मानवा

Submitted by T. J. Patil on 3 May, 2019 - 12:25

मानवा...।

मी पहातोच आहे
वरूनी तुला हमेशा
तुझ्या कारनाम्यांचा
बेधुंद हा तमाश्या

तुला निर्मिले मी
जिव ओतून सारा
तुझ्या भरवश्यावरी हा
सर्व मांडला पसारा

वगळून सर्व प्राणी
दिली तुला मी भाषा
तू वागशील शहाणां
होती मनांत आशा

वरदान हास्य वदनाचे मी
तुलाच दिले पामरा
निर्मून धर्म जाती
तू चेतला निखारा

कधी न म्हटले तुला मी
तू करावीस माझी पूजा
माजवून स्तोम धर्माचे
मलाच दिली तू सजा

कधी दिले तुला मी
फर्मान धर्मयुद्धाचे...?
तू तुझ्या हव्यासापोटी
सडे शिंपले रक्ताचे

कल्याण जगीचे साधण्यां
तुला दिली मी बुद्धी
तू हिकमती असा निपजला
तू तुझीच केली वृद्धी

हो आता तरी शहाणां
एव्हढेच सांगणे हाती
अश्राप मुक्या सजीवांचे
नको शाप तुझ्या माथी..।

...... टी.जे.पाटील

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू नच मला निर्मिले
मीच तुला कल्पिले
दगडा त्या स्थापुनी
शेंदूर त्या लाविले
मी तूझा निर्माता
तू नसे माझा पिता
जरी देव तू आहेस
लपून कोठे बैसलास
तुला कोंडले राउळा मंदिरात
तिथे तू रहावेस निवांत
तुझी गरज लागते कधी
तेव्हा करतो तुझी आरती.