सागराशी जुळले नाते

Submitted by मीना उत्तरा on 22 June, 2019 - 11:01

सागराशी जुळले नाते....

1977 ला इंजिनियरींग सोडून मी T.S.राजेंद्र हि मर्चंट नेव्ही साठी असलेल्या ट्रेनिंग शीप वर आलो, एन्ट्रन्स परिक्षेला भारतातून 39वा येऊनही घरून इंजिनियरींग सोडायला असलेल्या विरोधाला न जुमानता आयुष्यातील स्विकारलेले हे पहिले आव्हान.....पुढच्या वादळांची जणू नांदीच.
T.S.राजेंद्रची आमची गोल्डन ज्युबेली बॅच असल्याने आमचे ट्रेनिंग NDA च्या लेव्हल ने चालू होते. मला कॅडेट कॅप्टनचे प्रमोशन व जोडिला मोटरबोट ड्रायव्हरची जबाबदारी मिळाली.
1978 ला ट्रेनिंग संपवून मी रत्नाकर शिपिंग कंपनीत नोकरी स्विकारली, खरंतर तेव्हा SCI ,सिंदीया, ग्रेट ईस्टन अशा नावाजलेल्या कंपनीत जाण्यासाठी चढाओढ होती.
माझी पहिली शिप M.V.रत्नशोभना !! रत्नाकर कंपनीच्या बोटीच्या नावाआधी "रत्न " हा शब्द लावला जात असे.हि 25000 हजार टनाची बल्क कॅरिअर होती, म्हणजे धान्य, खत, गुरांचे खाद्य वाहून नेणारी मध्यम आकाराची शीप होती.
माझ्या पहिल्या काही महिन्यातच सिंगापूर, व्हिएटनाम, जपान, नाॅर्थ कोरिया ,इजिप्त, सुऐज कॅनाॅल ,हाॅलन्ड,डेन्मार्क अशी बंदरे फिरून झाली.
पुढच्या लिखाणातून या ठिकाणच्या आठवणी शेअर करेन.

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा. पहिला लेख लिहिलात सुद्धा. तुमच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकता येतील असे वाटते. असेच लिहित रहा.

लिखाण सविस्तर असेल तर वाचायला अधिक चांगले वाटेल.

उदा. मला कॅडेट कॅप्टनचे प्रमोशन व जोडिला मोटरबोट ड्रायव्हरची जबाबदारी मिळाली. म्हणजे नक्की काय झाले?
कॅडेट कॅप्टन हा काय हुद्दा असतो नुसता मान असतो की काही कामे + अधिकार + जबाबदार्‍याही असतात. मोटरबोट ड्रायव्हर म्हणून कायकाय करावे लागते ई. ई.

हर्पेन मला वाटते ही प्रस्तावना आहे. पुढील लेखनात सगळे डिटेल्स येतील बहुधा.

कॅडेट कॅप्टन :- नॉन सिव्हीलियन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स मध्ये सामान्य ऑफिसर कॅडेट म्हणुन जॉईन झाल्यानंतर तुमच्या अधिक अधिक कौशल्यांच्या परीक्षा पास होत गेल्यावर तसेच निदर्शनास आलेल्या नेतृत्व गुणांप्रमाणे कॅडेट्स चे जे ग्रुप्स असतात त्यांच्या नेतृत्वपदासाठी कॅडेट लीडर, कॅडेट कॅप्टन, आणि शेवटी सिनियर कॅडेट कॅप्टन असे काही जणांना प्रोमोट केले जात असे. मर्चंट नेव्हीची 1927 पसुनची डफरीन व त्या नंतर ची राजेंद्र (चोला सम्राटाच्या नावे असलेली ) ह्या ट्रेनिंग शिप्स होत्या. आता त्या नाहीत. त्यावरची ही पदं असत, तो नोकरीचा भाग नव्हे, मात्र भरपुर जबाबदारीची असत.

ह्या लिखाणाचा उद्देश हा मर्चंट नेव्हीतल्या वेगळेच पदर असलेले आयुष्य आणि अनुभवांचे कथन करण्याचा आहे ! आठवणींच्या डोहात डुबकी मारून जी आठवण हाती गवसणार आहे ती शिळोप्याच्या गप्पांच्या रूपात सांगणार आहे, त्याला कसलीही चौकट नसेल,क्षितिजापर्यंत पसरलेल्या रत्नाकराच्या अंगाखांद्यावर बागडलेल्या सारंगाचा आठवणींच्या लाटा मोजण्याचा हा एक प्रयत्न असेल .

मोटरबोट:- ही 100 जणांची ने आण करणारी मोठ्ठी लाँच होती, त्या बोटीचे दोन चालक - एक एंजिन चालवणारा आणि एक स्टेररिंग व बोट हँडलिंग करणारा , त्यांच्या समनवयाने मोटरबोट चालवली जाते. मोटर बोट चा ड्रायव्हर हे एंजिन चालकाचे नाव होते. कॅडेट्स पैकीच एकजण निवडला जाई त्याची परीक्षा पास झाल्यानंतर. परीक्षा ही आयसी इंजिन्स च्या इंजिनीरिंग ज्ञानाबद्दल असे, ती बऱ्याच मार्कांनी पास झाल्याने त्याचा 'बॅज' मिळाला होता. जॉईन झालेले इतर बहुतांशी कॅडेट्स सामान्यच राहिले होते कारण त्यांनी हे काही अॅडिशनल कौशल्य मिळवले व दाखवले नव्हते. ह्याच्या जोडीलाच अजुनही बॅजेस हे अधिकाधिक परीक्षा दिल्याने मिळाले व जोडीला असलेले नेतृत्वगुण ह्यामुळे सहा कॅडेट कॅप्टन्स पैकी तो एक होता. त्याची राजेंद्र ची बॅच ही आजवरची एकमेव राजेंद्र बॅच होती की ज्यात मराठी कॅडेट्स बहुसंख्य होते आणि टॉप किताबही त्यांनी मिळवले. मर्चंट नेव्हीत हल्ली सरकारी मार्गांनी किंवा खाजगी मार्गांनी लोक रिक्रूट होतात.

मी या ताईंना फेसबुक वर खूप दिवसांपासून फॉलो करत होते व त्यांचे ( मिस्टरांचे) लेख खूप रोमांचक वाटले म्हणून मी वारंवार त्यांना माबोवर लिहा अशा विनंत्या केल्या.‌
शेवटी त्या तयार झाल्या. पण धुर्त लेखिकेने मला त्याचे क्रेडिट दिलं नाही. असो..

नमस्कार, ज्योती ताई,
मला शिवराम हरी ओम नावाच्या एकाच अनोळखी व्यक्ती कडून दोनदा व माझे थोरले दिर यांच्या कडून मात्र वारंवार मायबोली वर लिहिण्याचा आग्रह केला गेला म्हणून हा प्रपंच.....आपल्या कडून मला सुचवले गेल्याचे स्मरत नाही...मला यात कसलाही धूर्तपणा जाणवत नाही कारण "षटकार पृथ्वी प्रदक्षिणांचा- कॅप्टन च्या जहाजातून " यात known & unknown अशा सगळ्यांनाच क्रेडिट दिले आहे.तरी या ठिकाणी लिहिण्याचा आनंद कमी होईल असे आरोप टाळता आले तर बरं होईल.

अहो JayantiP हे कसले ट्रोलिंग. लाज वाटली पाहिजे असे कॉमेंट करताना. लिखाण वाचा, एन्जॉय करा, स्वतः लिहा, पण असं फालतू ट्रोलिंग योग्य नाही.

नमस्कार मंडळी ,
आपले अभिप्राय वाचले. पण खरं सांगु का मंडळी मी लेखिका नव्हे, माझ्या दिवसभराच्या कामाच्या व्यापातुन रात्री अर्धातास वेळ काढुन जेवढे व जसे जमेल तसे लिहीत आहे, अजून काही माहिती हवी असल्यास कळवा शक्य असेल तर त्याविषयी लिहीन.

मीना ताई मग शशिराम हरी ओम यांना का विचारले मायबोली काय असते? कसं लिहायचं? थोरले दीर जवळचे होते ना.‌ त्यांच्या कडून माहिती का नाही घेतलीत?

नमस्कार ताई, त्यांच्या कडून तर सविस्तर माहिती घेऊन लिहिले,आपणच आपली ओळख लपवुन लिहित आहात का ? आणि क्रेडिटच हवे आहे ना?बेलाशक घ्या....आपल्या अनमोल मार्गदर्शनासाठी मी आपली आभारी आहे.

आता कसं. खूप लिहा. स्वागतच होईल इथं. लिहिताना हात ढिला सोडा. मोठे लेख लिहा. शार्यचीन तुमचे दीर आहे वाटतं. ते माबोकर असतील तर ओळख करून द्या.

नमस्कार,
मी आपल्या कुणालाच ओळखत नाही आणि आता मी खरंच विचार करते आहे कि इथे काही लिहावे का ??

जयंती ज्योती गप बस...ट्रॉलर नुसती... डोक्या वर पडलोय म्हणून आता माझी सटकली... मी कुणाचा दिर बिर नाय, मला तुमच्या सारख्या मूर्ख लोकांचा विट आला आहे.

मीना उत्तरा: इथे असंख्य वाचक आहेत तसेच काही ट्रोल्स अन त्रास देणारे देखील. तुम्ही त्रास देणार्‍या/ट्रोल्सकडे दुर्लक्ष करा अन वाचकांसाठी इथे लिहीत राहा.

नमस्कार टवणे सर,
इथे काही सिद्ध करण्यासाठी मी लिहित नाही आहे, ना कुणाला स्वतःच्या करमणूकीसाठी त्रास देण्याची मनोवृत्ती आहे, आत्ता येत असलेला अनुभव सार्वजनिक आयुष्यात काम करताना घेतला आहे फक्त माझ्या दिरामुळे इथे येण्याचा विचार केला.
आपल्या प्रोत्साहनामुळे नक्कीच निर्णयावर पुन्हा विचार करेन.

ह्या लिखाणातून मी कॅ.गोगटे, माझा नवरा, याच्या आठवणी शब्दबद्ध करत आहे.>> ओके ओके . सुरवातीला वाचताना कंफूझन झाले होते . कारण तुमचा फोटो बाईचा आहे म्हणून . सगळ्या ट्रोल्स कडे दुर्लक्ष करून बिनधास्त लिहा मॅडम . तुम्हाला लेखनाकरता शुभेच्छा Happy

नमस्कार सुजा,
प्रोत्साहना बद्दल खूप आभारी आहे.

मी पण नवऱ्याबरोबर शिप वर रहाण्याचा अनुभव घेतला आहे .
त्यामुळे वाचायला जास्तच आवडेल . धन्यवाद Happy

Pages