कुत्र्याच्या गमतीजमती

Submitted by रत्न on 17 April, 2019 - 05:26

माझ्या आजोळी मोत्या नावाचा कुत्रा होता. भटक्या लोकांकडून पिल्लू आणलेला. अतिशय इमानी कुत्रा. घरातल्यांसाठी अगदी मायाळू प्राणी तर बाहेरच्या लोकांसाठी तेवढाच डेन्जर. तो विशिष्ठ पद्धतीने भुंकू लागला तर घराकडे कोणी नवीन आले समजावे. एकदा तर त्याने चोरही पकडून दिले होते. आजोबांसोबत शेतावर वगेरे जायचा. धान्य टीपणार्या चिमण्या उडवायचा. आजोबा त्याला मुलासारखे जपत. त्याच्याशी गप्पा करत. कोणी आजारी पडले तर तो शेजारी बसून राही. आजोबांच्या शेवटच्या दिवसात त्यानेही खाणेपिणे सोडले होते. (तेव्हा तो दहा वर्षांचा होता) आजोबा निवर्तले, नंतर चारच दिवसात तो ही वारला.

लहान असताना त्याने गंमतच केली होती. झाले काय, तो चपला चावत असल्याने त्याला आजीने फटका दिला. तर घाबरुन कुंई करत तो कुठेतरी धावत निघून गेला. संध्याकाळपर्यंत शोधले, नंतर काळोख पडला पण तो कुठे दिसला नाही. दरम्यान आजोबांचे आजीला भरपूर ओरडून झालेले. सगळ्यांना वाटले हा दूर पळून गेला, परत यायचा नाही. रात्री नऊच्या सुमारास आजीला घरामागच्या रचलेल्या लाकडांमागे खुडबुड ऐकू आली. आजोबांना बोलावून ते विजेरी घेऊन पाहतात तर ते पिल्लू! त्यानंतर त्याला कोणीच मारले नाही. ओरडले की ही गोष्ट करु नये असे तो समजायचा Happy

तुमच्याकडे कुत्रा असेल, तर त्याच्या गमतीजमती, घटना, प्रसंग इथे लिहिता यावे यासाठी काढलेला धागा. त्यांच्या सवयी, training, घ्यावी लागणारी काळजी , vet appointments याबद्दल शंका इथे विचारल्या तरी चालेल

मायबोलीवर मला असा धागा सापडला नाही, असल्यास इथे सांगा
धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुत्रे Rofl

मला कुत्र्यांची प्रचंड भीती वाटते, पण गम्मत अशी झाली आहे की माझ्या होणाऱ्या सासरी कुत्रा आहे. खरेतर फक्त ह्या एका कारणावरूनच मी लग्नाला नकार देणार होते, पण फक्त ह्या कारणामुळे नको म्हणने रुचले नाही. तसेही हल्ली कुत्री बरी पण माणसे नको वाटते.. तेंव्हा एखादे चांगले माणूस भेटलेय आपल्याला तर फक्त कुत्र्यासाठी नको का बोलावे न

समाधी,
माझ्या 1ल्या धाग्याच्या 1ल्या प्रतिसादासाठी धन्यवाद..!

जाईल भीती हळूहळू

जाईल भीती हळूहळू>>> हो, तो पण हेच सांगतो मला की त्यांच्या घरी आल्यावर माझी कुत्र्यांची भीती जाईल, अर्थात त्याच्या सोबतीने भीती निघून जाईल असे मलाही वाटते

हा माझा सगळ्यात आवडता धागा असणार आहे. मी मागे दुसऱ्या एका धाग्यावर अमाना सुचवलं होत की आपण पाळीव प्राण्यांच्या गप्पांचा धागा काढुया. पण राहिलंच.

मी इथे पडीक असेन. खूप किस्से आणि गप्पा आहेत.

मला कुत्रं आज्जीबात आवडत नाही. पण आमच्या शेजार्‍यांकडे एक राणी नावाची कुत्री होती तिची मज्जा सांगतो.
शेजारच्या घरातले काका-काकी जॉबला जायचे आणि त्यांची मुलेही शाळा-कॉलेजला जायची. पण त्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळा अशा होत्या की राणी फारतर १-२ तासच घरी एकटी असे. त्यांनी राणीला दिवसभर एकटे सोडुन जायचा प्रसंग फार क्वचीत यायचा जो त्या राणीला अज्जिबात झेपत नसे. ती घरात कोंडलेली राणी भुंकुन-भुंकुन आमचा जीव नकोसा करुन टाके. एकदा मात्र मज्जा झाली. राणीला एकटे टाकुन तिच्या घरचे बाहेर गेले आणि राणीने दिवाणखाण्यातील दिवाणवरच्या गादीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. काका-काकी घरी आले तेव्हा सगळ्या घरात कापुसच-कापुस..! Proud
नंतर एकदा राणीला एकटी घरी सोडुन गेल्यावर राणीने त्यांचा टी.वी. फोडला होता. Biggrin
राणीला ते कधीच फिरायला नेत नसत फार्फार तर बाहेर अंगणात बांधुन ठेवत. तिला रस्त्याने येणा-जाणारा एखादा कुत्रा दिसला तर भुंकुन-भुंकुन आकाश-पाताळ एक करायची त्यामुळे कोणीच कुत्रा तिच्या नादाला लागत नसे. नंतर कधीतरी मला एक रोमिओ कुत्रा तिच्या आस-आस दिसायचा. त्यानंतर फार-फार दिवसांनी एकदा राणी त्यांच्या घरातील बेडरुम मधे गेली आणि तिथुन ८ दिवस झाले तरी बाहेर आलीच नाही. बेडरुम मधे कुणालाच येऊ देत नव्हती. काका-काकी आणि त्यांची मुले त्या रुम मधे जायचा थोडा जरी प्रयत्न करु लागले तर वस्स्कन भुंकत अंगावर यायची. मग काकी तिला दरवाजातुनच खाणं आत ठेउन दार लावुन घ्यायच्या. ८ दिवसांनंतर कळाले की राणीला ४ पिल्ले झालीत. Proud

मग आम्ही पिल्लं पहायला गेलो तर त्यातली २ त्या रोमिओ कुत्र्याच्या रंगाची होती Wink आणि इकडे काकी सर्वांना सांगत होत्या - "अहो काय सांगु बाई.. आम्हाला तर राणीला दिवस राहिलेले सुद्धा कळालं नाही..!" Biggrin

आमचा खंडू नावाचा कुत्रा अठरा वर्षे जगला. आमच्या प्रत्येक फोटो अल्बम मध्ये तो आहे. कधीच कुणाला चावला नाही पण आवाज इतका दणकेबाज होता की कुणाची हिंमत व्हायची नाही पायऱ्या चढायची. शेजारच्या लोकांच्या कोंबड्या पिटाळून लावायचा, पण घरच्या कोंबड्यांना काही करत नसे. बरोबर दुसऱ्या कोंबड्या ओळखून पिटाळायचा. त्याला अंगणातच पुरले व वर मोगऱ्याचे झाड छान वाढलं.
नंतर बरीच बिबट्याने धरुन नेली.
मी कधी सहा महिन्यांनी घरी गेलो व अंधारातच पोहोचलो तरी धावत येऊन अंगावर उडी मारायचा व खूप खूप आनंद व्यक्त करायचा. खरंच इमानी जनावर होते ते.
आताचे एक साहेब जोपर्यंत मारी बिस्किटे देत नाही तोवर नजरेला नजर देत नाही, बिस्किटे दिली तर मग लगेच अंगावर उड्या मारणार. आणि सकाळी सकाळी शिवाशिवीचा खेळ खूप आवडतो. चेंडू पळवायला तर एकदम तरबेज.

dj हिज हायनेस,
छान किस्से

गादीच्या चिन्धड्या, tv फोडला> Rofl

आमची शुभ्रा म्हणजे लाडाचं बाळ आहे...दरवाजा वाजल्यावर भंकणे, बाकी खारींच्या मागे पळणे आणी झोपणे एवढेच तिच्या आयुष्याचे साधे गणित आहे...
तिला तुपातले पदार्थ खूप आवडतात...मी सुद्धा साजुक तुपातला शिरा, पुरणपोळ्या, गरम भात याचा पहिला घास तिला भरवते. तिचे डोळे कुतुहलाने भरलेले आणि सुंदर आहेत!
मागच्याच वर्षी ती खूप मोठ्या अपघातातून बाहेर पडली आहे..एका गाडीने धडक दिल्यामुळे तिला Fractures झाले होते...
आता मजेत आहे!!
काही फोटोज देतेय...
IMG_4478.JPGIMG_4475.JPG2017-03-16 17.00.19.jpg2017-01-02 14.04.45.jpgshubhra-profile.JPGIMG_0478.JPG

आमच्याकडे आमची अशी पाळलेली नव्हती पण आम्ही आवडीने खायला द्यायचो म्हणून गल्लीतील कुत्री असायची घराच्या भोवती.
तेव्हा भटक्या कुत्र्यांचा इतका त्रास नव्हता आणि आमचा एरिया तसा सुनसान होता त्यामुळे रात्री राखण म्हणून कुत्री आजूबाजूच्या परिसरात असणे हे चांगलं होतं.
त्यातला एक टॉमी होता, माझा धाकटा भाऊ रांगत्या वयाचा असताना टॉमी खेळत असे त्याच्याशी. तामी तामी करत हा इतके त्याचे हाल करायचा, त्याच्या पाठीवर बसायला बघायचा, शेपटी ला धरून उभे रहायचा पण टॉमी ने कधीच त्याला काही केलं नाही.
अजून एक स्वीटी नावाची पील्ली होती, तिला माझ्या चपला पळवायची जाम सवय होती, मी खेळताना चपला काढून ठेवल्या की गायब,मग तिच्या लपण्याच्या जागी सापडत असत
एक जिमी होता, तो एकदा तोंडात काठी घेऊन पळत येत होता आणि गेटमधून जाताना काठी अडली आणि स्पीड मध्ये असल्याने जो काही चमत्कारिक पडला की ते आठवलं तरी अजून हसू येतं

I want my children to have a dog
Or may be two or three
They'll learn from them more easily
Than they will learn from me.

A dog will teach them how to love,
And have no grudge or hate
I'm not so good at that myself
But a dog will do it straight

I want my children to have a dog,
To be their pal and friend
So they may learn that friendship
Is faithful to the end.

There never yet has been a dog
That learned to double cross
Nor catered to you when you won
Then dropped you when you lost.

- Martin Hale (I am not 100% sure about the poet.)

Boka and kutta are एकमेकांचे enemies. सो कुत्ता कायकू तंगडी वर करेगा बोक्याके writingपे.

Submitted by उपाशी बोका on 17 April, 2019 - 20:53. >>>>>>.थँक्स. खूप सुंदर कविता आहे. मी माझ्या dog lovers गृप मध्ये शेअर केली

माझ्याकडे बिगल आहे. आता एक वर्षाचा होईल. त्याचा बेस्ट फ्रेंड गोल्डन रिट्रीव्हर आहे. दोघांच्या वयात एक महिन्याचा फरक आहे. आम्ही त्यांना वॉकला बरोबर नेतो. हॉस्टेलला बरोबर ठेवलं होतं. त्यांच्या दोघांच्या लंच डेट्स असतात ( म्हणजे मी त्याला माझ्या बिगलबरोबर जेवायला बोलावते किंवा ते माझ्या बिगलला बोलावतात). ह्युमन बेस्ट फ्रेंड्सच्या सगळ्या भावना त्यांच्यामध्ये दिसतात. दोघेही त्यांच्या दोस्तीमुळे सोसायटीमधे अगदी फेमस आहेत. संध्याकाळी क्लब हाऊसजवळ दंगा घालतात तेव्हा छोट्यांबरोबर मोठे पण गंमत बघायला उभे असतात. Happy

इथे कोणी बिगल ओनर आहे का? आपल्या इथे बिगल कमी असतात. काही टिप्स हव्या होत्या. भयंकर attitude आणि strong personality असते या दंगेखोर मुलांना.

नाही बाबा.. असल्या चतुष्पाद प्राण्यांच्या मुलांचे अ‍ॅटिट्युड्स संभाळण्यापेक्षा बरेच महत्त्वाचे उद्योग आहेत.

छान धागाय! Happy

नवीन Submitted by माउ on 17 April, 2019 - 16:18 >> कस्ली गोडेय शुभ्रा! Happy नाव शोभतं अगदी. पाहूनच तल्लख डोक्याची वाटतेय. कान उभे आहेत, चांगली राखण करत असणार. मला खूप आवडली. तिला एक लुसलुशीत पुरणपोळी द्या माझ्याकडून. Happy बादवे तिची ब्रीड कोणती?

एक जिमी होता, तो एकदा तोंडात काठी घेऊन पळत येत होता आणि गेटमधून जाताना काठी अडली आणि स्पीड मध्ये असल्याने जो काही चमत्कारिक पडला की ते आठवलं तरी अजून हसू येतं>> मी हे इमॅजिन करुन पोट धरुन हसतेय! Rofl

Submitted by उपाशी बोका on 17 April, 2019 - 20:53>> अगदी गोऽऽड कविताय Happy

बिगल>> अतिभयंकर खोडकर आणि खेळकर असतात असं ऐकलंय.. तुमच्या बिगलचे फोटो आणि किस्से टाका ना! Happy नाव काय ठेवलंत? Happy

माझा कुत्रा मी त्याच्या प्लेटला हात लावत नाही तोवर त्यातील अन्न खायचा नाही. माझ्या जर वडील ओरडले तर कॉट खाली जाऊन त्यांच्यावर भुंकायचा, कारण एकदा ते माझ्यावर ओरडत असतांना तो भुंकला तर त्यालाच फटका बसला, तेव्हा पासून असं काही झाले कि कॉट खाली जाऊन भुंकायचा म्हणजे त्याला मार पण नाही बसायचा आणि त्याला भुंकता पण यायचे.

माबोवरचे कुत्राविषयक धागे ( मला सापडलेले )

स्नोई
https://www.maayboli.com/node/12394

कुत्र्याविषयी थोडे
https://www.maayboli.com/node/22851

वान्या- भाग १ (पुढचे भाग धाग्याखाली सापडतील)
https://www.maayboli.com/node/1633

कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल???
https://www.maayboli.com/node/51614

पेट डाॅग घ्यावा?
https://www.maayboli.com/node/58190

अजून असतील तर सुचवावेत Happy

भयंकर attitude आणि strong personality असते या दंगेखोर मुलांना. छान वाटले हे वाचून!

कुत्रा इतका इमानी असूनही बदनाम केले जाते बिचाऱ्याला. पिसाळलेल्या कुत्र्या अशा शिव्या देतात लोकं.

माउ,
शुभ्रा मस्त आहे Happy 1ल्या photo मधे मलूल दिसतेय... लवकर बरी होऊदे

आशुचँप ,
खरेच काही भटकी कुत्री जीव लावतात...! पण काही वाईट असतात.. चपला, pipe, झाडेझुडपे, पाळलेली मांजरे, गाडीचे tyre, कोंबडे, कचर्याचा डबा याची नासाडी करतात! Sad
मला 2हीचा अनुभव आला आहे

उपाशी बोका,
छान कविता Happy
कोणी कवी ही कविता मराठीत बनवील का ? मला भाषान्तर नको आहे, भावना मांडून हवे आहे

'सिद्धि',
धन्यवाद

मीरा,
Beagle - golden retriever ची male -female अशी मैत्री जमली आहे का..? असे असेल तर एक सांगतो - beagle retriever hybrid पिल्ले छान दिसतात Happy

उडाणटप्पू,
फारच गुणी कुत्रे होते ( होते ..?)

द्वादशान्गुला,

बरे झाले धागे दिलेत.. आता वाचुन काढतो..! धन्यवाद

Beagle - golden retriever ची male -female अशी मैत्री जमली आहे का..? असे असेल तर एक सांगतो - beagle retriever hybrid पिल्ले छान दिसतात Happy. >>>>. नाही, दोन्ही मेल डॉग्ज आहेत. तसेही दोघांच्या आकारात प्रचंड तफावत असल्यामुळे पिल्लं शक्य नाहीत. आणि अतिशय महत्वाचे म्हणजे दोघेही सर्टीफाईड प्युअर ब्रिड्स आहेत, त्यामुळे त्यांना प्युअर ब्रीड गर्लफ्रेंड्स शोधणार आहोत. माझ्या बिगलचे वडील तर इंटरनॅशनल डॉग शो मध्ये भाग घेतात ( एकदम खानदानी, यु नो Wink Proud )

बिगल>> अतिभयंकर खोडकर आणि खेळकर असतात असं ऐकलंय.. तुमच्या बिगलचे फोटो आणि किस्से टाका ना! >>>>> मला ऑफिसमधून लॅपटॉपवर माबो वापरायला वेळ नसतो. आयपॅडवरून काही कारणाने टाइप करू शकत नाही, त्यामुळे फक्त सेलफोनवरूनच माबो वापरते. इथून फोटो अपलोड होत नाहीत. काय वैताग आहे ना? पण मी पुढेमागे कधी फोटो नक्की दाखवेन.

देवकी, खरंच मुलांसारखेच असतात डॉग्ज. बिगल तर अति मस्तीखोर आणि खेळकर. मी त्याला आरशात दाखवून सारखं सांगते की look at yourself, you are a dog. Do not be stubborn like a human baby. त्याचे डॉक्टर गमतीने सांगतात की अति लाडाने त्याला आयडेंटिटी क्रायसिस झाला आहे Happy

Pages