Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुलूतै अजिबात विचार करु नको.
सुलूतै अजिबात विचार करु नको. नेहमीसारखा अपेक्षाभंग होईल.
अचाट आणि अतर्क्क्य पणाचा कळस
अचाट आणि अतर्क्क्य पणाचा कळस आहे. जालिंदरने विक्याला "ईशाची बाजू सत्य आहे" हे सांगणं म्हणजे कहर होतं, ईशाने ह्याच्या विरुद्ध मोहीम उघडली आहे त्यालाच तिचा साथीदार जाऊन तिचं बरोबर आहे सांगतो , विस बहुतेक पोलिसांना सरेंडर करेल स्वतःला.
तेच..!
मला समजेना झालंय की कोण कोणाच्या विरोधात नक्की काय करतंय...?
तुम्ही लोक इतक्या मनोभावे
तुम्ही लोक इतक्या मनोभावे तुपारे पहाता? ___/\___
या आठवड्यात संपणारे ना ?
या आठवड्यात संपणारे ना ?
तुपारे खरंच संपणार असेल तर
तुपारे खरंच संपणार असेल तर बाप्पा पावला रे!
मला वाटलेलच जालिन्दर
मला वाटलेलच जालिन्दर आत्महत्या करेलच. आता विसने झेण्डेला नक्की मारल आहे का नाही तेही दाखवतील.
कालच गाण परफेक्ट होत. हा विस खरा कि तो विस खरा अशी अवस्था झालीये.
सुलूतै अजिबात विचार करु नको. नेहमीसारखा अपेक्षाभंग होईल. >>>>>>>> ++++++++++११११११११ येस्स. असच वाटतय. मानसिक तयारी करतेय.
सगळयान्ना विसची का़ळजी वाटतेय आईसाहेब सोडून. आईसाहेब बरोबर वागतायत. तिच्या नवर्याला आणि मुलीला ( सावत्र असली तरीही) विसने मारलय. तिचा त्याच्यावरचा राग पटतो. तिला ईशाने बदला घ्यावा अस वाटतय.
या आठवड्यात संपणारे ना ? नाही, पुढच्या आठवडयात.
इथल्या कमेंट्स वाचल्या बहुतेक
इथल्या कमेंट्स वाचल्या बहुतेक .. ईबाळाने काल गाऊन घातला होता घरात.
सुमारे १४० पोस्ट नवीन
सुमारे १४० पोस्ट नवीन राहिल्या होत्या वाचायच्या!
जालिंदर गायब झाला वाचल्यावर असे वाटले की इतके दिवस तो जीवाला धोका वगैरे होता तो जालिंदरच्याच होता की काय.
जालिंदर गायब झाला वाचल्यावर
जालिंदर गायब झाला वाचल्यावर असे वाटले की इतके दिवस तो जीवाला धोका वगैरे होता तो जालिंदरच्याच होता की काय.>>
फारेंड इज ब्याक.
जाळींदर खरंच ढगात गेलाय का??
जाळींदर खरंच ढगात गेलाय का??
की अजून काही गूढ बाकी आहे..
... तुपारे टीमची कमाल आहे.. साष्टांग _/\_सगळी सहनशक्ती एकवटून गादाला हैक्
हैक् करत करत शेवटापर्यंत ओढत आणली बुवा एकदाची...
तिलाच ढगात पाठवा...
सगळे सुटतील..
.. मी तर गेल्या आठवड्यापासून count डाऊन सुरू केलेय..
अजून अख्खा आठवडा ओढायची आहे मालिका..
दिवस घालणार आहे मी... खूप छळवाद झाला माझा तुपारे मुळे
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाने सुसह्य झाल्या माझ्या यातना..
माझी जाऊ म्हणत होती की ईशाला
माझी जाऊ म्हणत होती की ईशाला जुळी झालेली दाखवा. झेंडे व जालिंदरने तिच्या पोटी पुनर्जन्म घेतलाय असं.
कालच गाण परफेक्ट होत. हा विस
कालच गाण परफेक्ट होत. हा विस खरा कि तो विस खरा अशी अवस्था झालीये. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मला तर अजुन वाट्त आहे.... कि विस फसवतोय...
ईशाला जुळी झालेली दाखवा>> अगं
ईशाला जुळी झालेली दाखवा>> अगं ए .. म्हणजे झी च्या कॅल्क्युलेशन प्रमाणे अजून दिड वर्ष चालू राहील हा अत्याचार .. नको ग बाई .. मी गेले ४-५ दिवस पाहिलेला नाहीये त्यांचा पांचटपणा ..इतकी शांती मिळतेय जीवाला म्हणून सांगू
तुपारे टीमची कमाल आहे.. साष्टांग _/\_सगळी सहनशक्ती एकवटून गादाला हैक्
हैक् करत करत शेवटापर्यंत ओढत आणली बुवा एकदाची...>> हो खरंच ..
twins nastil tar... single
twins nastil tar... single asel tar. dadasaheb yetil...
जाळींदर खरंच ढगात गेलाय का??
जाळींदर खरंच ढगात गेलाय का??
की अजून काही गूढ बाकी आहे.. >>>>>>>> मला तर झेण्डे खरच ढगात गेला का नाही तेच कळत नाही.
झेंडे व जालिंदरने तिच्या पोटी
झेंडे व जालिंदरने तिच्या पोटी पुनर्जन्म घेतलाय असं. >>>
संपत आली असेल तर वेग वाढवलाय का? की अजूनही ईआई व ईबाबा खुशी माना डोलावत आहेत, सर एण्ट्री मारत आहेत, ईशा कोठूनतरी कोठेतरी चाललेली आहे असे सीन्स मिनीट मिनीट चालतात?
ईशा अचानक सगळं मी कोणाचंच
ईशा अचानक सगळं मी कोणाचंच देणं ठेवत नाही, धडा शिकवलाच पाहिजे वगैरे विसरली का?
प्रेग्नंसी गावभर सांगुन बाळ
प्रेग्नंसी गावभर सांगुन बाळ म्हणते कोणालाच सांगितलं नाहीये.. काय म्हणावं याला ? बाळाचा खोटारडेपणा का डायरेक्शनची माती?
कालचा भाग बघितला. ही
कालचा भाग बघितला. ही सर्र्र बरोबर लव्ही डव्ही सीन करून दोघे बाहेर येतात व वी आर प्रेगर्स न्युज देतात. आई साहेब शॉक्ड आहेत. तर पुढे एका सीन मध्ये ही आईसाहेबांना खोलीत जाउन कप भर चह ट्रे मधून घेउन जाते व इतकी बडबड करते की त्याच काय आपणही वैतागतो. शेवटी
त्या चक्क तिला सांगतात की बोलून झाले असेल तर जा आता. मोस्ट रिअलिस्टिक. क्युट पणाची परा काष ठा करत आहे इ बेबी. बाळाचे बाबा खुनी आहेत हे विसरल्चे सगळे. मेन मला काय वाट्ते. वट्ट घरात ली अशी माण से आई व जयडू. आता त्याचे लग्न झाल्यावर त्याची बायको. पण हे वेग ळेच सं बंध नसलेले पब्लिक घरी राहते आहे व त्यांना पोरेबाळे पण होत आहेत. आता तर जायदाद पण तिच्या नावावर.
नुसती पर्सन ल स्पेस नव्हे तर घर, फॅमिली बिझनेस, पैसा जायदाद ह्यावर हे अतिक्रमन कसे सहन करतात? मला तर घरी मोलकरीण जास्त वेळ थांबली तरी इरिटेट होते. लेखन अगदीच वाइट आहे. ती खरेतर सुम्दर पण नाही आनि सुभा एका लेव्हल नंतर स्मार्मी दिसतो.
अमा+11
अमा+11
जरा पाच मिनीटे पाहू म्हणून एक
जरा पाच मिनीटे पाहू म्हणून एक भाग लावला, तर गुगली वर गुगली चाललेत इथे तर. झेंडे ने विक्याला किडनॅप केलेय. मदतीला जालिंदरला बोलावतायत. जालिंदरच्या जीवाला धोका आहे. झेण्डे लय डेंजर माणूस आहे पण तो विक्रांत ला काही करणार नाही. किंबहुना त्याला वाचवायलाच त्याने त्याला किडनॅप केलाय. इकडे ईशा उर्फ राजनंदिनी झेण्डेने विक्याला किडनॅप केलाय म्हणून चिंतेत आहे तर तिकडे मायरा आणि जयदीप झेण्डेने विक्याला किडनॅप केलाय या बाबतीत निश्विंत आहेत.
टोटल ये कहाँ आ गये हम फीलिंग.
एकूण सध्या यात जीवाला धोका असलेले लोक हे धोका नसलेल्या लोकांपेक्षा जास्त दिसत आहेत. किमान विक्या, ईशा (ऑल-टाइम धोका रेकॉर्ड), आणि जालिंदर इतके तर नक्कीच. जयदीप आणि मायरालाही कसलातरी धोका दिसतोय.
मुळात मायरा इकडे कोठे कडमडली? मला वाटले ती म्हणेल तुम्ही घाला काय घोळ घालायचेत ते. मी कंपनी काबीज करते तोपर्यंत.
आता एक नवीन स्पेशल इफेक्ट आलेला आहे या सिरीयलीत. इनडोअर लाइटनिंग. झेंडे म्हणतो तुझा खेळ खलास होणार ईशा - लगेच लाइट चमकतो. खचॅक! एकदा विक्रांतला खरं काय ते कळलं की स्वतः तुला.... खचॅक!
झेंडे विक्याला औषध देतोय. "माझ्यासाठी नको घेउ, निदान...." इथे कोणासाठी म्हणावे असा विचार करताना गडबडलेला दिसला झेंडे. कारण सध्या विक्या कोणासाठी औषध घेइल हे विक्या, झेण्डे आणि लेखक कोणालाच पटकन आठवले नसावे. त्यामुळे "तुला ज्या व्यक्तीसाठी घ्यायचीय त्या व्यक्तीसाठी घे" असा एक जनरल पर्पज संवाद लावून टाकला असावा, म्हणजे कोणत्याही ट्विस्ट मधे चालून जाइल.
तुला ती इंग्लिश मधली म्हण माहितीय का? "What goes round comes round"
अरे यांना कोणीतरी दोन "a" द्या. What goes around comes around आहे ते
फारएंड...
फारएंड...
काल विक्रांत तिला तुझ्या सारखी हुशार, सुंदर व आणीक एक काहीतरी....अशी मुलगी आपल्याला हवी असे म्हणत होता!!
बाकी विक्रांत खून एकदम सराईत पणे करतो..दादा साहेब, राजनंदिनी, तो खबर्या कोण होता व त्याची फॅमिली, आणि जालिंदर व झेंडे.......एकदम कूल!
काहीतरी मोठ्या स्कीम्स,
काहीतरी मोठ्या स्कीम्स, डावपेच वगैरे चालू आहे ना? या पुढच्या एपिसोड मधे तर १० मिनीटे झाली अजून त्यांची बेडवर भंकस सुरू आहे. पुन्हा ते प्रेम आहे, पूर्ण विश्वास आहे वगैरे दळण सुरू झाले.
ईशाने ती प्रेग्नंट असल्याचे कोणाला सांगितले नाही? मग मागच्या एपिसोड मधे तिचे आईवडील, जयदीप, मायरा "या अवस्थेत तिला त्रास देउ नका" वगैरे का बोलत होते? आणि ती प्रेग्नंट आहे हे तिच्याआधी विक्याला कसे कळाले?
विक्रांत ने आधी डॉ ला विचारले
विक्रांत ने आधी डॉ ला विचारले व तिला जाऊन सांगितले....तिला तोपर्यंत "काहीच" कल्पना नव्हती !!!!
आणि ते सो कॉल्ड डावपेच व प्लॅन्स आता एकदम निष्प्रभ झाले आहेत...फक्त आईसाहेब कंसर्न्ड आहेत... की आता कसे काय!!
आज ती व्हेग बोलणारी देवी वाली बाई येणार आहे........! ती एकदम ओरडून व दटाऊन मग अगदीच जनरल स्टेट्मेंट्स करते......!!
सॉन्या एकदम ललिता पवार,
सॉन्या एकदम ललिता पवार, शशिकला, नादिरा वगैरे मोड मधून आशा काळे, जयश्री गडकर मोड मधे कशी आली? एकदम "ती लाजून पदराशी चाळा करत आत पळाली...." छाप वागणे सुरू आहे शब्दश: जयदीपही कधीचाच मैने प्यार किया मधला मोहनीश बहलचा हम आपके है कौन मधला झालाय.
हुशार, सुंदर व आणीक एक काहीतरी >> गोड, प्रेमळ, सुंदर आणि हुशार म्हणे. यातील पहिल्या तीन विशेषणांवर अनेकांचे मतभेद असतील, पण चौथ्याबद्दल जागतिक एकमत असेल, विरोधात
बाळाचे बाबा खुनी आहेत हे विसरल्चे सगळे. >> अमा, स्पॉट ऑन! विक्रांत ने खून केलेत हे सगळ्यांना माहीत आहे, तर अधूनमधून विसरल्यासारखे का वागत आहेत हे लोक? डाउट ईशा राजनंदिनी आहे का यावर ठीक आहे. विक्या खुनी असण्याबद्दल कोणालाच शंका नाही ना?
काल ईशाचे आईवडील सकाळी तिच्याकडे आले. ते दाखवायला एक रॅण्डम रस्त्यावरचा ट्रॅफिक शॉट होता. एक सायकलवाला कॅमेर्याच्या अगदी जवळून गेल्याने तो शॉट लक्षात राहिला. नंतर एडिटिंग च्या महानपणामुळे तो शॉट मधेच एकदा विक्या व ईशा वरून खाली गोड बातमी सांगायला येताना मधे घुसडला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मग आज सकाळी पुन्हा तो सायकलवाला अजून तेथूनच चाललेला आहे. ये पल जैसे थम गया है असेच जणू आपल्याला सांगत असावा दिग्दर्शक. रस्त्यावरचे ट्रॅफिक कथेत कोणीतरी कोठेतरी जात असले तर दाखवतात. सगळे एकाच घरात असतील तर मधेच रॅण्डम रस्त्यावरची वाहतूक कशाला?
ईशाच्या पोटात ब्रो इन लॉ चे बाळ वाढत आहे याचा दुसरा अर्थ काय आहे माहीत आहे का? असे सोन्या जयदीपला विचारत आहे. अरे पण त्याला त्याचा पहिला अर्थ आधी सांगा कोणीतरी. म्हणजे मग दुसर्या अर्थाचा कन्सेप्ट कळेल त्याला.
तिने म्हणे विक्याला चुकांसकट स्वीकारले आहे. अरे पण तुमचे काय बाकीच्यांचे?
या सगळ्या गदारोळात ईशा समोरचा गहन प्रश्न "राजनंदिनी, मी तुला ताई म्हणू, की काय म्हणू?"
फारेंड एकदम धमाल व करेक्ट
फारेंड एकदम धमाल व करेक्ट लिहिलय..
फारेण्ड
फारेण्ड
ईशाच्या पोटात ब्रो इन लॉ चे
ईशाच्या पोटात ब्रो इन लॉ चे बाळ वाढत आहे याचा दुसरा अर्थ काय आहे माहीत आहे का? असे सोन्या जयदीपला विचारत आहे. अरे पण त्याला त्याचा पहिला अर्थ आधी सांगा कोणीतरी. म्हणजे मग दुसर्या अर्थाचा कन्सेप्ट कळेल त्याला.>> मला तिसरा अर्थ कळतोय. आता जयडु/यडू इश्श्य म्हणून आत पळेल कां?
फारएण्ड सही लिहीलंय
फारएण्ड

सही लिहीलंय
Pages