पाटील v/s पाटील - भाग १५

Submitted by अज्ञातवासी on 4 February, 2019 - 09:47

दिवस रात्र कामात व्यस्त होतो, म्हणून भाग टाकायला उशीर झाला!
माफी असावी!

पाटील v/s पाटील - भाग १४
https://www.maayboli.com/node/68872

मीना आणि मोहन दोन्हीही रूममध्ये बसले होते.
"मिनेताई, काय केलं हे? नापसंत करणार होता ना तो तुम्हाला?"
मिने जोरजोरात रडायला लागली.
"मिनेताई शांत व्हा! काय झालं?"
"मोहन, इतका नीच माणूस मी अजून बघितला नाहीये रे!"
"म्हणजे?"
"मी त्याला सगळं सांगितलंय, तर तो म्हणतो, मलाही कुठे तुझ्याबरोबर संसार करायचाय? लग्न करून फक्त पाटलांची प्रॉपर्टी मिळवायचीय त्याला. मोहन, मला नाही करायचंय हे लग्न!"
"हे आधी सांगायला हवं होतं मिनेताई, तिथे देवाण घेवाणीची बोलणी होतायेत, तोपर्यंत तुम्ही गप्प राहिलात, आता सगळं ठरल्यावर तुम्ही मला सांगताहेत? मिनेताई मीसुद्धा सुन्न झालो होतो, क्षणभर. पण तुम्हीच काही बोलत नाही म्हटल्यावर मी कसा बोलू!"
"मोहन, खूप वाईट आहे तो, धमकी दिली रे मला, तुझी बदनामी करेन असं, आबांच नाव खराब करेल. मला काय करावं तेच नाही सुचलं."
"मिनेताई, आयुष्याच नुकसान केलंत तुम्ही, तुमच्याही, आणि प्रकाशाच्याही..."
"नाही नुकसान होणार," मीनाने डोळे पुसले, आणि ती निर्धाराने म्हणाली.
"चल मी जाते."
"कुठे?"
"अरे महादेवाला जाऊन येते."
"मिनेताई मी सोडतो तुम्हाला..."
"मी जाईन, मला एकांत हवाय."
मोहन सुन्नपणे म्हणाला, "जा!"
मिने बाहेर पडली. तडक घराबाहेर गेली. मोहनही तिच्यामागे बाहेर पडला. कृष्णराव बाहेर खुर्चीवर बसले होते.
गाडी धुरळा उडवत बंगल्याबाहेर गेली होती.
"मोहन, अरे ही अक्षरशः चावी हिसकावून गाडी घेऊन गेलीये रे!"
"बाबा, दुसरी गाडी हवीये मला, आत्ताच."
तेवढ्यात सोनी तिच्या स्कुटरवर येतांना मोहनला दिसली...
"सोनी, मला तुझी गाडी हवीये आताच्या आता!"
"ये गाडीला हात लावायचा नाही, माझी गाडी आहे".
मोहन इकडेतिकडे बघितले.
"ते बघ..."तो कुठेतरी बोट दाखवून म्हणाला.
सोनी तिकडे बघणार, तेवढ्यात...
मोहनने सोनीला उचलून स्कुटरशेजारी ठेवलं, आणि तो गाडी घेऊन पसार झाला!"
मीनाने महादेव मंदिराच्या बाहेर गाडी लावली...
...आणि ती विहिरीकडे निघाली.
"प्रकाश, माफ कर मला..."
आणि ती विहिरीत उडी टाकणार, तेवढ्यात...
मागून कुणीतरी तिला घट्ट पकडले.
"सोड मला, मला नाही जगायचं!"
मीना मोहनला मारत होती, चावे घेत होती, धडपड करून सुटण्याचा प्रयत्न करत होती.
"तुम्ही मला मारून घ्या, मग बोलू आपण."
थोड्यावेळाने मीना शांत होऊन रडू लागली.
"मिनेताई, आज मरून जाल, पण तुम्ही मेल्यावर काय वाटतं? सगळं दुःख दूर होईल? मेल्यानंतर प्रेम मिळतं? मिळत असेल तर खुशाल मरा. मिनेताई, एक वचन देतो, पाटलाच वचन, तुमचं लग्न प्रकाशशीच होईल.
मोहन खरंच असं होईन!
मिनेताई, मला कविता अजिबात आवडत नाही, खरंच नाही, पण एक कविता खूप आवडली, त्यादिवशी लायब्ररीत वाचलेली...
'प्रेम कर भिल्लासारखं,
बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा,
नभापर्यंत पोहोचलेलं!'
मीनाने रडणं थांबवलं, "कुठे शिकलास हे सगळं?"
"त्यादिवशी लायब्ररीत...चला जाऊयात घरी, काढूयात काहीतरी मार्ग."
दोघेही विहिरीपासून लांबवर आले.
"मिनेताई, तुमच्यामुळे मला सोनीताईंची स्कुटर उधार घ्यावी लागली... आणि अशी दामटत आणावी लागली ना... मोहन म्हणाला,"
आणि पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा पांढराफटक पडला...
"मिनेताई स्कुटर... देवा..."
समोरच सोनीची स्कुटर पडली होती. ठिकठिकाणी दणके बसले होते. पुढचं आणि मागचं मडगार्ड तुटलं होतं... ओरखडे किती पडले, याची गणतीच नव्हती.
"मिनेताई..."
"मोहन मेलास तू."
"मिनेताई, मला जाऊ द्या आता विहिरीकडे, जीव देण्याशिवाय पर्याय नाही."
"डोन्ट वरी, सोनी नक्की जीव घेईल तुझा..."
"चला, आत्महत्येसारखं महापाप करण्यापेक्ष्या, तिनेच जीव घेतलेला बरा."
आणि दोन्हीही घरी निघाले.
"सोनी अस्वस्थ होऊन वाड्याबाहेर येरझाऱ्या घालत होती."
"सोनीबाई, अहो येईल तो, काही अर्जंट काम असल्याशिवाय कशाला एवढा घाईने गेला असेल?"
सोनी काहीच बोलली नाही.
इकडे कृष्णराव अस्वस्थ होत होते.
तेवढ्यात डुगुडुगु हलत सोनीची स्कुटर आली.
मिनेही त्यामागे हळूहळू गाडी घेऊन आली.
सोनीला दारात उभं पाहताच, मोहनचा चेहरा पांढराफटक पडला.
मोहन सोनीपुढे मान खाली घालून उभा राहिला.
सोनीचा रौद्रवतार बघून मिनेचीही पाचावर धारण बसली होती.
खाड...
असा आवाज झाला. कृष्णराव दचकले, मिनेसुद्धा पूर्णपणे भांबावून गेली.
सोनीने मोहनच्या कानाखाली जाळ काढला होता!!!
वाड्याच्या दिवाणखान्यात स्मशानशांतता होती.
अंबा मोठ्या खुर्चीवर बसली होती. अण्णा, वत्सलाबाई, आणि मिने सोफ्यावर. सोनी अण्णांच्या समोर उभी होती. मोहन अण्णांच्या डाव्या बाजूला लांबवर उभा होता.
"सोनी, हात का उगारलास?"
"अण्णा माझी स्कुटर मोडलीये याने."
"मग समोर माणूस कोण आहे, हे न बघता हात उगारायचा? तुझा बाप झेड पी च इलेक्शन लढवतोय हे याच्यामुळे, विसरलीस वाटतं? तुझा बाप आज याच्यामुळे जिवंत आहे, विसरलीस वाटतं..."
"अण्णा, ती स्कुटर जीव की प्राण आहे माझा, आनंदीआत्याने ती स्कुटर मला दिली होती, तिची जुनी स्कुटर, आणि याने ती मोडली.."
...आनंदी हे नाव ऐकताच, मोहनचा चेहरा आश्चर्यचकित झाला.
"मोहन, सोनीने जे काही केलं, तिच्या वतीने मी माफी..."
"अण्णा, नको, माझंच चुकलं, मला त्या क्षणी नाही कळलं हो काय करावं?"
पण इतकं अर्जंट काय काम निघाल रे?" अंबा छद्मीपणे म्हणाली.
आता भीतीने पांढरफटक पडण्याची वेळ मिनेची होती.
"मला निनावी फोन आला होता, महादेव मंदिराजवळ मिनेताईंच्या गाडीला अपघात झाला..."
मिनेने सुस्कारा सोडला.
"निवडणुका आल्यात ना, चालेलच आता हे. बघितलं सोने, कशासाठी तुझी स्कुटर घेतली होती? पण मिने, तू का गेली होतीस ग, महादेवाला..."
क्षणभर पुन्हा शांतता पसरली.
"मोहन नाटकी लडिवाळपणे पुढे येत म्हणाला, अगदी हाच हाच प्रश्न मी विचारला, मिनेताईंना, तर त्या म्हणतात, अण्णांनी इतका चांगला वर शोधून दिला, म्हणून महादेवाकडे तात्काळ गेले."
"आणि घरभर हसू फुटलं!"
"मोहन, तपास लावायला हवा फोनवाल्याचा. तू
कोकणींना भेट."
मोहनने मान हलवली.
"अण्णा, या स्कुटरचं मी बघतो, काय करायचं. माझा एक मित्र दुबईला मॅकेनिक आहे, तो सध्या आमच्याकडे आलाय, नक्की नीट करेल तो."
"अण्णा, याला हात लावू देणार नाही मी"
सोनी असं करू नकोस," मोहन आर्जवीपणे मान खाली घालून म्हणाला...
सोनी मोहनचा हा पवित्रा बघून चरकली.
"ठीक आहे," एवढंच ती म्हणू शकली.
मोहन घराबाहेर आला, आणि व्यासला फोन केला...
"व्यास, एक गाडी दुरुस्त करायचीय, पाठवतो."
अर्ध्या तासाने एक भलामोठा ट्रेलर अण्णांच्या दारासमोर आला.
कृष्णराव मोहनजवळ जाऊन हळू आवाजात म्हणाले, "बरं विमान पाठवलं नाही."
दहा बारा लोकांनी गाडी ट्रेलरवर चढवली, आणि ते निघून गेले.
"चला, आठवड्यावर लग्न आलंय, अण्णा म्हणाले."
आणि सगळे घरात गेले.
मोहन सोडून...

Group content visibility: 
Use group defaults

माझ्या आवडत्या लेखकाने लिहीलेली आवडती कथा
बघून खूप छान वाटलं..
Happy

@श्रद्धा, थांकू
@असामी - Lol
@ एमी - धन्यवाद
@उर्मिला - साहेब Lol
खरंच बिजी आहे!

???????