मायबोली आयडीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत

Submitted by रिव्हर्स स्वीप on 27 May, 2019 - 15:50

मला मायबोली.कॉम वरील एका सदस्यावर कायदेशीर कारवाई - बदनामीचा खटला - करायची आहे. त्या संदर्भात मायबोलीवरील कायदेतज्ञांकडून माहिती हवी आहे.

१. मायबोली वरील एखाद्या आयडीवर कायदेशीर कारवाई करायची असल्यास काय प्रोसिजर आहे ?

२. अशा कायदेशीर तक्रारीत तो आयडी आणि मायबोली प्रशासन यांना प्रतिवादी करता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक सदस्याची पोस्ट हे वैयक्तीक मत असले तरी साईटवर आलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी अंतिमत: प्रशासनाची असते.

३. ही तक्रार सायबर सेलकडे करावी लागेल का रीतसर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवावा लागेल?

ही माहिती लवकरात लवकर मिळाल्यास बरे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मायबोली नामक साइटची लक्षणे तरी कुठे सोज्वळ आहेत ... इकडे दोघात भांडण लावून अमेरिकेत बसून मजा बघाणारा वर्ग असेल तर त्याला भारतीय नियमांच्या कक्षेत आणून प्रक्षोभक वातारण निर्मिती रोखण्याची तरतूद ही हवीच ! त्यामुळे उगीच मंजो नामक बागुलबुवा उभा करण्याचे ढोंग नेहमी यशस्वी ठरणार नाही. प्रशासन अनेकदा बायस्ड वागले / वागते हे सर्वाना दिसतेच आहे.

न्यूज चॅनेल ,न्यूज पेपर,आणि बाकी प्रसार माध्यम भारतीय कायद्यअंतर्गत च आहेत .
सर्रास खोट्या बातम्या देणे ,काही पुरावे नसताना कोणाचेही चारित्रहणान करणे असले उद्योग बिंदास्त करतात त्यांच्या वर कधी कारवाई झालेली एकिवात नाही .
फक्त आर्थिक,आणि राजकीय कमजोर असलेल्या सामान्य व्यक्ती वरच भारतीय कायद्याचा वचक चालतो.
Facebook,किंवा myboli अमेरिकन कायद्या अंतर्गत आहे म्हणूनच उत्तम पने काम करत आहे

जगाला दाखवायला हे भले लिबरल, समाजवादाची घोंगडी पांघरतात पण प्रत्यक्षात दंडवते, पै, गोरे, जोशी यांच्या सारख्यांच्या चपलेशेजारी उभं रहाण्याची देखील यांची लायकि नाहि. तर ते असो...

हा वरील मजकूर लिहिणाऱ्या हीन व्यक्तीबद्दल काय मत आहार तुम्हा लोकांचे? की फक्त ब्राह्मण समाजालाच तेवढी इज्जत असते?

>>चला, या धाग्यामुळे काही महान आय डिंचे ड्यु आय डी कळू लागले आहेत<<

मला देखील आत्ता नुकताच त्याचा प्रत्यय आला... Lol

विविध प्रसंगी विविध विषयावरील विविध धाग्यावरती आपले विचार प्रगट करताना त्या त्या प्रतिसादात मनातील दुःख व्यक्त न करु शकल्याने डुख धरून राहिलेले अभागी जीव डुप्लीकेट आयडी काढून आपले दुटप्पी जीवन जगण्याचा ह्या आभासी जगात प्रयत्न करतात त्यास ड्यू आयडी जाणावा !

@बेफिकीर
<<< मायबोली हा शब्द आणि संकेतस्थळ दोन्ही मराठी आहेत. त्याला अमेरिकन कायदे लागू आहेत. >>>
मायबोली जर १००% अमेरिकन कंपनी असेल तर अमेरिकेचे कायदे लागू होणार. भारतीय कायद्याशी काही देणेघेणे नाही.

<<< प्रशासनासाठी व अमेरिकन मायबोलीकरांसाठी (अनुक्रमे) निव्वळ स्थळ चालू ठेवणारे व मनोरंजनाचे धागे ठरतात का? >>>
मायबोली हे खाजगी संस्थळ आहे. प्रशासनाने कुठला धागा ठेवावा नी कुठला नाही, कुठला आयडी उडवावा आणि कुठला नाही, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. The owner is not answerable to any of its members.

<<< शिवाय, मग परदेशस्थ मायबोलीकरांनी भारतीय घडामोडींवर बोलणेच बंद का करू नये? तसेच, उलटही! >>>
अमेरिकेच्या freedom of speech नुसार कुणीही कुठल्याही विषयावर चर्चा करू शकतो किंवा मत देऊ शकतो. ट्रम्पने भारतीयांना किती H1B व्हिसा द्यावेत याचे सल्ले भारतातले लोक देतात आणि त्याच्यावर चर्चा करतात, तसाच काहीसा प्रकार.

<<< तिकडे बसून इकडच्यांची अक्कल काढणाऱयांना तिकडच्या कायद्यात काही तरतूद आहे का चाप लावण्याची? >>>
माझ्या माहितीत तरी नाही. पण ज्याला कुणाला वाटेल ते तसा प्रयत्न करू शकतात.

<<< परकीय भूमीवरील लोकांनी आपापसात केलेले विखारी ट्रोलिंग हे एखाद्या कक्षेत येते की ते दुर्लक्षणीय ठरते? इथे जातपात, धार्मिक विधानांवरून एखाद्याच्या प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडल्या तर त्याला मायबोलीचे कोणीही जबाबदार नाही असे समजायचे का? >>>
They "may" be responsible (most likely not), but they are definitely not answerable to users of this site. Please go through Terms of use of this site.

ओके उपाशी बोका

धन्यवाद सर्व उत्तरांसाठी

उत्तरे समजली व अर्थातच पटलीही

खालील दोन सुविधा समाज माध्यमांवर असणे गरजेचे असते. फेसबुक व तत्सम बहुतेक प्रख्यात संस्थळांवर त्या आहेत. मायबोलीवर नाहीत.

१. ब्लॉक करणे (आयडी, धागा): आयडी ब्लॉक करणाऱ्या आणि केल्या गेलेल्या दोन्हीही व्यक्तींचे मायबोलीवरील अस्तित्व एकमेकांसाठी कायमचे नजरेआड होईल. त्या दोघानाही एकमेकांचे धागे, प्रतिसाद, प्रोफाईल, विपु काहीकाही दिसणार नाही. धागा ब्लॉक केल्यास ब्लॉक करणाऱ्या व्य्क्तीस धागा आणि त्यावरील प्रतिसाद कायमचे नजरेआड होतील.

आणि

२. रिपोर्ट करणे (आयडी, धागा, प्रतिसाद, विपु, प्रोफाईल): आक्षेपार्ह तसेच मायबोलीच्या धोरणात बसत नाही असा धागा/प्रतिसाद/विपु/प्रोफाईल असेल तर तो रिपोर्ट करता यावा जेणेकरून संस्थळ प्रशासनास त्यावर त्वरित कारवाई करता येते. मायबोलीवर सध्या यासाठी वेमांना विपु करणे किंवा धाग्यावर त्यांचा उल्लेख करून त्यांचे लक्ष वेधून घेणे असे पर्याय अवलंबलेले दिसून येतात. पण हे तितकेसे इफिशियंट नाही.

या दोन सुविधा दिल्यास मायबोलीवरील आयुष्य अधिक सुसह्य होईल व अशा समस्यांचे प्रमाण बरेच कमी होईल असे वाटते.

Public platform आहे सर्वांनी स्वतःच काही नियम पाळायला हवेत .
समोरच्याची मत पटत नसली तरी शिवराल भाषा वापरू नये .कोणावर वैयतिक टीका करणे टाळावे .
देव,धर्म,श्रद्धा ह्या विषयावर चर्चा करताना भाषेवर संयम हवा .
बाकी जे वाटत ते व्यक्त होण्यामुळे समाज मन निरोगी राहत .
तरी सुधा काही आयडी सुधारत नसतील तर समज द्यावी आणि शेवटी बाहेरचा रस्ता दाखवावा

मायबोली ही अमेरिकन कंपनी आहे.
१८-४-२०१९ रोजी , कंपनी ऑफ रजिस्ट्रार, पुणे यांच्या अधिकृत पत्राप्रमाणे , मायबोली (भारत) या कंपनीचे बंद करण्याबद्द्लचे सर्व कायदेशीर टप्पे पूर्ण झाले असून ती आता अस्तित्वात नाही.
अमेरिकन सरकारच्या ज्युरिडिक्शन मधे येणारे सर्व कायदे पाळणे मायबोलीला बंधनकारक आहे आणि मायबोली नेहमीच ते पाळत आली आहे.

Submitted by webmaster on 28 May, 2019 - 07:03
>>>>>>>>

वेबमास्टर यांच्या या प्रतिसादामुळे सखेद आश्चर्य वाटले.

मायबोली ही अमेरीकन कंपनी आहे म्हणून भारतीय कायद्याच्यापासून आपण मुक्त आहोत आणि कोणी काहिही लिहीले तरी आमचे काही बिघडू शकत नाही हा दर्प या उत्तरातून स्पष्टपणे जाणवतो आहे. वेबमास्टर आणि अ‍ॅडमिन यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीच, उलट या उत्तरातून आमच्या मर्जीप्रमाणेच आम्हाला पाहिजे त्याच आयडींवर कारवाई करण्यात येईल, इतरांनी इथे कितीही गोंधळ घातला, कितीही अश्लाघ्य आणि निरर्गल आरोप केले तरी आमचे त्यांना पूर्णपणे अभय राहिल असे प्रशासनाचे धोरण आहे असे स्पष्ट दिसून येते.

मायबोलीचे प्रशासन एका विशिष्ट राजकीय विचारप्रणालीकडे झुकलेले आहे हे यापूर्वीही जाणवलेले आहे. भारतातल्या लोकसभेच्या निवडणूकीदरम्यान मुद्देसूद उत्तरे देत याच राजकीय विचारप्रणालीच्या समर्थकांना निरुत्तर केले गेल्यावर ते धागे साईटवरुन गायब करण्यात आले आहेत. किमान चार ते पाच धाग्यांच्या बाबतीत हा प्रकार झालेला आहे . एक व्यक्ती म्हणून वेबमास्टर आणि अ‍ॅडमिन यांना राजकीय मते असण्यात काही गैर नाही, पण एखादी साईट चालवताना प्रशासक म्हणून व्यक्तिगत विचार आणि रागलोभ बाजूला ठेवत सर्वांना समान वागणूक दिली जाण्याची अपेक्षा आहे, पण तसे झालेले दिसून आलेले नाही.

किमान मायबोली प्रशासकांनी यापुढे निष्पक्षपाती असल्याचा टेंभा तरी मिरवू नये इतकीच अपेक्षा आहे.

> २. रिपोर्ट करणे (आयडी, धागा, प्रतिसाद, विपु, प्रोफाईल): आक्षेपार्ह तसेच मायबोलीच्या धोरणात बसत नाही असा धागा/प्रतिसाद/विपु/प्रोफाईल असेल तर तो रिपोर्ट करता यावा जेणेकरून संस्थळ प्रशासनास त्यावर त्वरित कारवाई करता येते. >
ही सुविधा एकूणेक आयडीला दिली तर माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल. त्याऐवजी ऍडमीन, वेमा या दोघांना जे सेन्सिबल && न्युट्रल आयडी वाटतात अशा १०-१५ आयडीना ही सुविधा द्यायला हरकत नाही.

पणमग याच्यामुळे माबोच ऐसीअक्षरे होण्याची शक्यता आहे (श्रेणीपद्धती -> ठराविक विचारसरणीच्या लोकांनी आपापल्या कम्पूसाठी बनवलेले संस्थळ)

१. ब्लॉक करणे (आयडी, धागा): आयडी ब्लॉक करणाऱ्या आणि केल्या गेलेल्या दोन्हीही व्यक्तींचे मायबोलीवरील अस्तित्व एकमेकांसाठी कायमचे नजरेआड होईल. त्या दोघानाही एकमेकांचे धागे, प्रतिसाद, प्रोफाईल, विपु काहीकाही दिसणार नाही. धागा ब्लॉक केल्यास ब्लॉक करणाऱ्या व्य्क्तीस धागा आणि त्यावरील प्रतिसाद कायमचे नजरेआड होतील.
+१००. ही सोय चांगली ठरेल. कारण, यामूळे जे आयडी कायमच वैयक्तीक, जातीयवादी व विखारी स्वरूपाच लिखाण करतात त्यांच्या पोस्ट ईग्नोर होतील. बर्‍याच लोकांनी असे केल्याने अश्या आयडींना एकूणातच ईग्नोर केले जाईल. ना रहेगा बांस..
फक्त ही सुविधा संकेतस्थळावर राबवणे तितके सोपे नाही असे वाटते. कारण प्रत्येक आयडी साठी तसे टॅग्स मेंटेन करून प्रत्येक पेज मध्ये ते टॅग्स वापरून फिल्टरींग करावे लागेल. खेरी़ज, पुन्हा डु आयडी आला की ये रे माझ्या मागल्या.. मायबोली ही कंटेंट ओरिएंटेड साईट आहे. युजर ओरीएंटेड नाही.

ऊत्तम ऊपाय म्हणजे अशा आयडी, त्यांचे लिखाण, या सर्वांना अनुल्लेखाने मारावे. कुणिही कितीही वैयक्तीक, जातीयवादी लिहीले तरी आपल्या व ईतरांच्या आयुष्यात विशेष फरक पडत नसतो. अशा लिखाणामूळे ईथले वातावरण दूषित झाले तरी त्याचे समाजात गंभीर परिणाम वगैरे असं काही होत नसतं. तेव्हा, अनुल्लेख हा ऊत्तम पर्याय आहे.

एक पर्याय सुचवावासा वाटतो: एका आयडी ला एका महिन्यात किती धागे काढता येतील यावर बंधन असावे.
*दुसरा ऊपपर्याय (जमल्यास): एका आयडीला एका महिन्यात एकूण किती पोस्ट करता येतील यावर मर्यादा घालणे.
(मला वाटते हे 'ग्लोबल सेटींग' मार्फत मॅनेज करणे शक्य व्हावे व तितकेसे जिकीरीचे नसावे.)

रच्याकने: कोणे एके काळी ईथे मर्यादेत राहून हिरीरीने भांडणारे आयडी होते.. वाद विवाद वगैरे देखिल सर्व होते. पण एक नक्की की आजच्या ईतके 'पोलरायझेशन' मात्र नव्हते. कारणे अनेक असू शकतील. पण आता एकूणातच ईथे काही आयडी ऊद्दीमून वातावरण दूषीत करण्याचा अजेंडा राबवतात हे अगदी स्पष्ट आहे. त्यांना त्यांच्या हेलावर सोडून द्यावे. एव्हडे जमले तरी बराच कचरा कमी होईल. Proud

मुळात मायबोली हे संकेत स्थळ सुरू करण्याचा हेतू पूर्न झाला आहे आणि संपलाही आहे. जसे स्वातंत्र्य मिलाल्यानंतर कॉम्ग्रेसचे झाले होते. जशी काँग्रेस हट्टाने पुढे व्यवसाय म्हणून चालविण्यात आली तसे मूल मायबोलीचा उद्देश पूर्ण झाल्यानंतरही तिचे व्यवसायिक कंपनीत रुपान्तर करून पुढे चालविली गेली. मूळ मायबोलीचा काव्यशास्त्र विनोद हा ढांचा बदलून तिला प्रचारी स्वरूप व्यावसायिक कारणांसाठी आले. जसे पुण्यात बाहेरचे बाजारबुणगे घुसल्यावर व त्यांची बहुसंख्या झाल्यावर मूळ पुन्याची संस्कृती म्हना , जीवनशैली म्हणा नष्ट होउन पुणे हे गुंड , बेमुर्वतखोर, असंस्कृत झाले आहे तस्स्सेच मायबोलीचे झाले आहे. मायबोली व्यावसायिक झाल्याने कोनाला निर्बंध घालणे आता शक्य नाही. मला स्वतःला मायबोली हे अत्यंत हास्यास्पद संकेत स्थळ वाटते त्यामुळे मी क्वचितच येथे येतो कि जो राण्त्रंदिवस माबो वर पडिक असे.

मायबोली हे अत्यंत हास्यास्पद संकेत स्थळ +१२३

अगदी मनातले बोलला राव !
आणि हल्ली तर बरेचसे लेख सुद्धा रोमन लिपीत पाहण्यात आले आणि प्रतिसाद तर बरेच जण इंग्लिश मधून देत बसतात त्यामुळे माय बोली हे नाव तर आता नावापुरते राहिलेले आहे.

मूळ मायबोलीचा काव्यशास्त्र विनोद हा ढांचा >>> अत्यंत महत्वाचे.
पण नवीन लेखक, कवी यांना प्रतिसाद आहे का ? आणि नवे लेखक कवी यांचा दर्जा कसा आहे यावरही काव्यशास्त्र विनोद हा ढांचा आज लोकप्रिय राहणे अवलंबून आहे.

खवळलेले राजकवी अंमळ पाहून गम्मत वाटली.

रॉहू, जाउ द्या हो!

बाकी कायदेशीर कारवाई वगैरे धागा कर्त्यांना प्रेमाचा सल्ला. वेमांचा प्रतिसाद तुमच्या धाग्यात "मायबोलीला जबाबदार" धरण्याबाबतचा आहे.

त्यांच्या प्रतिसादाचा अर्थ असा, की इथे तुमच्याच्याने काय करता येईल ते करा. माबोला पार्टी करायचं असेल, तर अमेरिकन कायदा अन कोर्टाचे पैके भरावे लागतील. (तेवढी ऐपत तुमची असेल असे *मला* वाटत नाही.)

राहिला प्रश्न *इथे* कायदेशीर कारवाईचा.

आपल्याकडे जिसकी लाठी उसकी भैंस असा कायदा आहे. लाठी असेल तर कायद्याची/ कायदेशीर कारवाईची गरज पडत नाही. तुमची कारवाई पुढे ढकलण्यासाठी तुमचे फ्रेंडली नेबरहूड पोलीस काय करतात अन किती चहापाणी मागतात त्याचा अनुभव अजून तुम्हाला यायचा आहे.

तरीही,

पुढील कारवाईसाठी शुभेच्छा!

पुकाशु!

आपलं मेंढारा सारखे झाले आहे कोण्ही तरी हकणारा पाहिजे तेव्हा सुरक्षित आणि योग्य रस्त्याने चालणार नाहीतर एक खड्यात पडला तर त्याच्या पाढी बाकीचे पण खडयात पडणार .
म्हणजे वेब मास्टर नी आपल्या ला रस्ता दाखवावा ही अपेक्षा पण आपण स्वतः रस्ता ( मार्ग) शोधणार नाही

बरं,
मायबोली या संकेतस्थळाबाबत ज्यांच्या तक्रारी असतील त्यांना इथे का यावेसे वाटतेय ?
किंवा इथे कुणी काही लिहील्याने आपल्या पक्षाचे आता काही खरे नाही. पितळ उघडे पडलेच समजा, अशा धास्तीने एका वेळी चार पाच आयडी घेऊन थयथयाट का सुरू होत असेल ? नाही ना हे संस्थळ प्रभावी ?

तर म्ग त्या वेळात मुलाचा अभ्यास घ्या, मुलीच्या लग्नासाठी पैशाची जमवाजमव करण्यासाठी खडू, फळा, तक्ते विका ऑफीसमधून आल्यावर.
घरी बोर्ड लावा, इथे फुगे फुगवून मिळतील. हजर स्टॉकमधे बाटलीला बूचं (अ) लावून मिळतील. जेसीबीची चौकशी करू नये.

इथं कशाला पडीक रहायचं ?

राजेश १८८,
अपेक्षा केवळ वेब मास्टरांनी रस्ता दाखवावा इतकीच नाही, तर वेब मास्टरांनी आम्हांला हवा तोच रस्ता दाखवावा आणि आम्हांला हव्या त्याच आय्डीजना ( बाहेरचा) रस्ता दाखवावा अशी आहे!

Pages