सागराशी जुळले नाते....
1977 ला इंजिनियरींग सोडून मी T.S.राजेंद्र हि मर्चंट नेव्ही साठी असलेल्या ट्रेनिंग शीप वर आलो, एन्ट्रन्स परिक्षेला भारतातून 39वा येऊनही घरून इंजिनियरींग सोडायला असलेल्या विरोधाला न जुमानता आयुष्यातील स्विकारलेले हे पहिले आव्हान.....पुढच्या वादळांची जणू नांदीच.
T.S.राजेंद्रची आमची गोल्डन ज्युबेली बॅच असल्याने आमचे ट्रेनिंग NDA च्या लेव्हल ने चालू होते. मला कॅडेट कॅप्टनचे प्रमोशन व जोडिला मोटरबोट ड्रायव्हरची जबाबदारी मिळाली.
1978 ला ट्रेनिंग संपवून मी रत्नाकर शिपिंग कंपनीत नोकरी स्विकारली, खरंतर तेव्हा SCI ,सिंदीया, ग्रेट ईस्टन अशा नावाजलेल्या कंपनीत जाण्यासाठी चढाओढ होती.
माझी पहिली शिप M.V.रत्नशोभना !! रत्नाकर कंपनीच्या बोटीच्या नावाआधी "रत्न " हा शब्द लावला जात असे.हि 25000 हजार टनाची बल्क कॅरिअर होती, म्हणजे धान्य, खत, गुरांचे खाद्य वाहून नेणारी मध्यम आकाराची शीप होती.
माझ्या पहिल्या काही महिन्यातच सिंगापूर, व्हिएटनाम, जपान, नाॅर्थ कोरिया ,इजिप्त, सुऐज कॅनाॅल ,हाॅलन्ड,डेन्मार्क अशी बंदरे फिरून झाली.
पुढच्या लिखाणातून या ठिकाणच्या आठवणी शेअर करेन.
सगळ्याच प्रवासाचे अनुभव खूप
सगळ्याच प्रवासाचे अनुभव खूप सुंदर असतात, आणि समुद्र तर अनुभवांचा खजिनाच!
थँक्स. लिहीत राहा, आम्ही वाचत राहू.
(बादवे, एका आयडी ची खरी ओळख उघड केल्याबद्दल धन्यवाद. पण त्या विकृतीच्या कमेंटने हिरमसून जाऊ नका. लिहीत रहा.)
तुम्ही खरच खुप सुंदर सुरूवात
तुम्ही खरच खुप सुंदर सुरूवात केलेली आहे. आणि इथे नक्कीच लिहीत रहा. अशा ट्रोल्स कडे लक्ष न देता लिहीत रहा. बर्याचदा सामान्य वाचक प्रतिसाद देत नाहीत पण वाचत नक्कीच असतात.
पुढील लेखनास शुभेच्छा!!
मीना ताई तुम्ही माझ्या नावाचा
मीना ताई तुम्ही माझ्या नावाचा उल्लेख केला असता तर मला काही राजमुकुट भेटल्याचा फिल आला नसता. मी तुम्हाला माझ्या शशिराम आयडीने इकडे यायला सांगितले एवढं मला अपेक्षित होते. मला शशिराम आयडीने काय घडतं हे बघायचं होतं. काही सफेद डुकरं खूप खून्नस ठेवून आहेत माझ्यावर. तुम्हाला चाहते मिळण्यासाठी मुद्दाम निगेटिव्ह पब्लिसिटी केली. मला तुमचं लिखाण आवडत होते.
सगळ्या ट्रोल्स कडे दुर्लक्ष
सगळ्या ट्रोल्स कडे दुर्लक्ष करून बिनधास्त लिहा. >>> +१
क्याबातहैं
क्याबातहैं
TuKaRam44 क्याबातहैं
TuKaRam44 क्याबातहैं
JayantiP ये गलत बात है
JayantiP ये गलत बात है
Pages