पाटील v/s पाटील - भाग १९

Submitted by अज्ञातवासी on 2 May, 2019 - 05:50

पाटील v/s पाटील - भाग १८

https://www.maayboli.com/node/69624

कृष्णराव अजूनही आनंदीच्या धक्क्यात होते. गतकाळातील आठवणी जाग्या होत होत्या...
आनंदीबाईंनी वाड्यात पाऊल टाकलं, आणि समोरची स्मशानशांतता बघून त्या बावरल्या.
"काय झालं शाम, अण्णा?"
"या घरात मला एक क्षण राहायचं नाही, चला रे," शामराव संतापाने म्हणाले.
"श्यामा,"अंबा कडाडली.
अंबाचा रुद्रावतार बघून शामराव जागीच थबकले.
"खबरदार, या घराच्या बाहेर पाउल टाकशील तर. ही अंबा जिवंत आहे अजून."
अंबा अण्णांकडे बघून म्हणाली.
"अण्णा, श्यामने जे काही केलं, ते घराण्यासाठी केलं, पोरीचा गैरसमज झाला असेल, जे झालं ते झालं."
"आजी," मिने काही बोलणार, तेवढ्यात अंबाने डोळे वटारले.
"मिने, ह्या अंबेपुढे तुझ्या बापाची बोलायची बिशाद नाही, बस्स..."
"काकू, झालंय काय इथे, मला कुणी सांगेन का?"
"बाई, तुम्ही आत चला बघू," असं म्हणून वत्सलाबाई आनंदीबाईना आत घेऊन गेल्या.
कृष्णराव हळूच मोहनकडे सरकले,
"मोहन, आनंदी..."
...आणि मोहन आश्चर्याने कृष्णरावांकडे बघतच राहिला.
"आई, मिने आणि सोनी खोटं बोलनार नाहीत..." अण्णा खाली मान घालून म्हणाले.
"वा! अण्णा, आता या घरात एक क्षण राहायची नाही मी... निघते..."
"आई," अण्णांनी अंबेला म्हटलं, "नको असं बोलूस."
"अण्णा, काहीही होवो, रक्ताचं नातं महत्वाचं असतं, कळलं? माझ्या ज्या पोराने दुसऱ्या पोराला तोडलं, त्याच्याशी नातं मी तोडलं... कळलं."
"आई, दादा, माफ कर मला."
"पोरींच्या नादी लागून मला ऐकवलं अण्णा तू, विसरणार नाही." आणि शामराव तडक घरातून निघाले...
"अण्णा, थांबव त्याला."
"आई थोडे दिवस जाऊ दे, आणेल मी त्याला परत. "
वाड्यावर स्मशानशांतता पसरली होती. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
अण्णा सोफ्यावर बसून विचार करत होते.
"मोहन, अण्णा गरजले."
मोहन तात्काळ अण्णांसमोर आला.
"बस माझ्यासमोर..."
मोहन बसला...
"मला कळत नाहीये, कसं सांगावं, पण..."
"बोला अण्णा."
"आजपर्यंत अनेकदा साथ दिलीस. प्रत्येक वार झेललास. अनेकदा आमच्या खानदानाला वाचवलंस. पण...
...कधीतरी काही गोष्टी अशा घडतात, की... जाऊ दे. फक्त एवढंच सांगेन की, आता तू जास्त काळ आमच्या सोबत राहू शकत नाही."
"अण्णा?"
"हो, कारण कितीही झालं, तरी शेवटी परिवार महत्वाचा आहे माझ्यासाठी...
...म्हणून या अण्णाला माफ कर!"
"अण्णाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं!"
"अण्णा, नाही. असं करू नका. जातो मी, पण डोळ्यात पाणी आणू नका."
मोहनने अण्णाच्या पाया पडल्या.
"सगळ्यांना भेटून घेऊ?"
अण्णांनी फक्त मान डोलावली.
"मिनेताई, सगळं नीट होईल, काळजी नको." मोहन मिनेकडे जात म्हणाला.
"सुंदर दिसतेय," मिनेच्या शेजारी असलेल्या सोनीला म्हणाला.
"नीट राहा बाळा," वत्सलाबाई आशीर्वाद देत म्हणाल्या.
अंबा लांब उभी होती, मोहन तिच्याजवळ गेला.
"जातोय? नीट जा. आजीसारखाच! स्वतःला कितीही त्रास होऊ दे, नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा. नेहमी दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं, आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा."
मोहन नमस्कार करून निघाला.
"थांब..."
मोहनने अंबाकडे वळून बघितले.
"हे घे."
अंबाने नोटांची गड्डी काढून मोहनजवळ ठेवली.
"नीट आयुष्य जग. राधीला सांग, अंबाने परतफेड केली."
"गरज नाहीये," मोहन म्हणाला, आणि तडक घराबाहेर गेला.
"मी सोडून येतो त्याला," म्हणत कृष्णरावही घराबाहेर गेले.
-----------------
"संपलं सगळं बाबा, हरलो मी."
"नाही रे, उलट जिंकलास तू. अण्णाला रडताना बघितलं मी. अंबाच घर रडतय! या रानटी लोकांमध्ये जर तुझ्याविषयी प्रेम निर्माण झालं, तर जिंकलास ना तू."
"हार हार असते बाबा. जाऊ देत."
"कुणाच्या हरण्याच्या गोष्टी चालुयेत?"
मोहन चमकला, मागे आनंदी उभी होती.
"कुणाच्या नाही, म्हटलं, अण्णांबरोबर राहता येणार नसेल, तर ते हरणंच ना."
"अच्छा, ते जाऊ दे, अरे मी कशासाठी आले होते. आठवलं....तुला बघून ना, मला एक फार जुन्या व्यक्तीची आठवण आली. त्याचा चेहरा अगदी तुझ्यासारखा होता. कुठे असेल माहीत नाही... पण ना, तू खूप जवळचा वाटलास."
आनंदीने खिशातून दोन हजाराच्या चार नोटा काढल्या.
"या ठेव. नाही म्हणू नकोस. त्या गड्डीपेक्षा या नोटा खूप कष्टाच्या आहेत.
पुन्हा भेटशील का नाही माहीत नाही, पण ना, कायम आता एक जखम राहील, खूप जुनी जखम!"
मोहनने आनंदीच्या पायाला हात लावला.
"कृष्णराव, याला सोडून या."
कृष्णराव आणि मोहन गाडीत बसले. गाडी निघाली.
---------
"काकावर गेला आहेस ना, ओळखलं तिने बरोबर."
"हो, बाबा."
"ये मोहन, असं तोंड लटकावून बसू नकोस. उद्याच फ्लाईटने युक्रेनला जा. अरे आजीला तुला बघायचंय. अंबाला नाही."
"बाबा, मी हरलोय."
"गप्प राहा. आणि चल."
मोहन बंगल्यावर पोहोचला.
व्यास समोरच उभे होते.
"व्यास, प्लॅन पूर्ण फसलाय. मोहनला एकही प्रश्न विचारू नका, सगळी उत्तरे मी देईन."
"ओके सर."
मोहन सरळ बंगल्यावर गेला आणि तयारीला लागला.
संध्याकाळपर्यंत गडबड चालू होती. मोहनच संपूर्ण सामान बांधून झालं.
"सर, परत कधी येणार."
"मोहन विषण्ण हसून म्हणाला, कधीच नाही."
"सर एक सांगू?"व्यास म्हणाले.
"बोला ना व्यास."
"तुम्ही आल्यापासून ना, आयुष्यात काहीतरी नवीन करायला मिळत होतं, आता पुन्हा तेच रुटीन. तीच कामे."
मोहन फक्त हसला.
"एक झिंग होती तुमच्या कामात, एक वेडेपणा होता, आणि आता, आता मात्र पुन्हा शहाण्या माणसासारखं वागावं लागेल."
"व्यास. मलाही एक सांगायचंय."
"बोला ना सर."
"यु आर द बेस्ट पर्सन एव्हर आय वर्क विथ!" आणि मोहनने व्यासची गळाभेट घेतली.
व्यासच्या डोळयात पाणी होतं
आवरानिवर होऊन मोहन झोपायला गेला.
---------------------------------------------------
"व्यास, कॉफी!" मोहन सकाळी आळस देत उठला.
कुणीही प्रतिसाद दिला नाही.
व्यास,
"ओरडतोस कशाला आणतेय कॉफी..."
...आणि समोरच सोनी कॉफी घेऊन उभी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलेलेले

बाळाचे सांत्वन करुन तयार केले वाटते Lol

आधिच नको तेव्हढा तमाशा करुन माफि मागायचे नाटक करुन काय हाशिल झाले म्हणायचे???

नाही तर तीथे सगळे आधि तुम्हालाच सपोर्ट करते होते न मग कशाला केला सगळा ड्रामा

छान.
शेवटाकडे काहीतरी ट्विस्ट असतोच नेहमी त्यामुळे पुढील भागाबद्दल उत्सुकता वाटत राहते.

मस्त! पु ले शु..

?