क्रिकेट विश्वकप २०१९ - भारत वि. ईंग्लंड - अंतिम सामना ??

Submitted by हायझेनबर्ग on 5 July, 2019 - 11:08

विश्वकप आता 'करो या मरो' फेरीत येऊ ठेपला आहे. अपेक्षेप्रमाणे बाद फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत.
अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला पुन्हा एकदा ईंग्लंडशी लॉर्ड्स मैदानावर होण्याची बरीच शक्यता आहे.

साखळी फेरीतल्या आपल्या संघाच्या सगळ्या डिपार्टमेंटमधल्या कामगिरीवरून आणि खासकरून ईंग्लंड विरूद्धच्या पराभवावरून धडा घ्यायचा झाल्यास आगामी सामन्यासाठी भारतासमोर नक्कीच बरीच आव्हाने ऊभी आहेत. त्यातल्या काहींचा ऊहापोह मी ईथे करू ईच्छितो.

अ) सलामी जोडीचा सामन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन.
'सावध सुरूवात' हे आपल्या सलामी जोडीचे ह्या मालिकेतले वैशिष्ट्य दिसून आले आहे, खास करून रोहोत शर्माचे. आणि त्याने ह्या सावध सुरूवातीची मोठा स्कोर ऊभा करून अँकर ईनिंग खेळण्यात अद्वितीय यश आणि सातत्य दाखवले आहे. योग्य वेळी त्याच्या ह्या खेळींचे महत्व अधोरेखित आणि कौतूक होईलच. पण शिखर धवन सारखा फ्री-स्ट्रोकिंग प्लेअर जखमी झाल्यानंतर सलामीला येणार्‍या राहूल बरोबर रोहितच्या ह्या महत्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण खेळींचा सामन्यांवरचा ईंपॅक्ट कमी होतो आहे. ईंग्लंड आणि बांग्लादेश विरूद्धच्या दोन्ही सामन्यात ते प्रकर्षाने दिसून आले. त्याला कारण आहे राहूलचा सुद्धा सावध अ‍ॅप्रोच. पहिल्या १० ओवर्समध्ये राहूलचा सावध अ‍ॅप्रोच पुढच्या ईग्लंड विरूद्धच्या सामन्यात ऊपयोगी पडणार नाही कारण ईंग्लंड आणि आपल्या टीममध्ये रनांचा जास्तीत जास्त फरक पडण्याची ह्याच १० ओवर्स महत्वाच्या ठरणार आहेत. रॉय-बेअरस्टो जोडी ह्या १० ओवर्सचा ऊपयोग मोमेंटम बिल्ड करण्यासाठी पुरेपूर करून घेत आहे आणि ते ही कमालीचे सातत्याने. होम कंडिशन्स मध्ये खेळण्याचा त्यांना मिळत असलेला हा सगळ्यात मोठा फायदा.
हा फायदा आपणही नक्कीच मिळवू शकतो जर आपण राहूल ऐवजी पंतला रोहितबरोबर सलामीला पाठवले. हा प्रयोग सुचवण्यापाठी माझी काही कारणे.

१) पंतचा प्रेशर झुगारून आपला नॅचरल गेम खेळण्याकडे असलेला कल
हा कल आपण सेहवागमध्येसुद्धा बघितला आणि जो रॉय कडेही आहे. ही मानसिकता आहे जी ऑर्थोडॉक्स शॉट्स खेळण्याच्या स्किलची कमतरता भरून काढते. आप्ल्याला पंतचे हे शॉट्स अतिशय रिस्की वाटत असले तरी त्याने आजवरच्या त्याच्या खेळातून त्याबद्दलचे रिवार्ड्सही मिळवून दिले आहेत.
पंतची हीच मानसिकता आपल्याला ईम्ग्लंड सारख्या धडाकेबाज बॅटिंग लाईन अपशी दो-दो हात करण्याचे बळ देईल. ईग्लंड भक्कम बॅटिंङ टीम आहे म्हणूनच त्यांच्या बोलिंगची पिसं काढणं आपल्याला जरूरी आहे. थोडक्यात विकेट गमवायच्या भितीने ग्रासलेला सलामीवीरा ऐवजी अशी भिती न बाळगता खेळणारा बॅट्समन आपल्याला हवा आहे.

२) नवीन बॉल - जुना बॉल
जुन्या बॉलवर आणि शेवटाला स्लो होत असलेल्या ईंग्लिश पीचेस वर रन्स काढणे अवघड होत आहे. म्हणूनच काही ४-५ मॅचेसचा अपवाद वगळता आजवर खेळलेल्या ८०+ ईनिंग्जच्या शेवटाला धडाकेबाज फलंदाजी दिसून आली नाही. म्हणून ही धडाकेबाज फलंदाजी सुरूवातीलाच करणे जरूर आहे ती जमवून आणण्यासाठी सुद्धा पंत हवा. आयपील मध्ये सुद्धा नवीन बॉलवर (पंत साधारणतः पहिल्या १०-१२ ओवर्समध्ये खेळायला येतो) त्याचे मोठे शॉट्स आपण पाहिले आहेत.
ह्या मालिकेसाठी पहिल्याने वापरत असलेला बॉलवरचाचा नवीन प्रकारचा ग्लॉस आणि त्याखालचा बदलेला पेंट नेहमीच्या बॉलपेक्षा लवकर वेअर ऑफ होतो आहे (दोन बॉल्स वापरले जात असूनही) त्यामुळे शेवटच्या हाणामारीच्या शटकात सॉफ्ट बॉलला मारणे तेवढे सोपे नाही असे माझे मत आहे. बॉल बद्दलचा हा मुद्दा कदाचित सिरिज संपल्यावर चर्चेला येईल असा माझा अंदाज आहे.

३)पहिल्या १० ओवर्समधल्या फिल्ड रिस्ट्रिक्श्न्सचा पुरेपूर ऊपयोग
सावध सुरूवातीचे अजून एक नुकसान म्हणजे जिथे फिल्डिंग फलंदाजाला फेवरेबल आहे नेमका तिथेच आपण रेट वाढवायला कमी पडतो आहे. त्या फिल्ड रिस्ट्रिक्श्न्सचा वापर करून घेण्यासाठी रिस्क घेत ऊंचावरून फटके मारणारा फलंदाजच हवा. रोहित ही रिस्क घेणार नाहीये आणि राहूलही घेणार नसेल तर पंत ह्यासाठी एकदम सुटेबल रिप्लेसमेंट आहे.

४)बदललले ऊन्हाळी हवामान.
पावसाळी हवेचे दिवस जाऊन कडक ऊन पडत आहे त्यामुळे स्विंग फारसा होत नाहीये आणि एजबॅस्टनच्या विकेट मधून (आधीच्या सामन्यांपेक्षा वेगळी स्ट्रीप असली तरी) बोलर्सना फार मदत मिळते आहे असे दिसत नाहीये. हे दोन सकारात्मक मुद्दे पाहून पंत सलामीला अगदीच चाचपडणार नाही असे म्हणायला हरकत नाही.

५)पंतच्या जागी राहूल ४ किंवा ५ नंबर जागेवर
राहूलला अजूनही सलामीला विकेट्स टिकवण्याच्या प्रेशर किंवा एक्स्ट्रा कॉशसनेस मधून बाहेर पडता येत नाहीये. ४ नंबर वर हे प्रेशर नसल्याने तो जास्त ओपनली खेळू शकेल असे मला वाटते. जे त्याने खरेतर आधी दाखवून दिले आहे.
पण धोनीला ४ नंबरवर खेळवावे असे माझे स्पष्ट मत बनले आहे. तो ४ नंबरचा बॅट्समन आहे म्हणून नाही पण ईतर कुठल्याही नंबरवर तो खेळू शकत नाहीये. त्याच्याबरोबर खेळायला कोहली किंवा रोहित असतील तर स्ट्राईक रोटेट करणे धोनीला जास्त सोपे पडेल अगदी स्पीनर्स असले तरी एक बाजू विकेट न फेकता लाऊन धरणे त्याला सहज जमण्यासारखे आहे.

६) राईट-लेफ्ट काँबिनेशन
अगदी प्रुव करता येण्यासारखे नसले तरी ह्याचे नक्कीच फायदे आहेत. एक बोलिंग लाईन ठेवायला बोलर्सना त्रास होतो हे आहेच पण पंत सारखा धडाकेबाज फलंदाज वोक्स आणि आर्चर च्या लाईन्स आनी लय सुरूवातीलाच ठरवून बिघडवू शकतो जे शर्मा आणि कोहलीला फायदेशीर आहे

७)एका साईडची जवळ बाँड्रीलाईन
नवीन स्ट्रीप मिळाली तर लेग आणि ऑफ साईडच्या बॉड्रीसाईझेसचे गुणोत्तर ५९-७५ असे राहणार नाही पण अगदीच सम-समानही होणार नाही. म्हणून रिस्ट्रिक्टेड फील्ड असतांना (पहिल्या पावरप्लेमध्ये) डावरा-ऊजवा बॅट्समनची जोडी आळीपाळीने लहान बाँड्रीलाईनचा फायदा नक्कीच ऊचलू शकते.

ब) आदिल रशिदच्या ओवर्सचा चांगला वापर करून घेणे
रशिद ईग्लंडच्या बोलिंग लाईनप मधली वीक लिंक आहे. रशिद, स्टोक्स आणि रूट मिळून १० चा कोटा पूर्ण करणार अशी चिन्ह आहेत. ह्या १० ओवर्सचा रनरेट वाढवण्यासाठी चांगला वापर करणॅ जरूरी आहे

क) नवा बॉल शमी आणि भुवीकडे सोपवणे
बुमराने पहिल्या पावरप्ले मध्ये बोलिंग टाकू नये असे मला वाटते. ह्या स्पेल मध्ये तो लाईन आणि लेंग्थ आजिबात न बदलता फक्त जखडून ठेवणारे ईनस्विंगर टाकत आहेत. ज्यात रन्स जात नाहीत पण विकेट मिळण्याची शक्यता सुद्धा खूप कमी आहे. नंतरच्या स्पेल्स मध्ये त्याने लाईन आणि लेंग्थ बदलवून यशस्वीरित्या विकेट्स मिळवल्या आहेत. भुवी किंवा शमीपैकी (ज्यांची लाईन-लेंग्थ वर विकेट्सची मिळवण्याची जास्त संधी तयार करते) एकाला मार पडल्यासच बुमराला आणावे नाहीतर पहिला बोलिंग चेंज म्हणून बुमरा ८-९ व्या ओवरला पांड्या बरोबर येईल.

ड्)शमीच्या ओवर्स डेथ फेज चालू होण्याआधीच संपवणे.
शमी डेथ फेज मध्ये जिथे खेळ स्लो करणे जरूरी आहे तिथे पेस देऊन रन्स सोडत आहे. त्याच्या स्ट्राईकिंग अ‍ॅबिलिटीचा वापर मधल्या ओवर्समध्ये संपवून ४० ओवर्सनंतर जास्तीतजास्त बुमरा व भुवीच्या राहतील असे बघावे.

ई)चहल ची मानसिकता.
विकेट्स न मिळाल्यास अ‍ॅग्रेसिव आणि रिस्क टेकिंग मानसिकता बदलवून रन्सचा फ्लो रोखण्यावर भर द्यावा आणि त्यानुसार लाईन आणि लेंग्थ चेंज करावी.

आणि शेवटचे आपल्या हातात नसले तरी टॉस जिंकावाच आणि पहिले बॅटिग घ्यावी.
येत्या श्रीलंकेविरूद्ध्च्या सामन्यात ह्यातले काही प्रयोग खासकरून पंतला सलामीला ऊतरवण्याचा प्रयोग बघायला आवडेल. ह्या महत्वाच्या टप्प्यावर अगरवालला घेऊन अजून अनसर्टेंटी वाढवणार नाहीत अशी अपेक्षा आहे.

मला विचाराल तर क्रिकेटमधल्या स्कीलच्या बाबतीत ईग्लंड आणि वेस्ट ईंडिज ह्या काही फार वेगळ्या टीम्स नाहीत. फक्त एक स्कील जे विंडिजकडे नाही पण ईग्लंडकडे आहे ते म्हणजे मोमेंटम कॅश ईन करणे. ईंग्लंड टीम फक्त आणि फक्त मोमेंटमवर चालते. त्यांचा सगळा डोलारा रॉय (बेअरस्टो नाही) आणि रूट ह्या दोन प्लेअर्सच्या खांद्यावर टिकलेला आहे. एक मोमेंटम देतो तर दुसरा स्टॅबिलिटी. हा डोलारा ढासळवण्यासाठी ह्या दोघांना टार्गेट करणे जरूरी आहे. स्टोक्स नावाचा एक फॅक्टर आहे जो बराचसा ह्या डोलार्‍याबाहेर ऑपरेट करू शकतो पण एकदा का डोलारा ढासळला की त्याचे प्रयत्न फारसे पुरे पडत नाही.

बघूया काय होते आहे आता न्यूझीलंड विरूद्धच्या ऊपांत्य फेरीत.

लॉर्ड्सच्या पीचच्या अंदाजावरून कार्तिकला घ्यायचे की जडेजाला तेवढाच एक संभावित बदल माझ्यामते घडू शकतो.

गो टीम ईंडिया.!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते वेदर कंडिशन, लो टार्गेट आणि आप्ल्या विकेट्स पडण्याची मोठी शक्यता पाहता जेवढी मॅच कमी ओवर्सची तेवढे चांगले. >> करेक्ट.

तुम्ही वेगळ्या पिचवर का खेळताय. Happy

Law of averages, mean reversion, too big to fail, what goes up fast comes down fast, whatever can go wrong will go wrong
अशी सगळी वाक्ये मला आज उगीचच आठवत आहेत.

>>अशी सगळी वाक्ये मला आज उगीचच आठवत आहेत.<<
हे एक राहिलं - अब उन्हे दवा कि नहि, दुवा कि जरुरत है...

हो हो राज Proud
ही अजून काही.
known devil is better than unknown angel
be careful what you wish for
never underestimate your opponent
History does repeat itself especially in the Cricket World Cup ( 1996 Kolkata Semi Final against Sri Lanka) कालच वाटत होतं असे काही तरी होणार .. त्यावरून हेही म्हणून घेतो Always trust your gut Lol

माझ्या मते उद्याच मोठा उलटफेर होऊन भारत हरणार.

Submitted by महाश्वेता on 8 July, 2019 - 13:07
>>>>>
माझ्या मते ही भविष्यवाणी करणारी मी एकमेव असेन. आणि याचा मला आनंद वगैरे अजिबात होत नाहीये, उलट श्वेते आपल्या टीमने तुझे दात घशात घातले बघ, असं म्हटलं असतं तरी मला आनंदच झाला असता.
आता मी हे विधान का केलं याच कारण सांगते.
१. रोहित शर्मा - डिसीजन सायन्सचा नियम इतका लागू पडेल, असं वाटलं नव्हतं, पण रोहितला तो लागू पडला. मागच्या मॅचला तो अक्षरशः झिरो वर आउट झाला तरी चालेल, म्हणजे त्याचा चार्ट बॅलन्स राहील असं वाटलं, पण तिथे शतक केलं, आणि आता हा चार्ट खाली येईन याची शक्यता ९०% तरी झाली.

२. मैदान, पाऊस आणि गोलंदाजी - जर भक्कम वेगवान गोलंदाजी असेन, पावसाने स्विंग मिळत असेल आणि समोर आजसारखं मैदान असेल, तर क्रिकेट हा गोलंदाजांचा खेळ होतो. किंबहुना वेगवान गोलंदाजांचाच. मैदानाच नाव ऐकून आणि पावसाची शक्यता वर्तवलेली असल्यावर न्यूझीलंडची फास्ट गोलंदाजी बहरात येणार असं वाटलंच होतं, आणि तेच घडलं.

अपुनका दिन नहि था आज. धोनी, डायरेक्ट थ्रोवर काहि इंचाने रन आउट व्हावा याचा अर्थ क्रिकेटिंग गॉड्स वेर फेवरिंग किवीज. वेल प्लेड रहेजा+धोनी...

३. टॉप ऑर्डर - सगळा वर्ल्ड कप आपण टॉप ऑर्डरवर गाजवला, आणि इथेही डिसीजन सायन्सचा नियम लागू पडला. पत्त्याचा बंगला कोसळला. मिडल ऑर्डरला तितकं एक्स्पोजर मिळालंच नव्हतं वर्ल्ड कपला, तरीही त्यांच्या प्रयत्नांना दाद.

४. केन विलीयम्सन - हा माणूस मला स्टीफन फ्लेमिंगच सुधारित व्हर्जन वाटायचा आणि आज त्यावर शिक्कामोर्तब झालं. अतिशय धूर्त पण तितकाच डाऊन टू अर्थ कॅप्टन, आणि आय पी एल लाच याची चुणूक दिसली होती.

When in England play as British play a.k.a Take early wickets keep early wickets.

मिडल ऑर्डर बद्दलची लॅक ऑफ क्लॅरिटी शेवटी भोवलीच. खुद्द भारतीय नेत्त्रुत्व आणि थिंक टँक ह्याबाबतीत शेवटपर्यंत गोंधळलेले होते हे लख्खं दिसून आले. संपुर्ण टटुर्नामेंट् कोहलीला बदललेल्या धोनीला समजून घ्यायला आणि हँडल करायला आजिबात जमले नाही. तो कायम धोनीच्या लार्जर दॅन लाईफ ईमेजखाली दबल्यासारखा वाटला. (ह्याने तर सगळे पाहिले आहे, ह्याला तर सगळे कळते ह्याला काय मॅनेज करायचे)

शेवटच्या मॅच मध्ये कोहलीची कॅप्टन्सी त्याच्या पर्सनल फेल्युअरमुळे निगेटिवली अ‍ॅफेक्ट झाली का ते ही शोधणे ईंट्र्स्टिंग असेल. मला वाटते ईथे विल्यमसन कोहलीला वरचढ ठरला.

Player of the tournament कोण असेल?
शाकिब
रोहित
स्टार्क
आर्चर
विल्यमसन
रूट
फर्ग्यूसन

Player of the tournament कोण असेल?
>>>> विल्यमसन

न्यूझीलंड विश्वविजेता!

इंग्लंड व न्यूझीलंडची गोलंदाजी समान तुल्यबळ आहे. परंतु इंग्लंडची फलंदाजी न्यूझीलंडच्या तुलनेत खूप जास्त तगडी आहे. न्यूझीलंडकडे विल्यमसन व टेलर हे दोनच भरवशाचे फलंदाज आहेत. इंग्लंडचे सुरूवातीचे ६-७ फलंदाज भरात आहेत.

त्यामुळे अंतिम सामना इंग्लंड जिंकेल असे वाटते.

Pages