माझे मन पाही

Submitted by पाषाणभेद on 9 May, 2019 - 22:59

माझे मन पाही विठ्ठल मुर्ती
सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१||

नाही मज वेळ जाण्या राऊळा
नच पूजा केली कधी काळां ||२||

रमलो संसारी विना विचार
भाव भक्तीचा केवळ उपचार ||३||

नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी
पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४||

पाषाणभेद
०९/०५/२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह! खूप छान!

रमलो संसारी विना विचार
भाव भक्तीचा केवळ उपचार || मस्त.

दुरुनी उराउरी भेटण्याची कल्पना आवडली.