अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

Submitted by मभा दिन संयोजक on 1 March, 2019 - 02:13

अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!

पुस्तकांची मुखपृष्ठे ही सामान्यतः पुस्तकातल्या मजकुराला साजेशी बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठही आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. ' स्वामी' कादंबरीवरचा थेऊरचा चिंतामणी असेल, किंवा ' राऊ' वरचा तलवार धरलेला हात असेल, ही प्रसिद्ध मुखपृष्ठंं म्हणजे त्या त्या पुस्तकाची एक ओळखच असते. आजचा आपला हा खेळ, ही ओळख किती पक्की आहे याची चाचपणी करणारा आहे.

कोडं घालणार्या भिडूने एखाद्या मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो इथे द्यायचा. पुस्तकाचं नाव अर्थातच लपवून ठेवायचं. लेखकाचं नाव लपवायचं की दाखवायचं, म्हणजेच कोडं किती सोपं किंवा कठीण करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. इतरांनी हे पुस्तक ओळखण्याचा प्रयत्न करायचा. नाहीच जमलं, तर क्ल्यू मागायचा. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखेल, त्याने पुढचं कोडं घालायचं.

नियमः
१. तुम्ही तुमच्याकडच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा फोटो काढून येथे द्यायचा आहे.
२. पुस्तक तुम्ही वाचलेलं असल्यास उत्तम, म्हणजे कुणी क्ल्यू विचारला तर तो तुम्हाला देता येईल.
३. शक्यतो बर्यापैकी प्रसिद्ध पुस्तकांच्याच मुखपृष्ठांचे फोटो द्यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या खेळात भाग घेता येईल आणि खेळाची मजा वाढेल.

चला तर मग! पहिलं कोडं आमच्याकडून!

IMG_20190301_113507.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकरावीत असताना जी ए ना वाचून महिनाभर मला नैराश्य आलं होत त्यामुळे त्यांचं कोणतंही पुस्तक विसरणं अवघड आहे

पुस्तक नाही माहिती पण हे माडगूळकर लेखक म्हणून श्रेष्ठ असतील कदाचित पण निरपराध प्राण्यांची शिकार करून वर त्याच रसभरीत वर्णन करून काय आनंद मिळायचा त्यांना देव जाणो. लोक पण ते आवडीने वाचायचे. या एका कारणाने मी बनगरवाडी सोडून कधी त्यांचं दुसरं पुस्तक वाचलं नाही.

अरे हा गज़लसंग्रह आहे बहुतेक .....गझल कशी करायची हे शिकायला हे पुस्तक मी आणलेलं पण नंतर मला माझी कुवत लक्षात आली

पहिलं पुस्तक मला वाटतंय त्या ढसाळांच्या पत्नीचं आहे .नाव विसरलो... हे मी upsc च्या वेळी वाचलं होत , मराठी साहित्य वैकल्पिक विषयाचा अभ्यास करताना.....ढसाळांचं एक पुस्तक आहे upsc ला मराठी विषयात. त्यावेळी हे पण आणलेले वाचायला
दुसरं फार सोपं आहे, पेंडसेंच जुम्मन

Pages