चला , वजन कमी करूया -- भाग २

Submitted by केदार जाधव on 16 April, 2019 - 01:55

आधीचा धागा एडीट करता येत नाही , म्हणून हा नवीन धागा Happy

थोडी पार्श्वभूमी ? (Background) हवी असल्यास खालील धागे पहा ही विनंती Happy

१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )
https://www.maayboli.com/node/48355

चला , वजन कमी करूया

https://www.maayboli.com/node/50148

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

आणि आजपासून गुण मोजायला सुरू करू. फक्त एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Happy

२६.०४.२०१९

केदार जाधव ८८/१००
अतरंगी १०९/१२०
राजकूमारी ६/१०

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे यादी..

व्यायाम आणि आहार दोन्हींचा ट्रॅक ठेवायला

बहुदा २००६-७ दरम्याने. एक GM डाएट म्हणून मी नवीन ऐकलेल. ऑफिस मध्ये दोघी तिघींनी केलेला.
७-८ दिवसांचा प्लॅन असतो
१ल दिवस - फक्त भाज्या
२ duwas- फक्त फळ
३ दिवस - भाज्या फळं
४ दिवस - केळी आणि दूध
५diwas- tomatoes Ani थोडासा भात
६ दिवस -
७ दिवस

आणि विशिष्ट पद्धतीने बनविलेले सूप असते ते कितीही घेऊ शकतो.

आता इतक्या वर्षानंतर मला पूर्ण sequence आठवत नाहीये नीट. पण असच crash diet.
त्यात तुमचं वजन/ फॅट्स दोन्ही कमी होतात. पण तुमची भूकच खूप कमी होते. Don ek महिने तरी त्यात जातात पूर्ववत भूक लागायला.

खूप कठीण होत विशेषकरून केळी - दूध आणि tomatoes che diwas.

Won't recommend it to anyone... On त्यावेळी हे एकदम बेस्ट वाटलेल.

७-८ दिवसांचा प्लॅन असतो. त्यात तुमचं वजन/ फॅट्स दोन्ही कमी होतात. >>
मराठीत त्याला "पी हळद नी हो गोरी" प्लॅन असे म्हणतात.

छान धागा.
४ दिवस - केळी आणि दूध>> अघोरी उपाय वाटतोय.
ते क्रॅश डायट अगदीच अघोरी वाटते मला..\अक्खा दिवस उसळच खा अन काय काय.
व्यायाम आठवड्यातून ४ दिवस (३/५- वीकडे, १/२- वीकेंड) असा केला तरी नियमित व्यायाम फायदे शरिराला मिळतात असे माझ्या फिटनेस ट्रेनर ने सांगीतले होते. रोज केला तर अ ति उत्तमच.
मागे माबो वर निरजा ने ४आठवडा अन्न तक्ता दिला होता. अजून ही माझ्या फ्रिज वर तो आहे. त्यात १ फळभाजी, पाले भाजी, मुग आमटी, तूर, कोशिंबीर वगैरे असे ओप्शन सकट सर्व आहे.

Pages