पुरूषांची ऑनलाईन गळचेपी

Submitted by पुरूष हक्क समिती on 20 February, 2019 - 11:53

माझा आधीचा लेख नष्ट झाला. काही चुका झाल्या असाव्यात. त्या टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

इंटरनेट आल्यापासून महिला अत्यंत सक्रीय होत आहेत. त्यात अनेक महिला स्त्री वादी आणि स्त्री मुक्ती वाल्या आहेत. त्या पुरूषांना योग्य ती ट्रीटमेंट देताना दिसत नाहीत. विनाकारण भांडण उकरून काढणे, टोचून बोलणे, पराचा कावळा करणे हे नित्याचे झाले आहे. स्त्री वाद माहीत असणे हे जणू आधुनिकतेचे चिन्ह झाले आहे. ज्यामुळे अनेक बेगडी पुरूष या स्त्रियांची बाजू घेऊन प्रामाणिक पुरूषांवर हीणकस शेरे मारतात.

मानव जन्म हा सोळा लक्ष योनीतून गेल्यावर तर पुरूष जन्म चौसष्ट लक्ष योनींतून गेल्यावर मिळतो असे म्हटले जाते. असा पुरूष जन्म मिळून स्त्रियांची शाबासकी मिळवण्यासाठी नाही त्याच गोष्टींना पाठिंबा देणारे स्युडो स्त्री वादी पुरुष एकतर गेल्या जन्मी स्त्री असावेत किंवा या जन्मात पुरूष देहात कैद झाल्यासारखे वाटून लवकरच काही तरी करण्याच्या बेतात असावेत असे वाटते.

स्त्री वाद आणि स्त्री मुक्ती हे भांडवलशाहीचे अपत्य आहे. ( हा अत्यंत महत्वाचा भाग प्रशासनाने काढून टाकल्याने दु:ख झाले. प्रशासनाने कृपया विचार करून डिलीट करावे).

भांडवली बाजाराला सोयीचे होते तेव्हां त्यांनी स्त्री ला घरी बसवले आणि पुरूषासाठी बाजार मांडला. हळू हळू सामाजिक बदल झाले. तसे भांडवली बाजाराला व्यापार अपुरा आणि मंद गतीने विस्तारणारा वाटला. त्यांच्या लक्षात आले की पुरूषा सोबत स्त्री ने ही खरेदी केली तर बाजारपेठ वाढेल. त्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री मुक्तीचे वारे वाहू लागले. लक्षात घ्या हे खूळ पश्चिमेकडे आले. इथेच औद्योगिक क्रांती झाली. हे लोक पक्के व्यापारी होत. व्यापारासाठीच वैज्ञानिक क्रांती झाली. व्यापारासाठीच चर्चने माघार घेत लोकशाहीला पाठिंबा दिला.

या व्यापा-यांनी स्त्रियांना घराबाहेर पडून अर्थार्जन करायला भाग पाडले. मग तिच्या हाती पैसा आला. झाले, बाजारपेठ स्त्री केंद्रीत झाली. त्यांच्या लक्षात येत गेले की बाजारपेठ पुरूषकेंद्रीत असण्यापेक्षा स्त्री केंद्रीत असण्याने तिच्या विस्ताराचा वेग कैक पटीने वाढतो. कारण पुरूषाच्या हाती खरेदीचे अधिकार असतील तर तो सणावाराला साडी घेतो. मात्र स्त्री ला अधिकार आणि स्वातंत्र्य दिले तर ती शेजारणीने साडी आणली तरी हेवा वाटल्याने घेते, लग्नासाठी घेते, बाराशासाठी घेते तर कधी कधी नुसतीच आवडली म्हणूनही घेते. अनेकदा कुणी नातेवाईकाने आणली म्हणून परतफेड म्हणूनही घेते. तसेच कुणी घरगुती विक्रीसाठी आणल्या तरी एक तरी ठेवून घेतेच. हे फक्त साडीच्या बाबतीत. दागिने, पर्स, सौंदर्यप्रसाधने अशी अमाप मोठी बाजारपेठ स्त्रियांमुळे व्यापा-यांच्या हाती आलेली आहे. तसेच मुलांची काळजी हे भय दाखवून स्त्रियांना खरेदीला उद्युक्त केले जाते.

टीव्ही ही सुद्धा बाजारपेठ आहे. टीव्हीचे ग्राहकही महिलावर्गच असतो दुर्दैवाने. त्यामुळे मालिका सुद्धा स्त्री केंद्रीत असतात. जगभरच्या महिला एकसमानच वागतात हे एक कोडंच आहे .

हे जाणून न घेता फक्त स्त्री वाद एके स्त्रीवाद आणि स्त्री मुक्ती एके स्त्री मुक्ती करणा-यांना पुरूष बावळट, मंद किंवा लोचट (दुसरी कॆटेगरीच नाही) वाटले नाहीत तरच आश्चर्य !

पुरूष असा खरेदीच्या सापळ्यात अडकत नाहीत म्हणून त्याला बैल वगैरे म्हणणे हा ऑनलाईन स्त्रियांचा आगाउपणा आहे.
पुरूषाची विचार करण्याची पद्धत ही भविष्याचा वेध घेणारी असते. भविष्यात जगात, आजूबाजूला होणारे बदल व त्याचा आपल्यावर कुटुंबियांवर होणारा परिणाम त्याला अस्वस्थ करतो. मुलांच्या शिक्षणाचे भविष्यात कसे होईल, आजचे शिक्षण उद्या कालबाह्य होईल का, राजकारणाचे पुढे कसे परिणाम होतील हे पुरूषांचे विषय असतात. त्यामुळे घरातल्या समस्यांच्या बारीक नक्षीकामाकडे त्य़ाचे लक्ष जात नाही.

हा विचार न करता ऑनलाईन परिसंवाद भरवून तुम्ही घरात स्वयंपाक करता का, बायकोला मदत करता का असे प्रश्न विचारून सापळे लावणे हा पुढारी महिलांचा आवडता उद्योग असतो. यात काही व्रात्य महिला अग्रेसर असतात. एरव्ही शांत महिलांना ही या महिला वात्रटपणा करून पुरूषांना चावे घेण्य़ास भाग पाडत असतात. हे असे प्रश्न असतात की उत्तर द्यायला गेले तरी बाद आणि नाही दिले तरी बाद. कारण प्रतिसाद दिला नाही तरी टोमणे येतच असतात.

ऑनलाईन जगात बायकांचे टोमणे विनाकारण सहन करणे हे नित्याचे झाले आहे. ते सहन करण्याचे सुद्धा एक लिमिट असते. अनेक जण त्यामुळे हे जग सोडून गेले (आभासी). काही महिला घरचा राग ऑनलाईन येऊन दिसेल त्या पुरूषावर काढतात हे योग्य नाही. अशाने पुरूष नेटवर यायला घाबरतील.

त्यांनाही आपले म्हणणे मांडू द्या. त्यांनाही विचार स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचे मत मांडू द्या. प्रत्येकाने स्त्री वादी, स्त्री मुक्ती वादी असावे ही कसली भलतीच सक्ती ?
अनेक बायका तर केवळ अमेरिकेत चालते म्हणून.. या सदराखाली या विचारांचे गोडवे गात असतात. या महिलांना धर्माभिमान देखील जरा कमीच असतो. महिला आणि संस्कृती यांचे घट्ट नाते आहे. महिलांनीच ते सैल केले तर संस्कृतीचे डोलारे कोसळून नाहीत पडणार का ? खरे म्हणजे आधुनिक विचारांच्या मागे संस्कृतीला तडा देण्याचे छुपे कारस्थान देखील असते. त्यासाठी महिलांना हाताशी धरले जाते. कारण महिलांना स्वत:चे व्यक्तीमत्व नसते. त्यांना संस्कृती, धर्म या विषयी आपलेपणा वाटत नाही. म्हणूनच तो सातत्याने त्यांच्या मेंदूत ठाकून ठोकून बसावावा लागतो.

स्त्री वादाच्या नावाखाली स्त्रियांनी बाहेर पडावे आणि पुरूषांनी घरात बसावे असे काही करायचे आहे काय ?
तर मग थेट गुहेतच जाऊन का राहू नये ? त्या वेळी स्त्री प्रधान होती आणि पुरूष सेवक. पुरूष शिकारीला जाई तर स्त्री कुटुंब प्रमुख असे. पण नंतर आपसात भांडणे होऊ लागली तशी पुरूषांची गरज रक्षणासाठी भासू लागली. अशा पद्धतीने पुरूषाला महत्व येत गेले.
इतिहासात खिलजी, घौरी, तुघलक, बाबर, इब्राहीम गोदी, आदिल शहा, सिकंदर, निजाम शहा, टिपू सुलतान यांची भारतावर आक्रमणे झाली. या सर्वांनी महिलांवरच आक्रमण केले आणि त्यांना पळवून नेले. त्यामुळेच पुढे सुरक्षा म्हणून स्त्रियांवर बंधने आली. ही काळजी म्हणून आली. विवाह संस्था देखील स्त्रियांच्या रक्षणासाठी आली.

आता विवाह संस्था मोडीत काढली जात आहे. विवाह बाह्य संबंधात काही चुकीचे नाही असे वाटते. वन नाईट स्टॅंड म्हणजे त्यात काय असे उद्दामपणे विचारले जाते. विवाहाशिवाय लिव्ह इन आले आहे. आणि आता तर विवाहाशिवाय मूल. त्यासाठी आयव्हीएफ नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान. हे जगाचा विनाष करणारे आहे.

अनुभवातून शहाणे होऊन आपण इथवर आलो आहोत. पण आपण आता चंगळवादाच्या विळख्यात भयकाराकडे चाललो आहोत.
स्त्रियांकडे आता माध्यमे आली आहेत. त्य़ांना विरोध चालत नाही.
विरोध करणा-यांना विनोदी ठरवले जात आहे. त्यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र त्यामुळे गंभीर समस्येकडे लक्ष वेधणे कठीण होत चालले आहे.

इथून मागे अनेकांनी या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जी ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे कुणी उघड समोर येत नाही. मी गटगला अनेकांना भेटलो. अनेकांना ऑनलाईन मुस्कटदाबीबद्दल चीड आहे. पण हे लोक निषेध नोंदवत नाहीत. कारण बायकांचे विषारी हल्ले पाहून ते गांगरून जातात. या मूठभर महिला आहेत ज्या आपले मत सेट करत असतात. हळू हळू त्यांना समर्थ देणारे दोन चार शिखंडी येतात. बास्स ~ मग हेच मत सर्वांचे मत म्हणून गृहीत धरले जाते.

या विरोधात बोलाल तर तुमचा आभासी खात्मा केला जातो. मान खाली घालून संन्यास घ्यावा लागतो. कारण तुम्ही प्रामाणिक मत मांडत आहात आणि ते या पुढारी महिला आयड्यांशी जुळत नाही म्हणजे काय ? केव्हढा मोठा गुन्हा ! घोर अपराध !

पण यामुळे अनेक पुरूष घुसमटून जात आहेत. उद्विग्न आहेत. अस्वस्थ आहेत. त्यांना ख-या नावाने येण्याची भीती आहे.
हो, म्ह्णूनच मी पण ख-या आयडीने नाही आलो. काय करू ? प्रचंड दहशतीखाली वावरावे लागते.

पण हे कधी तरी सांगायलाच हवे. स्फोट होईल नाहीतर.

पुरूषांचा विचार करा कधी तरी !
सुधरा रे !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेकदा मुक्तविचार सरणीच्या लोकांना समजून घ्यायला अवघड जाते कारण त्यांची भाषा पाश्चात्य प्रभावाची असते. प्रत्यक्षात मुक्तविचारसरणी आणि धर्मनिष्ठ किंवा नीतिनिष्ठ विचार यामध्ये फारसा फरक नाही. यांच्याविषयी अधिक सविस्तर माहितीसाठी खालील लेख वाचा.

https://www.maayboli.com/node/68067

वरच्या लेखात लिहिल्या प्रमाणे जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये पाश्चात्य असो किंवा पौर्वार्त्य असो, स्त्रीसुख हा पुरुषाचा अधिकार मानला जातो जर तो सकारात्मक सामाजिक कार्य करण्यासाठी बांधिलकी मानत असेल किंवा त्याने याआधी सकारात्मक सामाजिक कार्य केले असेल. त्यामुळे जे लोक एक-रात्रीच्या स्त्रीपुरुष संबंधांना स्वातंत्र्याचा भाग मानतात त्यामध्ये त्यांची धारणा अशी असते, कि तुमच्या सुकृताचे फळ किंवा पुढच्या सामाजिक बांधिलकीची बीज, ती व्यक्ती एका रात्रीच्या आत्यंतिक सुखात पाहते का धर्मनिष्ठ वैवाहिक संबंधात पुढच्या मोठ्या काळामध्ये पाहते? हा निर्णय घ्यायचे त्या व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. सध्या भाषेत किंवा थोड्याशा विनोदांनी बोलायचे झाले, तर गेल्या ४ वर्षातील कंपनीच्या कामाचे फळ, एक रकमी बोनस म्हणून हवा आहे का पुढच्या २ वर्षांची पगारवाढ म्हणून हवी आहे? किंवा पुढच्या व्यवसायासाठी कर्ज एक रकमी हवे आहे का पुढच्या ४ वर्षात टप्प्याटप्प्याने हवे आहे? हा निर्णय घेण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे.

अल्ला उद्दीन खिल्जी, अफजल खान, मोहम्मद घौरी, गझनीचा मुहम्मद ज्यांनी भारतावर आक्रमणे केली आणि स्त्रिया आणि धन लुबाडले. स्त्री ही जिंकून घ्यायची असते हे त्यांना शिकवल्या बद्दल मला त्यांच्या माउलीचे पाय धरावेसे वाटतात नाही तर त्यांनी युद्धेसुद्धा केली नसती. शामची आई सारखी साधी बाई पण जिने साने गुरुजींना घडवले तसे अल्लाउददीन खिल्जी, अफजल खान, मोहम्मद घौरी, गझनीचा मुहम्मद यासारख्या क्रूर, भोगवादी पण यशस्वी व्यक्तींच्या किंवा अकबर, अब्दुल कलाम सारख्या सौम्य, उदारमतवादी आणि यशस्वी मुस्लिम पुरुषांच्या आईची चरित्रे वाचायला मिळाली तर अनेक गोष्टींवर प्रकाश पडेल.

या लेखावर प्रतिक्रिया दिल्याने माझे स्त्री मधे रूपांतर झाले आहे. आता मी काय केले म्हणजे पुन्हा पहिल्याप्रमाणे होईन ?
(चांदोबात तळ्यात स्नान केले की पुन्हा पहिले रूप मिळत असे अशी गोष्ट वाचली होती)

हैंरी पोटर ने दिलेला रूपांतरण मंत्र पाहून बघा एकदा म्हणजे पुन्हा पुरुष जन्म मिळेल.

टीप - मंत्र कार्यान्वित होण्यासाठी ती छोटीशी छडी आवश्यक !

हो मामी ऑनलाईन साडया विकते.. मला प्रोसेस बद्दल जास्त नाही माहीत.. मामीच सांगेल

स्मिते, दिवा का दिलास ते नाय कळालं.. आजकाल बरंच काय काय कळत नाही मला

चुकीच्या ठिकाणी गंभीर विषया वरचा धागा काढला आहात .
इथे फक्त उडते विषय आसवेत धाग्याचे.
विषय धरून ऐक पण पोस्ट नाही .

तेच सर्वात मोठं आश्चर्य आहे .
पण कोणाची मस्करी करू नका .
Aikpan कमेंट नसेल तरी चालेल .
Serious चर्चा आणि सर्वांची विषया धरून मत असतील तर बोधिक भूक bhagte काही तरी वेगळेपण आसव ना .

धाग्यात काही चांगले मुद्दे मांडले आहेत की. धागा पूर्णच दिरेल झालाय. हेच रूनमेश करतो तर शिव्या पडतात त्याला ☺️

शशशशश
नाव नका घेऊ चर्प्स
He Who Must Not Be Named"
असेंम्हणा नैतर आता येईल तो

निवडणूका जवळ आलेत. सर्वाधिक ट्रोलिंग होऊ शकणारे वादग्रस्त लिखाण कोण करू शकते हे पाहण्यासाठी आयटी सेल मध्ये स्पर्धा ठेवली असावी असा दाट संशय आहे.

<>
बौद्धिक भूक भागायला मायबोलीवर? मोठी चूक.
सरळ गीता, उपनिषदे वाचा नि अर्थ लावत बसा - असेल नसेल तेव्हढी सगळी भूक भागून अजीर्ण होईल!
नाहीतर सरळ क्वांटम मेकॅनिक्स किंवा असले काहीतरी वाचा.
इथे फक्त (भलतच) वेगळेपण असते!

बोधिक भूक हो.
म्हणजे काहीतरी बोध घेण्याची भूक.

अरे चोरांनो,
कुठे नेऊन ठेवली होती माझी गळचेपी ?

खरंच खूप वाईट वाटलं प्रतिसाद वाचून. मी बघितलं पुरूषांच्या मनात काय आहे ते. ते बिचारे बायकांच्या हल्ल्याला घाबरून व्यक्त होत नाहीत. त्यांच्या भावना मी इथे मांडल्या. त्याबद्दल आभार तर सोडाच पण काहीच्या काही प्रतिसाद दिलेत. या पेक्षा ते पॉपकॉर्न आणा रे छाप पांचटपणा असलेले प्रतिसाद परवडले.

तुम्हाला आवडले नाही तर तसे स्पष्ट म्हणा. पण तसे म्हटले तर कारणे द्यावी लागत असल्याने कदाचित हा मार्ग अवलंबला असावा.

आता इथून पुढे ऑनलाईन पुरूषांनी स्वतःचे स्वतः पहावे. त्यांचा कैवार घ्यायला प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला देखील हीच वागणूक मिळेल याबद्दल शंका नाही.

आता इथून पुढे ऑनलाईन पुरूषांनी स्वतःचे स्वतः पहावे. त्यांचा कैवार घ्यायला प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला देखील हीच वागणूक मिळेल याबद्दल शंका नाही.

>>>
Rofl

Pages