पाटील v/s पाटील - भाग १६

Submitted by अज्ञातवासी on 3 April, 2019 - 06:15

पाटील v/s पाटील - भाग १५
https://www.maayboli.com/node/68978

तप्त ऊन अंगाची लाहीलाही करत होतं. उन्हाच्या झळा, झळा भासत नसून ज्वाळा भासत होत्या.
"उतरवा रे तिला खाली."
सगळ्यांनी तिला नाजूक हातानी खाली उतरवली. तरीही तिचा एक तुकडा पडला.
"देवा तिकडे तो सूर्य आग ओकतोय, आणि तू इकडे हिचे तुकडे पाडून माझ्या हृदयाला तुकडे पाडतोय. देवा, देव तुला कधीच माफ करणार नाही. या जगात देव असेल, तर तो नक्की बदला घेईन..."
"सर, शांत व्हा सर, शांत व्हा... एका गाडीसाठी इतका त्रागा करून घेऊ नका..."
"नाही व्यास नाही, कशी या जीवाला शांतता लाभेल? माझी सोनी, माझ्यावर रागावून निघून गेली... सोनी..."
"साहेबाना न पिताही देवदास होता येतं वाटतं." एक ड्राइव्हर कुजबुजला.
समोरच्या गॅरेजमध्ये गाडी लावण्यात आली.
"व्यासमिया, किस राक्षस ने दौडाया है इस गाडी को, पूर्जा पूर्जा ढिला कर दिया है!" गॅरेजवाले भोपालीचाचा बाहेर येत म्हणाले.
व्यास त्यांना गप्प बसायला खुणावणार, तेवढ्यात ते मोहनने ऐकलं.
"मीच तो राक्षस, माझ्या सोनीला दुखावलं. सोनी...इ इ इ ..."
मोहनाचा आक्रोश बघून भोपालीचाचा द्रवले.
गाडीचं निरीक्षण करून, एका पोराला गाडी आत लावायला सांगून ते मोहनकडे वळले.
"बेटा शांत हो जावो, पाच दिनमें गाडी कि तबियत सुधार के नई नवेली दुल्हन कि तरह सजा देंगे."
"थँक यु... थँक यु... धन्यवाद... शुक्रिया..." मोहनच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
"चाचा, ये रही नई गाडी कि पुरी किंमत, क्योंकी गाडी नई जैसी चाहिये. पाच दिन बाद आऊंगा. व्यास चला, मला घेऊन चला. नाहीतर मी जळत राहीन. मी जळत राहीन व्यास, मी जळत राहीन."
मोहन धावत गाडीत जाऊन बसला, आणि गाडी सुसाट वेगाने निघाली.
-----------------------------------------------------------------------------
"जाऊन आलास."
"हो बाबा."
"होईल ना गाडी ठीक."
"व्हायलाच हवी. नाहीतर..."
"नाहीतर काय मोहन?" कृष्णरावांनी गालातल्या गालात हसत विचारले.
"काही नाही बाबा, सोनी रागावेल.बस..."
"माय सन, आय एम अफ्रेड, मेबी आय विल लॉस्ट माय सुनबाई!"
मोहन चमकला...
"असं काही नाहीये बाबा."
"स्वतःची चूक नसताना गालफडांत खावी लागल्यावर सुद्धा संताप न होता, समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे झालेलं दुःख कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करणं, याला प्रेम नाही तर काय म्हणतात मोहनराव?"
मोहन गालातल्या गालात हसला.
"प्यार और वार, दोनो एक साथ कर रहे हो. सांभाळून कर. आणि मुलगी चांगली आहे. अर्थात तुझ्या आईपेक्षा कमीच सुंदर, पण ओके. तुझ्यासाठी चालून जाईल. माझी संमती आहे या प्रकरणाला, जी तू मागतही नाहीयेस. पण बाप असल्याने थोडातरी भाव खावा लागेल."
"बाबा, तुमच्या संमतीशिवाय काहीही होणार नाही..."
"कल्याणम बाळ.... कल्याणम....!"
------------------------------------
पाटलांच्या घरात लगीनघाई चालू झाली होती. आठवड्यावर लग्न येऊन ठेपल्याने अनेक गोष्टी कमीत कमी वेळेत करायच्या होत्या.
लग्न वाड्याच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या भागात शामियाना उभारून करायचं ठरलं. शामरावानी जेवणाची जबाबदारी घेतली. स्वतः अण्णा कपडे, पाहुणे आणि दागिन्यांच्या सोयीसाठी लागले. मोहन आणि कृष्णरावांचा तर घरात पाय नव्हता.
मीने मात्र या सगळ्या गोंधळाकडे शून्य भावाने बघत होती. वेळ मिळेल तशी अश्रुना वाट मोकळी करून देत होती.
लायब्ररीसुद्धा ओसाड पडली होती. प्रकाशाचा कुठेही पत्ता नव्हता.
जरीही मोहन या गोंधळात सहभागी असला, तरीही तो मीनेला यातून बाहेर काढण्याची संधी शोधत होता...
पाचव्या दिवशी अण्णांच्या घरासमोर मोठा ट्रक उभा राहिला.
"बाजू व्हा, वाट द्या..." मोहन सगळ्यांना बाजूला करत ट्रकजवळ आला.
"बाबा, जरा सोनीला बोलवा."
कृष्णराव घरात गेले.
"सोनीताई, मोहन बोलावतोय."
"कशाला?" ती रागाने म्हणाली.
"सोने, काही काम असेल. जा लवकर." वत्सलाबाई साड्या बघत म्हणाल्या.
"मी कामात आहे."
"तू आणि कामात? साधा बहिणीच्या लग्नात घालण्यासाठी अजून कपडे घेतले नाही तू... आणि म्हणे कामात! जा लवकर."
सोनी घुश्यात बाहेर आली.
"सोनी. सोनी... सोनी... सोनी... सरप्राईज..." मोहन आनंदाने चित्कारत म्हणाला.
"काय उद्योग केलाय आता?"
मोहनने समोरचा कपडा ओढला.
सोनीची गाडी अगदी नव्यासारखी उभी होती.
"आईशपथ," सोनी विस्फारून बघत राहिली.
"नव्यासारखी बनवलीये. असली दुरुस्ती गेल्या दहा हजार वर्षात झाली नसेल."
सोनी पटकन गाडीवर बसून एक राउंड मारून आली.
"काहीही प्रॉब्लेम नाहीये. टेस्टेड?" मोहन म्हणाला.
"नाहीये काही. ओके. तुला माफ केलं मी." सोनी हसत म्हणाली.
"सोनी तू हसूही शकते... सिरियसली?"
अण्णा पाटीलही कोपऱ्यातून बघत होते.
"सोनी तू मला माफ केलंस, आनंद झाला. चल आता तुही परतफेड कर."
"काय?"
"गाल पुढे कर सोनी." मोहन रोखून म्हणाला.
"वेड लागलंय का तुला? काय बोलतोय?"
"असं? पाटलीण आहेस ना! मग काही सगळं बरोबर ठेवायला नको? चूक केली, तू सुधारण्याची संधी न देता शिक्षा केलीस. आता ती चूक सुधारली आहे. शिक्षा परत घ्यायला नको?"
"आजूबाजूचे लोक सॊनीकडे बघत होते."
"सोनी, लोक बघतायेत. असं वाटतंय, सोनी आज जशास तशी वागणार नाही... अरेरे!"
सोनी निश्चल उभी होती.
"ठीक आहे..." असं म्हणत तिने डोळे मिटून गाल पुढे केला.
"अण्णा या मोहन्याच्या तर," म्हणत दोन तीन गडी पुढे जाणार. तेवढ्यात अण्णांनी त्यांना थांबवलं.
फटाक!!!!!!!!
जोरात आवाज झाला, आणि सोनी किंचाळली.
सगळे जोरजोरात हसू लागले.
मोहनने सोनीच्या गालाजवळ फुगा फोडला होता.
सोनीने डोळे उघडले. सगळे हसताना बघून ती प्रचंड खजील झाली.
"काय सोनी? फुग्याला घाबरलीस होय. चल एक माफी तुझ्यावर उधार..." मोहन तिला चिडवत म्हणाला.
"अण्णा गड्यांकडे बघत म्हणाले. बघितलं... खऱ्या पाटलाचं रक्त...यासाठीच थांबवलं होतं तुम्हाला. स्त्रीचा अपमान पाटील कधीच करणार नाही. निदान मोहन पाटील तरी नाही."
"अण्णा. असं बोलतोय. जसकाही तुझा जावई बनवणार आहे त्याला तू!" शामराव मागून येत म्हणाले.
"दादा, चांगल्या घरचा पोरगा. आपल्या तोलामोलाचा असता तर बनवलाही असता."
"अण्णा... घराण्याची इभ्रत राखून बोल." शामराव रोखून म्हणले.
अण्णा चपापले. त्यांनी विषय बदलला.
-----------------------------------------
सकाळपासून मोहन कुठेतरी गायब होता. ना फोन लागत होता ना काही. अण्णांनी एक दोनदा चौकशी केली, पण नन्तर कामात तेही विसरून गेले.
संध्याकाळी मोहन वाड्यावर आला.
"काय रे, दिवसभर कुठे होतास."
"अण्णा मित्राचा ऍक्सीडेन्ट झाला. म्हणून दवाखान्यात होतो."
"अरे बापरे. कसा आहे तो?"
"डायरेक्त्त स्वर्गात..." मोहन हुंदका देत म्हणाला.
"अरेरे, वाईट झालं. बरं... सगळी तयारी झालीये. उद्या लग्न आहे, आज रात्री जागरण आणि उद्या सकाळपासून काम. तयारीत रहा."
"ओके अण्णा."
मोहन सरळ मिनेच्या रूममध्ये गेला. काही मैत्रिणी तिची थट्टा करत बसल्या होत्या.
"पोरींनो, जा कि घरला, किती अंधार पडलाय बाहेर!" मोहन आत शिरत म्हणाला.
"आम्ही आज इथेच थांबणार आहोत. काही प्रॉब्लेम?" एक मुलगी आगाऊपणे म्हणाली.
"थांबायचं तर थांबा. पण पाटलांच्या रिवाजाप्रमाणे जी मुलगी लग्नाच्या आदल्या रात्री नवरीबरोबर असते...तिला लग्नाच्या दिवशी मुलीला एकवीस हजाराचा आहेर करावा लागतो. हो कि नाही मिनेताई?"
"हो... " मीने म्हणाली.
आणि पाच मिनिटात मीनेची खोली रिकामी झाली.
"मिनेताई इकडे बघा."
"बोल ना मोहन."
"ऐका. असं निराश राहू नका. आज रात्री आपल्याला निघावं लागेल."
"कुठे?"
"लांब कुठंतरी. या लग्नापासून दूर."
"तू मला पळून जायला सांगतोय?"
"मिनेताई तुम्हाला पळवून न्यायला म्हणतोय. सगळी तयारी झालीये. प्रकाशही तिकडे पोहोचेल. फक्त तुम्ही आता तयार राहा."
"नाही मोहन, मी असं नाही करू शकणार. अण्णांना धोका नाही देऊ शकणार."
"हे लग्न होणं हाच अण्णांना मोठा धोका आहे, लक्षात ठेवा. तुमच्या नावाखाली कायम ते अण्णांना मिंधे बनवत राहतील.
तयार राहा रात्री... मी येईन..." एवढं म्हणून मोहन बाहेर पडला, आणि तडक वाड्याबाहेर गेला.
आणि त्यापाठोपाठ अजून एक व्यक्ती वाड्याबाहेर पडली!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sorry उशीर झाला..
छान आहे पण काहीतरी मिसींग वाटतंय..

Nice

मागील काही भाग वाचून पडलेला प्रश्न -

अंबा आणि मोहनची आज्जी राधा बहिणी बहिणी असतात ना मग त्यांची नातवंड (मुलांची मुल) भाऊ बहिण असणार ना,
मग मोहन सोनी यांच नात असं का दाखवलंय. Uhoh

मोहन आणि मोहनच्या वडीलांना माहिती आहेच ना हे नातं!