अध्यक्षपदाचा राजीनामा हे राहुल गांधींचा निर्णय योग्य आहे का.

Submitted by ashokkabade67@g... on 26 June, 2019 - 12:36

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत पण त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला खरोखर काहीलाभ होईल का ।त्यांचा हा निर्णय योग्य आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 13:18 >>>

यार तुला जुन्या व्रुत्तपत्रान्चा ढीग कुठे मिळेल ते सांगीतल. त्यातुन भाजपच्या वाजपेयीन्नी वा त्यावेळच्या २ सदस्यान्नी कॉन्ग्रेस्च्या अध्यक्षाचा राजीनामा कधी मागीतला हे शोधुन तुच केलेले वक्तव्य सिद्ध करायला सांगीतल. त्याचं बघ. कारणं देणं आणि इकडच तिकड्च बोलण थांबव आता. चल कामाला लाग.

काही लोकांनी कितीही रंग उधळले तरी त्यांना आपली औकात चांगलीच माहित असते. औकात दाखवून समोरच्याला नामोहरम करू असे त्यांना वाटते. समोरच्यांना अशांची जागा चांगलीच माहित असते पण दुर्लक्ष केले की अशांना फारच चेव येतो. शहाण्या माणसांनी यांना फाट्यावर मारलं पाहिजे.

जाऊ दे. दोन ठिकाणी उताणा पडला आहेस. राहू दे.
तुला ९६ च्या आधीचे आणि नंतरचे संदर्भ समजतील अशी अपेक्षाच नाही.

हो ना, त्यामुळेच चैतन्य रामसेवक रामप्यारे झाला. हा जास्त दिवस (संडेपर्यंत) राहील असे वाटत नाही.

जाऊ दे. दोन ठिकाणी उताणा पडला आहेस. राहू दे.
तुला ९६ च्या आधीचे आणि नंतरचे संदर्भ समजतील अशी अपेक्षाच नाही.

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 13:25 > बरं चल, तुझ्या बाळबोध समाधानासठी तसं समजुन चालुया हा !

अमर ९९ या सिरीज ने काही आयड्यांचे फारच टेण्शन घेतलेले दिसतेय. त्यामुळे मानसिक अवस्था ढळून कुठल्याही आयडीचा कुठेही संबंध जोडायची सवय लागली आहे. त्यामुळेच आपला आयडी वारंवार जातोय पण समोरचा शाबूत राहतो हे सुद्धा समजेनासे झाले आहे. याला कुठली अवस्था म्हणतात हे सांगायला आता खोटे पुणेकर किंवा कोथरूडकर येतीलच. सल्ला घ्या. Lol
रस्त्यात दारू पिऊन शिव्या देणा-याकडे दुर्लक्ष करण्याला घाबरले असे म्हणणा-याच्या एकंदरच अकलेचा वकूब सांगण्याची गरज नाही
(तुम्हाला खान ९९, शशिराम, शक्तीराम, चैतन्य रामसेवक आडवळणाने न म्हणता थेटच म्हटले तरीही आयडी उडत नाही हे लक्षात घ्या. फ्रस्ट्रेशन मधे हा घाबरला तो घाबरला अशा विपू करण्याची पाळी आलेली दिसतेय. )

आपटे बद्दल लिहिले तर कांदामुळाला का झोंबले असावे. खान ९९, शशिराम, शक्तीराम, चैतन्य रामसेवक ही नावे वारंवार का घ्यावी लागतात व मला त्यांच्या बरोबर जोडण्याचा बालिश प्रकार का करतात लोकं हे कळत नाही. मी कुणाला तूच आपटे, किरण्या,म्याऊ आहे असे लिहिले नाही.

मला अजिबात झोंबलेले नाही. तुझा मात्र अवतारकार्य झाले आहे. जो आयडी अस्तित्वात नाही त्याच्या नावाने शिव्या देणे इतकेच.
मी तुला काहीच बोललेले नसताना तू आपला मला विपू करतोस, माझ्या प्रतिसादाच्या आगेमाग कायम या आयडींचा उल्लेख करतोहेस आणि तरी मी तुला भीक घातलेली नाही म्हणून आता थेटच उल्लेख करत आहेस.
तुझ्या याच प्रमादांमुळे तुझे शशिराम, शक्तीराम, शशिकांत, खान ९९, जयंती पी हे सर्व आयडी उडाले आहेत. माझा हा ड्युपिकेट आयडी असून शाबूत आहे यावरून काय ते समजून घे. रश्मीताईंना विचार हवे तर, अ‍ॅडमिन अजिबात पक्षपाती नाहीत हे त्यांनी आताच सांगितले आहे.
याउप्पर तुझी मर्जी.
तू पुन्हा असा प्रयत्न केलास तर परिणाम तुलाच भोगावे लागतील.
हवं तर मी तुला तू शशिराम आहे असे म्हटल्याची आणि ते खोटे असल्याची तक्रार करून बघ.

माझे सुध्दा दहा आयडी अजून शाबित आहेत. गरज लागेल तसे बाहेर काढतो. शशिराम ला थयथयाट करून त्रास देणारांना मायबोली सोडायची वेळ आली होती. तो भूतकाळ आहे. मला शशिराम आयडीचं काही घेणं नाही. मी माबोवर आल्या आल्याच तू मला काही आयडींशी जोडण्याचा प्रयत्न केला हे पाहून मी तूला विपू केला.

<<
>>काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी सोनिया गांधी यांची निवड झाली हे धक्कादायकच आहे... निवडणूका मे मधे संपल्यात... आज ऑगस्ट आहे. दुसरे कुणीच नाही का ? <<
घ्या, ह्यांना आत्ता हा साक्षात्कार झाला. गेले २५ वर्षं पब्लिक हेच सांगत आलंय पण तेंव्हा यांच्या निष्ठा ओसंडुन वहात होत्या. अजुनहि नेहरु-गांधी-वड्रा यांपलिकडे यांची उडी जाणार नाहि... Wink
>>
-------- ह्यांना "आत्ता" साक्षात्कार झाला याबद्दल थोडे....
आधीपासून माझा घराणे शाहीला विरोध आहे. नेहरु, इंदिरा, पुढे राजिव, सोनिया आणि आता च्या काळात राहुल पुन्हा सोनिया गांधी.
२०१४ (२०१५ ) पर्यंत काँग्रेसवर आणि धोरणांवर खरमरित टिकाच केली आहे...
काँग्रेस पक्ष काही ठिकाणी चुकलेला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यात कमी पडला.... सर्व माहित आहे, मान्य आहे.
मी गुजराथ २००२ हत्यां विरोधात जेव्हढे लिहीले नसेल त्यापेक्षा जास्त १९८४ दिल्ली/ उ भारत शिखांच्या हत्याकांडा विरोधात लिहीले आहे... आणि पुढेही लिहीणार आहेच.

कुठल्याही अर्थाने मी काँग्रेसी विचारसरणीचा नव्हतो आणि नाही आहे.

२०१४ मोदी निवडून आले... खूप आनंद झाला... Happy आता भ्रष्टाचाराला कायमचा आळा बसणार यावर माझा ठाम विश्वास होता. काही महिने वाट बघितली. वर्ष गेले.... पण तसे काहीही झाले नाही.
उलट काळ्या पैसेधारकांची लिस्ट सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे साधे धारिष्ट्य पण दाखवले नाही. काळ्या पैशाच्या विरोधात लढण्याची भाषा करणारे... पण या लोकांची सरकार कडे असलेली नावाची यादी सर्वोच्च न्यायालयाला देताना खळखळ करतात. आधी देतच नाही...
हे धक्कादायक चित्र होते.
जाणकरांनी ऑक्टोबर - २०१४ ची वृत्तपत्रे चाळावीत.

दुसरी पण तेव्हढीच धक्कादायक चित्र निरव मोदी, विजय माल्या, मेहुल चोक्सी, ललित मोदी... यांना पळवले, पळवून जाण्यासाठी मदत केली, किंवा कानाडोळा केला...... चौकीदाराच्या नजरेमधून हे निसटले कसे? ठिक आहे. परत आणण्यासाठी काही प्रयत्न ?
ते लंडन मधे अलिशान फ्लॅट मधे रहातात, मस्त मोकळे हिंडतात, मॅचेस बघतात... तिकडच्या वर्तमानपत्रात आल्यावरच आपल्याला कळते.. आणि मग परत आणण्याची अत्यंत क्लिष्ट / किचकट प्रक्रिया सुरु केली जाते.

भ्रष्टाचार माझ्या यादीमधे क्र. १ वर होता.... मोदी सरकारने काहीही नाही केले. ज्या काही थोड्याफार (ED, CBI) हालचाली २०१९ च्या सुरवातीला केल्या होत्या त्या सर्व निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच केल्या होत्या. उद्देश भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्यापेक्षा विरोधकांना (ममता बॅनर्जी आदी) नेस्तनाबूत करण्याचा होता. आता विरोधक काही स्वच्छ आहेत असे मला म्हणायचे नाही.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदी आणली.... तो निर्णय पाण आत्मघातकी होता आणि आजपर्यंत कुणालाही त्याचे तार्किकदृष्ट्या समर्थन करता आलेले नाही...

येथवर मला भाजपा आणि काँग्रेस दोन्ही सारखेच वाटले... ते स्वच्छ नाहीत, हे पण काही सोवळे नाहीत. ठिक आहे.

पण मग लिंचिंगचे प्रकार सुरु झालेत... १, २, ३.... ५०.... रस्त्यात एखाद्या निरपराधी व्यक्तीला वाट्टेल त्या बालिश कारणाने पकडून (मग कधी ते बिफचा खाल्याचा किंवा शिजवल्याचा किंवा बाळगल्याचा संशय असेल अथवा लहान मुलांना पळवण्याचा संशय असे प्रकार) त्या कारणाने बदडणे... अगदी जिवानेच मारणे.

निरपराध, निशस्त्र माणसांना टार्गेट का आणि कशासाठी? पुढे अत्यंत ढिसाळ चौकशी आणि सर्व आरोपी अपुर्‍या पुराव्या अभावी सुटतात... काही थोडी लोक विरोध दर्शवतात... आदळआपट करतात आणि विसरण्याचा प्रयत्न करतात. कुणालाही शिक्षा झालेली नाही, होत नाही. सर्वशक्तीशाली पंतप्रधान चौकीदार पंतप्रधान काही आठवड्यानंतर त्यांच्या मनाला खूप यातना झाल्याचे कोरडे ट्विट करतात... मग पुन्हा काही आठवड्यांनी लिंचिंगची अजुन एक लाजिरवाणी घटना देशात कुठेतरी घडते... आणि दृष्टचक्र सुरुच रहाते.

लिंचिंगच्या घटना... आणि त्याबद्दल कुणालाही (हे कुणा बद्दलही वय्यक्तिक नाही आहे) काही न वाटणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का आहे. एका व्यक्तीने केलेला हिंसाचार/ खून, एका छोट्या समुहाने केलेला अत्याचार/ हिंसाचार... आणि सरकारच्या मुक संमतीने झालेला हिंसाचार यात मी फरक करतो.
अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या हिंसाचारी घटनांत फार मोठा, टोकाचा द्वेष दिसतो आहे.

घराणेशाहीला माझा विरोध आहे... पण टोकाचा धार्मिक द्वेष, एकाच धर्माला टार्गेट करत घडवलेला हिंसाचार, आणि खोटी बेगडी देशभक्ती यांच्या आवरणाखाली देशाच्या लोकशाही मुल्यांवर होणारे आघात यापेक्षा अनेक दोष असलेली काँग्रेस नक्कीच चांगली होती. पुन्हा, कुठल्याही अर्थाने मी काँग्रेसी विचारसरणीचा नव्हतो आणि नाही आहे.

मी विज्ञानाचा अभ्यास करतो, आणि निसर्गावर अमाप प्रेम आहे. कुठलाही देव किंवा धर्म अजिबात मानत नसलो तरी मानवतावादी आहे. हे यासाठी लिहीले आहे कारण मला कुठल्याही (इस्लाम) धर्माबद्दल खास प्रेम नाही. इतरेजन धर्म मानत असतील तर त्यांच्या भावनांचा आदर करतो...

जम्मू-काश्मीरमध्ये फुटीर गोष्टी करणाऱ्या काँगिंना सरकारने अटक केली, त्यावर रा गा ने तीव्र संताप व्यक्त केलाय आणि पक्षाध्यक्ष सो गा मुगाचे लाडू खात आहेत.

यह चल क्या रहा है भाई?

Pages