क्रिकेट विश्वकप २०१९ - भारत वि. ईंग्लंड - अंतिम सामना ??

Submitted by हायझेनबर्ग on 5 July, 2019 - 11:08

विश्वकप आता 'करो या मरो' फेरीत येऊ ठेपला आहे. अपेक्षेप्रमाणे बाद फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत.
अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला पुन्हा एकदा ईंग्लंडशी लॉर्ड्स मैदानावर होण्याची बरीच शक्यता आहे.

साखळी फेरीतल्या आपल्या संघाच्या सगळ्या डिपार्टमेंटमधल्या कामगिरीवरून आणि खासकरून ईंग्लंड विरूद्धच्या पराभवावरून धडा घ्यायचा झाल्यास आगामी सामन्यासाठी भारतासमोर नक्कीच बरीच आव्हाने ऊभी आहेत. त्यातल्या काहींचा ऊहापोह मी ईथे करू ईच्छितो.

अ) सलामी जोडीचा सामन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन.
'सावध सुरूवात' हे आपल्या सलामी जोडीचे ह्या मालिकेतले वैशिष्ट्य दिसून आले आहे, खास करून रोहोत शर्माचे. आणि त्याने ह्या सावध सुरूवातीची मोठा स्कोर ऊभा करून अँकर ईनिंग खेळण्यात अद्वितीय यश आणि सातत्य दाखवले आहे. योग्य वेळी त्याच्या ह्या खेळींचे महत्व अधोरेखित आणि कौतूक होईलच. पण शिखर धवन सारखा फ्री-स्ट्रोकिंग प्लेअर जखमी झाल्यानंतर सलामीला येणार्‍या राहूल बरोबर रोहितच्या ह्या महत्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण खेळींचा सामन्यांवरचा ईंपॅक्ट कमी होतो आहे. ईंग्लंड आणि बांग्लादेश विरूद्धच्या दोन्ही सामन्यात ते प्रकर्षाने दिसून आले. त्याला कारण आहे राहूलचा सुद्धा सावध अ‍ॅप्रोच. पहिल्या १० ओवर्समध्ये राहूलचा सावध अ‍ॅप्रोच पुढच्या ईग्लंड विरूद्धच्या सामन्यात ऊपयोगी पडणार नाही कारण ईंग्लंड आणि आपल्या टीममध्ये रनांचा जास्तीत जास्त फरक पडण्याची ह्याच १० ओवर्स महत्वाच्या ठरणार आहेत. रॉय-बेअरस्टो जोडी ह्या १० ओवर्सचा ऊपयोग मोमेंटम बिल्ड करण्यासाठी पुरेपूर करून घेत आहे आणि ते ही कमालीचे सातत्याने. होम कंडिशन्स मध्ये खेळण्याचा त्यांना मिळत असलेला हा सगळ्यात मोठा फायदा.
हा फायदा आपणही नक्कीच मिळवू शकतो जर आपण राहूल ऐवजी पंतला रोहितबरोबर सलामीला पाठवले. हा प्रयोग सुचवण्यापाठी माझी काही कारणे.

१) पंतचा प्रेशर झुगारून आपला नॅचरल गेम खेळण्याकडे असलेला कल
हा कल आपण सेहवागमध्येसुद्धा बघितला आणि जो रॉय कडेही आहे. ही मानसिकता आहे जी ऑर्थोडॉक्स शॉट्स खेळण्याच्या स्किलची कमतरता भरून काढते. आप्ल्याला पंतचे हे शॉट्स अतिशय रिस्की वाटत असले तरी त्याने आजवरच्या त्याच्या खेळातून त्याबद्दलचे रिवार्ड्सही मिळवून दिले आहेत.
पंतची हीच मानसिकता आपल्याला ईम्ग्लंड सारख्या धडाकेबाज बॅटिंग लाईन अपशी दो-दो हात करण्याचे बळ देईल. ईग्लंड भक्कम बॅटिंङ टीम आहे म्हणूनच त्यांच्या बोलिंगची पिसं काढणं आपल्याला जरूरी आहे. थोडक्यात विकेट गमवायच्या भितीने ग्रासलेला सलामीवीरा ऐवजी अशी भिती न बाळगता खेळणारा बॅट्समन आपल्याला हवा आहे.

२) नवीन बॉल - जुना बॉल
जुन्या बॉलवर आणि शेवटाला स्लो होत असलेल्या ईंग्लिश पीचेस वर रन्स काढणे अवघड होत आहे. म्हणूनच काही ४-५ मॅचेसचा अपवाद वगळता आजवर खेळलेल्या ८०+ ईनिंग्जच्या शेवटाला धडाकेबाज फलंदाजी दिसून आली नाही. म्हणून ही धडाकेबाज फलंदाजी सुरूवातीलाच करणे जरूर आहे ती जमवून आणण्यासाठी सुद्धा पंत हवा. आयपील मध्ये सुद्धा नवीन बॉलवर (पंत साधारणतः पहिल्या १०-१२ ओवर्समध्ये खेळायला येतो) त्याचे मोठे शॉट्स आपण पाहिले आहेत.
ह्या मालिकेसाठी पहिल्याने वापरत असलेला बॉलवरचाचा नवीन प्रकारचा ग्लॉस आणि त्याखालचा बदलेला पेंट नेहमीच्या बॉलपेक्षा लवकर वेअर ऑफ होतो आहे (दोन बॉल्स वापरले जात असूनही) त्यामुळे शेवटच्या हाणामारीच्या शटकात सॉफ्ट बॉलला मारणे तेवढे सोपे नाही असे माझे मत आहे. बॉल बद्दलचा हा मुद्दा कदाचित सिरिज संपल्यावर चर्चेला येईल असा माझा अंदाज आहे.

३)पहिल्या १० ओवर्समधल्या फिल्ड रिस्ट्रिक्श्न्सचा पुरेपूर ऊपयोग
सावध सुरूवातीचे अजून एक नुकसान म्हणजे जिथे फिल्डिंग फलंदाजाला फेवरेबल आहे नेमका तिथेच आपण रेट वाढवायला कमी पडतो आहे. त्या फिल्ड रिस्ट्रिक्श्न्सचा वापर करून घेण्यासाठी रिस्क घेत ऊंचावरून फटके मारणारा फलंदाजच हवा. रोहित ही रिस्क घेणार नाहीये आणि राहूलही घेणार नसेल तर पंत ह्यासाठी एकदम सुटेबल रिप्लेसमेंट आहे.

४)बदललले ऊन्हाळी हवामान.
पावसाळी हवेचे दिवस जाऊन कडक ऊन पडत आहे त्यामुळे स्विंग फारसा होत नाहीये आणि एजबॅस्टनच्या विकेट मधून (आधीच्या सामन्यांपेक्षा वेगळी स्ट्रीप असली तरी) बोलर्सना फार मदत मिळते आहे असे दिसत नाहीये. हे दोन सकारात्मक मुद्दे पाहून पंत सलामीला अगदीच चाचपडणार नाही असे म्हणायला हरकत नाही.

५)पंतच्या जागी राहूल ४ किंवा ५ नंबर जागेवर
राहूलला अजूनही सलामीला विकेट्स टिकवण्याच्या प्रेशर किंवा एक्स्ट्रा कॉशसनेस मधून बाहेर पडता येत नाहीये. ४ नंबर वर हे प्रेशर नसल्याने तो जास्त ओपनली खेळू शकेल असे मला वाटते. जे त्याने खरेतर आधी दाखवून दिले आहे.
पण धोनीला ४ नंबरवर खेळवावे असे माझे स्पष्ट मत बनले आहे. तो ४ नंबरचा बॅट्समन आहे म्हणून नाही पण ईतर कुठल्याही नंबरवर तो खेळू शकत नाहीये. त्याच्याबरोबर खेळायला कोहली किंवा रोहित असतील तर स्ट्राईक रोटेट करणे धोनीला जास्त सोपे पडेल अगदी स्पीनर्स असले तरी एक बाजू विकेट न फेकता लाऊन धरणे त्याला सहज जमण्यासारखे आहे.

६) राईट-लेफ्ट काँबिनेशन
अगदी प्रुव करता येण्यासारखे नसले तरी ह्याचे नक्कीच फायदे आहेत. एक बोलिंग लाईन ठेवायला बोलर्सना त्रास होतो हे आहेच पण पंत सारखा धडाकेबाज फलंदाज वोक्स आणि आर्चर च्या लाईन्स आनी लय सुरूवातीलाच ठरवून बिघडवू शकतो जे शर्मा आणि कोहलीला फायदेशीर आहे

७)एका साईडची जवळ बाँड्रीलाईन
नवीन स्ट्रीप मिळाली तर लेग आणि ऑफ साईडच्या बॉड्रीसाईझेसचे गुणोत्तर ५९-७५ असे राहणार नाही पण अगदीच सम-समानही होणार नाही. म्हणून रिस्ट्रिक्टेड फील्ड असतांना (पहिल्या पावरप्लेमध्ये) डावरा-ऊजवा बॅट्समनची जोडी आळीपाळीने लहान बाँड्रीलाईनचा फायदा नक्कीच ऊचलू शकते.

ब) आदिल रशिदच्या ओवर्सचा चांगला वापर करून घेणे
रशिद ईग्लंडच्या बोलिंग लाईनप मधली वीक लिंक आहे. रशिद, स्टोक्स आणि रूट मिळून १० चा कोटा पूर्ण करणार अशी चिन्ह आहेत. ह्या १० ओवर्सचा रनरेट वाढवण्यासाठी चांगला वापर करणॅ जरूरी आहे

क) नवा बॉल शमी आणि भुवीकडे सोपवणे
बुमराने पहिल्या पावरप्ले मध्ये बोलिंग टाकू नये असे मला वाटते. ह्या स्पेल मध्ये तो लाईन आणि लेंग्थ आजिबात न बदलता फक्त जखडून ठेवणारे ईनस्विंगर टाकत आहेत. ज्यात रन्स जात नाहीत पण विकेट मिळण्याची शक्यता सुद्धा खूप कमी आहे. नंतरच्या स्पेल्स मध्ये त्याने लाईन आणि लेंग्थ बदलवून यशस्वीरित्या विकेट्स मिळवल्या आहेत. भुवी किंवा शमीपैकी (ज्यांची लाईन-लेंग्थ वर विकेट्सची मिळवण्याची जास्त संधी तयार करते) एकाला मार पडल्यासच बुमराला आणावे नाहीतर पहिला बोलिंग चेंज म्हणून बुमरा ८-९ व्या ओवरला पांड्या बरोबर येईल.

ड्)शमीच्या ओवर्स डेथ फेज चालू होण्याआधीच संपवणे.
शमी डेथ फेज मध्ये जिथे खेळ स्लो करणे जरूरी आहे तिथे पेस देऊन रन्स सोडत आहे. त्याच्या स्ट्राईकिंग अ‍ॅबिलिटीचा वापर मधल्या ओवर्समध्ये संपवून ४० ओवर्सनंतर जास्तीतजास्त बुमरा व भुवीच्या राहतील असे बघावे.

ई)चहल ची मानसिकता.
विकेट्स न मिळाल्यास अ‍ॅग्रेसिव आणि रिस्क टेकिंग मानसिकता बदलवून रन्सचा फ्लो रोखण्यावर भर द्यावा आणि त्यानुसार लाईन आणि लेंग्थ चेंज करावी.

आणि शेवटचे आपल्या हातात नसले तरी टॉस जिंकावाच आणि पहिले बॅटिग घ्यावी.
येत्या श्रीलंकेविरूद्ध्च्या सामन्यात ह्यातले काही प्रयोग खासकरून पंतला सलामीला ऊतरवण्याचा प्रयोग बघायला आवडेल. ह्या महत्वाच्या टप्प्यावर अगरवालला घेऊन अजून अनसर्टेंटी वाढवणार नाहीत अशी अपेक्षा आहे.

मला विचाराल तर क्रिकेटमधल्या स्कीलच्या बाबतीत ईग्लंड आणि वेस्ट ईंडिज ह्या काही फार वेगळ्या टीम्स नाहीत. फक्त एक स्कील जे विंडिजकडे नाही पण ईग्लंडकडे आहे ते म्हणजे मोमेंटम कॅश ईन करणे. ईंग्लंड टीम फक्त आणि फक्त मोमेंटमवर चालते. त्यांचा सगळा डोलारा रॉय (बेअरस्टो नाही) आणि रूट ह्या दोन प्लेअर्सच्या खांद्यावर टिकलेला आहे. एक मोमेंटम देतो तर दुसरा स्टॅबिलिटी. हा डोलारा ढासळवण्यासाठी ह्या दोघांना टार्गेट करणे जरूरी आहे. स्टोक्स नावाचा एक फॅक्टर आहे जो बराचसा ह्या डोलार्‍याबाहेर ऑपरेट करू शकतो पण एकदा का डोलारा ढासळला की त्याचे प्रयत्न फारसे पुरे पडत नाही.

बघूया काय होते आहे आता न्यूझीलंड विरूद्धच्या ऊपांत्य फेरीत.

लॉर्ड्सच्या पीचच्या अंदाजावरून कार्तिकला घ्यायचे की जडेजाला तेवढाच एक संभावित बदल माझ्यामते घडू शकतो.

गो टीम ईंडिया.!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>थोडक्यात विकेट गमवायच्या भितीने ग्रासलेला सलामीवीरा ऐवजी अशी भिती न बाळगता खेळणारा बॅट्समन आपल्याला हवा आहे.
>>पण धोनीला ४ नंबरवर खेळवावे असे माझे स्पष्ट मत बनले आहे. तो ४ नंबरचा बॅट्समन आहे म्हणून नाही पण ईतर कुठल्याही नंबरवर तो खेळू शकत नाहीये.

पूर्ण पोस्टच पटली.... पण वरची दोन वाक्ये जरा जास्तच पटली
Happy

भारत-इंग्लंड असा उपांत्य फेरीचा सामना होणार का भारत-न्यूझीलंड असा सामना होणार ते आधी नक्की होऊ दे.

बव्हंशी सहमत.
*फिल्ड रिस्ट्रिक्श्न्सचा वापर करून घेण्यासाठी रिस्क घेत ऊंचावरून फटके मारणारा फलंदाजच हवा. रोहित ही रिस्क घेणार नाहीये ...* - रोहितचा सध्याचा फाॅरम व दुणावलेला आत्मविश्वास पहातां, हें इतक्या ठामपणे नाही म्हणतां येणार.
*...स्पेल मध्ये तो लाईन आणि लेंग्थ आजिबात न बदलता फक्त जखडून ठेवणारे ईनस्विंगर टाकत आहेत.* - जर इंगलंड ह्याच पहिल्या स्पेलमधे धडाकेबाज खेळून वरचढ होते असं असेल, तर जखडून ठेवणारी गोलंदाजीच योग्य नाही का होणार? शिवाय, तो जखडून ठेवतो म्हणून भुवी व शमी विकेट मिळवण्यात अधिक प्रभावी ठरत अअसण्याची शक्यता आहेच.
पंतला पुढची मॅच सलामीचा खेळवून पहावं, हें पटतं.

हाब ब,क,ड बद्दल सहमत.
ओपनिंगला मयांक येणार. पहिली ट्रायल उद्या. श्रीलंके विरुद्ध. राहूल चौथा. मला ही आयडिया त्यातल्या त्यात बरी वाटतीय. पंत 5, धोनी/पांड्या 6/7. हे बेस्ट आहे. Happy
सुरूवातीला मारायची काही जरूर नाही. 40 आणि 60 मधला फरक विकेटस असतील तर सहज भरून काढता येतो.
चहलने aggressive च रहायला पाहिजे.

मला new Zealand सेमी आणि england फायनलला आल तर जास्त आवडेल. कारण मग सर्वांना हरवून विश्व विजेता झालो असे म्हणता येईल. Happy

पहिल्या दहा ओव्हर्समध्ये धावा निघत नाहीयेत आणि राहुलला अतिसावधतेमुळे फील प्लेसमेंटचा फायदा घेता येत नाहीये हे पटले. शमी पहिल्या षटकांत खूप धावा देतो हे दिसून आलेच आहे. पण भाऊंचेही मत पटले. पंत सलामीला हे पटले.

भारताचा श्रीलंकेविरूद्धचा विजय अनेक कारणांमुळे नक्कीच सुखावह आहे.
खासकरून राहूलचे शतक (मधूनच त्याचे शेल मध्ये जाऊन खेळणे फ्रस्ट्रेटिंग वाटले तरी) , बुमराच्या ईनिंगच्या सुरूवातील विकेट्स घेणे आणि जडेजाचा बोलिंग परफॉर्मन्स.
रोहितबद्दल काय बोलणार?

कुलदीपला का खेळवले हे मात्र माझ्यासाठी अनाकलनीय आहे. त्याएवजी शमीला अजून एक प्रॅक्टिस गेम मिळायला हवा होता.

आपण शेवटची मॅच जिंकून झोकात नाॅक आउट मधे प्रवेश केला. मला मुलांच्या पुस्तकातील एक कविता आठवली.
Ro Ro Row your boat gently down the stream.
Merrily merrily merrily , life is but a dream. Happy
रोहित आणि राहूल आता जोडी छान जमलीय
मॅचेस्टरला कालची विकेट असेल तर बाॅल टर्न होत होता. चाकू टिम मधे असतील. पाच बाॅलर . चार विकेट किपर आणि कर्णधार व उपकर्णधार.
चलो. All the best. Come on team India.

हाब, कुलदीप / चावला पैकी एक रिस्टस्पिनर टीम मधे हवा असं मला वाटतं. ३ पेसर्स २ स्पिनर्स आणी पंड्या हा बॉलिंग अ‍ॅटॅक योग्य वाटतो. माझ्या दृष्टीनं रोहित, राहूल, विराट, धोनी, पंड्या, पंत, जडेजा, भुवी, शामी, कुलदीप / चहल, बुमराह हा लाईन-अप सेमीज, आणी फायनल ला योग्य वाटतो.

आता न्यूझीलंड विरुद्ध भारत अशी मॅच होणार ना?
भारताचे चान्सेस जास्त आहेत जिंकण्याचे. तिकडे इंग्लंड बहुतेक ऑस्ट्रेलियाला हरवेन.
फायनल भारत विरुद्ध इंग्लंड, विजेता इंग्लंड!

जडेजा नाही बसत टीम मधे. कुलदीप पाहिजे च. भूवी कसा खेळणार?. मग एक बॅट्समन कमी होइल.

*फायनल भारत विरुद्ध इंग्लंड, विजेता इंग्लंड!>>>>
फायनल भारत विरुद्ध आॅसी, विजेता आॅसी* - कशावरून ? मग माझंही -
फायनल - भारत वि. कुणीही . भारत विजयी !! Wink

हाब, कुलदीप / चावला पैकी एक रिस्टस्पिनर टीम मधे हवा असं मला वाटतं. ३ पेसर्स २ स्पिनर्स आणी पंड्या हा बॉलिंग अ‍ॅटॅक योग्य वाटतो. >> अग्रीड.
माझ्या दृष्टीनं रोहित, राहूल, विराट, धोनी, पंड्या, पंत, जडेजा, भुवी, शामी, कुलदीप / चहल, बुमराह हा लाईन-अप सेमीज, आणी फायनल ला योग्य वाटतो. >> अग्रीड. माझी सुद्धा सेमीसाठी हीच टीम असेल. पण माझी पहली पसंती चहलला जरी त्याची ईकॉनॉमी कुलदीपपेक्षा खराब असली तरी.
४० ओवर्सच्या आधी पंत किंवा पंड्या दोघांपैकी एकालाच धोनीच्या आधी येऊ द्यावे. हेच जर ४०-४२ च्या ओवर्सच्या नंतर असेल तर मग दोघेही धोनीच्या आधी. थोडक्यात जेवढ्या लवकर दुसरी विकेट पडेल तेवढ्या लवकर धोनीला मैदानात ऊतरवावे. ईग्लंड विरूद्धची शर्मा-कोहली जोडीचे हाय डॉट बॉल पर्सेंटेज त्यांचा आपल्या मिडल-ऑर्डरवर विश्वास नसल्याचेच द्योतक आहे. धोनी वरती आल्यास कोहली/शर्मा मिडल ऑर्डरचे ओझे घेऊन खेळणार नाहीत आणि धोनीवर हाणामारी करून स्ट्राईक रेट १००+ हवाच असेही प्रेशर येणार नाही. हो पण त्याला स्ट्राईक रोटेशन मात्र जमवावेच लागेल.

ऊद्या बोल्टला फेवरेबल कंडिशन्स असतील असे दिसते त्यामुळे शर्माजींची ऊद्या बोल्टला तोंड देतांना कसोटी लागेल असे वाटते आहे.
ते ह्या कसोटीत खरे ऊतरतेल असाही विश्वास वाटतो आहे. स्टार्क, आमीरसमोर ते यशस्वी झालेत, पण बोल्टचा पेस त्या दोघांपेक्षा कमी असला तरी फेवरेबल कंडिशन्समध्ये तो जास्त डिसीविंग आहे.

मला केदार खेळेल जडेजा नाही आणि भूवीच्या ऐवजी कुलदीप असे वाटते. असो टीम काहीही असो. आपण जिंकणार हे नक्की. Happy

काय जबरदस्त बोलिंग केली पाचही जणांनी. बुमराने घेतलेली गुप्टीलची पहिली विकेट फारच महत्वाची होती. त्या विकेटने किवीजना सेमीज मधला 'फ्रेश स्टार्ट' विसरायला लाऊन 'लीग स्टेज' मधल्या पर्फॉर्मन्सचे 'ये रे माझ्या मागल्या' ची आठवण देत एकदमच बॅकफुटवर ढकलले.
रॉस टेलरच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत असलेले फ्र्स्ट्रेशन आपला आजचा बोलिंग अ‍ॅटॅक किती चांगला होता तेच सांगून जातेय.
विल्यमसन पण मस्त खेळला.... सिच्युएशन कितीही वाईट असो खंबीरपणे एक बाजू सातत्याने लाऊन धरणारा अशा मानसिकतेचा एक खेळाडू आपल्याकडे हवा. धवन आल्यानंतर राहूल जेव्हा ४ नंबर वर खेळायला जाईल तेव्हा तो असा खेळाडू बनू शकतो.

पीच नेमकं कसां आहे ते मात्र काही कळेना मला. १९९६ च्या ईडन गार्डनवरच्या श्रीलंका सेमी फायनलच्या आठवणींनी ऊचकी लागेल की काय असे ऊगीचच वाटते आहे.

साभार https://www.theguardian.com

In case New Zealand doesn't bat again, India's target in
46 overs will be 237
40 overs will be 223
35 overs will be 209
30 overs will be 192
25 overs will be 172
20 overs will be 148#IndvNZ #NZvInd#CWC19 #CWC2019

मी मागे एक क्रूड डकवर्थ-लूईस चा अल्गो एक्सेल मध्ये बनवला होता. तेव्हा ते डकवर्थ-लुईस होते आता डकवर्थ-लुईस-स्टर्न झाले आहे त्यामुळे माझे नंबर्स थोडे ऑफ असू शकतात. स्टर्नने अल्गो मध्ये अवेलेबल रिसोर्सेस (विकेट्स्+ओवर्स) टॉप हेवी करण्यासाठी थोडी सुधारणा केली होती.

समजा किवींनी ऊद्या ऊरलेल्या ४ ओवर्स मध्ये २११ वरून २३९ पर्यंत मजल मारली (बुमराच्या दोन ओवर्स असतांना २३०+ डोक्यावरून पाणी असेल पण तरी ठीक आहे टार्गेट २४० गृहीत धरू) तर आपल्यासाठी प्रत्येक ओवरमध्ये टार्गेट जवळपास असे असेल.

Overs % Target Rate
50 100 240 4.80
49 99.1 238 4.85
48 98.1 235 4.91
47 97.1 233 4.96
46 96.1 231 5.01
45 95 228 5.07
44 93.9 225 5.12
43 92.8 223 5.18
42 91.7 220 5.24
41 90.5 217 5.30
40 89.3 214 5.36
39 88 211 5.42
38 86.7 208 5.48
37 85.4 205 5.54
36 84.1 202 5.61
35 82.7 198 5.67
34 81.3 195 5.74
33 79.8 192 5.80
32 78.3 188 5.87
31 76.7 184 5.94
30 75.1 180 6.01
29 73.5 176 6.08
28 72.8 175 6.24
27 70.1 168 6.23
26 68.3 164 6.30
25 66.5 160 6.38
24 64.6 155 6.46
23 62.7 150 6.54
22 60.7 146 6.62
21 58.7 141 6.71
20 56.6 136 6.79

मला वाटते वेदर कंडिशन, लो टार्गेट आणि आप्ल्या विकेट्स पडण्याची मोठी शक्यता पाहता जेवढी मॅच कमी ओवर्सची तेवढे चांगले.
२० ओवर्सच्या मॅच मध्ये ६.५+ चा रेट टिकवणे फार अवघड जाऊ नये.

Pages