पुरूषांची ऑनलाईन गळचेपी

Submitted by पुरूष हक्क समिती on 20 February, 2019 - 11:53

माझा आधीचा लेख नष्ट झाला. काही चुका झाल्या असाव्यात. त्या टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

इंटरनेट आल्यापासून महिला अत्यंत सक्रीय होत आहेत. त्यात अनेक महिला स्त्री वादी आणि स्त्री मुक्ती वाल्या आहेत. त्या पुरूषांना योग्य ती ट्रीटमेंट देताना दिसत नाहीत. विनाकारण भांडण उकरून काढणे, टोचून बोलणे, पराचा कावळा करणे हे नित्याचे झाले आहे. स्त्री वाद माहीत असणे हे जणू आधुनिकतेचे चिन्ह झाले आहे. ज्यामुळे अनेक बेगडी पुरूष या स्त्रियांची बाजू घेऊन प्रामाणिक पुरूषांवर हीणकस शेरे मारतात.

मानव जन्म हा सोळा लक्ष योनीतून गेल्यावर तर पुरूष जन्म चौसष्ट लक्ष योनींतून गेल्यावर मिळतो असे म्हटले जाते. असा पुरूष जन्म मिळून स्त्रियांची शाबासकी मिळवण्यासाठी नाही त्याच गोष्टींना पाठिंबा देणारे स्युडो स्त्री वादी पुरुष एकतर गेल्या जन्मी स्त्री असावेत किंवा या जन्मात पुरूष देहात कैद झाल्यासारखे वाटून लवकरच काही तरी करण्याच्या बेतात असावेत असे वाटते.

स्त्री वाद आणि स्त्री मुक्ती हे भांडवलशाहीचे अपत्य आहे. ( हा अत्यंत महत्वाचा भाग प्रशासनाने काढून टाकल्याने दु:ख झाले. प्रशासनाने कृपया विचार करून डिलीट करावे).

भांडवली बाजाराला सोयीचे होते तेव्हां त्यांनी स्त्री ला घरी बसवले आणि पुरूषासाठी बाजार मांडला. हळू हळू सामाजिक बदल झाले. तसे भांडवली बाजाराला व्यापार अपुरा आणि मंद गतीने विस्तारणारा वाटला. त्यांच्या लक्षात आले की पुरूषा सोबत स्त्री ने ही खरेदी केली तर बाजारपेठ वाढेल. त्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री मुक्तीचे वारे वाहू लागले. लक्षात घ्या हे खूळ पश्चिमेकडे आले. इथेच औद्योगिक क्रांती झाली. हे लोक पक्के व्यापारी होत. व्यापारासाठीच वैज्ञानिक क्रांती झाली. व्यापारासाठीच चर्चने माघार घेत लोकशाहीला पाठिंबा दिला.

या व्यापा-यांनी स्त्रियांना घराबाहेर पडून अर्थार्जन करायला भाग पाडले. मग तिच्या हाती पैसा आला. झाले, बाजारपेठ स्त्री केंद्रीत झाली. त्यांच्या लक्षात येत गेले की बाजारपेठ पुरूषकेंद्रीत असण्यापेक्षा स्त्री केंद्रीत असण्याने तिच्या विस्ताराचा वेग कैक पटीने वाढतो. कारण पुरूषाच्या हाती खरेदीचे अधिकार असतील तर तो सणावाराला साडी घेतो. मात्र स्त्री ला अधिकार आणि स्वातंत्र्य दिले तर ती शेजारणीने साडी आणली तरी हेवा वाटल्याने घेते, लग्नासाठी घेते, बाराशासाठी घेते तर कधी कधी नुसतीच आवडली म्हणूनही घेते. अनेकदा कुणी नातेवाईकाने आणली म्हणून परतफेड म्हणूनही घेते. तसेच कुणी घरगुती विक्रीसाठी आणल्या तरी एक तरी ठेवून घेतेच. हे फक्त साडीच्या बाबतीत. दागिने, पर्स, सौंदर्यप्रसाधने अशी अमाप मोठी बाजारपेठ स्त्रियांमुळे व्यापा-यांच्या हाती आलेली आहे. तसेच मुलांची काळजी हे भय दाखवून स्त्रियांना खरेदीला उद्युक्त केले जाते.

टीव्ही ही सुद्धा बाजारपेठ आहे. टीव्हीचे ग्राहकही महिलावर्गच असतो दुर्दैवाने. त्यामुळे मालिका सुद्धा स्त्री केंद्रीत असतात. जगभरच्या महिला एकसमानच वागतात हे एक कोडंच आहे .

हे जाणून न घेता फक्त स्त्री वाद एके स्त्रीवाद आणि स्त्री मुक्ती एके स्त्री मुक्ती करणा-यांना पुरूष बावळट, मंद किंवा लोचट (दुसरी कॆटेगरीच नाही) वाटले नाहीत तरच आश्चर्य !

पुरूष असा खरेदीच्या सापळ्यात अडकत नाहीत म्हणून त्याला बैल वगैरे म्हणणे हा ऑनलाईन स्त्रियांचा आगाउपणा आहे.
पुरूषाची विचार करण्याची पद्धत ही भविष्याचा वेध घेणारी असते. भविष्यात जगात, आजूबाजूला होणारे बदल व त्याचा आपल्यावर कुटुंबियांवर होणारा परिणाम त्याला अस्वस्थ करतो. मुलांच्या शिक्षणाचे भविष्यात कसे होईल, आजचे शिक्षण उद्या कालबाह्य होईल का, राजकारणाचे पुढे कसे परिणाम होतील हे पुरूषांचे विषय असतात. त्यामुळे घरातल्या समस्यांच्या बारीक नक्षीकामाकडे त्य़ाचे लक्ष जात नाही.

हा विचार न करता ऑनलाईन परिसंवाद भरवून तुम्ही घरात स्वयंपाक करता का, बायकोला मदत करता का असे प्रश्न विचारून सापळे लावणे हा पुढारी महिलांचा आवडता उद्योग असतो. यात काही व्रात्य महिला अग्रेसर असतात. एरव्ही शांत महिलांना ही या महिला वात्रटपणा करून पुरूषांना चावे घेण्य़ास भाग पाडत असतात. हे असे प्रश्न असतात की उत्तर द्यायला गेले तरी बाद आणि नाही दिले तरी बाद. कारण प्रतिसाद दिला नाही तरी टोमणे येतच असतात.

ऑनलाईन जगात बायकांचे टोमणे विनाकारण सहन करणे हे नित्याचे झाले आहे. ते सहन करण्याचे सुद्धा एक लिमिट असते. अनेक जण त्यामुळे हे जग सोडून गेले (आभासी). काही महिला घरचा राग ऑनलाईन येऊन दिसेल त्या पुरूषावर काढतात हे योग्य नाही. अशाने पुरूष नेटवर यायला घाबरतील.

त्यांनाही आपले म्हणणे मांडू द्या. त्यांनाही विचार स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचे मत मांडू द्या. प्रत्येकाने स्त्री वादी, स्त्री मुक्ती वादी असावे ही कसली भलतीच सक्ती ?
अनेक बायका तर केवळ अमेरिकेत चालते म्हणून.. या सदराखाली या विचारांचे गोडवे गात असतात. या महिलांना धर्माभिमान देखील जरा कमीच असतो. महिला आणि संस्कृती यांचे घट्ट नाते आहे. महिलांनीच ते सैल केले तर संस्कृतीचे डोलारे कोसळून नाहीत पडणार का ? खरे म्हणजे आधुनिक विचारांच्या मागे संस्कृतीला तडा देण्याचे छुपे कारस्थान देखील असते. त्यासाठी महिलांना हाताशी धरले जाते. कारण महिलांना स्वत:चे व्यक्तीमत्व नसते. त्यांना संस्कृती, धर्म या विषयी आपलेपणा वाटत नाही. म्हणूनच तो सातत्याने त्यांच्या मेंदूत ठाकून ठोकून बसावावा लागतो.

स्त्री वादाच्या नावाखाली स्त्रियांनी बाहेर पडावे आणि पुरूषांनी घरात बसावे असे काही करायचे आहे काय ?
तर मग थेट गुहेतच जाऊन का राहू नये ? त्या वेळी स्त्री प्रधान होती आणि पुरूष सेवक. पुरूष शिकारीला जाई तर स्त्री कुटुंब प्रमुख असे. पण नंतर आपसात भांडणे होऊ लागली तशी पुरूषांची गरज रक्षणासाठी भासू लागली. अशा पद्धतीने पुरूषाला महत्व येत गेले.
इतिहासात खिलजी, घौरी, तुघलक, बाबर, इब्राहीम गोदी, आदिल शहा, सिकंदर, निजाम शहा, टिपू सुलतान यांची भारतावर आक्रमणे झाली. या सर्वांनी महिलांवरच आक्रमण केले आणि त्यांना पळवून नेले. त्यामुळेच पुढे सुरक्षा म्हणून स्त्रियांवर बंधने आली. ही काळजी म्हणून आली. विवाह संस्था देखील स्त्रियांच्या रक्षणासाठी आली.

आता विवाह संस्था मोडीत काढली जात आहे. विवाह बाह्य संबंधात काही चुकीचे नाही असे वाटते. वन नाईट स्टॅंड म्हणजे त्यात काय असे उद्दामपणे विचारले जाते. विवाहाशिवाय लिव्ह इन आले आहे. आणि आता तर विवाहाशिवाय मूल. त्यासाठी आयव्हीएफ नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान. हे जगाचा विनाष करणारे आहे.

अनुभवातून शहाणे होऊन आपण इथवर आलो आहोत. पण आपण आता चंगळवादाच्या विळख्यात भयकाराकडे चाललो आहोत.
स्त्रियांकडे आता माध्यमे आली आहेत. त्य़ांना विरोध चालत नाही.
विरोध करणा-यांना विनोदी ठरवले जात आहे. त्यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र त्यामुळे गंभीर समस्येकडे लक्ष वेधणे कठीण होत चालले आहे.

इथून मागे अनेकांनी या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जी ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे कुणी उघड समोर येत नाही. मी गटगला अनेकांना भेटलो. अनेकांना ऑनलाईन मुस्कटदाबीबद्दल चीड आहे. पण हे लोक निषेध नोंदवत नाहीत. कारण बायकांचे विषारी हल्ले पाहून ते गांगरून जातात. या मूठभर महिला आहेत ज्या आपले मत सेट करत असतात. हळू हळू त्यांना समर्थ देणारे दोन चार शिखंडी येतात. बास्स ~ मग हेच मत सर्वांचे मत म्हणून गृहीत धरले जाते.

या विरोधात बोलाल तर तुमचा आभासी खात्मा केला जातो. मान खाली घालून संन्यास घ्यावा लागतो. कारण तुम्ही प्रामाणिक मत मांडत आहात आणि ते या पुढारी महिला आयड्यांशी जुळत नाही म्हणजे काय ? केव्हढा मोठा गुन्हा ! घोर अपराध !

पण यामुळे अनेक पुरूष घुसमटून जात आहेत. उद्विग्न आहेत. अस्वस्थ आहेत. त्यांना ख-या नावाने येण्याची भीती आहे.
हो, म्ह्णूनच मी पण ख-या आयडीने नाही आलो. काय करू ? प्रचंड दहशतीखाली वावरावे लागते.

पण हे कधी तरी सांगायलाच हवे. स्फोट होईल नाहीतर.

पुरूषांचा विचार करा कधी तरी !
सुधरा रे !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन प्रतिसाद दखलपात्र वाटले.

१. स्वाती आंबोळे
२. मेधा यांचा

स्वाती यांचा प्रतिसाद लांबीला मोठा आहे. पण फारसे विशेष काही नाहीच त्यात. अशा विषयावरच्या लेखाचे गांभीर्य कमी करणे (नेमकी म्हण हाताशी नाही) हा सूर आहे. गोदी कि लोधी हे इतके महत्वाचे आहे काय की ज्यामुळे लेखातल्या आशयाचे अर्थच बदलतील ? तर मग झाले.

२. मेधा यांचा प्रतिसाद.
या ताईंचा गोंधळ झालेला असावा किंवा
हेतुपुरस्सर असा प्रतिसाद दिलेला असावा (विपर्यास)

विपर्यास नाही असेच समजून चालावे. त्यांचा गोंधळ का झाला आहे याबाबत खालच्या स्वतंत्र प्रतिसादात.

मेधाताई
अपार करूणा दाटून राहिली आहे आपल्याबद्दल. आपल्यातला संताप, द्वेष घालवून टाका. ध्यान करा. आपण लेख अजिबात समजून घेतला नाही याचे अत्यंत दु:ख वाटते आहे. आपल्या मनात जो गोंधळ आहे त्यास मी जबाबदार नसून इथले प्रशासन जबाबदार आहे. कारण दोन दिवसांपूर्वी अगदी तपशीलवार आणि क्रोनोलॉजिकल ऑर्डर मधे लेख लिहीला होता. त्याचा बॅक अप सुद्धा नव्हता घेतला हो. आणि प्रशासनाने तलवार चालवून लेख छाटून टाकला. मी निव्वळ स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा लेख लिहीला आहे. त्यातले तपशील अर्थातच सुटले.

सर्वप्रथम आपण ऑनलाईन आणि इतिहास यांचा जो संबंध लावला आहे तो तुमचा गोंधळ आहे. ऑनलाईन अन्याय ही आजची घटना आहे. ऑनलाईन चर्चांमधे जे मुद्दे येतात त्याचे स्पष्टीकरण ऑनलाईन चर्चात देता येत नाही. का नाही ? तर बोचकारे. जे आपण सुद्धा काढले आहेत. त्यामुळे तर्कशुद्ध स्पष्टीकरणे देणे अवघड होऊन बसते.

ते या लेखात एकदाचेच काय ते देऊन टाकलेले आहे. हा लेख अनेक ऑनलाईन चर्चांना लागू पडतो आणि भविष्यातही लागू पडेल या दृष्टीने त्याची मांडणी केली आहे. आज स्त्रीवादावर बोलून महिला पुरूषांना वेड्यात काढतात हे खरे आहे की नाही ?
पण स्त्री वाद का ? याचे उत्तर या विदुषींना तरी ठाऊक आहे काय ? ते इथे देताना इतिहास दिला आहे. आता इतिहासात ऑनलाईन वाद कसा काय असू शकेल ? आपण हे सगळे एकत्र करून वर मलाच गोंधळ झाला असे ठरवले असे दिसते आहे.

पुन्हा नीट वाचा. मन लावून वाचा. मन शांत ठेवून वाचा. एकांगी होऊ नका. आपण स्त्री की पुरूष हे विसरून अगदी तटस्थ पद्धतीने वाचा. तुम्हाला लेख समजेल याची खात्री देतो.

शुभेच्छा !

जामोप्या असता तर वहीनींना शिव्या देऊन मोकळा झाला असता.पण गेले ते दिन गेले. तेव्हा धागे विणायची कला असणारे आयडी होते ,आताशा विणकर राहिले नाही. गुजर गया वो जमाना जब मिल बैठते थे तीन यार ,आप मै और मायबोली.

ते या लेखात एकदाचेच काय ते देऊन टाकलेले आहे. हा लेख अनेक ऑनलाईन चर्चांना लागू पडतो आणि भविष्यातही लागू पडेल या दृष्टीने त्याची मांडणी केली आहे. आज स्त्रीवादावर बोलून महिला पुरूषांना वेड्यात काढतात हे खरे आहे की नाही ?
काय ही तुमची अवस्था .
तुम्ही पुरुषांचा अपमान करू नका .
तुमच्या मताला समस्त पुरुष वर्ग सहमत नाही .
लढाई स्त्रिया लढतायात ..वीरमरण येतंय .
आतिषय खतरनाक गुन्हेगार स्त्रिया पकडतात .
आणि विर गतीला पण जात आहेत .किती मस्त पुरुषांचा जीव वाचतोय.
जे swapanat सुधा bagay मिळत नाही ते चार चौघात बागाय मिळत आहे .
कशाला पुरुषांना हवी संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था

लेखनशैली ओळखीची वाटत आहे.
चांगला मुद्दा मांडला आहे - अखिल पुरुष जात तुमचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही.

ऑनलाईन चर्चांमधे जे मुद्दे येतात त्याचे स्पष्टीकरण ऑनलाईन चर्चात देता येत नाही. >> आँ? अहो इथे राजकारण भागातले धागे दिन दूनी रात चौगुनी या रेटने वाढत असतात. ती मंडळी कशी काय ( त्याच त्याच ) ऑनलाइन चर्चा करतात वर्षानुवर्षे ?

तुम्ही प्रयत्न तर करा स्पष्टीकरण देण्याचे .

अनेक बायका तर केवळ अमेरिकेत चालते म्हणून.. या सदराखाली या विचारांचे गोडवे गात असतात. या महिलांना धर्माभिमान देखील जरा कमीच असतो.
कशावरुन ठरवलेत हे ? कुठल्या धर्माच्या महिलांचा अभ्यास केलात ? जरा कमी म्हणजे नेमका किती कमी ? किती धर्माभिमान पुरेसा आहे हे कोण ठरवणार ?

महिला आणि संस्कृती यांचे घट्ट नाते आहे. महिलांनीच ते सैल केले तर संस्कृतीचे डोलारे कोसळून नाहीत पडणार का ?>> संस्कृतीचे डोलारे एवढे फ्लिम्सी असतील तर पडू देत की . सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ! सती आणि केशवपन प्रथा मोडीत गेल्याच ना ? काही बिघडलं का कोणाचं ? पुरुषांचे सुद्धा १०० वर्षांपूर्वीचे पेहराव आता नाहीत. पण काय कोसळलं त्यामुळे ?

खरे म्हणजे आधुनिक विचारांच्या मागे संस्कृतीला तडा देण्याचे छुपे कारस्थान देखील असते. त्यासाठी महिलांना हाताशी धरले जाते. >> मग तुम्ही या कारस्थान्यांचा बंदोबस्त करा ना ? महिलांनाच का जबाबदार धरताय ?

कारण महिलांना स्वत:चे व्यक्तीमत्व नसते. >> मग त्या पुरुषांची गळचेपी करतात यात त्यांची काय चूक? सगळी भांडवलदारांची कारस्थाने ! शिकल्या सवरल्या पण तरिही व्यक्तिमत्व नसलेल्या बायकांवर खापर फोडताय ?

त्यांना संस्कृती, धर्म या विषयी आपलेपणा वाटत नाही. म्हणूनच तो सातत्याने त्यांच्या मेंदूत ठाकून ठोकून बसावावा लागतो.>> त्या रामतीर्थकर बाईंची भाषणे ऐकाच! त्यांना ठोकाठो़की चांगलीच जमते.

मेधाताई, तुमचे प्रतिसाद असंबद्ध आहेत. यातून वितंडवादा शिवाय हाती काहीच लागणार नाही.
@ सर्व
माझे हे खरे प्रोफाईल नाही हे मी सांगितले आहे. नैतिकतेच्या दृष्टीने त्यामुळेच मला इथे मर्यादा आहेत व राहतील. फक्त जेव्हां जेव्हां पुरूषांची गळचेपी होईल तेव्हांच आणि गरज लागेल तेव्हांच लिहीण्यासाठी आहे ते. खरे तर पुरूषांनी स्वतः लिहावे हीच अपेक्षा आहे. ही फक्त क्रांतीची ठिणगी आहे.
मला या प्रोफाईलचा वापर करून ना मार्मिक टोले द्यायचे आहेत ना हुप्पाहुय्या करून गोंधळ घालायचा आहे. आपण सूज्ञ आहातच.

पुरूषांची गळचेपी होईल तेव्हांच आणि गरज लागेल तेव्हांच >>> Proud
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवत .. आठवले !
Lol
पुरुषांची ऑनलाइन गळचेपी थांबवण्यासाठी तुम्ही आता शस्त्र हाती धराच म्हणतो मी Light 1

वावा! तो परवाचा धागा मी वाचलेला. मग काल दिसला नाही. म्हटलं अर्र बरंच काही मिस केलं मी.
पण आज हा धागा आणि प्रतिसाद वाचले.
छान लिहिता तुम्ही. लिहित रहा.
लोक गंभीर प्रतिसाद देताहेत ते पाहुन डोपा.
मार्मिक टोले द्यायचे आहेत ना हुप्पाहुय्या करून गोंधळ>>>>>>>>>>> ह्यावरुन काही समजायचं आहे काय? Happy

हा विनोदी लेख आहे का ? कुठल्याही प्रकारात असला तरी अजिबात आवडला नाही. अत्यंत उथळ विचार.

<< अनेक बायका तर केवळ अमेरिकेत चालते म्हणून.. या सदराखाली या विचारांचे गोडवे गात असतात. या महिलांना धर्माभिमान देखील जरा कमीच असतो. >>
-------- त्यांना धर्माचा अभिमान असायला पाहिजे या अपेक्षा कशाला? त्यांनी काय धर्माचा ठेका घेतला आहे का ?
त्यांना अभिव्यक्ती, विचार स्वातंत्र आहे हे मान्य करा.

<< महिला आणि संस्कृती यांचे घट्ट नाते आहे. महिलांनीच ते सैल केले तर संस्कृतीचे डोलारे कोसळून नाहीत पडणार का ? >>
-------- कुठली भंपक संस्कृती आहे ज्यात सर्व जबाबदारी महिलांकडे जाते ?
कुठल्या जमान्यात वावरत आहात ?

<<खरे म्हणजे आधुनिक विचारांच्या मागे संस्कृतीला तडा देण्याचे छुपे कारस्थान देखील असते. त्यासाठी महिलांना हाताशी धरले जाते. कारण महिलांना स्वत:चे व्यक्तीमत्व नसते. त्यांना संस्कृती, धर्म या विषयी आपलेपणा वाटत नाही. म्हणूनच तो सातत्याने त्यांच्या मेंदूत ठाकून ठोकून बसावावा लागतो. >>
-------- महिलांना स्वत:चे व्यक्तीमत्व नसते ? हे काय लिहीले आहे ?

अय्या, मला तर लेख वाचून साडीखरेदीचीच प्रबळ इच्छा झालेली आहे. बरेच दिवसांत नवर्‍याचा खिसा कापलेला नाहीये हे लक्षात आलं.

बघा, भांडवलदारी मानसिकतेतून उभ्या राहिलेल्या स्त्रीशिक्षणाचा हा सरळसरळ ढळढळीत दुष्परिणाम. मला मेलीला वाचायला शिकवलं नसतं तर असे साडीखरेदीचे उल्लेख वाचून मी चळले नसते आणि नवर्‍याचे पैसे वाचले असते (डेटापॅकही वाचला असता तो निराळाच आणखी!)

मला एक शंका आहे:
सुधरा रे चूक वाटतेय .. सुधारा रे हवे ना?

वैवकु???
मला पाटील वाटले.

वरदाबाईंनी लेख वाचुन त्यांना साडीखरेदीची प्रबळ इच्छा झालीये असं लिहिलंय म्हणुन मी कला निकेतनच्या सेलबद्दल लिहिलं ओ.

ऑन लाईनदेखिल बरेच सेल सुरु आहेत! ऑन लाईन चर्चा सुरु आहे म्हणून सुचविले! उगा ऑनलाईन गैर अर्थ नको निघायला!

मी सकाळी माबो लॉगिन करून, फोन बाजूला ठेवून कामात मग्न होतो. मध्येच मला काहीतरी ढासळत असण्याच्या आवाज आला फोन मधून.
आता वेळ मिळाल्यावर जरा शोधले तेव्हा लक्षात आले, वरदा आणि सस्मित यांनी साडी खरेदी आणि सेलच्या पोस्टी टाकून संस्कृती ढासळवली, त्याचा आवाज होता तो.

वरदा आणि सस्मित यांनी साडी खरेदी आणि सेलच्या पोस्टी टाकून संस्कृती ढासळवली>>> बाब्बो! ढास लागली हो मला हे वाचुन.

ऑन लाईनदेखिल बरेच सेल सुरु आहेत >>> हो, मी आत्ताच एक ब्रेसलेट ऑर्डर केले अ‍ॅमेझान वर, खुप छान व्हॅरायटी आहे बघा कुणाला हवे असेल तर.

वरदा आणि सस्मित यांनी साडी खरेदी आणि सेलच्या पोस्टी टाकून संस्कृती ढासळवली > Lol
लेख ८ मार्च ला टाकय्ला हवा होता Proud

म्हणुन मी कला निकेतनच्या सेलबद्दल लिहिलं ओ >>> मला आवडतं साडी घेऊन द्यायला. मुलीलाही घ्यावे लागतातच. सेल असेल तर बरं म्हणून धन्यवाद म्हणालो. पण ते क.नि. पुण्यातले आहे का ?

Pages