नमस्कार
म्याऊ हा आयडी माझा तात्पुरता आहे. त्यांमुळे संशोधन करू नये.
मायबोलीची बदलती रूपं मी बघत गेले आहे. अनेक कारणांसाठी मी मायबोलीचा प्रभावी वापर पाहिला. इथे स्त्री वादाबाबत झालेल्या चर्चा वाचल्या. लिंगनिरपेक्षता सारखे अतिशय मार्गदर्शक परिसंवाद वाचले. मी त्यात सहभागही नोंदवला. पुरूषांना इथे बोलतं केलं गेलं. काहींचे कबुलीजबाब आले. मायबोलीला जर आपण सोशल मीडीया समजणार असू तर असा वापर मी कधीही कुठेही पाहिलेला नाही.
भाषाविषयक उपक्रम, गणेशोत्सवाचे उपक्रम आणि दिवाळी अंक हे सर्व मायबोलीच्या यशातले मानाचे तुरे आहेत. हे सर्व मायबोलीचे अधिकृत उपक्रम आहेत. याशिवायही अनेक काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. त्या म्हणजे इथल्या मंडळींनी येऊन एक नाही दोन दोन शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत. माझ्या माहीतीत नसलेले ही अनेक उपक्रम असतील. हे पण मायबोलीचेच यश नाही का ?
इथे संशोधक आहेत. खेळाडू आहेत. सायकलस्वार आहेत. ट्रेकर्स आहेत. अनेक व्यावसायिक आणि छंदी फोटोग्राफर्स आहेत. या सर्वांच्या अनुभवांनी मायबोली समृद्ध होत गेली आहे.
माझ्या माहितीत मायबोली म्हणजे नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती. मी त्याच साठी इथे आले. बाकीचे उपक्रम नंतर समजत गेले. मी कुणाचेही नाव घेण्याचे टाळतेय. पण इथे उत्तमोत्तम कथा, कविता, गझला, ललितं वाचायला मिळायची हे अगदी सत्य आहे. या काळात मला वर्तमानपत्रातले लेख वाचवेनासे झाले होते. कारण नव्या दमाचे साहीत्य मी इथे वाचत होते. मी पण तोडका मोडका प्रयत्न केला. पण तो अगदीच बालीश असल्याने सोडून दिला.
इथे लिहीणा-या मंडळींना खुले आकाश मिळाले. हे नैसर्गिक आहे. त्यांची जागा नव्यांनी घेतली. वाचकांची नवी पिढीही आली.
पुढे पुढे मायबोलीवर काही तरी बिनसत गेले.
कुठून आणि कसे ते सांगता येत नाही. पण साहीत्याचा दर्जा घसरला ही सुरूवात होती कि सदस्यांतली धूसफूस ही सुरूवात हे मला सांगता नाही येणार. मला इथे कारणांच्या मुळाशी जायचे नाही. परिणाम दिसताहेत. त्यावर बोलायचे आहे. कदाचित माझे इथून पुढचे लिखाण चुकीचे असेल, एकांगीही वाटू शकेल. कारण माझ्या चष्म्यातून मी लिहीणार आहे.
- नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही
- नव साहीत्यिकांना मार्गदर्शन करायला कुणालाच वेळ नाही
- साहीत्यिकांचा दर्जा म्हणावा तसा नाही.
- त्यामुळे करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत.
- इतर काही घडत नसल्याने राजकारण, करंट अफेअर्स पुरतीच मायबोली आहे का असे वाटते.
- जर राजकारणावरच्या चर्चांपेक्षा इतर घडामोडींमधे वाढ झाली तर राजकारणाकडे फारसे लक्ष जाणार नाही
हे काही मुद्दे आहेत.
याशिवाय राजकारणाचा चिखल होण्यामागे काही जण सातत्याने फेक आयडीज घेऊन ख-या नावाने लिहीणा-यांवर चिखलफेक करत राहतात. यावर मायबोलीचे कोणतेच धोरण नाही.
मायबोली जर सोशल साईट आहे असे म्हणणे असेल तर युझर्सला समान वागणूक हवी.
मायबोली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे म्हणणे असेल तर त्या पद्धतीचा डिसक्लेमर सदस्यत्व घेताना मिळायला हवा.
अनेकदा सक्रीय सदस्यांचं जे बहुमत आहे त्यापेक्षा वेगळ्या मताची टिंगल करणे किंवा त्याच्यावर तुटून पडणे हे न्याय्य असल्याप्रमाणे मायबोलीचे धोरण असते. अल्पमताचा आदर मायबोलीवर पूर्वी व्हायचा. तो आता होत नाही. मायबोली ही इतर अनेक साईट्सपेक्षा वेगळी होती. पुरोगामी होती याचे असंख्य पुरावे आहेत.
पण ती तशीच राहिलेली आहे का याबद्दल शंका आहेत.
उजव्या विचारसरणीचा वरचष्मा मायबोलीवर जाणवतो. इथे अनेक सभ्य आयडीज फेक आयडीज घेऊन पुरोगाम्यांना त्रास देत राहतात. रॅशनलिस्टना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी मायबोलीचा मुक्तपणे वापर सध्या वाढलेला आहे. उजव्या विचारसरणीचे नसाल तर तिरस्कारयुक्त , द्वेषपूर्ण वागणूक मिळते.
अनेक तटस्थ समजले जाणारे आयडीज देखील उजव्या विचारसरणीला अनुकूल आहेत. त्याचे त्यांना नक्कीच स्वातंत्र्य आहे. पण तसे ते कबूल करत नाहीत. यातले काही राजकारणाच्या धाग्यावर येऊन झाली का चिखलफेक सुरू असे शेरे मारतात आणि फेक आयडीने एका कंपूवर तुटून पडतात. मूळ आयडीने कितीही तटस्थपणाचा आव आणला तरी ही मंडळी आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा राग धरतात. हे दुर्दैवी आहे.
मतभेदांना जागा असावी.
माझ्या पाहण्यात काही जण आले आहेत. ज्यांच्याकडे मी मत मांडले नव्हते तोपर्यंत ते माझ्याशी खूप चांगले होते. यांच्या तोंडून मी ऐकलेल्ञा गोष्टी आहेत. काही लेखक या मंडळींना आवडायचे. पण यातल्या काहींनी आपली राजकीय विचारसरणी स्पष्ट केल्यानंतर त्यांना वाळीत टाकले गेले आहे. तसे एसएमएस पूर्वी जायचे. नंतर व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर अमूक तमूक ला रिप्लाय देऊ नका असे मेसेजेस येऊ लागले. फेसबुक ग्रुप्स काढूनही तिथे हे उद्योग झाले आहेत.
मी अनेकदा असे मेसेजेस इग्नोर केले. पण अती झाल्यानंतर संबंधितांना फोन करून सांगितले. याचा परिणाम म्हणून मलाही तीच वागणूक मिळाली. याच कारणाने मी मायबोलीवर अनेक वर्षे नव्हते. यावेसेच वाटले नाही. पण इतर ठिकाणीही रमले नाही.
अधून मधून नवे काही दमदार आले आहे का हे बघत राहीले. पण छे !
मध्यंतरी काही दमदार गझलांची सुरूवात झाली. आश्वासक वाटले. पण गझलकारांचा एक कंपू झाला आणि त्याने नको नको केले. रोगापेक्षा उपाय भयंकर झाला.
अजूनही दाद तैंचं काही येत अधून मधून येता राहतं. (तिच नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. खूप आवडती लेखिका आहे ती माझी). तेव्हढ्यासाठी मायबोलीवर उगवून अंतर्धान पावणारे आयडीज पण पाहीलेत. हे माझ्यासारखेच नंतर कुठे तरी गायब होतात. खरेच आम्ही मायबोलीवर वैयक्तिक स्वार्थासाठी येतो. आम्हाला मायबोली सुधारावयाची नाही का ?
पण, आमच्या हाती आहे का हे ?
किंबहुना हे आमचे काम तरी आहे का ? मायबोलीला तसे मनापासून वाटत असेल तर सक्षम लोक आहेत इथे. आपोआप सुधारेल. पण तसे खरेच वाटतेय का कुणाला ?
मायबोलीचे मत म्हणजे कुणाचे मत आहे ? जगभर पसरलेली मायबोली आहे. ५०००० च्या पुढे पोहोचलीय ना संख्या ? (कदाचित मी खूप मागच्या जमान्यात असेन)
मग इथे मूठभरच का सक्रीय ? ही मंडळी नेमकी काय करतात ? एखादी चांगली कथा व्हायरल होते. नावाशिवाय चोरी होते ही सक्रीय न दिसणारे लोक मायबोली वाचतात याची पावतीच नाही का ? या सर्वांना सामील करून घेण्यासाठी काय योजना आहेत ?
मुठभरांच्या आवड निवड बाजूला सारून बहुजनांची आवड लक्षात घेऊन आपल्याला उपक्रम आखता येऊ शकतील का ?
माफ करा. जरा जास्तच बोलले. कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व !
टवणे!
टवणे!
पण प्रयत्न केले तर ना!
पण प्रयत्न केले तर ना!
नि त्यांचा काँप्युटर नि ऑपरेटिंग सिस्टीम स्पेशल असेल तर?
प्रयत्न करणे कठीण.
भाषा, लिपी कुठलिहि असली तरी विचार पोचवणे महत्वाचे.
माझ्या मते मराठीत जोडाक्षरे लिहीणे कठीण असल्याने रोमन लिपीतच मराठी लिहावे.
हळू हळू रोमन लिपीत मराठी लिहिण्या ऐवजी इंग्रजीतच लिहावे - म्हणजे फायदा असा की मायबोली जागतिक होईल, फेसबूक, व्हाट्स अॅप सारखी. मग मायबोलीचा दर्जा घसरला अशी खंत असणारे लोक गप्प बसतील.
मराठी टंकलेखन करणे वाळुचे कण
मराठी टंकलेखन करणे वाळुचे कण रगडण्यापेक्षा सोपे आहे. >>
Bhari hota reply.
yes. Whenever i login from my laptop.
Mobile varun issue yetahet. + kahi karanane maza awadata marathi keyboard Jo mee purvi vaparayache to vaparu shakat nahiye.
Serious question - on maayboli (while typing fom mobile ) r u able to type in marathi without installing external keyboard like u can on laptop?
Yes. Start using Google indic
Yes. Start using Google indic. If I am not wrong, हे तुम्हाला अनेकदा सांगूनही तुम्ही स्टेबर्नली action घेत नाही असं दिसलं आहे.
वाट्टेल त्या आयडीशी काय नाव
वाट्टेल त्या आयडीशी काय नाव जोडतात इथे ? ते ही ड्युआयडींचा वापर करून. या असल्या फालतूपणाला उत्तर द्यायला वेळ नाही.
काल मोबाईलवरून लॉगिन केले असल्याने देवनागरीत लिहीणे जमत नव्हते.
इथल्या काही ट्रोलिंगच्याच्य उद्देशाने कार्यरत असलेल्या ड्युआयड्यांवर कारवाई व्हायला हवी. फेसबुक वर तशी यंत्रणा आहे. अलिकडे ड्युआयडी किंवा स्पॅम मेसेज म्हणून रिपोर्ट केलं की ताबडतोब तो आयडी दिसेनासा होतो.
फेसबुक पण मुक्त आहे. पण त्याचा भारतियांनी गलीच्छ उपयोग केला. ट्रोलिंग बाबत तक्रारी होत असताना फेसबुक थंड असायचे. शेवटी मार्क झुकेरबर्गला या ट्रोलिंगचा फटका बसला. स्वतःच्या बहीणीच्या नावावरून लोकांनी जे काही केलं त्याने भारतियांची अब्रू गेली.
भारतीय जनता पक्ष नुकताच निवडून आला. पण निकालाच्या आधी सातत्याने ईव्हीएम बाबत काही व्हिडीओज व्हायरल झालेले दिसले. तसेच ३७३ मतदारसंघात ईव्हीएमची मतं आणि नोंदणी झालेली मतं जुळत नसल्याचे दिसून आले आहे. नेहमी राजकारणावर न लिहीणा-यांना यावर लिहावेसे का वाटू नये ? यावर जे प्रतिसाद आहेत ते सर्व गलीच्छ आहेत. उर्मटपणा आणि ट्रोलिंग आहे.
मायबोलीवर एखादा संशय व्यक्त करण्याआधी न्यायालयात जाणे अनिवार्य कधीपासून झाले ? मंदार जोशी नामक ट्रोलने २०१३ च्या आधी ईव्हीएम हॅक होते असे अनेकदा लिहीले आहे. आता तसे लिहीणे हा देशद्रोह कसा काय होतो ?
तुम्हाला असे म्हणायचे आहे का अशी सुरूवात करून जबरदस्ती एखाद्याच्या तोंडात वाक्ये घुसवून न केलेल्या स्टेटमेण्टला धरून ट्रोलिंग चालू आहे. त्याला आवर घालावा. राजकारणावर बोलू नये असे काही नाही. फक्त इतरही क्षेत्रात वावर असावा. निव्वळ राजकारणावर बोलण्यासाठी आणि ते ही उद्दामपणे, आयडीज उडवण्याचे धोरण ठेवले तर राजकारणाच्या धाग्यांनाही चांगले वळण लागेल.
फेसबुकवर ब्लॉक करण्याची सुविधा असल्याने अशा ट्रोल्सना ब्लॉक करणे हा पर्याय हाताशी असतो.
इथे कुणी जर स्वतः मायबोली चालवत असल्याप्रमाणे इतरांना फुकटे वगैरे म्हणत असतील तर त्यांना ब्लॉक करताना विशेष आनंद होईल.
जमतंय की मराठी टंकलेखन
जमतंय की मराठी टंकलेखन
च्रप्स, आधार कार्डाचा फोटो
च्रप्स, आधार कार्डाचा फोटो लावू का ?
मला कंटाळा आलाय आता या आरोपांचा. आधी केपण, पण आता नाही एंजॉय करता येत. सॉरी.
झाले का बघून ?
कुणीही उठतं आणि मंदार
कुणीही उठतं आणि मंदार जोशींच्या नावाने खडे फोडत राहतं. मंदार जोशी यांना त्यांची बाजू मांडण्याची सोय नाही हे माहीत असून त्यांच्यावर आरोप होत राहतात. तुमच्याकडे काय पुरावा आहे कि हे सर्व आयडीज मंदार जोशींचे आहेत म्हणून ?
पूर्वीच्या पार्लेकरांनी म्हणजे आताच्या टीपापा वाल्यांनी किती जणांना पळवून लावलेय ते बघा. त्यांच्या नावाने खडे फोडण्याची हिंमत नाही म्हणून आपले गरीब आयडीज पकडायचे आणि त्यांच्या नावाने पावत्या फाडायच्या. चांगलं आहे.
कुणीही उठतं आणि मंदार
कुणीही उठतं आणि मंदार जोशींच्या नावाने खडे फोडत राहतं. मंदार जोशी यांना त्यांची बाजू मांडण्याची सोय नाही हे माहीत असून त्यांच्यावर आरोप होत राहतात. तुमच्याकडे काय पुरावा आहे कि हे सर्व आयडीज मंदार जोशींचे आहेत म्हणून ? >>>
त्याला मायबोली म्हणजे स्वतःच्या मालकीचं खेळाचं मैदान वाटतं. म्हणजे त्याने स्वतः इतरांना कितीही आणि कसही ट्रोल करावं, मग "उद्धटपणे" दुसऱ्यांना ट्रोल म्हणावं. त्याच्या मते तो स्वतः एक जेन्यूईन आयडी आहे नि ज्यांची मते त्याच्याशी जुळत नाहीत ते सगळे फेक वा ड्युआयडी आहेत !
एका ठिकाणी मंदार जोशीचा तिरस्कार करताना त्याने काय केलं याचे दाखले देऊन तेच स्वतःही करणे, यावरून मंदार जोशी या माबोकाराचे वैचारिक विश्व व्यापून राहिलाय हे समजून येते. मग त्या भक्तीभावातून सगळीकडे आणि प्रत्येकजण मंदार जोशी दिसू लागतो ! Obsession म्हणतात ते हेच असावं कदाचित...
Start using Google indic >.>
Start using Google indic >.> its not inbuilt in my phone. :O
मी हे वापरतो https://www
मी हे वापरतो https://www.google.com/intl/mr/inputtools/try
मी हे वापरतो https://www
मी हे वापरतो https://www.google.com/intl/mr/inputtools/try
नानबा, मला लॅपटॉपवरूनही फक्त
नानबा, मला लॅपटॉपवरूनही फक्त मायबोलीवर मराठी टाईप करता येते, माझ्याकडे कुठलेही दुसरे सॉफ्टवेअर नसताना. (आता लॅपटॉपवर सोशल मीडिया बॅन असल्यामुळे लॅपटॉप वापरू शकत नाही हे वेगळे, जेव्हा बॅन नव्हता तेव्हा टाईप करता येत होते)
जिथे आपण टाईप करतो त्या चौकोनात वर म/E ही अक्षरे दिसत आहेत, त्यावर क्लिक करून प्रश्न सुटतो का पहा. तिथे तुम्हाला मराठी निवडता येईल.
हा फोटो बघा, इथेही मराठी निवडायची सोय आहे.
Thank u Sadhana and jiddu!
Thank u Sadhana and jiddu!
लॅपटॉपवरूनही फक्त मायबोलीवर मराठी टाईप करता येते, माझ्याकडे कुठलेही दुसरे सॉफ्टवेअर नसताना >> laptop works for me.. Mobile is d problem. Not possible to open laptop every day..
" marathi" option selected ahe..
Actually baryach dhagyavar reply cha det nahi. Maze naav alyache kaLale mhanun ha dhaga baghayala ughadala..
Jiddu , vipu keli ahe. Can u check?
इनबिल्ट नसते, कीबोर्ड डाउनलोड
इनबिल्ट नसते, कीबोर्ड डाउनलोड करावा लागतो अँप स्टोर किंवा प्ले स्टोर मधून.
ंआआञ्मक्धधिचमराथिई
ंआआञ्मक्धधिचमराथिई व्ञाव्स्ट्।ईटळ्टटाआ. टाईप़कर्ताणाआ।ईनाहि.
मला मायबोलीवर कधीच मराठी टाईप करता आले नाही. असं आहे वरचे वाक्य. फक्त एकदा बॅकस्पेस दिल्याने असे झाले. मी नेहमी इनबिल्ट देवनागरी कीबोर्ड वापरतो. म/E यावर मात्र क्लिक करावे लागते अन्यथा मराठी किबोर्ड देखील चालत नाही. हा प्रकार लॅपटॉपच्याही बाबत आहे.
Kuthslle App download
Kuthale App download karayache ?
Mee ata mobile Varun type kartana mala devnagari keyboard available nahiye
मिंग्लिश कीबोर्ड वापरा.....
मिंग्लिश कीबोर्ड वापरा..... मस्त आहे
Ok
Ok
मिंग्लिश कीबोर्ड वापरा... >
मिंग्लिश कीबोर्ड वापरा... > Mee aadhi toch vaparayache swarup.. Its very intuitive.
नानबा, विपुला प्रतिसाद दिलाय.
नानबा, विपुला प्रतिसाद दिलाय. डेमोसाठी हा विडिओ पहा ३.३०व्या वेळेपासून
https://www.youtube.com/watch?v=zJxFvZGHin0
वा! हा मस्त आहे. SwiftKey
वा! हा मस्त आहे. SwiftKey

ल+ H नाही यात.
>> मराठी टंकलेखन करणे वाळुचे
>> मराठी टंकलेखन करणे वाळुचे कण रगडण्यापेक्षा सोपे आहे
हो ना. प्रयत्ने कीबोर्ड ची बटने रगडता देवनागरीही गळे.
>> फेसबुकवर ब्लॉक करण्याची सुविधा असल्याने अशा ट्रोल्सना ब्लॉक करणे हा पर्याय हाताशी असतो.
सहमत आहे. पूर्वी सुद्धा लिहिले होते मी यावर. इथेही धागा किंवा आयडी ब्लॉक/रिपोर्ट करण्याची सुविधा असायला हवी. कदाचित काम सुरु असेल त्यावर. किंवा अन्य काही अडचणी असल्याने ती सुविधा दिली गेली नसेल. पण ज्यांना जे नको आहे ते ते (धागा/आयडी) ब्लॉक करतील कि त्या दोन व्यक्तींना एकमेकांच्या प्रोफाईल/पोस्ट/विपु वगैरे काही काहीच दिसणार नाही. सध्या होतेय असे कि नको असलेले धागे समोर येत राहतात किंवा मत जुळत नसलेले आयडी नाईलाजाने आमनेसामने येतात. मग अनेकजण मायबोली सोडून जातात किंवा त्यांना काढले जाते वगैरे.
>> Submitted by साधना on 19 June, 2019 - 09:05
मायबोलीवर असणारा हा पर्याय पूर्वी चांगला होता. पण आता डेस्कटॉप/लॅपटॉप साठी गुगल मराठी इनपुट (जिद्दु यांनी वर लिंक दिली आहे) हे जास्त सोयीस्कर आणि जलद टाईप करता येईल असे आहे. मी कित्येक वर्षे हेच वापरतोय. पण होते काय कि मायबोलीचा मराठी लिखाणाचा पर्याय डीफॉल्ट सिलेक्टेड असल्याने त्याची आणि गुगल मराठी इनपुट ची हाणामारी सुरु होते. विशेषतः डिलीट, कॉपी, पेस्ट वगैरे करताना शब्द आणि अक्षरे एकमेकात घुसतात. आधी लिहिलेल्या लिखाणाची वाट लागते. ते फारच वैतागवाने असते. मग परत स्क्रोल करून ते बदलून तिथे इंग्लिश आणायचे वगैरे. "Ctrl + \ ने बदला" असे लिहिलेय खरे पण ते कधीच काम करत नाही. मला वाटते या ऐवजी आताच्या जमान्यात मायबोलीने गुगल ची सुविधा वापरायला हरकत नाही. पूर्वी च्या सकाळ मध्ये सुद्धा प्रतिसाद विभागात त्यांनी गुगलचा एपीआय वापरून सुविधा दिली होती. खूप जलद मराठी टाईप करता येत असे. गुगल इनपुट ज्यांच्याकडे इंस्टाल नाही त्यांना हे खूप सोयीचे जाईल. (तसेही नॉन-टेक्निकल व्यक्तींसाठी गुगल इनपुट इंस्टाल करणे तसे क्लिष्टच आहे)
फेसबुक पण मुक्त आहे. >>
फेसबुक पण मुक्त आहे. >>
कोणीतरी इकडे मायबोलीसाठी
कोणीतरी इकडे मायबोलीसाठी ऑफलाइन टाइपिंग सुविधेसाठी एवढे मेहनत घेऊन काम करतंय नी ह्यांचे आपले अजुन कीबोर्ड कुठला वापरु ह्याच्यावर खल सुरुय ! कठीण आहे मराठीचे
कदाचित माझ्या पद्धतीचा काही
कदाचित माझ्या पद्धतीचा काही लोकांना मराठी
टंकण्या साठी उपयोग होईल थोडक्यात मी वापरतो ती पद्धत अशी
मी एम एस वर्ड मध्ये टाईप करतो. नंतर मायबोलीवर द्यायचे असल्यास कॉपी पेस्ट करतो. पण हा प्रतिसाद मी डायरेक्ट मायबोलीच्या प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीत डिक्टेट केलाय.
बहुतेक वेळा गूगल जीबोर्ड वापरून एम एस वर्ड मध्ये डिक्टेशन देतो.
डिक्टेशन अगदी बरोबर असते असे नाही पण टायपिंगचे बरेच श्रम कमी होतात.
यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन करंट कीबोर्ड ऑप्शन जीबोर्ड असा सेट करायला लागतो. तसेच लांग्वेज ऑप्शन मध्ये मराठी सेट करावे लागते.
एकदा सेटिंग केले की तुम्हाला दोन प्रकारचे कीबोर्ड मिळतात. ते टाॅगल करता येतात. कीबोर्डच्या खालच्या बाजूला पृथ्वीचे चित्र आहे ते दाबले की अनु
आलटून-पालटून इंग्लिश किंवा मराठी कीबोर्ड मिळतो. मराठी कीबोर्ड मिळाल्यावर कीबोर्डच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या माइकचे बटन दाबले की तुम्ही डिक्टेशन देऊ शकता.
ज्या कोणाला एम एस वर्ड वापरणे शक्य नाही ते डायरेक्ट मायबोली मध्ये टंकू शकतात.
Veekshya, u missed my point.
Veekshya, u missed my point. Mala external keyboard download karane shakya nahiye mobile var. Laptop is no issue.
Pan Asoch. Kiti vela tech tech lihayache. Jiddu ncha option work hotoy ka pahu shakate /pahatey
Ek gosht manavi lagel pan, adhichya vikhari posts mage padun kahi kaaL tari maabo karanni ekjuTine charcha keli!
Nanba
Nanba
Tumhi soppe app ka download karat nahi jar fakt MOBILE issues asel tar. Google indic madhye hinglish option mast aste. Spell chk autocorrection wagaire kahi zamzat nahi. Tyamule ase typing khup sope aste. Ani hyat Marathi madhye khup chhan fast typing jamte. Baki Marathi keyboard peksha !
Tase tar sarw phone madhye inbuilt option khup bhasha astat...fakt aplyala havi ti select keli ki zale. Say for example... English and Marathi. Mg tyatun suddha typing jamtech ki jar ase Google indic app ghyayla nako asel tar.
मी इसकाळ वेबसाईटवर टाईप करतो
मी इसकाळ वेबसाईटवर टाईप करतो नन्तर इकडे पेस्ट करतो.
मी खालील लिन्क वापरतो. ईसकाळ
मी खालील लिन्क वापरतो. ईसकाळ पेक्षा चान्गल आहे.
http://marathi.indiatyping.com/
Pages