या साईटवर सुद्धा शृंगारिक कथा आहेत. इथे सुद्धा अजून यायला हरकत नही. या विषयावर वेगळा धागा काढवा वाटत आहे.

कथेचा मतितार्थ असा कि दुसऱ्यांचे सेक्स बघून ती ऑन झाली.
सरळ पॉर्न लावायची ना - सिम्पल सोल्युशन

आठ दिवस जातोय म्हणून एकांत दिला असेल. वा रे वा. मिलिटरी वाले सहा सहा महिने दूर जातात. मग ताळतंत्र सोडतात काय? प्रणय कथा ? शीट. कबुतरांचे वर्णन तद्दन बकवास आहे.

कथा आहे ती

तिच्याकडे कथा म्हणून च पहा

विषवल्ली ! -3 या धाग्यात बलात्कारच रसरशीत, डिटेल वर्णन केलंय आणि त्यात बाईदेखील थोडीफार एक्साईट झालेली दाखवलीय. कोणीच आक्षेप घेतला नाही.

© प्रणयगुण या धाग्यात 'पत्नीने कसे शयनेषु रंभा असायला पाहिजे" वगैरे प्रवचन नणंदकडून मिळायची शक्यता होती पण तसे काही झाले नाही. आधी लग्न झालेल्या जोडप्यातला सेक्स बघून थोडी एक्साइट झालेली बाई नंतर पक्षीपॉर्न बघून नवर्यासोबत सेक्स करायला तयार झाली तर तिथे आक्षेप घेतला गेला.

तुझमे तेरा क्या है - ९ या धाग्यात एकमेकांबद्दल अतिशय शारीरिक आकर्षण असलेले पण लग्न न झालेले जोडपे अतिशय हिटेड सिच्युएशनमधे कपाळावर किस करतायत तर ते 'ओह्ह सो रोमँटिक' वाटतंय.

∆ ही सकाळीसकाळी तजेलदार बुद्धी असतानाची माझी निरीक्षणं.....

कथेची गरज म्हणून दुर्लक्ष करायचे असते. हे अनेक चित्रपट नायिकांनी बलात्कार/अंगावर येणारा रोमान्स चे समर्थन करताना सांगितले आहे. तेव्हा वाचकांनी कथानकाची डिमांड लक्षात घेऊन लिखाणाचा आस्वाद घेतला पाहिजे.

आधी लग्न झालेल्या जोडप्यातला सेक्स बघून थोडी एक्साइट झालेली बाई नंतर पक्षीपॉर्न बघून नवर्यासोबत सेक्स करायला तयार झाली तर तिथे आक्षेप घेतला गेला.>>>>>>
amy आक्षेप कोणीच घेत नाहीये ओ,
त्यांची कथा , त्यांची पात्रे .... त्यांनी हवी तशी नाचावावीत,
फक्त ज्या पद्धतीने ते मांडले गेले आहे ते गंभीर वाटायच्या ऐवजी गमतीशीर वाटते.
नितीन राणे यांचे बाकीचे लिखाण इतके वर वर चे नसते , ते चांगले लिहितात , त्यामुळे तृटी जास्त जाणवते.

असो..., फसते एखाद्या कथेची मांडणी.

नितीन, पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत

आताच फेसबुक वर माझं पान या पेजवर ही कथा वाचली. तिथे प्रत्येकाने चांगली कथा म्हणून वाहवा केली आहे. एकही प्रतिसाद वाईट नाही.

नितीन, तुमच्या कथांची मी फॅन आहे. फक्त ही आणी आधीची ती दिवीजा नाव असलेली कथा रुचली नव्हती. तुम्ही या पेक्षा मालवणीतच ( म्हणजे मालवणी बोली भाषेतच ) कोकणातले अनूभव किंवा काल्पनीक कथा इथे लिहा. ते वर्णन वास्तववादी व भन्नाट असते. एक फॅन व वाचक म्हणून माझे हे सजेशन बाकी नथिंग.