तो पाऊसच वाईट होता!

Submitted by अज्ञातवासी on 11 June, 2019 - 06:59

तो पाऊसच वाईट होता,
सगळंच शुष्क करत होता,
ना तुझ्या डोळा, ना माझ्या,
हृदयात मुसळधार कोसळत होता!

तो मुखवटाच वाईट होता,
चेहऱयावर चढवलेला,
भयाण, विद्रुप, कोता,
तरीही तुला आवडत होता!

ती रीतच वाईट होती,
जगणं शिकवणारी,
सज्जनतेची पुटे चढवता,
प्राण हिरावून घेणारी!

ते नातंच वाईट होतं,
गिधाडांपासून लपवून जगलेलं,
तुझ्या कुशीत वाढलेलं,
तुझ्या दुराव्याने प्राण सोडलेलं!

तो पाऊस वाईट होता,तो मुखवटा वाईट होता,
ती रीत वाईट होती, ते नातंच वाईट होतं,
सगळं वाईट होतं, अश्वत्थाम्याच्या शापासारखं,
भळभळणारी जखम, अमीट पापासारखं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय! पु.ले.शु!

ना तुझ्या डोळा, ना माझ्या,
हृदयात मुसळधार कोसळत होता! KY sunder lihilay... Ani maza comment vr kuni bhasya kru nka... Aamhala je vatat te aamhi lihito ... Virodhkancha marjich Ani aavdich lihayla tumhi aamhla posayla yetat ka ...

सिद्धी - धन्यवाद
उर्मिला - थँक्स
श्रद्धा - थँक्स
च्रप्स - धन्यवाद! अमीट म्हणजे न मिटणार!

@अविका - बाय द वे, तू अज्ञातवासीच्या प्रत्येक धाग्यावर बाय डिफॉल्ट 'बकवास एकदम' हा प्रतिसाद सेट केलाय का?
की कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळ दिसत तशी तुझी गत झालीये?
उपचार करून घे. आणि यावर धागा काढ लगेच Proud
(आणि आता इथे लगेच निगेटिव्ह प्रतिसाद दिला तर एक कंपूतला आय डी त्यावर तुटून पडला वगैरे रडारड करू नये. लेखकाच्या प्रत्येक धाग्यावर हाच प्रतिसाद कॉपी पेस्ट केलाय. अभ्यास वाढवा, उघडा डोळे, बघा नीट)

नवीन Submitted by महाश्वेता on 12 June, 2019 - 09:14 >>>> Rofl Rofl

मला जे बकवास वाटले त्याला बोल्ली बकवास तुला काय प्रोब्लेम
मा बो अलॉड करते कमेंट सो मी माझी कमेंट टाकणारच , तुला का झोंबतेय

मी काय करायचे हे तु मला सांगणारी कोण
ह्या लेखकाने ठेवलेल्यातली एक ???? म्हणजी त्याच्या वतीने लढायला Wink
बादवे तुझी कमेंट वाचुन कळले की तुला मान्य् आहे की तु आणी बाकीच्या त्याच्या वतीने रडारड करता

Biggrin

क़ळतेय चांगलेच की कुणाला झोंबलेय.

मला कुणी ठेवायची की कोणाला मी ठेवायची गरज नाही, मी माझ्या लढाया एकटीने लढायला समर्थ आहे, मला नै गरज कुबड्यांची

हे ठेवलेल्या वगैरे आयडिया कुठून येतात ग? की स्वानुभव >>> नाय ओ, तुमच्यासारख्यांना बघुन्/वाचुन कळते तेव्हढेच बास Wink

एक विनंती, यावर तुला जी कमेंट टाकायचीय ना, ती माझ्या विपुमध्ये टाक. उगाच चांगल्या कवितेच्या धाग्यावर पिंका नको...>>>>> +११११

अविका, जरा सरस्वतीचे स्मरण करा. जर एकदा तुमचे अज्ञातवासी यांच्याशी वाद झाले असतील तर याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या प्रत्येक धाग्यावर तुम्ही थयथयाट करावा. आणी महाश्वेता यांना तुम्ही आत्ता जे उद्देशुन लिहीले आहे ते निश्चीतच अतीशय हीन दर्जाचे आणी खालच्या पातळीवरचे आहे. एक स्त्री असुन दुसर्‍या स्त्रीला असे तुम्ही लिहु शकता हे आश्चर्यच आहे, नाही का?

बाय द वे, मी पण कुणाची ड्यु आय डी नाही, नाहीतर अज्ञातवासी व महाश्वेता यांची बाजू घेतली म्हणून परत काही तरी लिहाल. आणी जर तसे परत लिहीले तर मग तुम्हाला कुठेही पूर्णपणे इग्नोर केले जाईल.

माझा प्रश्न अजुनही तोच आहे, मी काय करावे / बोलावे हे मला सांगणारे तुम्ही सगळे कोण????

आणी एका स्त्री विशयी काय भाशा वापराय्ची हे मला सांगायची लायकी एकाची तरी आहे का ईथे बाकीचे जावो अ‍ॅडमीनची पण नाही

जर असती ना तर त्या कल्पेश कुमार ऊर्फ अंबज्ञ ऊर्फ वीष्य (मला खात्री आहे की हा तोच आहे) च्या बळी धाग्यावर माझी जी अवहेलना झाली त्यावर कोणी का बोल्ले नाही का अ‍ॅडमीनने त्याच्यावर कार्वाई केली नाही

तेव्हा पासुनच मी अशी वागतेय आनी वागत राहीन

पेरावे ते ऊगवते

करा की मला ईग्नोर त्यात काय एवधे