भाग १
https://www.maayboli.com/node/63469
भाग २
https://www.maayboli.com/node/69583
"तर बाई, असा आपला परिवार."
तोपर्यंत मी वेगळ्याच जगात तरंगत होते... आजीने ज्या गोष्टी सांगितल्या त्या डोळे विस्फारून ऐकत होते.
"आजी, स्ट्रेंज आहे हे सगळं."
"म्हणजे ग?"
"म्हणजे, विलक्षण... अगदी वेगळंच... लाईक अ मुवि."
"मग, पटवर्धन सगळ्या पंचक्रोशीत फेमस होते, आणि त्यांचे कारनामेसुद्धा. काय मेले एक एक नमुने होते. या माणसांनी तर कधीच सुख दिलं नाही आम्हाला."
"या महेशला सांगितलं, जा बाबा, तू तरी बाहेर जा, शिकून मोठा हो... पण नाहीच...यालाही पिंपळगाव सोडवलं नाही. एकटा मोहनच बिचारा बाहेर निघाला, आणि नाव कमावलं हो."
"आजी एक विचारू?"
"विचार ना."
"बाबा असाच होता का ग लहानपणापासून..."
"नाही ग, खूप हट्टी, संतापी आणि खोडकर होता, गजाननाचे काय हाल करायचा म्हणून सांगू."
"मग, का असा बदलला बाबा."
"काय माहिती. मोठा झाला, आणि खरंच ग... इतकी सगळ्यांची काळजी घ्यायचा ना... यायचा ना, तर आधी फोन करून विचारायचा, काय आणू? आणि काही नाही म्हटलं तरी येताना गाडी भरून जाईल इतक्या वस्तू घेऊन यायचा.
तुझी मोठी ताई, अपर्णा. तिला परदेशी जायचं होतं, तर याने किती उपदव्याप केलेत, तोड नाही."
"माहितीये. मम्मा कशी चिडायची तुला माहीत नाही. दोन महिने तिच्यासोबत रशियाला जाऊन राहिला होता. म्हणे तिला जोपर्यंत सवय होत नाही, तोपर्यंत राहीन बरोबर."
"पोरी, बाप म्हणजे सोनं होता तुझा. अगदी सोनं. सगळं सोडून इकडे आला, नवीन विश्व तयार केलं... कधी जुन्याच लोभ धरला नाही."
"आजी,".माझ्या डोळ्यातलं पाणी मोठया कष्टाने आवरत म्हणाले. "मी येऊ का ग पिंपळगावला?"
"अगबाई, आजी घाबरून म्हणाली. नको म्हणू असं, तुझी आई म्हणेल, पोरीला फूस लावली म्हातारीने. एकदा असाच विषय निघाला होता, तर केवढं तांडव केलं होत माहितीये. माझ्या पोरीवर पिंपळगावची सावलीही पडू देणार नाही, असं म्हणाली ती."
"मी समजावेन तिला."
"तू समजव, आणि मग ये. मला म्हातारीला त्रास नको."
"आजी.आवरलं सगळं. चल, विमान पकडायचंय..."महेश दादा तिकडून आला.
"धन्यवाद तुम्ही आलात..." मम्मा अचानक येत म्हणाली.
"कसं येणार नाही, पोरगा गेला अचानक," आजी डोळे पुसत म्हणाली.
"अरविंद, यांचं सामान गाडीत ठेवा." नमस्कार करते. मम्माने पाया पडल्या.
"सुखी रहा. काळजी घे. सायली निघते हं."
"आजी, थांब, मीही पाया पडते."
"बरं बाई."
मी पाया पडले.
"चल ग छोटी, निघतो."
"काय दादा, छोटी नाही. सायली."
"तुला शेवटी भेटलो होतो ना, तेव्हा छोटीच होतीस, मग छोटीच हाक मारायचो."
आईला हे आवडलं नसावं बहुतेक.
आणि ते सर्वजण निघाले. घर पुन्हा सुन्न झालं.
------------------------------------------------
बाबा असा का झाला, मी रात्री विचार करत पडले होते.
'बाबाच्या कॉलेजनंतर त्याने वर्षभर गॅप घेतला. तेव्हा तो पिंपळगावात परत गेला. अक्षरशः वर्षभर त्याने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं.
कारण काय?'
कळत नाही.
अ ट्रान्सफॉर्मेशन... आणि तेही इतकं जास्त.?
आजीने बाबाच्या ज्या कथा सांगितल्या ना, मला तर विश्वासच बसत नव्हता.
मारामाऱ्या करण्यापासून ते लोकांशी तासन तास वाद घालण्यापर्यंत, हुशार होताच पण प्रचंड विचित्र.
बाबाचा विचार करतच मला केव्हा झोप लागली कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले. गेटवरच विश्लेष उभा दिसला.
'ओह गॉड, मला आता याला फेस करायचं नाहीये.' मी मनाशीच पुटपुटले.
मी वळणार, तेवढ्यात त्याने मला बघून हात हलवला.
मीही कसनुसं हसून हात हलवला.
तो उड्या मारतच माझ्याकडे आला.
"तुझ्या बाबांचं ऐकून वाईट वाटलं."
"मी फक्त मान खाली घातली."
"मी तुला मेसेज करणार होतो, पण..."
"तू ब्लॉक होतास.."मी म्हणाले.
तेवढ्यात एक मुलगी त्याच्याकडे आली.
"कम ऑन, वी आर लेट."
ती त्याला ओढतच घेऊन गेली.
"आय विल कॉल यु," तो जाता जाता म्हणाला.
"गो टू हेल," मी ओरडले. "बास्टर्ड."
पण मी का चिडले? मला खरंच हे नातं हवं होतं?
आय डोन्ट नो.
मी क्लासमध्ये गेले. कशाचं लेक्चर चालू होतं काय माहीत. मी फक्त जाऊन बसले होते.
"सायली पटवर्धन," शिपाई आला. डिरेक्टर मॅम बोलवतायेत.
"मिस सायली," आणि लेक्चररने बाहेर अंगठा दाखवला.
डिरेक्टर सी एच पटेल. बाबांची आणि त्यांची चांगली ओळख ओळख होती.
"मे आय कम इन मॅम?"
"सायली, कम."
मी समोर बसले.
"तुझ्या बाबांचं कळलं. अ नाईस अँड वाईस पर्सन!"
मी मान हलवली.
"कॉफी घेणार?"
"नो थँक्स."
"इट्स ब्लॅक कॉफी, अँड युवर ब्रँड."
मी चरकलेच.
"तुझ्या बाबानेही कधी ही गोष्ट तुला सांगितली नसेल, आणि मीही नाही. पण...
मोहन हा माझा चांगला मित्र होता... अगदी मी कॉलेजला आल्यापासून. येस, तो तेव्हा जॉबला होता, सीसीआयमध्ये, पण आमची भेट झाली होती, व्हायोलिनच्या क्लासला.
खूप शांत आणि विचारी माणूस. हुशार सुद्धा. अतिशय सुंदर वाजवायचा व्हायोलिन. अगदी तू वाजवतेस तशी!"
मी चरकले. मिस पटेल इतकी इमोशनल असेल बाबाविषयी हे मला कळलंच नव्हतं.
"गो, टेक या ब्रेक फ्रॉम कॉलेज. तुला पूर्ण महिना देतेय मी, कल्चरल नाईटच्या आदल्या दिवशी मला तुझा निर्णय कळव."
"मॅम माझी अटेंडन्स?"
"आय विल टेक केर ऑफ इट. पण मला तू नीट हवी आहेस, कळलं?"
मी होकारार्थी मान डोलावली.
"नाऊ गो."
आणि मी केबिनमधून बाहेर पडले, सरळ घरी निघाले.
रात्री मम्मा उशिरा घरी आली. मी तिच्यासाठी जेवणाला थांबले होते. जनरली तिच्याशी काही बोलायचं असेल तरच मी थांबते.
जेवताना कुणीही काहीही बोलत नव्हतं.
"मम्मा, मला काहीतरी सांगायचंय."
"हं,"
"मी ब्रेक घेतलाय कॉलेजमधून, महिनाभरासाठी."
"ओके. काही नसेल तर मार्केटिंगला जॉईन हो."
"नाही नाही, आय वॉन्ट टू ट्रॅव्हल समव्हेर."
"व्हेर?"
"पिंपळगाव!"
वा वा, नक्की पुर्ण करा.
वा वा, नक्की पुर्ण करा. पुभाप्र.
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद अज्ञात, इतकी सुंदर
धन्यवाद अज्ञात, इतकी सुंदर सुरवात केलेली.. कथा अर्धवट सोडल्यावर रुखरुख वाटते.
Pages