मायबोली आयडीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत

Submitted by रिव्हर्स स्वीप on 27 May, 2019 - 15:50

मला मायबोली.कॉम वरील एका सदस्यावर कायदेशीर कारवाई - बदनामीचा खटला - करायची आहे. त्या संदर्भात मायबोलीवरील कायदेतज्ञांकडून माहिती हवी आहे.

१. मायबोली वरील एखाद्या आयडीवर कायदेशीर कारवाई करायची असल्यास काय प्रोसिजर आहे ?

२. अशा कायदेशीर तक्रारीत तो आयडी आणि मायबोली प्रशासन यांना प्रतिवादी करता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक सदस्याची पोस्ट हे वैयक्तीक मत असले तरी साईटवर आलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी अंतिमत: प्रशासनाची असते.

३. ही तक्रार सायबर सेलकडे करावी लागेल का रीतसर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवावा लागेल?

ही माहिती लवकरात लवकर मिळाल्यास बरे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली ही अमेरीकन कंपनी आहे म्हणून भारतीय कायद्याच्यापासून आपण मुक्त आहोत आणि कोणी काहिही लिहीले तरी आमचे काही बिघडू शकत नाही हा दर्प या उत्तरातून स्पष्टपणे जाणवतो आहे. >>> रिव्हर्स स्वीप, थोडी overreaction वाटत आहे. अशा वेळेस पहिल्यांदा लीगल दृष्टीने काय लागू आहे त्याची माहिती देणे आवश्यक असते ती वेमांनी दिली आहे. ती अचूक आणि आवश्यक तेवढीच असणे गरजेचे असते.

मायबोलीचे प्रशासन एका विशिष्ट राजकीय विचारप्रणालीकडे झुकलेले आहे हे यापूर्वीही जाणवलेले आहे. >>> याच्याशी सहमत नाही. गेल्या १०-१५ वर्षांत असे अनेक आरोप अनेक बाजूंनी झाले आहेत. मायबोली हे "ब्राह्मणी" संस्थळ आहे असे आरोप वाचलेत (आजही एका बाफ वर आला आहे), हे ब्राह्मणविरोधी आहे असेही वाचलेत. हिंदुत्त्ववाद्यांच्या विरोधातले धागे जितक्या चटकन उडतात तितके हिंदुत्त्ववाद्यांचे उडत नाहीत असेही आरोप वाचलेत, तर तुमच्या वाक्यातील ध्वनित आरोप त्याच्या बरोब्बर उलटा आहे.

इथून भाजपवाले,काँग्रेसी, सनातनी, ब्रिगेडी, खरे पुरोगामी/स्वघोषित पुरोगामी सगळ्या प्रकारचे आयडी उडालेत. त्यातले बहुतांश भाषेमुळेच उडालेत. केवळ मतांमुळे कोणाचा आयडी उडाल्याचे उदाहरण मला तरी माहीत नाही.

ट्रॅफिक पोलिसासारखे समजा हे. नियम मोडणारे सगळे पकडले जातीलच असे नाही. अशा कोणाला पकडण्यात आणि न पकडण्यात तुम्हाला एका बाजूने पक्षपात दिसत असेल, तसा इतरांनाही दुसर्‍या बाजूने दिसतो.

<<मूळ मायबोलीचा काव्यशास्त्र विनोद हा ढांचा >>

बाबा कामदेव, अहो मायबोली जेंव्हा सुरु झाली तेंव्हा जगभरात पसरलेल्या मराठी भाषिकांनी एकत्र येऊन संपर्क साधावा, ओळख करून घ्यावी असा उद्देश होता. तेंव्हाचे आपल्यासारखे मराठी भाषिक काव्यशास्त्र विनोद यांचे चहाते होते. आता चे मराठी भाषिक (म्हणजे जे स्वतःला मराठी समजतात, पण दोन वाक्ये धड मराठीत बोलता येत नाहीत) काय डोंबल मराठी काव्य शास्त्र विनोद समजणार?
आता मराठी भाषिक, काव्य शास्त्र विनोद या ऐवजी फक्त पैसा, सत्ता यांच्यामागे आहे. त्यांची अक्कल फक्त वादावादी, फूट पाडणे, शिव्या देणे, कुणाचा ना कुणाचा तरी द्वेष करणे यातच.
माफक प्रमाणात आजहि काव्य शास्त्र आढळते मायबोलीवर, पण जास्त करून मायबोली एकमेकांना शिव्या देणे यासाठीच. व्यावसायिक असो किंवा नसो - मराठी लोक असेच करणार!
आपण आपले जुन्या प्रेमाखातर इथे येतो. बाकी काही नाही.

> मायबोली हे "ब्राह्मणी" संस्थळ आहे असे आरोप वाचलेत (आजही एका बाफ वर आला आहे) > ब्राह्मणी म्हणजे प्रोब्राह्मण (हे खरे नाही) की चेहरामोहरा ब्राह्मणी (हे खरे आहे. फक्त माबोच नाही इतर मराठी संस्थळ मिपा, ऐसीदेखील ब्राह्मण बहुसंख्य आहेत. त्यामुळे 'हे सगळे एकाच जातीचे लोक इतक्या संख्येने एकत्र कसे आले?' असे इतरांना वाटू शकते)

नंद्या१४३, मायबोली सुमारे १५ वर्षांपूर्वी स्थापन झाली. तेव्हाचा वाचकवर्ग आज नाही. आणि माध्यमक्रांतीची तेव्हा नुकती सुरुवात होती. थोडेफार वाचन असलेले, अभिरुची असलेले लोकच लिहीत असत. आज जालावर लिहिणे फारच सोपे आहे. वयाची, माहितीची, भाषेची कोणतीही अट नाही. नेट सार्वत्रिक आहे. कोणीही कसाही व्यक्त होऊ शकतो. जालावर शिव्यांचा आणि फुल्याफुल्यांचा सुळसुळाट असतो. मायबोलीच्या पोहोऱ्यात त्याच आडाचे पाणी येते. आणि हे सार्वत्रिक आहे. जपान आणि कदाचित चीन सोडून.
बदल अटळ आहेत.
भारताच्या संदर्भात सार्वजनिक किंवा राष्ट्राच्या चारित्र्यघडणीसंबंधी एकदा लिहायचे आहे. विषयांतर होईल म्हणून इथे नको. संघटन खूप झाले पण घटन किंवा घडणूक झाली का हा मुद्दा आहे.

(हे खरे आहे. फक्त माबोच नाही इतर मराठी संस्थळ मिपा, ऐसीदेखील ब्राह्मण बहुसंख्य आहेत. त्यामुळे 'हे सगळे एकाच जातीचे लोक इतक्या संख्येने एकत्र कसे आले?' असे इतरांना वाटू शकते)

ब्राम्हण समाजाचे लोक मायग्रेशन मध्ये आघाडीवर असल्याने आणि राज्यापासून , मूळ गावापासून दूर गेल्यावर त्यांना ऑनलाइन कनेक्ट व्हावं असं वाटलं असावं म्हणून सुरूवातीला जास्त असावेत. मी सध्या अमेरिकन ब्लॅक लोकांचं जे साउथ टू नॉर्थ मायग्रेशन झालं त्याबद्दल पुस्तक वाचत आहे. एकेक जनरेशन उठून चालू पडली. तसाच प्रकार ब्राम्हण समाजाचा झाला. आधी गांधी हत्या दंगल, कूल कायद्यानंतर गाव ते शहर व अनेक कारणांनी शहरातून परदेश .
पण हे साईटवरील ब्राम्हण जास्त संख्येने असणं एकाच पिढीपुरतं असावं. नवीन पिढीत ब्राम्हणी चेहरामोहरा कमी आहे कारण स्थलांतरित ब्राम्हणांची पोरं मराठी शाळेत शिकलेली नाहीत किंवा त्यांना मराठी अक्षरओळख नाही.

मायबोली वाटते त्यापेक्षा दूरवर पसरलेली आहे. मायबोलीवरचे लेख ढापले जातात आणि नाव बदलून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून पसरले जातात. इथे मूकवाचकांची संख्या मोठी आहे असे वाटते. जे सक्रीय आहेत ते मूठभर आहेत. मूकवाचकांपैकी काहींना मत मांडणे जमत नसावे, शाय असावेत किंवा अन्य काही कारणे असावीत.

मात्र जे सक्रीय आहेत त्यांच्या मतांचा प्रभाव जाणवत असल्याने असेल कदाचित कुणा कुणाला अमूक एका गटाचा प्रभाव आहे किंवा मेजॉरिटी आहे असे वाटत असेल.

मूकवाचकांपैकी ड्युआयडी किती हे सांगता येत नाही.

Amy चा अल्गोरिदम शिकला पाहिजे किंवा डेटाबेस चोराला पाहिजे. त्यांना सगळ्यांची जातीनिहाय ओळख बरोब्बर माहीत असते कायम.

ब्राह्मणांच्या स्थलांतरासाठी गांधीहत्या आणि कूळ कायदा हाच रेफेरन्स पॉइंट नेहमी का घेतला जावा? कोंकणस्थांच्या मोठ्या स्थलांतराची सुरुवात पेशव्यांपर्यंत म्हणजे तीनशेसाडेतीनशे वर्षे मागे जाते. देशस्थ हे बिंब राजाबरोबर किंवा त्याआधीही घाट ओलांडून आले. तसेही देशस्थ हे दक्खनच्या मोठ्या भूभागात पुरातन काळापासून पसरले होते.
ब्राह्मण हे मीडियात सक्रिय असण्यामागे त्यांच्या पिढ्यानुपिढ्या प्रमाणभाषेशी परिचित असण्याचे आणि एकंदरीतच सुशिक्षितपणाचे कारण आहे. जर त्रैवर्णिकांचा मीडियामधला प्रेझेन्स वाढवायचा असेल तर सध्या मीडियात लोकप्रिय असणारी भाषेची धाटणी आत्मसात करावी. आपले विचार थोडक्यात पण स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत. वाक्यपूरके उदा. या ठिकाणी, जे आहे ते, वगैरे टाळली जावी. मी एका ठिकाणी सुचवले होते की बातमीदारीमध्ये बातमी व्यवस्थितरीत्या लिहून सादर करण्याचे प्रशिक्षण होतकरू इच्छुकांना दिले जावे. बहुजनहितैषी समाजसेवी संस्थांनी असे प्रशिक्षणवर्ग चालवावे. ब्राह्मणांचे सहकार्य घ्यावेच घ्यावे. एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मग मीडियाच्या भाषेला आपले वळण लावता येईल. तसेही, बदल हा थोडे द्यावे थोडे घ्यावे अशा फ्रेंड्ली मर्जर किंवा टेक ओवरमधूनच घडत असतो.

>>> २. रिपोर्ट करणे (आयडी, धागा, प्रतिसाद, विपु, प्रोफाईल):............. ही सुविधा एकूणेक आयडीला दिली तर माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल.

असे नाही होणार. फेसबुकचे अब्जावधी युजर्स आहेत. कोणतीही पोस्ट/प्रोफाईल आक्षेपार्ह वाटल्यास कोणीही युजर फेसबुक व्यवस्थापनाला ती रिपोर्ट करू शकतो/शकते.

>> १. ब्लॉक करणे (आयडी, धागा): ............ ही सुविधा संकेतस्थळावर राबवणे तितके सोपे नाही असे वाटते. कारण प्रत्येक आयडी साठी तसे टॅग्स मेंटेन करून प्रत्येक पेज मध्ये ते टॅग्स वापरून फिल्टरींग करावे लागेल.

नाही. टेक्निकली इतके अवघड नाही. पोस्ट्स असो वा प्रतिसाद. ब्लॉक करणाऱ्या व केलेल्या एकमेकाला त्यांचे कोणतेही कन्टेन्ट (प्रतिसाद, धागा, प्रोफाईल, विपू इत्यादी) दिसू नयेत म्हणून काही डेटाबेस क्वेरीज मध्ये फक्त बदल करावे लागतात (जाहिरात करण्याचा हेतू नाही पण माझ्या मेसेंजर मध्ये मी हे केलेले आहे).

एनीवेज, प्रोजेक्टमध्ये तांत्रिकदृष्ट्या आजकाल या गोष्टी फार आव्हानात्मक राहिलेल्या नाहीत. पण मायबोलीबाबत (स्पेसिफिक) इतर आव्हाने असतील तर माहित नाही.

>> मायबोली सुमारे १५ वर्षांपूर्वी स्थापन झाली.

छोटीशी दुरुस्ती. बावीस वर्षांपूर्वी. या पानावर खालीच आहे पहा. स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६

होयं . आधी मी वीस बावीस वर्षे असेच लिहिले होते. पण साधारणत: २००५ पासून मायबोलीचे रुपडे बदलल्यावर सभासद आणि वाचक संख्या वाढली असावी असा अंदाज. सुरुवात झाल्याचे वर्ष शोधणे अवघड नव्हते, पण आळस केला.

>> पण साधारणत: २००५ पासून मायबोलीचे रुपडे बदलल्यावर सभासद आणि वाचक संख्या वाढली असावी असा अंदाज.

ओह ओके

मायबोलीचे पूर्वी नाव हितगुज होते. त्या काळी आयडी इंग्रजीच असायचे , टायपिंगला दोन विंडो दिसायच्या , एकात इंगजी टाईप केले की दुसर्यात मराठी दिसायचे,

मग हे आताचे रूप आले ,

> ब्राह्मणांच्या स्थलांतरासाठी गांधीहत्या आणि कूळ कायदा हाच रेफेरन्स पॉइंट नेहमी का घेतला जावा? > +१.
रेफरन्स पॉईंट तुम्ही म्हणतात तसा ३५० वर्ष मागे नेता येतो किंवा ४८-६०च्या अलिकडेदेखील आणता येतो.

१९८३ ला खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजना मान्यता मिळाली. या नवीन कॉलेजची संख्या पुण्यामुंबईत जास्त होती. शेती हा तेव्हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला नव्हता + मंडल आयोग नव्हता <- त्यामुळे ब्राह्मणेतर समाजात शिक्षणचे महत्व, अवश्यकता रुजली नव्हती. ९१ ला जेव्हा खाऊजा झाले, त्यानंतर आयटीक्रांती झाली त्याचा भरघोस फायदा मराठी ब्राह्मणना झाला. Early bird gets and keeps the worm प्रकार. ९१ ते २००० दरम्यान परदेशात गेलेले हेच लोक आहेत.
===

> Amy चा अल्गोरिदम शिकला पाहिजे किंवा डेटाबेस चोराला पाहिजे. त्यांना सगळ्यांची जातीनिहाय ओळख बरोब्बर माहीत असते कायम. > हा हा एवढीच उत्सुकता असेल तर पुढच्या वेळी गटगला गेलात की 'ब्राह्मणेतर कोणकोण आहेत हात वर करा' म्हणा. माझ्या अनुभवानुसार ५-१०% असतात.
किंवा माबो पॉलिसीत बसत असेल तर एक सर्व्हे काढा:
१ जानेवारी २०१९ नंतर तुम्ही माबोवर किमान एक प्रतिसाद दिलाय &&
तुम्ही ब्राह्मणेतर आहात तर खाली +१ बटनवर क्लिक करा.
===

> असे नाही होणार. फेसबुकचे अब्जावधी युजर्स आहेत. कोणतीही पोस्ट/प्रोफाईल आक्षेपार्ह वाटल्यास कोणीही युजर फेसबुक व्यवस्थापनाला ती रिपोर्ट करू शकतो/शकते. > फेसबुक व्यवसायीक साईट आहे, भरपूर जाहिराती, डाटाबेस विकणे वगैरे करतात. त्यांनी पगारी ऍडमीन ठेवले आहेत. माबो हौशी && खाजगी साईट आहे.

जातीयवादात शिरायचे नाही. पण मुंबईत शास्त्री हॉल, हिंदू कॉलनी, पेंडसेवाडी, भटवाडी या वसाहती स्वातंत्र्यापूर्वीच्या आहेत. जर सारस्वतांना ब्राह्मण समजले तर तालमकीवाडी ही आशियातली सर्वात पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था १९१६ साली स्थापन झाली होती.तसेच प्रार्थनासमाजाची चळवळ चालवणारे चंदावरकर, वागळे, भांडारकर, पंडित, तेलंग, भाउ दाजी लाड हे लोक एकोणिसाव्या शतकात मुंबईत अग्रेसर दिसतात. उत्तर कोंकणचा प्राचीन इतिहास हे श्री पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी यांचे, तसेच उत्तर कोंकणातील प्राचीन गंगातीरस्थ शुक्लयजुर्वेदीय ब्राह्मण हे नारायण विट्ठल वैद्य पुरंदरे पुणतांबेकर यांचे पुस्तक ही दोन्ही अति दुर्मीळ पुस्तके वाचनीय आहेत. मुंबई बेटे, साष्टी, ठाणे जिल्हा, कुलाबा जिल्हा इथे ब्राह्मणांची वसती पूर्वापार होती. मुंबईत सुरतेच्या लुटीनंतर इंग्रजांचे लक्ष्य सुरक्षित अशा मुंबईच्या सात बेटांकडे गेले आणि सुरतेचे महत्त्व मुंबईला मिळून इथे वखारी आणि उद्योगधंदे सुरू झाले आणि लोकांचा ओघ मुंबईकडे वाढला. कोंकणातले चाकरमाने गिरण्यांमधून तर देशावरचे माथाडी बंदरपरिसरात दिसू लागले. आधीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे नवीन शिक्षण आणि इंग्रजी भाषा शिकणे ब्राह्मणांना सोपे गेले आणि ते कारकुनीत शिरले. त्यांनी पदोन्नती घेतल्या, शिक्षणसंस्था काढल्या, उच्च शिक्षणे घेतली, डॉक्टर, वकील झाले. बहुजनांमध्ये आधुनिक शिक्षणाची परंपरा थोडी उशीरा छ शाहू महाराज, वि रा शिंदे, रयत शिक्षण संस्था आणि ज्योतिबा फुले वगैरेमुळे सुरू झाली. भारतीय द्वीपखंडाच्या इतिहासातले तिसरे नागरीकरण वसाहतींच्या काळात सुरू झाले आणि हा शहरीकरणाचा रेटा पुढे विसाव्या शतकातही वाढतच गेला. असो. ग्रामीण व्यवस्था का मोडकळीस आली आणि लोकांना शहराकडे का धावावेसे वाटले हा वेगळा आणि अतिविस्तृत भाष्याचा विषय आहे.

<<< ९१ ते २००० दरम्यान परदेशात गेलेले हेच लोक आहेत.>>>
The ant and the grasshopper

Submitted by उपाशी बोका on 30 May, 2019 - 12:. >>>>>. अति वास्तवदर्शी कथा आहे. आधी फिसकन हसू आलं होतं, पण मग खरंच विचारात पाडणारं आणि त्यातल्या वास्तवाने उदास करणारं (इंडियन) व्हर्जन आहे.

हा हा Lol Lol
स्टँडर्ड प्रोसिजर:
आधी गांधीहत्या, कुळकायदा वगैरे करत व्हिक्टिम कार्ड खेळायचं
मग आम्ही कित्तीकित्ती कष्ट घेतले आणि त्याची फळं चाखतोय वगैरे फ्लॉंटिंग करायचं
आणि मग NDTV, अरुंधती रॉय, मेघा पाटकर वगैरे डाव्यांना शिव्या घालायच्या...
कंटाळा येत नाही का तेचते करून?
नो डाऊट बाकीचे इथे येत, मिसळत नाहीत!!

हीरा छान लिहीलय. कुठलाही विषय असो, तुम्ही सर्वांगीण विचार करुन लिहीता. आणी विशेष म्हणजे तुमचे लिखाण बायस कधीच नसते. Happy

सर्वात जास्त नुकसान हिंदू धर्माचे जाती व्यवस्थेने केले आणि दुसरे हिंदूची मातृभाषा समान नसल्यामुळे झाले .
ह्या दोन्ही गोष्टींचा इतिहास कोणाला माहीत असेल तर pls share kara

महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेल्या 'ब्राम्हणाचे कसब' ची आठवण झाली.
स्वजातीचे आयडी शाबुत ठेऊन इतरांचे आयडी उडवण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे..!

महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेल्या 'ब्राम्हणाचे कसब' ची आठवण झाली.
स्वजातीचे आयडी शाबुत ठेऊन इतरांचे आयडी उडवण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे..!

Submitted by DJ.. on 30 May, 2019 - 16:11 >>

हे वर बघा उदाहरण. यान्ना आयडी पाहुन लोकान्ची जात समजते आणि दुसर्याना सनातनी म्हणतात !

हे वर बघा उदाहरण. यान्ना आयडी पाहुन लोकान्ची जात समजते आणि दुसर्याना सनातनी म्हणतात !
<<

बिग्रेड लोकांना ही दिव्यदृष्टी उपजत मिळते, असे ऐकून आहे.

वाक्यपूरके उदा. या ठिकाणी, जे आहे ते, वगैरे टाळली जावी. मी एका ठिकाणी सुचवले होते की बातमीदारीमध्ये बातमी व्यवस्थितरीत्या लिहून सादर करण्याचे प्रशिक्षण होतकरू इच्छुकांना दिले जावे. >> अवांतर आहे या धाग्यावर पण अलिकडेच लोकमत , लोकसत्ता, इसकाळ वगैरे जास्त वाचले आहे त्यामुळे. असे काही करायची गरज दिसत नाही . निदान या तीन वर्तमानपत्रांच्या ऑनलाइन आवृत्तीसाठी काही मजकूर लिहायला किमान पात्रता, संपादन, मुद्रितशोधन याची आवश्यकता दिसत नाही. डार्क ह्युमरचे गडद विनोद असे भाषांतर चालते.
मायबोलीवर किंव्हा इतरत्र प्रमान बाशेत लिव्हणार्‍यांनाचा द्यावे प्रचलित बाशेचं प्रशिक्शण Happy

Pages