बहुधा प्रथमच असे घडले असावे की त्याच्या जागी नसिर किंवा तत्सम कोणी असता तरी तितकाच प्रभावी ठरू शकला असता. बदला चित्रपटाच्या कथेने अमिताभला खाऊन टाकलेले आहे. पांढरी दाढी स्वीकारल्यापासून असलेली तीच तीच शैली वापरण्यापलीकडे साहेब या चित्रपटात जाऊ शकलेले नाहीत. खरे तर या स्तराच्या अभिनेत्याला अजून काहीच्या काही अभिनयगुण दाखवता यावेत अशा भूमिका मिळायला हव्यात. मात्र बदला ही कथा अशी आहे की कथा ९९.९९ टक्के आहे आणि बाकी सगळे अभिनेते, सीन्स हे उरलेल्या ०.०१ टक्क्यात सामावलेले आहेत.
एक काळ असा होता की 'अमता वच्चन 'साठी रोल लिहिले जायचे. जे कोणीही कधीही करू शकत नाही पण प्रत्येकाला मनातून वाटत असते असे काहीतरी तो पडद्यावर करून दाखवायचा. अगदी अलीकडे ऋषी कपूरचा बाप बनतानाही त्याने किंचित तरी काहीतरी वेगळे दिले होते. मात्र बदला या चित्रपटाच्या कथेने त्याला त्याच्या शैलीतून म्हणा किंवा चौकटीतून म्हणा, बाहेर पडायची संधीच दिलेली नाही.
हे लिहिताना हे मान्य करायलाच हवे की त्याने ही भूमिका अफाट साकारलेली आहे. तरीही, 'तिथे इतर काहीजण चालू शकले असते'हे मनात आल्याशिवाय राहिले नाही.
कथा इतकी वेगवान आणि डोकॅलिटीने रचलेली आहे की कोण कोणती भूमिका करत आहे याकडे प्रेक्षकाचे फारसे लक्षही जाऊ नये. प्राण, दिलीप कुमार, संजीव कुमार, राजेश खन्ना यांना एकेकाळी कच्चा खाणारा माणूस या कथेतील एक असे पात्र बनतो जे आहे तर महत्वाचे पण ते पात्र कोणी साकारावे याबद्दल मनात काही खास अपेक्षा निर्माण होत नाहीत. मला तर वाटते की अशोक कुमार (दादामुनी) या अभिनेत्याने या भूमिकेचे प्लॅटिनम केले असते.
अमिताभच्या डोळ्यांत आजही तोच अंगार दिसतो ज्याच्या प्रेमात माझी आणि नंतरची एक पिढी वेडी झाली. आजही सूडकथा साकारावी तर त्यानेच! मात्र त्याने सूडकथा साकारणे यात नेहमीच त्याची एक अमिताभीय वाटचाल दिसून यायची. ती वाटचाल हीच कथा असायची. इथे कथा वेगळी आहे आणि त्याची वाटचाल स्वतंत्र! तितकीच शानदार पण स्वतःच कथा न ठरणारी अशी वाटचाल!
संवादांबद्दल असे ऐकले होते की खूपच काहीतरी इन्टेलेक्चुअल मटेरिअल आहे. प्रत्यक्षात असे वाटले की ते संवाद हेही कथेचे गुलाम आहेत. एखादा लार्जर दॅन लाईफ अभिनेता चित्रपटात आहे म्हणून खास संवाद म्हणून खूप काही लिहिता आले असते असेही मनाला वाटून गेले.
मला वाटते की आजकाल इतके जबरदस्त वेगवान, तांत्रिक बाबींवर आधारलेले आणि डोक्याला शॉट देणारे कथानक असलेले चित्रपट येतात की बहुधा मोठ्यात मोठ्या अभिनेत्यालाही त्यात अभिनय करण्यास फारसा वाव राहत नसावा. एक प्रकारे हेही बरेच आहे की खूप वर्षांनी नावीन्यपूर्ण आणि कल्पक कथानके बघायला मिळत आहेत. अशी कथानके जेथे खान्स, कपूर्स, कुमार्स, देवगण्स आणि आयुष्मान्सही खपून जातील.
खंत एकच राहते मनात! ज्याच्यासाठी म्हणून भूमिका लिहिल्या जायच्या, ज्याच्या प्रवेशाच्या आधी शिट्ट्यांनी चित्रपटगृह दणाणून जायचे, जो रडला की प्रेक्षक रडायचे, ज्याने मारामारी केली की आपण सूड उगवल्याचा आनंद व्हायचा, तो अमिताभही या युगाने गिळंकृत करायचा घाट घातलेला दिसतो.
=====
-'बेफिकीर'!
मला बच्चंन हा अर्जुनचा फादर
मला बच्चंन हा अर्जुनचा फादर असेल असे वाटले होते.
कारण त्याचे नातेवाईक दाखवले नाहीत
स्पॉईलर अलर्ट - ज्यांनी
आणि तो जो खरा वकील आहे, ज्याने आजवर एकही केस हरली नाहीये तो वाचवणारच कि तिला.
म्हणजे, यातून फक्त आत्मिक समाधान मिळाले की तिने कबूल केले, या पलिकडे काहीही नाही>>>>
(मी बदला बघितला नाही. पण इन्व्हिजिबल गेस्ट बघितला त्यावरून लिहिते.)
मुव्ही 'लॅटरल थिंकिंग ' वर बेस्ड आहे ना. सो कुठलीच गोष्ट खरी नाही किंवा खोटीही नाही. लॅटरल थिंकिंग : एकच गोष्ट आपण किती प्रकारे अॅनालाईज करु शकतो. त्यामुळ काय खर खोट गौण आहे. तुम्ही पहाल तसे. ईंटरप्रीट कराल तसे.
आत्मीक समाधानासाठीच तर आहे ना सगळे. मुळ चित्रपटात वडील त्याला सांगतात कि "तु फक्त कुठे टाकलस माझ्या मुलाला ते सांग. आम्हाला त्याला पुरण्याचे समाधान तरी मिळु देते. तु कबुल कर किंवा न कर. " पण तो त्याला नकार देतो. दुसरं म्हणजे फक्त अॅक्सिडेंट असता तर सांगितले असते कि घाबरून गाडी ढकलून दिली. पण तो कबुल करत नाही म्हणजे त्याने त्यापेक्षा पुढे जावून (खुन) केला असणार असे त्यांना इंट्युंशन आहे. आणि त्यासाथी त्यांची धडपड चालु आहे सगळि अस मला वाटल.
'बदला' नावाने हा घोळ झालाय. मुळ चित्रपटात , बदला अस कुठेच वाटत नाही. मुव्ही फक्त एकच गोष्ट कशी वेगवेगळ्या प्रकारे खरी वाटु शकते या कन्सेप्ट वर जास्त फोक्सड आहे अस वाटत. त्यामुळ सगळे धक्के असे एकावर एक आदळत जातात.
इन्व्हिजिबल गेस्ट : तुम्हाला वाटत रहात , वडिल इन्व्हिजिबल गेस्ट आहे हॉटेल रुम मध्ये. सो नेम मेक्स पर्फेक्ट सेन्स. आणि वडीलच खुनी अस वाटु लागल असतानाच एकदम , चेंज होते स्टोरी. आणि दुसरीच व्य्कती जी कन्सिस्टंतली गुन्हेगाराबरोबर आहे , ती व्यक्ती इन्व्हिजिबल गेस्ट होते.
सिनेमा पहायचा असल्याने बदला
सिनेमा पहायचा असल्याने बदला बाबत कुठेही लिहून आलेले वाचायचे नाही असे ठरवले होते. काल रात्रीचा शो पाहील्याने आता पाहिला हा धागा. स्पॉयलर्स आहेत. बोर्ड लावून टाका.
प्राण, दिलीप कुमार, संजीव
प्राण, दिलीप कुमार, संजीव कुमार, राजेश खन्ना यांना एकेकाळी कच्चा खाणारा माणूस >>> यातल्या दोन नावांबाबत सहमत नाही. संजीवकुमारच्या अभिनयाची शैली नैसर्गिक होती. दिलीपकुमारने शक्ती मधे अमिताभ पेक्षा सरस अभिनय केला आहे. दोघेही लार्जर दॅन लाईफ !
आताच्या पिढीला हे दोघेही विनोदी वाटतात... काळाचा महीमा.
मला वाटतं की त्यांना आपल्या
स्पोईलर....... चित्रपट पाहायचा असेल तर कृपया पुढे वाचू नका
मला वाटतं की त्यांना आपल्या मृत मुलाला शोधण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो. आईबापांना मुलाचा मृतदेह हवाय, नक्की काय घडलं त्याच्या बाबतीत हे समजून घ्यायचंय... त्यांना क्लोजर हवंय>>>>
हो, मूळ सिनेमात हेच आहे. हॉटेलात मुलीचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर कायद्याने आपल्या मुलाला न्याय किंवा त्याचे काय झाले हे कळणे दुरापास्त आहे हे त्यांच्या लक्षात येते. आणि मग हा डाव रचला जातो.
आणि तिथल्या कायद्यात कदाचित अशी कबुली ग्राह्य धरत असावेत. त
सनीने जबरदस्त एकटिंग केले,
सनीने जबरदस्त एकटिंग केले, सगळेच फिके पडलेत त्याच्यासमोर. त्याच्या रुपात बॉलिवूडला नवीन अमिताभ मिळाला.
इरफान नसता चालला
इरफान नसता चालला
एकतर तो इतकं तोंडातल्या तोंडात बोलतो की निम्मा वेळ तो काय बोलतोय हे कळून घेण्यात जातो
त्यातून इतका संवाद असलेला चित्रपट म्हणजे झालं कल्याण
नवाजुद्दीन चालला असता पण तो वकील वाटत नाही अजिबात
महिला वकील असती तर विद्या बालन भारी वाटली असती
अमिताभ ऐवजी इतर कोणीतरी चालले
अमिताभ ऐवजी इतर कोणीतरी चालले असते हा सूर उमटत आहे हे (माझ्यापुरते) पुरेसे आहे.
इरफान नसता चालला>>>
इरफान नसता चालला>>> नसीरुद्दीन शाह ???
**** स्पॉयलर अलर्ट ****
**** स्पॉयलर अलर्ट ****
१. तो मुलगा डिक्कीला आतून लाथा बुक्क्या मारण्याएव्हढा फिट होता तरी ढकलून दिलं तिने पाण्यात.. तरीही अमिताभ ला सांगताना "पर तब तक बहुत देर हो चुकी थी" असं का म्हणते?
२. त्याला वाचवलं असतं तर छोटासा का होईना पण खटला चालला असता.. आणि ती दुसऱ्या पुरुषासोबत होती हे उघड झाले असते ते टाळण्यासाठी जिवंत माणसाला पाण्यात बुडवून मारलं? तिची सो कॉल्ड पॉवर वापरून तिला तेवढी फॅक्ट लपवता नसती आली? किंवा तिथल्या लोकांना मॅनेज नसतं करता आलं?
३. बाकी निम्मी उर्फ निर्मल अभिनयात पारंगत असतो असा उल्लेख करून त्यांनी त्याला वकिलाची भूमिका एवढी चांगली कशी वठवता आली याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. पण वर कोणीतरी म्हटलंय त्याप्रमाणे नुसता अभिनय आणि कसलेल्या वकिलाप्रमाणे नुसत्या स्पॉंतानीयस संवादातून जिगसॉ पझल सोडवत जाणे यात फरक आहे. ते निम्मिला कसे जमले असावे?
४. प्रॉस्थेटिक मेकप माणसाचा चेहरा इतका बदलू शकतो?
५. निम्मी उर्फ निर्मल कोणत्याच अँगलने भारतीय वाटत नाही.
६. रच्याकने चित्रपटाचा सारांश असा की चित्रपटात अमिताभ नाहीच्चे
७. चित्रपटात गाणी, अश्लील सीन्स, घरगुती ड्रामा नाही ही जमेची बाजू.
८. अमृता सिंग आधी जरा जास्तच अघळपघळ दाखवली आहे ते अजिबात डायजेस्ट झालं नाही. कोणतेच परदेशस्थ भारतीय असे असतील असं अजिबात वाटत नाही.
हुई और भी मुलायम
हुई और भी मुलायम
मेरी शाम ढलते ढलते
अभिनेत्रीने खाल्लेला अमिताभ या गाण्यात दिसतो
ये कहां आगये हम
रेखाने अक्षरशः रोमिओ केलाय त्याचा
अभिनेत्याला कसे खातात यावर
अभिनेत्याला कसे खातात यावर थोडा प्रकाश टाकण्यात यावा.
Pages