अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

Submitted by मभा दिन संयोजक on 1 March, 2019 - 02:13

अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

पुस्तकांची मुखपृष्ठे ही सामान्यतः पुस्तकातल्या मजकुराला साजेशी बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठही आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. ' स्वामी' कादंबरीवरचा थेऊरचा चिंतामणी असेल, किंवा ' राऊ' वरचा तलवार धरलेला हात असेल, ही प्रसिद्ध मुखपृष्ठंं म्हणजे त्या त्या पुस्तकाची एक ओळखच असते. आजचा आपला हा खेळ, ही ओळख किती पक्की आहे याची चाचपणी करणारा आहे.

कोडं घालणार्या भिडूने एखाद्या मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो इथे द्यायचा. पुस्तकाचं नाव अर्थातच लपवून ठेवायचं. लेखकाचं नाव लपवायचं की दाखवायचं, म्हणजेच कोडं किती सोपं किंवा कठीण करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. इतरांनी हे पुस्तक ओळखण्याचा प्रयत्न करायचा. नाहीच जमलं, तर क्ल्यू मागायचा. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखेल, त्याने पुढचं कोडं घालायचं.

नियमः
१. तुम्ही तुमच्याकडच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा फोटो काढून येथे द्यायचा आहे.
२. पुस्तक तुम्ही वाचलेलं असल्यास उत्तम, म्हणजे कुणी क्ल्यू विचारला तर तो तुम्हाला देता येईल.
३. शक्यतो बर्यापैकी प्रसिद्ध पुस्तकांच्याच मुखपृष्ठांचे फोटो द्यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या खेळात भाग घेता येईल आणि खेळाची मजा वाढेल.

चला तर मग! पहिलं कोडं आमच्याकडून!

IMG_20190301_113507.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंजिनीरिंग च्या पहिल्या वर्षापर्यंत मराठीतील सर्व लोकप्रिय पुस्तक वाचून झाली. पाचवीत असताना बटाट्याची चाळ पासून सुरुवात झाली आणि २००८ ला माडखोलकरांच्या पुस्तकांनी शेवट. नंतर इंटरनेट मुळे वाचनाची पूर्ण वाट लागली. आता फिक्शन ची कसर सिनेमे, वेब्सिरीज भरून काढतात.. वाचलं तर लघुकथा आणि काही दिवाळी अंक वाचतो फक्त आता. वाचनाचा सगळा वेळ उत्तम नॉन-फिक्शन ला देतो.

जुनी पुस्तके चटकन ओळखू येतात.... एकतर ती आपल्या किंवा जवळच्या कुणातरी संग्रहात असल्यामुळे सतत डोळ्यासमोर असतात किंवा लायब्ररीत पाहिलेली असतात

लहानपणी जेंव्हा review, समिक्षा या गोष्टींचा फारसा संबंध नव्हता तेंव्हा लायब्ररीतुन बऱ्याचदा कव्हर बघूनच पुस्तके आणली जायची.... त्यामुळे काही काही कव्हर्स अगदीच ओळखीची असतात!

मी विकत घेतलेल्या पुस्तकांना कागदाची कव्हरं घालून ठेवलीत. त्यामुळे त्यांची मुखपृष्ठ लक्षात नाहीत. वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांची बरेचदा लक्षात राहतात.

हे घ्या... सोप्प आहे!

हे पुस्तक वाचून प्रचंड अस्वस्थ व्हायला झालेले!

20190302_201836.png

ह्या विश्वास पाटील आणि त्यांच्या भावाचा वाङ्मयचोरी वरून काही तरी वाद आहे वाटतंय ... प्रशासकीय वर्तुळात पाटील चांगलेच चर्चेत असतात. आलिशान फ्लॅट आहे त्यांचा समुद्रकिनारी ... एकदम हायफाय..

mrunmayi

Pages