भारतातुन परदेशात जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता ?

Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39

भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@अंजली,
एवढे (आणि तेही दह्याचे) स्मगलिंग करण्यापेक्षा ऍमेझॉनवरून योगर्ट स्टार्टर कल्चर घ्या की म्हणावे. माझ्या मते २० डॉलरच्या आतच मिळतील आणि एकदा त्याचे दही केले की ते देवदासमधल्या दिव्यासारखे त्यांच्या नातवंडांपर्यंत चालू राहील. आणि याहूनही भारी म्हणजे त्या २० डॉलरच्या इन्व्हेस्टमेंटवर विरजण विकू शकतील देशी लोकांना!

टप्पर नसेल अगदी ..पण घट्ट झाकणाच्या डबी /बाटली तुन असेल .. काही का असेना ..कशाकरता पण एवढा खटाटोप बंदी असलेल्या गोष्टी आणायला .. मुळात दूध इतकं पात्तळ असतं त्याचं दही इतकं कवकवीत लागतं .. आणि उस्तवार आणि संभाळण्यातच सगळा वेळ जातो ..
१-२ तासांनी झाकण आपोआप उडाले>> कसं काय पण ??!!

सर्व अमेरिका वासी लोकांच्या कमेंट मधून एक गोष्ट लक्षात येत आहे .
की तिथे डाळी,असू ध्या कोणतेही खाद्य पदार्थ हे ब्रँड chya नावा वर च विकता येतात .
खुले किंवा बिना ब्रँड विकता येत नाहीत.
फळ कोणत्या तरी कंपनी chya नावावरच विकली जातात की अशी सुधा मिळतात

भारतातून दही कशाला आणायला पाहिजे आणि ऍमेझॉन वरून तरी कशाला , अलीकडच्या किंवा पलीकडच्या शेजाऱ्याचे दार ठोठावा एक तरी नक्कीच गुलटी असेल रोज रात्री कर्ड राईस खाणारा .एका वाटीत घ्या थोडेसे त्याच्याकडुन .

अलीकडच्या किंवा पलीकडच्या शेजाऱ्याचे दार ठोठावा एक तरी नक्कीच गुलटी असेल रोज रात्री कर्ड राईस खाणारा .एका वाटीत घ्या थोडेसे त्याच्याकडुन>> +१

सर्व अमेरिका वासी लोकांच्या कमेंट मधून एक गोष्ट लक्षात येत आहे .
की तिथे डाळी,असू ध्या कोणतेही खाद्य पदार्थ हे ब्रँड chya नावा वर च विकता येतात .
खुले किंवा बिना ब्रँड विकता येत नाहीत.
फळ कोणत्या तरी कंपनी chya नावावरच विकली जातात की अशी सुधा मिळतात >> नाही हो काहीही काय? असे काही बळेच लक्षात घेऊ नका बरं.
ऊत्पादक देशात मालावर एकदा 'एक्स्पोर्ट क्वालिटी' चा शिक्का लागला की ब्रॅंड बिंड काही भानगड ऊरत नाही. जे काही मिळते ते चांगल्या क्वालिटीचे मिळते त्यामुळे व्हरायटी असतात ब्रँड एखादा-दुसराच असतो. दुकानदार घाऊक 'एक्स्पोर्ट क्वालिटी' माल घेऊन आपल्या दुकानाच्या नावाचा ब्रँड म्हणून वापर करतात. आले लक्षात?

एवढे (आणि तेही दह्याचे) स्मगलिंग करण्यापेक्षा ऍमेझॉनवरून योगर्ट स्टार्टर कल्चर घ्या की म्हणावे. माझ्या मते २० डॉलरच्या आतच मिळतील आणि एकदा त्याचे दही केले की ते देवदासमधल्या दिव्यासारखे त्यांच्या नातवंडांपर्यंत चालू राहील. आणि याहूनही भारी म्हणजे त्या २० डॉलरच्या इन्व्हेस्टमेंटवर विरजण विकू शकतील देशी लोकांना!>>> हायला असे योगर्ट स्टार्टर कल्चर मिळते हे आत्ता च कळतंय मला :गालावर हात ठेऊन डोळे मोठे करून तोंडाने हॉss करणारी भावली: थँक यु !! लग्गेच सांगण्यात येईल .. ७ ते २५ युरो अशी रेंज दिसतेय
कुठल्या धाग्याचा कुणाला कसा उपयोग होईल काय सांगता येत नाही Wink Proud

तिथे डाळी,असू ध्या कोणतेही खाद्य पदार्थ हे ब्रँड chya नावा वर च विकता येतात .
खुले किंवा बिना ब्रँड विकता येत नाहीत
>>

बल्क बार्न नावाच्या दुकानात , स्थानिक coop मध्ये मिळते की सुट्टे धान्य

खूप आंबले असणार>> अच्छा !मग आतमध्ये दाबामुळे उघडलं कि काय ! मी पण आणते ऑफिस मधे दही डब्यातून आता अधून मधून उगाच उघडायला पाहिजे मग !!!!

निशामधुलिका चॅनलवर दह्याचे विरजणाची (स्टार्टर सर्च टर्म वापरावी लागते.) लाल मिरचीची कृती जमते. हिरवी मिरची/लिंबू जमले नाही अद्याप. पुन्हा ह्यापद्धतीने विरजले तर हिरवी मिरची-लिंबू सुईदोर्‍यात ओवून ओव्हनला बांधणार आहे. Wink

<<< अलीकडच्या किंवा पलीकडच्या शेजाऱ्याचे दार ठोठावा एक तरी नक्कीच गुलटी असेल रोज रात्री कर्ड राईस खाणारा .एका वाटीत घ्या थोडेसे त्याच्याकडुन . >>>
त्याने वाटीवर नाव लिहिले नसेल तर वाटी देईल का शेजारी?

>> त्याने वाटीवर नाव लिहिले नसेल तर वाटी देईल का शेजारी?

कमीत कमी वाटी तरी आपली न्यावी म्हणतो कि मी... Wink

आमच्या वाट्यांवर नाव न्हवते, त्यामुळे सगळ्या शेजार्‍यांनी नेल्या त्या परतच दिल्या नाहीत ना. आता भारतातून आणीन म्हणतो, इंग्रजीत नाव टाकून आणि येताना वाटीभर दही पण. (मायबोलीवर मस्त-मस्त आयडिया मिळतात बाकी) Wink

वाट्या च्या कथा वाचून एक गोष्ट आठवली .
आमच्या लहानपणी जवळ जवळ सर्व सायकल वर लिहलेले असायचं सायकल सोडून बोला .
किंवा सायकल मागितल्यास अपमान केला जाईल .
तश्या मजकुराची पाटी दरवाजा वर लावता येईल "वाटी" सोडून बोला.
आयडिया ठीक आहे

एकदा त्याचे दही केले की ते देवदासमधल्या दिव्यासारखे त्यांच्या नातवंडांपर्यंत चालू राहील. >> Biggrin
बाकी विरजण विकायचं म्हणजे कॅपिटलिझमचा कळस आहे. "विरजण फॉर ऑल" (मेडीकेयर फॉर ऑल सारखी) अशी काही चळवळ सुरू होईल...

विरजण विकायचे? कंजुषपणाची हद्द होईल मग ... Lol Lol
गोपी दह्याचे विरजण म्हणुन वापर करतात व चांगले दही लागते म्हणे.

विरजण कशाला लावायचं? दोन तीन डॉलरला मोठा डबा मिळतो दह्याचा. ट्रेडर जो चं ग्रीक योगर्ट चांगलं असतं.
आपली कामं वाढवायची आणि मग काम करायला माणूस शोधायचं आणि दमलेल्या बापाच्या चातुर्मासिय कहाण्या वाचायच्या यात काय हशील! Proud

गोपी दही ? ऐकले नाही कधी या ब्रॅण्डबद्दल.

विरजण विकले की बरकत कमी होते, धंद्यातली भरभराट थांबते असे आज्जी म्हणायची.

कुणाचा विश्वास बसणार नाही पण आमच्या शेजारच्यांचे एक नातेवाईक पुण्यातल्या आरती संस्थेची चूल / शेगडी घेऊन गेले कुठल्या तरी फॉरेनला. बहुतेक कॅनडा. कॅनडात शेगडी किंवा चूल पेटवायला परवानगी असेल का ?

थॅनोस भाई आमच्या आजीच्या काळात दूधाला गोरस म्हणत व दूधाचे पदार्थ विकणे पाप होते. नंतर शहरीकरण झाल्यावर गरजेनुसार पुरवठा म्हणून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरू झाली. आता गाय म्हैस यांना मशीन बनवलं आहे.

विरजण कशाला लावायचं? >> दूधाला. बाकी कुठल्याही द्रवास विरजण लावले तर त्याचे दही होत नाही. Wink Happy
साडीला फॉल 'लावतात' तसं विरजण 'लावणे' हे तास-दोन तासाचे काम नसते. विरजण लावणे हे अर्ध्या मिनीटाचे काम असते. एक क्यालरी जळता जळणार नाही विरजण लावता लावता.

>>विरजण कशाला लावायचं? आपली कामं वाढवायची आणि मग काम करायला माणूस शोधायचं आणि दमलेल्या बापाच्या चातुर्मासिय कहाण्या वाचायच्या यात काय हशील!

विकत दही मिळतं म्हणून विरजण लावायचं नाही म्हणणाऱ्यांसाठी माझ्याकडे एक निबंध तयार आहे.
पण योग्य व्यासपीठाच्या शोधात आहे.

मला भारतीय दह्यापेक्षा योगर्ट जास्त आवडतं. योगर्ट जास्त होमोजिनियस असतं. मी हे असे कल्चर घेऊन भारतातही योगर्ट केले आहे.

या धाग्याच्या शिर्षकातील प्रश्न वाचून एकच उत्तर मनात येतंय---- सदाबहार गाणी आणि काही आठवणी (कारवा ची जाहिरात)

निशामधुलिका चॅनलवर दह्याचे विरजणाची (स्टार्टर सर्च टर्म वापरावी लागते.) लाल मिरचीची कृती जमते. हिरवी मिरची/लिंबू जमले नाही अद्याप. पुन्हा ह्यापद्धतीने विरजले तर हिरवी मिरची-लिंबू सुईदोर्‍यात ओवून ओव्हनला बांधणार आहे.>> मला आत्ता विडिओ पाहिल्यावर या पोस्ट चा अर्थ लागला ! मला काळातच नव्हतं दही आणि लिंबू मिरची चा काय संबंध !?
करून पाहायला हवं खरंच .. धन्यवाद लिंक दिल्याबद्दल

Pages