प्रेम उष्टावले ओले

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 July, 2019 - 09:11

प्रेम उष्टावले ओले
**************

प्रेम उष्टावले ओले
निळे आभाळ हे झाले
देही धरित्रीच्या पुन्हा
कोंब नवे अंकुरले ॥

आस डोळ्यात दाटली
कुण्या रूपात खिळली
किती सांगावे जीवाला
होडी धावते वादळी ॥

युगे उलटली तरी
रोज उगवतो तारा
लखलखते अंतर
पुन्हा कवळे अंधारा ॥

जादू स्पर्शात दाटली
कुण्या पुसट क्षणाला
मन हरवते तरी
त्याच स्मरून क्षणाला ॥

ओझे मनावर मोठे
मन प्रतिष्ठा गोठले
आत चुकार जीवाचे
पंख मुक्त भरारले ॥

ओढ असली कसली
जन्मा वेढून राहिली
कुण्या शोधात शिणली
कुडी इवली कोवळी ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users