Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 June, 2019 - 09:53
हरवली पुनव
*********
ते डोळे मिटणारे
ते श्वास सरणारे
अगतिक असहाय
ते प्रेम हरणारे
विशी पंचविशीतले
होते वय कोवळे
जगण्याचे स्वप्न
डोळ्यात एकवटले
हळू हळू वाढलेली
श्वास गती होती वक्षी
थकलेल्या पिंजरी
त्या थकलेला पक्षी
चुकलेला नेम जणू
होता तो काळाचा
करपला देठ जणू
चुकूनिया कळीचा
दाट केस काळे कुंकू
छोटे भालावरी
खचलेला पती सवे
होता हात हातावरी
आणि मग गेली ती
लढूनिया थकलेली
पुनवच जणू काही
अवसेत हरवली
पण तिचे ते डोळे
बोलके नि मोठाले
विनवणी भरलेले
माझ्या मनी थिजले
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय बोलु?? शब्दच नाहियेत.
काय बोलु?? शब्दच नाहियेत.
निःशब्द...
निःशब्द...
थॅंक्स
थॅंक्स