कुत्र्याच्या गमतीजमती

Submitted by रत्न on 17 April, 2019 - 05:26

माझ्या आजोळी मोत्या नावाचा कुत्रा होता. भटक्या लोकांकडून पिल्लू आणलेला. अतिशय इमानी कुत्रा. घरातल्यांसाठी अगदी मायाळू प्राणी तर बाहेरच्या लोकांसाठी तेवढाच डेन्जर. तो विशिष्ठ पद्धतीने भुंकू लागला तर घराकडे कोणी नवीन आले समजावे. एकदा तर त्याने चोरही पकडून दिले होते. आजोबांसोबत शेतावर वगेरे जायचा. धान्य टीपणार्या चिमण्या उडवायचा. आजोबा त्याला मुलासारखे जपत. त्याच्याशी गप्पा करत. कोणी आजारी पडले तर तो शेजारी बसून राही. आजोबांच्या शेवटच्या दिवसात त्यानेही खाणेपिणे सोडले होते. (तेव्हा तो दहा वर्षांचा होता) आजोबा निवर्तले, नंतर चारच दिवसात तो ही वारला.

लहान असताना त्याने गंमतच केली होती. झाले काय, तो चपला चावत असल्याने त्याला आजीने फटका दिला. तर घाबरुन कुंई करत तो कुठेतरी धावत निघून गेला. संध्याकाळपर्यंत शोधले, नंतर काळोख पडला पण तो कुठे दिसला नाही. दरम्यान आजोबांचे आजीला भरपूर ओरडून झालेले. सगळ्यांना वाटले हा दूर पळून गेला, परत यायचा नाही. रात्री नऊच्या सुमारास आजीला घरामागच्या रचलेल्या लाकडांमागे खुडबुड ऐकू आली. आजोबांना बोलावून ते विजेरी घेऊन पाहतात तर ते पिल्लू! त्यानंतर त्याला कोणीच मारले नाही. ओरडले की ही गोष्ट करु नये असे तो समजायचा Happy

तुमच्याकडे कुत्रा असेल, तर त्याच्या गमतीजमती, घटना, प्रसंग इथे लिहिता यावे यासाठी काढलेला धागा. त्यांच्या सवयी, training, घ्यावी लागणारी काळजी , vet appointments याबद्दल शंका इथे विचारल्या तरी चालेल

मायबोलीवर मला असा धागा सापडला नाही, असल्यास इथे सांगा
धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बिगलचे वडील तर इंटरनॅशनल डाॅग शो मध्ये भाग घेतात >
मग वडील नाही हो पिताश्री तात असे काहीतरी म्हणा .. Proud Light 1

तुमचा beagle Lucky (नाव नाही) आहे
एवढे खानदानी घराणे, मग पिलू महाग पडले असेल
हौसेला मोल नाही हेच खरे Happy

चला तुमच्या beagle चा photo तरी दाखवा, खानदानी beagle निदान photoत पाहून सुखाने डोळे मिटेन (झोपेन) Proud

फोटो अपलोड होत नाहीत > अरेरे..!
सगळ्यान्नी आपापल्या पाळीव बाळांना (कुत्रे तरी कसे म्हणू) शुभरात्री (नाही समजले तर good night! Lol ) सांगा Happy

माझ्याकडे कुत्रा नाही आणि नातेवाईकांकडे किंवा फ्रेंड सर्कल मध्येही नाही, त्यामुळे बरेच अज्ञान आहे. एक बेसिक प्रश्न नेहमी पडतो. पाळीव कुत्रा असलेले सांगू शकतील . साधारण पिल्लू असल्यापासून ते तो जाईपर्यंत कुत्रा पाळला जातो मग त्याच्या तरुणपणी विशेषतः विणीच्या हंगामात त्याला नैसर्गिकरित्या जेव्हा एका जोडीदाराची गरज असते तेव्हा काय करतात? की असले पाळीव कुत्र्याच्या ह्या गरजा मालकाची इच्छा असेल तरच पूर्ण होतात?

द्वादशांगुला, शुभ्रा 'राज्यपाल्यम हाउंड' आहे...
तुमच्या कौतुकाबद्दल धन्यवाद!!
पुरणपोळी नक्की!!

साधारण पिल्लू असल्यापासून ते तो जाईपर्यंत कुत्रा पाळला जातो मग त्याच्या तरुणपणी विशेषतः विणीच्या हंगामात त्याला नैसर्गिकरित्या जेव्हा एका जोडीदाराची गरज असते तेव्हा काय करतात? >>>>>.
प्युअर ब्रीड कुत्र्याला तसाच / तशीच प्युअर ब्रीड पार्टनर मिळणं हे मंगळ असलेल्या आणि घरची गरिबी असलेल्या मुलीचं लग्न ठरण्याइतक अवघड असतं. त्यामुळे तुम्ही विचारलं तसं ते त्या कुत्र्याच्या मालकावर अवलंबून असते की मेटिंग करायचं की नाही. मेल डॉग ओनरला फरक पडत नाही, पण फिमेल डॉग ओनरसाठी आणि त्यातही ब्रिडिंगचा व्यवसाय करणाऱ्या ओनरसाठी हा अवघड प्रश्न असतो. माझा बिगल 1च वर्षाचा आहे आणि आम्ही लगेच न्यूटर करणार नाही आहोत कारण त्यामुळे वजन वाढणे किंवा बाकी हेल्थ इश्यूज येतात असं ऐकलं आहे. अजून व्हेटशी बोलणं झालेलं नाही. लकीली त्याच्या व्हेटकडे येणाऱ्या फिमेल बिगलने याच्याबद्दल विचारून ठेवलं आहे त्यामुळे आम्हाला विचार करायला वेळ आहे.

आमची गावठी कुत्री निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी मालकांवर अवलंबून रहात नाहीत. त्यांचा प्रश्न त्यांचा ते सोडवतात. पण शक्यतो कुत्री कुणी पाळत नाही. कारण अनेक रोमिओ धुडगूस घालतात.

आमच्या कॉलनीत , आमच्या बिल्डिंगमध्येच एका कुत्रीने ६ पिल्लांना जन्म दिला होता. तिचं पोट अगदी खपाटीला गेलं होतं आणि ती अतोनात भुकेली होती बहुतेक. मुसळधार पावसाची संततधार लागलेली होती. कुठे शोधणार अन्नं? मुंबईत नाले, तुडुंब भरुन वहात होते. त्या रात्री आमचं दूध नासलं मी त्या दूधाची भरपूर नासकवणी केली अन जाउन तिच्यापुढे ठेवली. त्यानंतर इतकी इमानी झाली. मला पाहून नेहमी शेपूट हलवे, लाडात येई.

माझी मुलगी पहिलीत असताना गल्लीतील आडदांड कुत्र्यांशी खेळत असे. त्यातला एक टोण्या कुत्रा तिला अक्षरशः घोड्यासारखा फिरवत असे. लोक भयचकित होउन बघायचे.

परवा फेज ३ हिन्जवडी मध्ये ( 'टोपीमिथुन' कंपनीकडे जाणारा रस्ता, तिकडे वाहनांची वर्दळ नसते) २४-२५ भटक्या कुत्र्यांची भर रस्त्यात मध्यभागी सभा भरली होती. गाड्या चुपचाप बाजुने जात होत्या.

काय डिस्कस करत असतील ती कुत्री? Proud

सामो गुड कर्मा. तुम्हास पुण्या मिळेल. समस्त भटके कुत्रे समिती तर्फे मी आपले आभार मानते.

>>सामो गुड कर्मा. तुम्हास पुण्या मिळेल. समस्त भटके कुत्रे समिती तर्फे मी आपले आभार मानते.>> हाहाहा अमा धन्यवाद तुम्हालाही.

सामो छान Happy

प्रकाश घाटपांडे,
बापरे!

किल्ली,
कुत्रासमारंभ असेल कुठलातरी Proud

कुत्रे फिरवणारयांकडे पाहून नेहमी एक प्रश्न पडतो,
यांच्या मागे गल्लीकुत्रे लागत नसतील का..?
हा उपद्रव टाळायला क य करता बरे..?
कुत्र्यासह जीवन घालवणार्यांनी अनुभव सांगावे

यांच्या मागे गल्लीकुत्रे लागत नसतील का..?
हा उपद्रव टाळायला क य करता बरे..?>>
दगड, काठी इ सोबत बाळगावं लागतं. मारायला नाही, घाबरवायला.

दगड, काठी इ सोबत बाळगावं लागतं. मारायला नाही, घाबरवायला. >>
खरेच घाबरतात..?
चौपाटीवर कित्येक कुत्रा मालक without काठी फिरताना दिसतात..
आणि कुत्र्यान्ची टोळी एक माणूस आणी काठीला घाबरेलच असे नाही.. कित्येकदा पाळिव मित्रही stray dogs वर धावुन जात असतील..
अशावेळी काय करता बरे..?
आणि लोक कुत्र्याला घेऊन ट्रेकवर, फिरायला कसे जातात..? कुत्र्याची सोय कशी होते..?
मला खूप curiosity आहे

टोपीमिथुन ही कंपनी इतक्या कोपऱ्यात आहे की मला तिथे सुट्टी घालवायला जावेसे वाटते.मी एकदा गेले होते.साधारण पणे जगाच्या अंताला आल्याचे फिलिंग आले.

त्याच कोपर्‍याच्या आसपास आम्ची कम्पनी आहे..
पावसाळ्यात डोन्गरवरचे ढग, मोर, जमीनीवर साप, भटकी कुत्री, मुन्गूस , असन्ख्य कीटक पाहावयास मिळतात..

<<दगड, काठी इ सोबत बाळगावं लागतं. मारायला नाही, घाबरवायला.>> मी अशा कुत्र्यांना ग्लुकोज बिस्किटांची लाच देतो. शहाण्यासारखी वागतात. Happy

एकदा दिवेआगरला गेलो होतो तेव्हा एका भुभुला सहज यु यु केल तर आल आन अस जाम चिकटल मला.कंपल्सरी पंजा देत राहिल. मग मी सुटका करुन घेण्यासाठी समुद्रावर गेलो तर आल माझ्या माग माग. मी समुद्रात गेलो तर माझ्या मागे आत पाण्यात आल. सोडेच ना मला. मग बर्‍याच काळाने त्याला एक भुभी भेटली मग मला सोडल.

किल्ले, आपण एका बोटीत गं.
अनू ये कधीतरी पाहुणचाराला. ह्या जगाच्याही पलिकडचं जग बघायला. आम्ही रोज असतो तिथे. तिथंही मंडई झालीये आता.

रत्न, मी कुत्र्याला रोज फिरायला नेणाऱ्या जमतीतली आहे. आम्ही ज्या टेकडीवर फिरायला जातो, तिथे 15-20 भटकी कुत्री आहेत (सकाळी बिस्किट्स आणि धान्य टाकून दिवसभरासाठी पुण्य कमावणार्या लोकांमुळे त्यांची संख्या वाढतेच आहे. ) या भटक्या कुत्र्यांव्यतिरिक्त रोज सकाळी आणि/अथवा संध्याकाळी फिरायला येणारी खानदानी कुत्री असतात. कारण माहीत नाही, पण अगदी निसर्गाने आखून दिल्यासारखी ती एकमेकांपासून दूर राहतात. भटक्या कुत्र्याची टोळी एकत्र बसलेली दिसते. बाकी सगळी पाळीव कुत्री एकमेकांशी खेळतात, एकमेकांना चेस करतात, एखाद्याची कार आली की जो आधी पोचला आहे तो मित्र कारमधून उडी मारेपर्यंत भुंकून गोंधळ घालतो. त्यांच्यात एवढी दोस्ती आहे, पण रोज एकमेकांना दिसत असून सुद्धा भटक्या कुत्रांकडुन कधी अशी काही रिऍक्शन आलेली पाहिली नाही. माझा कुत्रा पपी असताना मात्र उच्चनीच मानत नव्हता, तो स्ट्रे डॉगच्या मागे पळायचा, पण ते घाबरून जोरात पळून जायचे. या दोन गटांमध्ये मी गेल्या दीड वर्षात कधी दोस्ती झालेली पाहिली नाही.
आम्ही ज्या पेट फ्रेंडली रेस्तराँ मध्ये जातो, तिथे बरीच कुत्री आपापल्या ह्युमन बरोबर येतात, पण तिथे मात्र एकमेकांना ढुंकून पहात नाहीत. लाईव्ह म्युझिक असतं, त्या लोकांना या चार पायाच्या मुलांच्या दंग्यामुळे कधी कार्यक्रम बंद करावा लागला नाही.

मात्र नवीन एरियात काही कारणासाठी गेलो आणि बरोबर कुत्रा असेल तर त्या एरियातली भटकी कुत्री ओरडून गोंधळ घालतात. त्यावेळी मात्र फक्त घाबरवण्यासाठी एखादी छोटी छडी बरोबर बाळगावी लागते.

Pages