थोडया दिवसांपूर्वी एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक पाहिलं. नाटकाचं कथानक थोडक्यात पुढील प्रमाणे सांगते.
तर मन्या(प्रशांत दामले ) आणि मनी (कविता मेढेकर )ह्यांच्या लग्नाला जवळपास वीस वर्ष होत आलेली आहेत. नव्याची नवलाई संपुन आणि नात्यामध्ये तोच तोच पणा जाणवू लागला आहे . छोट्या छोट्या कारणाने दोघांमध्ये वाद होतं असतात. अशातच त्या दोघांच्या अफेअर ची एनिवर्सरी असते आणि त्याचं दिवशी त्या दोघांचं काही कारणांनी भांडण होतं. ह्या सतत होणाऱ्या भांडणावर "उपाय "म्हणून मन्या त्याचा ऑफिस मधला सहकारी पुरु (अतुल तोडणकर )ह्याच्या सांगण्यावरून त्याच्याच ऑफिसमधल्या एका मुलीशी(ऍक्टरेस चं नाव विसरले. पात्राचा नाव कश्मिरा आहे. ) "अफेअर " करतो. आणि त्यात मनी ची बहीण(मृणालिनी चेंबूरकर ) हि तिला सतत घटस्फोट घेण्यासाठी मागे लागलेली असते.
मन्या चे अफैर मनी ला कळते का? त्यामुळे त्या दोघांचा घटस्फोट होतो का? मनीच्या बहिणीची इच्छा पूर्ण होते का ? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरें मिळवायची असतील तर तुम्हांला हे नाटक पाहावं लागेल.
प्रशांत दामलें बद्दल काय बोलणार..? तो अभिनय तर छान करतोच पण गातो हि छान आणि नाचतोही खूप सहज . सुरवातीला चिडचिडा आणि नंतर भावूक झालेला मन्या खूप छान उभा केलाय. काही ठिकाणी अभिनयामध्ये तोच तोच पणा जाणवतो पण चलता हैं.
कविता मेढेकर हि ह्या नाटकाची सूत्रधार आहे. नाटकाची सुरुवातचं तिच्या एन्ट्री नि होते आणि तीही थेट प्रेक्षकांतून. तिचा अभिनय, स्टेज वरचा वावर सगळंच अगदी सहज आहे. ती दिसते हि खूप सुंदर खास करून लाल रंगाच्या ड्रेस मध्ये तर ती अप्रतिम दिसलीय. मन्या वर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्या चिडचिडेपणामुळे हर्ट झालेली मनी खूप छान साकारलीय. मन्या आणि मनीची केमिस्ट्री हि खूप उत्तम जमून आलीय. आणि आता अतुल तोडणकर ह्याच्याकडे. पुरु च्या पात्रात ह्या कलाकाराने अगदी धमाल आणलीय. तो आधी फू बाई फू मध्ये होता. इकडेहि त्याने खूप मस्त काम केलंय. त्याच अधिकाधिक काम बघायला मिळो. त्याला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
इतर सहकलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. फक्त कश्मिरा झालेल्या मुलीनी आणखी मेहनत घेण्याची गरज आहे.
नाटकामध्ये "मला सांगा " आणि "ती परी "ह्या दोन गाण्यांशिवाय तिसरं गाणंही ऍड केलंय. "तू हि असावा मी ही असावी "असे काहीतरी बोल आहेत त्या गाण्याचे. आधीची दोन्ही गाणी आवडतंच होती तिसरं गाणंही छान आहे.
जाणवलेल्या काही गोष्टींमध्ये एक गोष्टी अशी की मन्या आणि मनीच सगळं काही सुरळीत सुरु असताना नक्की भांडणं का होत असतात हे प्रेक्षकांना नीटस कळत नाही.
बाकीही काही गोष्टी आहेत पण त्या सांगायला गेले तर संपूर्ण नाटकाची स्टोरी सांगितली जाईल.
तर अशी हि खळखळून हसवणारी आणि हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सगळ्यांनी एकदा बघायला हरकत नाही.
लेखक, दिग्दर्शक -अद्वैत दादरकर
संगीत -अशोक पत्की
कलाकार -प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणालिनी चेंबूरकर आणि इतर
टीप :मी नाट्य समीक्षक नाही तसेच माझा लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे सर्व सूचनांच स्वागत आहे.
प्रशांत दामलेच्या अभिनयामुळे
प्रशांत दामलेच्या अभिनयामुळे वा नावामुळे जी हलकी फुलकी, कुटुंबवत्सल, सोज्वळ नाटके चालतात त्यातले हे एक नाटक आहे. ठीकठाक आहे.
प्रशांत दामले आणि कविता लाड
प्रशांत दामले आणि कविता लाड यांची जोडी असली की टेंशन खल्लास होते आपोआप.
'अफैर' असं का लिहिलंय..? अफेअर लिहायचं ना..
मन्या आणि मनीची गोष्ट!!!!
मन्या आणि मनीची गोष्ट!!!!
मस्त लिहिलंय, आवडलं.
सात वर्षांच्या खाजेला वीस
सात वर्षांच्या खाजेला वीस वर्षांवर नेलं का मराठी माणसाने?
२००२ की ०३ साली एका लग्नाची गोष्ट पाहिलं होतं. दामलेची भलीमोठी ढेरी याखेरीज काही आठवत नाही. असला 'हिरो' असतो का कधी! त्यानंतर 'आपल्याला नाटकं आवडत नाहीत, यापुढे एकही नाटक बघायचे नाही' असे ठरवले. (त्याखेरीज एकच नाटक बघितले होते ते महाभारतवर काहीतरी विनोदी करायचा प्रयत्न केलेला होता ते).
प्रशांत दामले नवीन होता तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेची नक्कल करायचा.
अफैर' असं का लिहिलंय..? अफेअर
अफैर' असं का लिहिलंय..? अफेअर लिहायचं ना.>>बदल केला आहे.
नाटक अजिबात आवडले नाही.स्टोरी
नाटक अजिबात आवडले नाही.स्टोरी, अभिनय काहीच नाही. प्र.दा.ची acting व dialogues मोनोटोनस झालीये.तो पुढचा dialogue आता काय मारणार,हातवारे काय,कसे करणार हे आधीच लक्षात येतं.
spoiler alert
बायकोनेच सेक्रेटरीला आपल्या नवर्या बरोबर अफेअर (चं नाटक) करायला सांगणं अजब वाटलं..
प्र.दाच्या मित्रानेही त्याला अफेअर करायला सांगणं लग्नानंतरच्या बोअरिंग आयुष््यात मजा आणण्यासाठी (!) ह्यावरुन अमोल पालेकर, फारुक शेख, दिप्ती नवल, देवेन वर्माचा एक सिनेमा आठवला.नाव गुगलून सांगते.यात दे.वरमा अमोल पालेकरला असाच सल्ला देतो व ते करत असताना अ.पा. ला बायकोची किम्मत कळते.
रंगबिरंगी
रंगबिरंगी
<<< दामलेची भलीमोठी ढेरी
<<< दामलेची भलीमोठी ढेरी याखेरीज काही आठवत नाही. असला 'हिरो' असतो का कधी! >>>
वा, काय पण क्रायटेरिया आहे 'हिरो' कसा असावा/नसावा याचा?
नाटक फार तर एकदा(च) बघायला हरकत नाही.
एका लग्नाची गोष्ट य
एका लग्नाची गोष्ट य वर्षांपूर्वी पाहिलं होतं. तेव्हाच बोअर झालं होतं. त्यामुळे इथे हे एलपुगो येऊनही बघायला जाण्याची इच्छा मुळीच नव्हती. प्रशांत दामलेही अजिबात आवडत नाही.
शी - फक्त ढेरीच बघत बसला होता
शी - फक्त ढेरीच बघत बसला होता का? सर्वसामान्य माणसाची कथा आहे, दामले सर्वसामान्य माणूस वाटतो की। तुम्हांला काय सिक्स पॅक असणे अपेक्षित होते का दामले चे?
ट्रोलिंग करावे पण काय लिमिट आहे की नाही।
> वा, काय पण क्रायटेरिया आहे
> वा, काय पण क्रायटेरिया आहे 'हिरो' कसा असावा/नसावा याचा? > तुमची आवडती 'हिरोईन' टुनटुन आहे वाटतं??
बादवे मला मेलिसा मकार्थीचा Spy हा सिनेमा आवडलेला.
एस... करेक्ट..'रंगबिरंगी'.
एस... करेक्ट..'रंगबिरंगी'.
कुणी सुमित राघवनच हॅम्लेट
कुणी सुमित राघवनच हॅम्लेट बघितलं असेल, तर त्याचा रिव्ह्यू लिहावा!!!
प्र.दा.ची acting व dialogues
प्र.दा.ची acting व dialogues मोनोटोनस झालीये.तो पुढचा dialogue आता काय मारणार,हातवारे काय,कसे करणार हे आधीच लक्षात येतं.>>>
हे खरं आहे. साखर खाल्लेला माणूसमधेही ते जाणवलं होतं. खरं तर त्या नाटकाची सुरवात चांगली केली होती पण मग मधेच मुलीचा boyfriend, pregnancy चं नाटक इत्यादी अनावश्यक फाटे फोडत नाटकाची वाट लावली होती. एका लग्नाची पुढची गोष्ट तर प्रचंड कंटाळवाणं होतं. कविता लाड अतिशय नाटकी बोलते हे वैयक्तिक मत. त्यातल्या त्यात त्या दुसर्या actor च्या comic timing मुळे थोडेतरी सह्य झालं.
नाटक बघितले नाही तरी काहीही मिस केलेले नाही. प्रशांत दामलेने थोडं चाकोरीतून बाहेर पडून एखादी हटके भूमिका करावी अशी अपेक्षा आहे.
DJ, अज्ञातवासी प्रतिसादासाठी
DJ, अज्ञातवासी प्रतिसादासाठी खूप आभार.
अशातच त्या दोघांच्या अफेअर ची
अशातच त्या दोघांच्या अफेअर ची एनिवर्सरी असते
>>> लग्न झालेले असते का लिविंग मध्ये असतात? अफेयर कसले?
चीकु.. साखर...बद्दल +१.
चीकु.. साखर...बद्दल +१. वडिलांचा आजार कळल्यावर त्यांनी औषधं घ्यावीत,व्यायाम करावा,बरं व्हावं म्हणुन मुलीचं लग्नाआधी प्रेग्नंसीचं नाटक..! हे ऐकुन वडिल बरे होतील की ढगात जातील धक्का बसुन..!? काहीच्या काही कनेक्शन.
तेच 'कार्टी..' बाबत..प्र.दा.ची सेम एक्टिंग व संवाद.व तेजश्री प्रधान घर सोडून गेलेल्या वडिलांना भेटायला गेल्यावर असं गावठी बोलताना का दाखवलीये.
व शेवटी प्रमाण मराठीत बोलायला लागते अचानक व ती ऊच्चशिक्षित आहे हे ही कळतं.
सुरुवातीपासुन व्यवस्थित मराठी बोलताना दाखवली असती तर वडिल घरी आले नसते का परत?
अरे माफ करा प्र दा ला, कशाला
अरे माफ करा प्र दा ला, कशाला त्याच्या ढेरी वाल्या पोटावर पाय आणताय !
प्रशांत दामलें बद्दल काय
प्रशांत दामलें बद्दल काय बोलणार..? तो अभिनय तर छान करतोच पण गातो हि छान आणि नाचतोही खूप सहज . सुरवातीला चिडचिडा आणि नंतर भावूक झालेला मन्या खूप छान उभा केलाय. काही ठिकाणी अभिनयामध्ये तोच तोच पणा जाणवतो पण चलता हैं.>>> +१
ठीकठाक वाटलं नाटक..
लग्न झालेले असते का लिविंग
लग्न झालेले असते का लिविंग मध्ये असतात? अफेयर कसले?
नवीन Submitted by च्रप्स >>अफेर म्हणजे त्या दिवशी ते दोघे भेटलेले असतात तो दिवस ती सेलेब्रेट करत असते. खरंतर अफेर पेक्षा पहिल्या भेटीची एनिवर्सरी असं म्हणायला हवं होतं. पण नाटकात अफेर ची एनिवर्सरी असंच म्हणत असते ती. लग्न झालेलं असतं दोघांचं.
हे नाटक बघितलं. बिलकुल आवडलं
हे नाटक बघितलं. बिलकुल आवडलं नाही.
सकाळ महोत्सवात तीन नाटकं पाहिली.
नियम व अटी लागू, तूतू मीमी, आणि हे. त्यातले नियम व अटी लागू हे एकच नाटक बरे होते. इतर दोन्ही नाटके भयानक होती.