सुरत अग्नी तांडवात बळी पडलेले दुर्दैवी विद्यार्थी

Submitted by अविका on 26 May, 2019 - 00:18

२३ तारखेला लोकसभेचा निकाल लागल्यापासून सर्वत्र मोदी मोदी चाललेय. त्यांचे यशही मोठे आहे. पण ह्या सगळ्यात सुरतमध्ये जे अग्नी तांडव झाले, ज्यात अंदाजे २१ विद्यार्थ्यांनी आपला जीव गमवला. ही बातमी अगदी थोड्या वेळासाठी न्युज चॅनेल वर दाखविण्यात आली. नंतर जणू काही झाले नाही असे सगळे विसरले
सगळी माध्यमे जाऊ द्या, इकडे मायबोली वर पण कोणी काहीच बोलताना दिसले नाही.
असे का बरे????????
जर हा निवडणूकांचा काळ नसता, तर ही नक्कीच ब्रेकिंग न्युज असती????

हीच का लोकशाही, जिथे सामान्य माणसापेक्षा नेते , राजकारण श्रेष्ठ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे ही झाली राजकारणी जमात ... आपण तो कित्ता न गिरवणे हे उत्तम !
हां धागा आपण कृपया राजकारण भागात हलवाल का ?

अत्यंत भीषण आणि दुर्दैवी. चौथ्या मजल्यावरून उडी मारणारी दहावी बारावीची मुले/मुली पाहिली..... शब्द नाहीत! शब्द नाहीत! काय अवस्था झाली असेल त्या पालकांची.

पूल कोसळतात. आगी लागतात. अनेक निष्पाप जीव भयाणरित्या मृत्यूला सामोरे जातात. कोणाचातरी हलगर्जीपणा कारणीभूत असतो. पण असे अपघात झाल्यानंतर कोणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.

अत्यंत दुर्दैवी घटना.
आजूबाजूच्या लोकांनी मदतीचे प्रयत्न न करता मोबाईल वर व्हिडिओ बनवण्यात धन्यता मानली ही गोष्ट तर अजूनच दुर्दैवी. Sad

अत्यंत दु:खद.

ह्या इमारतीला सर्टिफिकेट देणाऱ्या फायर ऑफिसर्सना निलंबित केले आहे. पण त्या आधी जीव गेलेच. प्रत्येकाला आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे का करता येत नाही?

निलंबित करून काही फायदा नाही. जनतेनेच आता स्वतःच न्याय केला पाहिजे. जनताच या देशाची मालक आहे आणि सरकार जर त्यांच्या जीवाची काळजी घेऊ शकत नसेल तर अश्या सरकारी अधिकाऱ्यांचे जनतेनेच मॉब लिंचिंग केले पाहिजे तरच हे लोक आपला जॉब गांभीर्याने घेतील. नाहीतर आहेच पूल पडून मरण.

बिचारे छोटे जीव!

एक शाब्दिक, निरर्थक श्रद्धांजली वाहत आहे.

लहान मुलांसाठी असलेल्या सर्व वास्तूंचे ऑडिट अत्यावश्यक आहे. उद्या मुंबई लोकल वरचा पूल पडला की त्या पुलांचे structural audit कसे आवश्यक याच्या पोस्टी येणारच. इमानदारीने काय होते अन काय नाही हे बघण्यासाठी आणि जालीम उपाय करण्यासाठी समिती नेमायला हवी. (नेमल्याही असतील)

मोदी सरकारचा विजय ही जागतिक महत्वाची घटना आहे. त्या घटनेतच मीडिया गुंतली असे म्हणून धाग्याचा टी आर पी वर ठेवण्याची गरज समजली नाही. मूर्ख व्यवस्थापनामुळे गेलेले जीव आणि सर्वात मोठ्या लोकशाहीतीला लागलेले निराळे वळण यापैकी मीडियाला काय महत्वाचे वाटावे हे मिडियाच ठरवणार शेवटी!

मायबोलीवर नसेलही, पण माझ्या ग्रुपवर मी सगळे थांबवून आधी श्रद्धांजली वाहिली. मात्र, श्रद्धांजली वाहणे किंवा न वाहणे हा संवेदनशील असल्या / नसल्याचा निकष ठरू शकत नाही असे वाटते. ठरू नये.

सर्व बाबतीत पूर्ण निष्काळजी वृत्ती हे आपले व्यवच्छेदक लक्षण आपण बदलत नाही तोवर अशा बातम्या येत राहणार. कुर्ल्याला किचनमध्ये सिलिंडर स्फोट झाल्यावर लोकांना हॉटेलातुन बाहेर पडता आले नाही, वरळीलाही अशीच घटना..

आता आपणच काळजी घ्यायला हवी. कुठेही गेल्यावर संकटकाळी तिथून बाहेर पडणे कठीण आहे असे वाटले तर दारातूनच यु टर्न मारायला हवा.

बाकी संबंधित खात्यावर दबाव आणून कायदे पाळणे बंधनकारक करणे वगैरे लढाया तर लढायला हव्यात पण आधी आपण आपली काळजी घ्यायला हवी.

भारतातील लोक अपघाता प्रसंगी पिडीतांना मदत करण्याच्याबाबतीत किती निष्क्रिय व उदासिन असतात हे सुरतमधील ह्या जळीतकांडाच्या निमिताने पुन्हा एकदा समोर आले.

आज फेसबुकरवर या आगीचा एक फोटो व्हायरल झालाय त्यात गर्दितील हजारो लोक हातात मोबाईल घेऊन या घटनेचे शुटिंग करण्यात मग्न आहेत असे दिसते. आता या लोकांपैकी काहीजणांनी तरी हातात मिळेल ते चादर, जाळी, ताडपत्री वगैरे घेऊन उड्या टाकणार्‍या मुलांना झेलण्याचा प्रयत्न केला असता तर किती तरी मुलांचे प्राण वाचले असते.

साळसूद पणाचा आव आणून भारता मधील कोणत्या ही शहरातील जनता सरकार वर आरोप करू शकत नाही .
कारण तसा नैतिक अधिकार त्यांना नाही .
रस्त्याचा दोन्ही बाजूला गाड्या पार्क करणे
बिल्डिंग नियमानुसार न बांधणे.
आग लागू नये म्हणून बिलकुल काळजी न घेता गॅस सिलिंडर जिण्या वर ठेवणे.
आगप्रतीबंधक यंत्रणा न बसवता ती आहे असा खोटं बनाव करणे
खूप कारणे आहे त
जनताच शाहणी नाही त्याला सरकार काय करणार

घटना घडताना लोक मोबाईल वर शूट करत होते त्या सर्वांना सर्वांना अटक करून अद्धाल घडवा .
Shirt,pant,दुपट्टा बांधून झोळी तयार करता आली असती पण त्यात गर्दी मधील एका पण murkhach डोकं चाललं नाही

घटना घडताना लोक मोबाईल वर शूट करत होते आणि घटना झाल्यावर फेसबुक, मायबोली वगैरे ठिकाणी धागे काढून trp मिळवू पहात होते... !
लोकांना सुशिक्षित बनवण्यासोबत सुजाण नागरिक बनवणे ही काळाची गरज आहे.

ऐमी, ग्रुप कसा बदलायचा माहिती नाही

अतुल, हो पाहवत नाही ते व्हिडिओ

इमारतीला सर्टिफिकेट देणाऱ्या फायर ऑफिसर्सना निलंबित केले आहे. >>> नायतर काय, आता काय फायदा

काही जणांना ही बातमी मीडियावर जास्त दिसली नाही म्हणून काही वाटले नाही असे दिसते, तसेही मोदी भक्तांना मीडियात ही बातमी असली काय आणि नसली काय, सध्या सारखेच

मानवी संवेदना संपल्यात असेच वाटते ते व्हिडीओ बघून , कोणीच त्यांना वाचवायला प्रयत्न केला नाही.

मायबोली वगैरे ठिकाणी धागे काढून trp मिळवू पहात होते... !>>>> अगदी अगदी, जेलस झालात की काय की तुमची trp कमवायची संधी हुकली, पण तुमचे दोन प्रतिसाद बघून तू या धाग्याचा trp वाढवणार असे दिसते

अगदी अगदी, जेलस झालात की काय की-----
छे छे Happy अविकाजी काहीतरी काय उगीच.... तुम लगे रहो धागा निकालने को, हम तुम्हारे साथ है trp बढ़ानेको ।

फक्त वाईट इतकेच वाटले की तुम्ही ह्या https://www.maayboli.com/node/63860?page=12 धाग्यावर आधी सदरच्या घटनेबाबत मत / श्रद्धांजलि नोंदवली असती आणि नंतर सविस्तर चर्चेसाठी इकडे आला असता तर तुमचा ह्या धाग्याबाबतचा प्रामाणिकपणा / तळमळ अधिक आवडले असते.

जनतेने सरकार का निवडून देते याचे कारण समजून घेतले पाहिजे. सार्वजनिक हिताच्या गोष्टी ही संपूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे.

जर तुम्ही जनतेला तुमच्या जीवाची काळजी तुम्ही घ्या असा सांगताय तर सरकारची गरज काय आहे.

दुसरा सूर असा दिसला की बघ्यांनी काही केले नाही. हे सर्व बघे सामान्य लोक असतात. यात कोणालाही अश्या प्रकारच्या आगीला तोंड द्यायचे प्रशिक्षण नसते. खरे तर हे शाळांमध्ये शिकवले गेले पाहिजे. तिथेही सरकार काही करत नाही. आणि जनतेच्या कराच्या पैश्यातून सरकार ने अग्निशमन दल पोसले आहे त्याचा काय उपयोग. त्यांच्याकडे शिड्या नसाव्यात या सारखे दुर्दैव नाही. 4 मजली बिल्डिंग ला लावण्या सारख्या शिड्या नव्हत्या हा मूर्खपणा आहे.

आणि अश्याप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून नियम न पाळणाऱ्या समाजविघातक लोकांवर कारवाई करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरते. अनधिकृत बांधकामे पैसे घेऊन व मतांच्या आशेने सर्रास नियमित केली जातात.

श्रद्धांजली.
भीतीदायक आहे.असे क्लास गजबजलेल्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये छोट्या जागेत लाकडी 0पार्टिशन घालून बनवलेले असतात.फार सेफ्टी नियम पाळले असतीलच असे नाही.शिवाय खाणे हा कधी तोट्यात न जाणारा धंदा असल्याने आजूबाजूला कमी किमतीत खाणे देणारी लहान दुकानं असतात.त्यात छोट्या जागेत कढई, सिलिंडर किंवा मोठा गॅस स्टोव्ह असतो.All environment is disaster waiting to happen.
लोकल पातळीवर फायर ऑडिट नीट व्हावी, बिल्डिंगमध्ये स्ट्रेचर लिफ्ट असावी, आग विझवायची सिलिंडर असावी, संकट काळी काय करावे यांच्या नीट वाचता येतील अश्या सूचना दर्शनी जागी लिहिलेल्या असाव्यात.वेळ कुठेही, कितीही पॉश मॉल मध्ये कोणावरही येऊ शकते.

आणि अश्याप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून नियम न पाळणाऱ्या समाजविघातक लोकांवर कारवाई करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरते. अनधिकृत बांधकामे पैसे घेऊन व मतांच्या आशेने सर्रास नियमित केली जातात.>>>>चिडकू सहमत.

या सर्व दुर्दैवी जीवांना श्रद्धांजली !!

स्वत:चा नाकर्तेपणा सरकारवर ढकलण्यात भारतीय किती माहिर असतात याचे हे उदाहारण.

घर घेताना किती लोक बिल्डर्सकडे विचारणा करतात कि इमारतीत अग्निक्षमण यंत्रणा आहे का ? किती लोक विचारतात इमारतीला Emergency Exit आहे का ? हिच अवस्था गाड्या घेणार्‍यांची.

सरकार जनतेच्या कानीकपाळी ओरडून सांगत असते की रस्त्यावर बसणार्‍या फेरिवाल्यांकडून वस्तू विकत घेऊ नका मात्र स्वस्ताईच्या नावावर सरकारच्या सुचना फाट्यावर मारणार्‍या भारतीय जनतेची रक्षा सरकार करणारच कसे ?

जनतेच्या सुरक्षेसाठी बनविलेले कायदे मोडण्यात ज्या देशाची जनताच अग्रभागी असते तिथे सरकार काय त्यांच्या पासंगाला पुरणार.

@समीर अग्निशमन दलाकडे शिड्या नव्हत्या यात जनतेचा नाकर्तेपणा काय होता? तुम्हाला लोक प्रतिनिधींद्वारे सरकारी अधिकाऱ्यांवर अंकुश या संकल्पनेचा अर्थ पुरेपूर उमगला आहे का?

अहो समजून घ्या चिडकू भौ.. त्यांच्या लाडक्या गुजरात मॉडेलवर आगपाखड होऊ नये म्हनून तडफड सुरू आहे त्यांची. ३०० कोटी खर्च करुन पुतळे बाण्धले पण ३० फुटी शिडी दलाकडे नव्हती ह्याचाही दोष जनतेचाच आहे. कारण जनता कोणाला निवडून देते हे जनतेचाच दोष आहे हो.

सुरत दुर्घटनेत बळी पडलेल्या दुर्देवी जीवांना श्रध्दांजली !

Submitted by चिडकू on 27 May, 2019 - 10:04 चिडकू यांच्या या मताशी सहमत.

अश्या दुर्घटना घडल्यावर दोन-चार दिवस प्रसारमाध्यमांमध्ये गंभीर चर्चा घडतात. अश्या चर्चांमध्ये अनेक राजकारणी, लोकप्रतिनीधी आणि तज्ञ आपापली मते मांडतात आणि उपाय सुचवतात. त्यानंतर सर्व काही शांत होते. सुचवलेल्या उपायांवर काय अंमलबजावणी होते हा तर एक संशोधनाचा विषय आहे. पुढील दुर्घटना घडेपर्यंत पुन्हा सर्व काही पुर्वीप्रमाणेच सुरू राहते.

दुर्घटनेला कारणीभुत असलेल्या भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांना फक्त निलंबीत/बडतर्फ करून काहीच फायदा होत नाही आहे. एक कडक कायदा करून अश्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवून त्यांना शिक्षा झाली तरच काही फरक पडेल असे वाटते. त्याच बरोबर सरकारच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाकर्तेपणाकडे सुध्दा डोळेझाक करून चालणार नाही.

भावासोबत ह्या विषयाची चर्चा करताना त्याची मुलगी जिथे जाते तिथे काय परिस्थिती आहे म्हणून विचारणा केली असता, गंभीर परिस्थितीत पळून जायची तिथे काहीही सोय नाही, जिने अतिशय चिंचोळे आहेत हे त्याच्या लक्षात आले.

सगळे पालक मिळून काहीतरी करा म्हणून भावाला सांगितले. असे अजून किती क्लासेस आहेत माहीत नाही.

दरवेळेस दुर्घटना घडल्यावर लोक जागे होतात, संबंधित अधिकारी व मालक यांच्यावर कारवाई होते. पण वापरकर्ते म्हणून आपला काहीच रोल नाही? जिथे आपली मुले रोज जातात, आपण जातो त्या जागा कितपत सुरक्षित आहेत? तशीच वेळ आली तर तिथून पळून जायचे मार्ग आपल्याला माहीत आहेत का? ठळकपणे ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी लिहिलेल्या आहेत का? हे प्रश्न आपल्याला कधीही का पडत नाहीत?

जिथे आपली मुले रोज जातात, आपण जातो त्या जागा कितपत सुरक्षित आहेत? तशीच वेळ आली तर तिथून पळून जायचे मार्ग आपल्याला माहीत आहेत का? ठळकपणे ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी लिहिलेल्या आहेत का? हे प्रश्न आपल्याला कधीही का पडत नाहीत?
<<

सहमत !

मी ही हेच सांगत होतो.
जर जनतेने सुज्ञपणे, सुरक्षेशी तडजोड केलेल्या इमारतीतून सदानिका घेतल्याच नाहीत, तर कोणताही विकासक अश्या इमारती बांधणारच नाही. मात्र होतेय काय स्वस्तात मिळते म्हणून खरेदीदार, विकासकाला सुरक्षेसंबधीत प्रश्न विचारत नाही व सरकारी कर्मचारी मिळणार्‍या चिरीमिरीसाठी विकासकाच्या ह्या चुकांकडे दुर्लक्ष करतो.

कुठल्याच रेसिडेंशल व छोट्या कमर्शियल मध्ये आगीसाठी स्वतंत्र जिना वगैरे नसतो,

मोठ्या कमर्शियल मध्ये असतो , असू शकतो , बाकी , पाणी , एडिशनल पाईप लाईन , वगैरे असेलच असे नाही,

फायर एकसिंगविषर हेच मुख्य करून कंपल्सरी करता येते , जे बहुतेकदा नसते

Video बघून असे वाटतंय सर्व मुलांनी खिडकी मधून खाली उतरायचं प्रयत्न केला आहे .
आणि त्या प्रयत्ना मध्ये भीती मुळे तोल सावरता न आल्या मुळे मुल खाली पडली आहेत .
उंची जास्त नाही खाली जमलेल्या लोकांनी थोडा प्रयत्न जरी केला असता तर काही मुल वाचली असती .
बाहेर पडण्याच्या जागेतच आग लागली असणार .
पण प्रश्न हा आहे आग काही लगेच जोर पकडत नाही स्टेप स्टेप नीच भडकते .
आगीला survat झाली आहे हे त्यांना उशिरा समजले असेल