Submitted by अज्ञातवासी on 11 June, 2019 - 06:59
तो पाऊसच वाईट होता,
सगळंच शुष्क करत होता,
ना तुझ्या डोळा, ना माझ्या,
हृदयात मुसळधार कोसळत होता!
तो मुखवटाच वाईट होता,
चेहऱयावर चढवलेला,
भयाण, विद्रुप, कोता,
तरीही तुला आवडत होता!
ती रीतच वाईट होती,
जगणं शिकवणारी,
सज्जनतेची पुटे चढवता,
प्राण हिरावून घेणारी!
ते नातंच वाईट होतं,
गिधाडांपासून लपवून जगलेलं,
तुझ्या कुशीत वाढलेलं,
तुझ्या दुराव्याने प्राण सोडलेलं!
तो पाऊस वाईट होता,तो मुखवटा वाईट होता,
ती रीत वाईट होती, ते नातंच वाईट होतं,
सगळं वाईट होतं, अश्वत्थाम्याच्या शापासारखं,
भळभळणारी जखम, अमीट पापासारखं!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता
कविता!
कविता
सुंदर लिहिलंय! पु.ले.शु!
वाह! मस्तच!!
वाह! मस्तच!!
सुंदर
सुंदर
धन्यवाद मन्याS, शाली, mr
धन्यवाद मन्याS, शाली, mr.pandit
झक्कास आहे कविता
झक्कास आहे कविता
ना तुझ्या डोळा, ना माझ्या,
ना तुझ्या डोळा, ना माझ्या,
हृदयात मुसळधार कोसळत होता! KY sunder lihilay... Ani maza comment vr kuni bhasya kru nka... Aamhala je vatat te aamhi lihito ... Virodhkancha marjich Ani aavdich lihayla tumhi aamhla posayla yetat ka ...
छान..
छान..
अप्रतिम... अमीट म्हणजे काय?
अप्रतिम... अमीट म्हणजे काय?
बकवास एकदम
बकवास एकदम
सिद्धी - धन्यवाद
सिद्धी - धन्यवाद
उर्मिला - थँक्स
श्रद्धा - थँक्स
च्रप्स - धन्यवाद! अमीट म्हणजे न मिटणार!
मस्त कविता
.
@अविका - बाय द वे, तू
@अविका - बाय द वे, तू अज्ञातवासीच्या प्रत्येक धाग्यावर बाय डिफॉल्ट 'बकवास एकदम' हा प्रतिसाद सेट केलाय का?
की कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळ दिसत तशी तुझी गत झालीये?
उपचार करून घे. आणि यावर धागा काढ लगेच Proud
(आणि आता इथे लगेच निगेटिव्ह प्रतिसाद दिला तर एक कंपूतला आय डी त्यावर तुटून पडला वगैरे रडारड करू नये. लेखकाच्या प्रत्येक धाग्यावर हाच प्रतिसाद कॉपी पेस्ट केलाय. अभ्यास वाढवा, उघडा डोळे, बघा नीट)
नवीन Submitted by महाश्वेता on 12 June, 2019 - 09:14 >>>>
मला जे बकवास वाटले त्याला बोल्ली बकवास तुला काय प्रोब्लेम
मा बो अलॉड करते कमेंट सो मी माझी कमेंट टाकणारच , तुला का झोंबतेय
मी काय करायचे हे तु मला सांगणारी कोण
ह्या लेखकाने ठेवलेल्यातली एक ???? म्हणजी त्याच्या वतीने लढायला
बादवे तुझी कमेंट वाचुन कळले की तुला मान्य् आहे की तु आणी बाकीच्या त्याच्या वतीने रडारड करता
अरेरे, इतकं झोंबल!
.
क़ळतेय चांगलेच की कुणाला
क़ळतेय चांगलेच की कुणाला झोंबलेय.
मला कुणी ठेवायची की कोणाला मी ठेवायची गरज नाही, मी माझ्या लढाया एकटीने लढायला समर्थ आहे, मला नै गरज कुबड्यांची
हे ठेवलेल्या वगैरे आयडिया कुठून येतात ग? की स्वानुभव >>> नाय ओ, तुमच्यासारख्यांना बघुन्/वाचुन कळते तेव्हढेच बास
एक विनंती, यावर तुला जी कमेंट
एक विनंती, यावर तुला जी कमेंट टाकायचीय ना, ती माझ्या विपुमध्ये टाक. उगाच चांगल्या कवितेच्या धाग्यावर पिंका नको...>>>>> +११११
अविका, जरा सरस्वतीचे स्मरण करा. जर एकदा तुमचे अज्ञातवासी यांच्याशी वाद झाले असतील तर याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या प्रत्येक धाग्यावर तुम्ही थयथयाट करावा. आणी महाश्वेता यांना तुम्ही आत्ता जे उद्देशुन लिहीले आहे ते निश्चीतच अतीशय हीन दर्जाचे आणी खालच्या पातळीवरचे आहे. एक स्त्री असुन दुसर्या स्त्रीला असे तुम्ही लिहु शकता हे आश्चर्यच आहे, नाही का?
बाय द वे, मी पण कुणाची ड्यु आय डी नाही, नाहीतर अज्ञातवासी व महाश्वेता यांची बाजू घेतली म्हणून परत काही तरी लिहाल. आणी जर तसे परत लिहीले तर मग तुम्हाला कुठेही पूर्णपणे इग्नोर केले जाईल.
माझा प्रश्न अजुनही तोच आहे,
माझा प्रश्न अजुनही तोच आहे, मी काय करावे / बोलावे हे मला सांगणारे तुम्ही सगळे कोण????
आणी एका स्त्री विशयी काय भाशा वापराय्ची हे मला सांगायची लायकी एकाची तरी आहे का ईथे बाकीचे जावो अॅडमीनची पण नाही
जर असती ना तर त्या कल्पेश कुमार ऊर्फ अंबज्ञ ऊर्फ वीष्य (मला खात्री आहे की हा तोच आहे) च्या बळी धाग्यावर माझी जी अवहेलना झाली त्यावर कोणी का बोल्ले नाही का अॅडमीनने त्याच्यावर कार्वाई केली नाही
तेव्हा पासुनच मी अशी वागतेय आनी वागत राहीन
पेरावे ते ऊगवते
करा की मला ईग्नोर त्यात काय एवधे
चांगली कविता
चांगली कविता
शेवटचं कडवं ह्रदय चोरून गेलं.
शेवटचं कडवं ह्रदय चोरून गेलं....
भन्नाट एकदम.... अज्ञातवासी.....
पु.ले.शु.