पत्र १

Submitted by विजय देशमुख on 25 April, 2019 - 12:09

प्रिय आई व बाबा,

खरं तर आजकाल पत्र कोणी लिहित नाही, पण मला त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, म्हणुन लिहितोय. तुम्ही दोघही कृपया गैरसमज करुन घेउ नका.
तसं पाहिलं तर मी मागच्याच आठवड्यात लग्नाला आलो होतो, पण कुठुन दुर्बुद्धी झाली अन लग्नाला आलो असं वाटु लागलय. नाही नाही... प्रियाच्या लग्नात माझ्या लग्नाबद्दल गोष्टी चालु होत्या, त्याबद्दल मी अजिबात नाराज नाही. पण...

मला आपल्या कित्येक नातेवाईकांनी "खुप कष्ट घेतले हो सुरेश रावांनी..." असं दयापुर्ण म्हटलं त्याचीच दया येत होती. नेहमीप्रमाणे बाबांनी "खुप कष्ट पडले हो आम्हाला सुदेशच्या इंजिनिअरिंगसाठी...." ह्या वाक्याची किमान शंभरी तरी पुर्ण केलीच. मला तुम्ही कष्ट केलेत, याबद्दल शंकाही नाही आणि तुम्ही ते फक्त एक कर्तव्य म्हणुन केले असही वाटत नाही. तुम्ही माझ्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला आणि त्यासाठी तुम्ही बरीच काटकसरही केली.

पण या सर्व गोष्टींचा मी अभिमान बाळगावा की सहजपणे एज्युकेशन लोन मिळत असतांनाही मी बाबांच्या लोन न घेण्याच्या निर्णयाला विरोध करुन ते घेतले नाही याची खंत बाळगावी हेच समजत नाही आहे. नातेवाईकांच्या नजरेत मी बाबांच्या आशा-आकांक्षा मारुन टाकणारा दुष्ट मुलगा आज इंजिनिअर झाला एकदाचा ... आता सुरेशरावांचा त्रास संपेल... असं काहिसं दिसु लागलं होतं. मला आताशा माझीच दया, किव, आणि स्वतःविषयी थोडीशी घृणाही वाटु लागली आहे.
हे कर्ज (पैशांचं नव्हे) थोडं हलकं व्हावं म्हणुन मी तुमच्या खात्यात माझ्या शिक्षणाचा पुर्ण खर्च, अगदी व्याजासकट पाठवला आहे. तुमच्या कष्टांची ती किंमत मुळीच नाही, पण तुम्ही मारलेल्या स्वतःच्या इच्छा त्यातुन पुर्ण करता आल्या, तर मला थोडं बरं वाटेल.
मला नेमकं काय म्हणायचं आहे, ते प्लिज समजुन घ्याल.

तुमचाच,
सुदेश.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगला निर्णय.
तुझ्यासाठी आम्ही किती खस्ता खाल्ल्या रडगाणे आयुष्यभर ऐकून घेण्यापेक्षा आपला १८+ नंतरचा शिक्षण (झालंच तर अन्न वस्त्र निवारा इतर) खर्च व्याजसहीत देऊन टाकावा.
त्याच्याआधीचा मागत असतील तर तेदेखील शक्य होईल तेव्हा देऊन टाकावे आणि त्यांचे नाव आपल्या नावातून काढून टाकावे, परत कधी भेटू बोलू नये.
मग काही भिकारचोट लोकं आईने जन्म दिला, दूध पाजले, शिशु साफ केली वगैरे चालू करतील. अशांना एक दमडीदेखील देऊ नये Lol