अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का.

Submitted by ashokkabade67@g... on 26 June, 2019 - 12:36

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत पण त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला खरोखर काहीलाभ होईल का ।त्यांचा हा निर्णय योग्य आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

मोदींना भेटण्यासाठी आतुर असलेल्यांसाठी खूषखबर
महापुरात काही अपरिहार्य कारणांनी येऊ न शकलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीसाठी सांगली, कोल्हापूर, मिरज भागात नक्की येणार असल्याचे समजते.

ठाकरे कुलोत्पन्न, प्रुथ्वीराज चव्हाण, प्रकाश आम्बेडकर यांनी किती पैसे पुरग्रस्तांसाठी दिलेत नि काय मदत केलीय ? >>> या सर्वांनी प्रचंड मदत केली आहे. ठाकरे कुलोत्पन्न राजसाहेबांचे ३५ ट्र्क्स पहिल्याच दिवशी गेले. तिकडे मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित च्या कार्यकर्त्यांचे काम अथांग आहे. काँग्रेसला नेता नसल्याने संघटीत प्रयत्न नाहीत. पण विश्वजित कदम, वसंतदादांचे घराणे हे सर्व काम करत आहेत.

आपल्या आज्ञेचं पालन वेळात वेळ काढून केले आहे.

नवीन Submitted by कांदामुळा on 13 August, 2019 - 11:52>>>

माझी आज्ञा पाळली वगैरे ठिक आहे, पण महाराष्ट्रात २०० च्या वर आमदार आहेत (विनोद तावडे, जयन्त पाटील हे त्यातील एक) , त्यां २०० च्या वर आमदारान्ची बातमी कधी आणणार? अशोक चव्हाणान्चे नावही लिस्ट मधुन काढुन टाकलेले दिसते. किती अर्धवट कामं करता यार?

बाकी सरकार भाजपचेच आहे नि तेही या सर्वान्पेक्षा जास्त मदत करतंय हे ध्यानात असु द्या. महत्वाच्या गोष्टी विसरायची काही लोकांची सवय जात नाही...

गांधी फॅमिली सोडून कॉंग्रेसचा अध्यक्ष होण्यालायक एकही नेता कॉंग्रेसमधे नाही, यावरुनच कॉंग्रेस पक्षाची काय लायकी उरली आहे ते कळते. हे कॉंग्रेसी गांधी फॅमिलीची गुलामगिरी करणे कधी सोडणार काय माहित !

अध्यक्ष पदापेक्षा सोमिवरचा विखारी प्रचार कसा रोखायचा ह्याची काहीतरी रणनीती तयार करा आधी. तिथे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत पराभव सुरुच राहणार. शिकलेले लोकही बळी पडतात त्या प्रचाराला.

गांधी फॅमिली सोडून कॉंग्रेसचा अध्यक्ष होण्यालायक एकही नेता कॉंग्रेसमधे नाही, यावरुनच कॉंग्रेस पक्षाची काय लायकी उरली आहे ते कळते. हे कॉंग्रेसी गांधी फॅमिलीची गुलामगिरी करणे कधी सोडणार काय माहित ! >>>>>

मोदी सोडून पंतप्रधान होण्याच्या लायकीचा एकही नेता भाजपमधे उरला नाही...

एका देशात एक माफिया गुंड सत्तेत आला. सत्तेत आल्यावर त्याने गुन्हेगार कुणाला म्हणायचं याची व्याख्याच बदलली. जे त्याच्यासोबत ते सर्व देशभक्त आणि जे त्याच्या गुन्हेगारी वृत्तीवर टीका करत होते ते देशद्रोही असे ठरले. सोशल मिडीयावर त्याच्या विरोधात लिहीतील त्यांना दहशतवादी ठरवण्याचा कायदा बनवून घेतला.

त्या देशाचे नाव आत्ता आठवत नाही..

जोरका झटका..... जोरदार लागलेला दिसतोय. Lol
बाकी हंगामी अध्यक्ष म्हणजे काय हो? याआधी मुक्कामी होते की काय? Proud

ठाकुर तो गियो.... च्या धर्तीवर काॅग्रेस तो गियो! Proud

>>काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी सोनिया गांधी यांची निवड झाली हे धक्कादायकच आहे... निवडणूका मे मधे संपल्यात... आज ऑगस्ट आहे. दुसरे कुणीच नाही का ? <<
घ्या, ह्यांना आत्ता हा साक्षात्कार झाला. गेले २५ वर्षं पब्लिक हेच सांगत आलंय पण तेंव्हा यांच्या निष्ठा ओसंडुन वहात होत्या. अजुनहि नेहरु-गांधी-वड्रा यांपलिकडे यांची उडी जाणार नाहि... Wink

एकाही कॉंग्रेस नेत्यात अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा नाही, गांधी परिवारातील व्यक्ती पलिकडे ह्याना एकही नेतृत्व दिसत नाही.. एका नॅशनल पक्षाची अतिशय दयनीय अवस्था आहे ही. एवढे मानमोडे नेते देशाचं नेतृत्व करायला खचितच नालायक आहेत.

I really wanted them to elect a young, thoughtful leader, Disgraceful and disappointing.

सिताराम केसरीची अवस्था ठाऊक आहे भुक्कडांना. विषाची परीक्षा कोण घेणार म्हणा.

मी काय म्हणतो माबोवर एव्हढे लोकशाहीवादी, संतुलीत, समतावादी, हूच्चविचारी काॅगी समर्थक आहेत एखाद्याने प्रयत्न करायला हरकत काय आहे. सध्या विदेशात वास्तव्यास असलेले भारतीय सुध्दा चालतील. विदेशी व्यक्ती इतकी वर्षं नाहीतर पक्ष चालवतच आहे.

मी काय म्हणतो माबोवर एव्हढे लोकशाहीवादी, संतुलीत, समतावादी, हूच्चविचारी काॅगी समर्थक आहेत एखाद्याने प्रयत्न करायला हरकत काय आहे.
>> सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ते इथंच टॅंवटॅंव करणार.

I really wanted them to elect a young, thoughtful leader,>>>> राहुल गांधींना निवडले होते की. माबोवरची पानेच्या पाने त्यांच्या स्तुतीसुमनांनी ओसंडून वाहत होती. अजून एक उगवता तारा आहे त्यांचं नक्कीच जमेल.

मी काय म्हणतो माबोवर एव्हढे लोकशाहीवादी, संतुलीत, समतावादी, हूच्चविचारी काॅगी समर्थक आहेत एखाद्याने प्रयत्न करायला हरकत काय आहे. >> त्याना १० जनपथ वर कोण उभं तरी करेल का? तिथल्या ओरिजीनल ल्युटीयन्स च्या टाचांखाली हे डुप्लिकेट चिरडले जातील.

एका देशात एक माफिया गुंड सत्तेत आला. सत्तेत आल्यावर त्याने गुन्हेगार कुणाला म्हणायचं याची व्याख्याच बदलली. जे त्याच्यासोबत ते सर्व देशभक्त आणि जे त्याच्या गुन्हेगारी वृत्तीवर टीका करत होते ते देशद्रोही असे ठरले. सोशल मिडीयावर त्याच्या विरोधात लिहीतील त्यांना दहशतवादी ठरवण्याचा कायदा बनवून घेतला.
>> त्या माफिया ने काहींच्या पार्श्वभागावर इतके फटके दिले की अवघड जागेचं दुखणं दाखवता येईना नि सहनही होईना.

I really wanted them to elect a young, thoughtful leader, . हायझेनबर्ग त्याने काय झाले असते? तो कसा पप्पु२ आहे ह्याच्या प्रचाराच्या पोष्ट सोमिवर फिरल्या असत्या. त्याच्या आइ वडिलांचे चारित्रहन्न झाले असते. त्याला बायको असती तर तीचे चारित्र्य हनन केले असते. त्याच्या नातेवाइकांमागे इडी तत्सम संस्था लागल्या असत्या.
तो गांधी कुटुंबाचा चमचा कसा आहे हे सिध्द करणार्या पोष्ट सोमिवर फिरल्या असत्या. विरोधकांना चिर्डुन कसे टाकायचे याची उत्तम रणनीती भाजपा कडे आहे. विरोधक हतबल आहेत.त्यांनी थोडे दिवस निवांत बसावे हेच त्यांच्यासाठी बरे.

रशियामधे पुतिन यांच्यासमोर गॅरी सारखा बुद्धीबळपटु उभा राहीला ..काय झाले शेवटी ?देश सोडुन पळ काधावा लागला.कित्येक पत्रकारांनी तर जीव गमावले. त्यापेक्शा निवांत बसलेले बरे.

त्यापेक्शा निवांत बसलेले बरे. +१११

अजुन २० एक वर्ष निवांत बसा की हाकानाका ! तोपर्यन्त नक्कीच कोणीतरी (बहुधा वॉड्रा फॅमिलीमधून नातू पणतु) उगवेल धडाडीचा युवा उमेदवार आणि पक्षाध्यक्ष म्हणून आणि मग काय जित तर फक्त कॉंग्रेसचीच !

भाजपमधे सध्या मोदींना पर्याय नाही. प्रचारासाठी सुद्धा लायकी असलेला दुसरा नेता नाही. महापालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही मोदीच भाषणे करतात. मोदींचाच चेहरा.
मंत्रीमंडळात मंत्र्यांना ब्र काढायची सोय नाही. मध्यंतरी साक्षी महाराज यांनी कुरुकुर केली होती. नाना पटोळे याच कारणावरून भाजपतून बाहेर पडले. सुषमा स्वराज यांच्या सारख्या धडाडीच्या नेत्या असूनही परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचे अस्तित्त्व नव्हते, परदेश दौर्‍यांवर मोदीच जात होते. मुरली मनोहर जोशी, अडवाणी सारख्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तिथे इतरांची काय कथा ?
ज्या पक्षांतर्गत हुकूमशाही वर अटलबिहारी वाजपेयी बोलत असत तीच आता भाजपमधे दिसतेय.
त्यांचं त्यांना लखलाभ. कारण भाजपवाले दुस-यांवर टीका करण्यात पुढे असतात.
स्वतःच्या चुका कबूल करणे त्यांच्या डीएनए मधेही नसते.
त्यांची मातृसंघटना एकदिशेने हुकूम सोडण्याचे आणि पालन करण्याचे प्रशिक्षण देत असते.
या फॅक्ट-यातून बिनडोक गुलाम बाहेर पडत असतात. ज्यांना स्वतः विचार करण्याची बंदी असते.
लोकशाही मूल्यांवर यांचा विश्वास नसतो.
इथे त्याचं प्रात्यक्षिक वारंवार पहायला मिळते. या प्रतिसादानंतर सुद्धा ते दिसेलच.
आता आयटी सेल मधे शिकवल्याप्रमाणे स्मायल्या टाकणे किंवा शिव्या देणे यापैकी एक होईल.
वैयक्तिक हल्ले, अ‍ॅडमिनकडे तक्रारी करणे हा ही त्यांच्या शिक्षणाचाच भाग आहे.

तसे नसते तर पक्षातल्या हुकूमशाहीबद्दल त्यांनी काहीतरी कबूल केले असते.

"जे लोक काँग्रेस समर्थक नाहीत त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची उठाठेव कशाला?" - इति भरत@आमचा अड्डा. (याच साहेबांनी "भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव" असा धागा काढला होता ! एव्हढ्यातच त्यानी दुसर्यांसाठी नवीन नियम बनवला. असो, फुरोगाम्यांचे हे वागणे नवीन नाही)

तद्वत, जे लोक भाजप समर्थक नाहीत त्यांना भाजपच्या नेत्यांची उठाठेव कशाला?

आमचा अड्डा या धाग्यावर जे काही लिहीले जात असेल त्याला तिकडे उत्तर द्या.
मला आत्ता काही मिनिटांपूर्वीच तो धागा दिसू लागला आहे. तुम्ही तिकडे उत्तर पण दिलेय.
इकडे कशाला कॉपी पेस्ट करता ?
भरत यांची एव्हढी दहशत का वाटते ?

तद्वत, जे लोक भाजप समर्थक नाहीत त्यांना भाजपच्या नेत्यांची उठाठेव कशाला? + लक्ष लक्ष मोदक

पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचे धोरण हे काँग्रेसच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसणे एव्हढेच राहीलेले आहे. त्या वेळी त्यांना अल्पमतावरून कुणी हिणवले नव्हते. बिचा-यांचे दोन खासदार सुद्धा महामुश्किलीने निवडून यायच्या काळात ते काँग्रेसच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीचा राजीनामा मागत असत.

अटलबिहारी वाजपेयी हे पहिल्यापासून जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षात होते, पण ते नेहमीच काँग्रेसच्या अंतर्गत बाबींवर बोलत. एक व्यक्ती एक पद हे काँग्रेसने कधी काळी स्वतःसाठी धोरण जाहीर केले होते. त्यासाठी ते इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी यांचा राजीनामा मगत असत. भारतीय जनता पक्षा कुठल्याही मुद्यावरून राजीनामा मागत असे. पण त्यांची मीडीयाने किंवा अन्य कुणी टिंगल उडवली नाही. त्यांना कुणी देशद्रोही म्हटले नाही. त्यांच्यावर ट्रोल्स सोडले गेले नाहीत. याला लोकशाही म्हणतात.

आता तर धमक्या येतात. फोन नंबर सार्वजनिक केले जातात.
न्यायव्यवस्था सुद्धा अस्वस्थ आहे.
https://www.maayboli.com/node/65003

पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचे धोरण हे काँग्रेसच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसणे एव्हढेच राहीलेले आहे. त्या वेळी त्यांना अल्पमतावरून कुणी हिणवले नव्हते. बिचा-यांचे दोन खासदार सुद्धा महामुश्किलीने निवडून यायच्या काळात ते काँग्रेसच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीचा राजीनामा मागत असत. >>>

सरकारी पदावरील व्यक्तीचा राजीनामा मागणे एखाद्या पक्षाच्या अन्तर्गत बाबतीत नाक खुपसणे कसे काय ठरते?

आमचा अड्डा या धाग्यावर जे काही लिहीले जात असेल त्याला तिकडे उत्तर द्या. >> मी कुठे काय लिहायचं ते मी ठरवीन

मला आत्ता काही मिनिटांपूर्वीच तो धागा दिसू लागला आहे. तुम्ही तिकडे उत्तर पण दिलेय. >>> त्याचा अर्थ इथे काही लिहु नये असा होत नाही.

इकडे कशाला कॉपी पेस्ट करता ? >> मी काय कॉपि पेस्ट केलं ते दाखवतोस काय?

भरत यांची एव्हढी दहशत का वाटते ? >> मी तर दुतोन्डी फुरोगाम्यांना उघडा पाडतोय. त्यामुळे दहशत ऐवजी कीव हा शब्द परफेक्ट राहील.

काँग्रेसचे अध्यक्षपद हे सरकारी पद आहे हे आजच समजले. या माहीतीबद्दल आभार.
लवकरच तुमची नेमणूक माहीती अधिकार आयुक्त म्हणून होऊ शकते.

आज जर मोदींच्या पंतप्रधान पदाच्या राजीनाम्याची मागणी कुणी केली तर त्याला थेट देशद्रोहीच ठरवले जाईल. त्या पार्श्वभूमीवर मी-माझा यांनी अशी मागणी करणे चुकीचे नाही असे म्हणणे हे पक्षांतर्गत बंडखोरीत बसेल असे वाटते.

काँग्रेसचे अध्यक्षपद हे सरकारी पद आहे हे आजच समजले. या माहीतीबद्दल आभार.
लवकरच तुमची नेमणूक माहीती अधिकार आयुक्त म्हणून होऊ शकते.

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 11:51 >>

त्यापेक्षा भाजपचे २ सदस्य असताना त्यानी कॉन्ग्रेस्च्या अध्यक्षान्चा राजीनामा नक्की कुठल्या तारखेला मागीतलेला ती माहीती इथे डकवा.

त्यांनी मागितलाच नव्हता हे सिद्ध करा.

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 11:57 >>

आता झाली का पंचाईत तुझी. मुळात जी गोष्ट तुला सिद्ध करताच येणार नाही ती आधी लिहायचीच कशाला?
बाकी सर्वसाधारण नियम असा आहे की आरोप करणार्याने पुरावे आणायचे असतात. फुरोगाम्यांच्या चेल्यांच सगळंच उलटं असल्याने ते स्वतःला न्यायाधीश समजुन आरोप करत असतात ! मग स्वतःच्याच वक्तव्यावरच्या प्रश्नाला उत्तर नसलं की पळ काढतात.

आणि गंमत म्हणजे काही सिद्ध करता आले नाही की लगेच ह्यांची न्यायव्यवस्था धोक्यात आलीय ही बोंब सुरु होते Lol

मी-माझा तुझ्याच पद्धतीचा आधार घेतला आहे. तू स्वतः आरोप करताना तुम्हीच तुमच्यावर आरोप केल्याबद्दल पुरावे आणून द्या असे बडबडत असतोस.
आता मला १९९६ च्या आधी जगातल्या कोणत्याही वर्तमानपत्राची ऑनलाईन कॉपी उपलब्ध असल्याचे पुरावे आणून दे. जर ती तू आणू शकलास तर मी १९८४ सालच्याच काय १९७७ सालच्या वाजपेयींच्या वक्तव्याच्या ऑनलाईन लिंका द्यायला तयार आहे.
ज्या काळात ऑनलाईन लिंका नाहीत त्या काळच्या लिंका मागणे हे बौद्धीक दारीद्र्याचे लक्षण आहे. ज्या गोष्टी सर्वसाधारणपणे मान्य आहेत असे गृहीत धरून चाललेले असतात त्याच्याही लिंका मागायला लागणे म्हणजे एक तर अपल्याला चर्चा नीट करता येत नाही किंवा करायचीच नाही याचे पुरावे आहेत.
किमान आई आणि मुलांच्यात एक विश्वास असतो. तिथेही पुरावे मागायला लागले तर कसे होणार ?

आणि एव्हढेच पुरावे हवे असतील तर मी जे सांगितले आहे त्याचे पुरावे कुणी खिशात घेऊन फिरत नाही. त्यासाठी वेळ देणे आवश्यक असते. बालीश पणाला पण काहीतरी सुमार असू द्या.

आता मला १९९६ च्या आधी जगातल्या कोणत्याही वर्तमानपत्राची ऑनलाईन कॉपी उपलब्ध असल्याचे पुरावे आणून दे. जर ती तू आणू शकलास तर मी १९८४ सालच्याच काय १९७७ सालच्या वाजपेयींच्या वक्तव्याच्या ऑनलाईन लिंका द्यायला तयार आहे. >>>

यार कान्दामुळा, ज्ञान हवे असेल तर विनयाने मागावे. असो, मी उद्धटातल्या उद्धट अज्ञानालाही मदत करतो.

गूगल न्युज अर्काइव्ज असा सर्च केला तर भारतील व्रुत्तपत्रांच्या १९४७च्याही आधीच्या आव्रुत्त्या मिळतात, त्या जरा चाळ. १९८७ च्या वर्षाखेरीस राजीव गांधींनी बंगाराम बेटावर केलेल्या पार्टीच्या बातम्याही मिळतील.

------------------------------------------------------------------------------------

मी-माझा तुझ्याच पद्धतीचा आधार घेतला आहे. तू स्वतः आरोप करताना तुम्हीच तुमच्यावर आरोप केल्याबद्दल पुरावे आणून द्या असे बडबडत असतोस. >> हे मी कधी केलं याचेही पुरावे आण, बघुया तरी मी भुतकाळात काय केलं ते ! Lol

गूगल न्युज अर्काइव्ज असा सर्च केला तर भारतील व्रुत्तपत्रांच्या १९४७च्याही आधीच्या आव्रुत्त्या मिळतात, त्या जरा चाळ. १९८७ च्या वर्षाखेरीस राजीव गांधींनी बंगाराम बेटावर केलेल्या पार्टीच्या बातम्याही मिळतील. >>> एखाद्या कुठल्याही वृत्तपत्राची अर्काईव्ह कॉपी दाखव. तसेच त्याच वर्तमानपत्राची ८९ सालची अर्काईव्ह आहे का हे पण सांग. की फक्त प्रपोगंडा साठी अपलोड केलेले फोटो आहेत ते ?

चोराला चोरी केल्याचे लक्षात ठेवणे अवघड असते.

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 12:24 >>.

कोण चोर आहे कांदामुळा? हे मला उद्देशुन म्हटलेलं आहे काय ?

इथे उचकवणं अन त्याला प्रतिसाद देणं हे चालुच असत.. इग्नोर करा उचकवणार्‍या पोष्टना .. कुणाच्या बोलण्याने काहि होत नाहि.

कोण चोर आहे कांदामुळा? हे मला उद्देशुन म्हटलेलं आहे काय ? >> तुला उद्देशून म्हटल्याचे पुरावे देऊन सिद्ध कर.

शेवटी कान्दामुळा नावाच्या फार्सने शेलकी वाक्ये व शिव्या लिहुन पळ काढला. न्युज आर्काइवज बद्धल माहीती देउनही आता मी त्याला चमच्याने भरवावे अशी याची अपेक्षा ! .

स्वतः बिनबुडाचे व बिनपुराव्याचे आरोप करुन वर मला चोर म्हणत आहे.

अर्थात माहीती शोधण्याच्या कळ्कळीपेक्षा या आयडीला ट्रोलींग मध्ये जास्त रस आहे. आणि वाभाडे काढतय म्हणे !

स्वतः बिनबुडाचे व बिनपुराव्याचे आरोप करुन वर मला चोर म्हणत आहे. >>>> तुला चोर म्हटल्याचे पुरावे दे. नाहीतर तुला चोर हा उल्लेख चोराच्या मनात चांदण्याच्या न्यायाने झोंबला हे सिध्द होतेय. नाहीतर तूच बिनबुडाचे आरोप करत असतोस हे इथल्या इथे सिद्ध झाले आहे. तसे ते सर्वांना माहीतच आहे.

मी असे म्हणेन की न्यूज अर्काईव्ह वर जुन्या बातम्याच उपलब्ध नाहीत. आता तू त्या असल्याचे सिद्ध कर.

३७० च्या धाग्यावर सपशेल उताणा पडला आहेस. तिकडे लक्ष दे नीट.
इथे शरणागरी वगैरे काहीच नाही. जी गोष्ट अस्तित्वात नाहीस ती तू मागत आहेस हे सगळ्यांना समजतेय.
१९९६ पासून न्यू यॉर्क टाईम्सने ऑनलाईन आवृत्ती चालू केली. त्या आधी एकाही वर्तमानपत्राची ऑनलाईन आवृत्ती नव्हती.
भारतात हे व्हायला चार पाच वर्षे गेली. त्यामुळे ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्याच्या लिंका मागणे हे कसल्या पणाचे लक्षण आहे यावर न बोललेले बरे.

https://www.rediff.com/news/column/rahul-is-fighting-a-losing-battle-in-...

धाग्याच्या विषयाला अनुसरून एक लेख वाचण्यात आला तो देत आहे. बाकी चालूद्या.

Submitted by जिंदादिल. on 14 August, 2019 - 13:01 >>>

समर्पक लेख आहे.. त्यातले कार्टुनही मस्त आहे.

जगात फक्त न्युयॉर्क टाइम्स आहे Lol ... "राजसाहेबान्च्या" बातम्या न्युयॉर्क टाइम्स मध्ये येतात की नाही? >> अडचण झाली की मुद्दा भरकटवणे ही पण तुझी मोडस ऑपरेण्डी आहे. मी काही राजसमर्थक नाही. पण अनेकदा त्यांच्या भाषणाने प्रभावीत होतो. याचा अर्थ त्यांच्या पार्टीचा समर्थक आहे असा होतो का ?
मी प्रकाश आंबेडकरांचाही मुद्दामून उल्लेख केला पण त्यावर अशा प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. कारण त्यांच्या पक्षामुळे भाजपचा फायदा होत असताना तुम्ही का टीका कराल ?

Pages