भारतातुन परदेशात जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता ?

Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39

भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीयांनी अमेरिकेला जाताना मोकळेच जावे.
पण अमेरिकी मधून भारतात येताना भरपूर सामान घेवून यावे . ---- उलटं का बोलताय, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कसा हातभार लागेल?!

एक जुना किस्सा आहे. १९८१ १९८२ चा. आमच्या साबांच्या मैत्रीणीचा एकुलता एक मुलगा सिअ‍ॅटल ला स्थायिक झाला. व जपानी मुलीशी लग्न केले. ह्याचे त्यांना अचाट अफा ट कौतूक होते. व नवरा बायको तिकडे गेले व येताना ह्या बाईंनी सेकंड हँड माल खूप आणलेला. त्यात तेलाचा प्लास्टिकचा पाच लिटरचा कॅन. चांगल्या क्वालिटीचा, एक बारका अ‍ॅपल शेपचा रेडिओ. ( सोनेरी रंग दिलेला व तो रंग उडालेला अधून मधून असा) व चारच चांगल्या प्लेट्स क्रॉकरीच्या. म्हणजे फार महागातल्या नव्हेत. रोजच्या वाप्रातल्या सुने ने नवा सेट घेतला तर ह्या घेउन आल्या.

दोन तीन बोल पण होते.

म्हणजे मला लग्नात ह्या दोन बाबी गिफ्ट पण दिल्या. त्या चार प्लेट मी खूप वापरल्या व अ‍ॅपल शेप रेडिओ ची खरखर ऐकत असे. तेव्हा इंपोर्टेड वस्तूच फार दिसत नसत. इंपोर्तॅड बोगस स्टफ विकणारी दुकाने असत पण ती कँपात. आम्ही तिकडॅ फारच कमी जाउ.

आता आपण रियुज रिसायकल मंत्र जपतो पण काकूंनी खरेच तेव्हा ते केले होते. तो प्लास्टिकचा कॅन वापरताना पण त्यांना फार अभिमान वाटे.
ह्या मुलाला खरेच भारतात आल्यावर राजपुत्राची ट्रीटमेंट मिळे व जपानी सुनेचे भरमसाठ कौतूक. बारक्या भावली वाणी नाती व फोटोतला
छोटा क्रिसम्स ट्री, भले मोठे अमेरिकेतले घर. बॉक्स मॅट्रेस!!!! ही आणायला जमले नसावे.

भारतात सुद्धा लोक अन्न सोडले तर बाकी वस्तू इम्पोर्टेड किंवा विदेशी कंपनी चेच वापरतात अगदी मोबाईल पासून गॉगल पर्यंत .
अमेरिकेत दर्जेदार
वस्तू मिळत असतील म्हणून तिकडून येताना घेवून यायच्या

माठाची चर्चा अशक्य आहे.
माठ का आणावा वाटतो एखाद्याला?

मला अमेरिकेतील पहिले काही दिवस मेतकूट+क्लिनिक हॅप्पी अशा मिश्र वासाचे कपडे घालून ऑफिसला गेल्याचे आठवते आहे. आणि एकदाही मेतकूट भात खाल्ल्याचे आठवत नाहीये.

>>दगडु तेली मसाला (पुर्वी आइ करुन द्यायची मसाला)
हा कशासाठी वापरतात? फारच मजेदार नाव आहे.

माठ आणि वर्तमानपत्राचा तुकडा दोन्हीची चर्चा इथे बरोबरच आहे की. दोन्ही भारतातून गोष्टी परत नेण्याशी संबंधित आहे. माठाचे पाणी इथे प्रचंड मिस करत होतो. त्यावेळेस येताना बॅगांमधे जागा होती, म्हंटले बघू टिकला तर वापरू Happy

एकदा तर कंटेनर मधून पुण्यातील सकाळ प्रदर्शन टाइप ठिकाणाहून घेतलेल्या अनेक बोजड गोष्टी आणल्या आहेत. तेव्हा इकडे पुन्हा शिफ्ट्/मूव्ह करत होतो व या गोष्टी भारतात नवीन घेतलेल्या होत्या. ते फोल्डेबल कोच असतात फोमचे. एरव्ही बसायला उपयोग होतो, व उलगडले की त्याचा बेड होतो. त्याचे डिझाइन स्मार्ट आहे - कारण एरव्ही बसताना वापरलेला भाग कोच उलगडून बेड केला की खाली जातो आणि आतला भाग वरती येतो. अधूनमधून वापरायला, पाहुण्यांना झोपायला अगदी उपयोगी आहे. आता ६-७ वर्षे झाली. अजूनही व्यवस्थित टिकले आहेत. तीन कोच मिळून ४-५ जण सहज झोपू शकतात. उचलून रूम्स मधे हलवायलाही हलके आहेत.

माठावरून आठवले, २ महिन्यांपूर्वी आमच्या गटगच्यावेळी मटका बिर्याणी होती.माझ्या कझनने रिकामी मटका अमेरिकेत नेलाय.छान आकार आहे आणि झाकणही आहे.

चर्चा बरोबरच आहे की! पण अशक्य कॉमेडी आहे.
मी आणि नवरा संपूर्ण एप्रिल-मे माठ आणूया माठ आणूया अशा साप्ताहिक चर्चा करून शेवटी नळाचे पाणी पिऊन पावसाळ्यात आलो. त्यामुळे अमेरिकेला माठ नेणाऱ्या व्यक्तीबद्दल किती आदर वाटतो आहे, हे याठिकाणी नमूद करायला हवे.

मी आणि नवरा संपूर्ण एप्रिल-मे माठ आणूया माठ आणूया अशा साप्ताहिक चर्चा करून शेवटी नळाचे पाणी पिऊन पावसाळ्यात आलो. >>> लोल सई.

माठ कसा न्यायचा, फुटणार तर नाही ना असे प्रश्न पडत असतील तर डोके जाईल एवढे तोंड असलेला घ्यावा. आय मास्क, इअर प्लगची गरज पडणार नाही.

आणि युनायटेड वाल्यांनी फ्लाईट ओव्हरबुक झाली म्हणून फरफटत बाहेर ड्रॅग केलं तरी फोटो वेगळेच असल्याने डबल व्हायरल होतील.

तयार कपडे तिथे टेलर महाग आहे

रवी लाकडाची दही बनवण्यासाठी तिथे मिळत नाही .

कूकर तिथे खूप महाग आहे .

स्टेशनरी तिथे इथल्या पेक्षा महाग आहे .

पोळपाट, लाटणं ह्याचा अमेरिकेला काही गरज नाही म्हणजे मिळत नसेल .
घाटी मसाला,कोकणी मसाला,तिथे मिळणे शक्यच नाही कारण हे दोन्ही भारतातील बाकी राज्यात सुद्धा मिळत नाही.
आणि महत्वाचं माठ तो तर हवाच इथे सर्व माठाचेच पाणी पितात,
हो आणि लसणाची चटणी, कळ्या तिळाची चटणी पक्के भारतीय असाल तर .
काळा घेवडा( ब्लॅक beans,,) ha अमेरिकेच्या staple food मध्ये गणला जातो पण आपल्याला लाज वाटते तो नका घेवून जावू

अमेरिकन भारतीय लोकांना कशी treat देतात. >> जेवणाबरोबर अ‍ॅपल आणि अजून बर्‍याच प्रकारचे पाय, कॅरट केक, पीच कॉबलर, गलेटो, चीझ केक, बनाना फॉस्टर, बनाना पुडिंग, नट रोल असे बरेच पदार्थ सर्व्ह करून ट्रीट देतात.

कधी संधी मिळाली तर भारतातून घरघंटी आणणार मी नक्की. इथली जुनी प्रोसेसस्ड पिठं खाऊन कंटाळा आला आहे.
तसं जातं आणि पाटावरवंटा बघितला आहे मी लिटल इंडिया मध्ये, पण वयानुसार झेपणार नाही.
रच्याकने माठ आहे घरी पण तो इथेच घेतलेला आहे.

अमेरिका मध्ये सहज मिळणाऱ्या पदार्थाची नावे सुद्धा मराठी मध्ये न सांगता येणारे अमेरिकन भारतीय
>>>

विशेषनाम इंग्रजीतूनच लिहिणार ना. उद्या तुम्ही विचारले की अमेरिकन मित्रांची नावे लिहा आणि बर्गाने जॉन, शॉन, रॉन अशी लिहिली तर तुम्ही ती मराठीत का नाही म्हणून विचाराल!

अमेरिकन भारतीय लोकांना कशी treat देतात.

बरेचदा भारतीय राहतात ते एरिया भारतीय डॉमीनेटेड असतात. Corresponding school district मध्ये भारतीय मुलं शाळेत जास्त असतात. जर आयटी किंवा तत्सम जॉब असेल तर ऑफिसातही देसीच भरपूर असतात. त्यामुळे गोऱ्या अमेरिकन्सशी तसा थेट संबंध कमी येतो. जे असतात ते गोरे जनरली फ्रेंडली असतात. जे रेसिस्ट असतात ते दुसरीकडे राहायला जात असावेत (White flight!).
जे भाग अजून अमेरिकन डॉमीनेटेड आहेत आणि जिथे इमिग्रँटसची संख्या वाढत आहे तिथे सटल रेसिझमचे अनुभव येत असतात खासकरून २०१६ च्या निवडणुकीनंतर. अगदी २५ -३० वर्षे अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय बाईला रस्त्यात हटकून आयडी विचारणे टाईप प्रकार २०१६ नंतर झाले आहेत.
सो, समराईझ करायचं तर अमेरिकन्स भारतीयांना कसं ट्रीट करतात यात फारच छान वागवतात ते हडतुड करतात अशी पूर्ण रेंज येईल.

अगदी २५ -३० वर्षे अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय बाईला रस्त्यात हटकून आयडी विचारणे टाईप प्रकार २०१६ नंतर झाले आहेत.
>>>

मायबोली आयडी? डुआय आहे म्हणून सांगायचे

फा, सीबीपीवाल्यांना जीरा आवडत नाही कारण जीरा असाईन झालेला कोणालाच आवडत नाही. ते कुणाकडे जिरं मिळालं की रिझॉलव्ड, रिजेक्टेड करत असतील ... किंवा वेव्ड, पास्ड, अबॅन्डंड असलं काही रिझोल्युशन करत असतील. Proud

मला फक्त हेच सांगायचे होते .
परदेशात कोणत्याही देशातील नागरिक जातो तेव्हा त्या लोकांची किंमत ते कोणत्या देशा तून आलेत ह्या वर ठरते .
आर्थिक,राजकीय,लष्करी,दृष्ट्या प्रगत देशातील नागरिकांना सन्मान मिळतो ..
भारत जर वरील तिन्ही बाबतीत प्रबळ असेल तरी तरच भारतीय लोकांना सन्मान मिळेल .
भारत दरिद्री असेल ,लष्करी बाबतीत कमजोर असेल तर तुम्ही किती ही हुशार असला तरी परदेशातील सरकार आणि नागरिक तुम्हाला किंमत देणार नाहीत

Pages