पुरूषांची ऑनलाईन गळचेपी

Submitted by पुरूष हक्क समिती on 20 February, 2019 - 11:53

माझा आधीचा लेख नष्ट झाला. काही चुका झाल्या असाव्यात. त्या टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

इंटरनेट आल्यापासून महिला अत्यंत सक्रीय होत आहेत. त्यात अनेक महिला स्त्री वादी आणि स्त्री मुक्ती वाल्या आहेत. त्या पुरूषांना योग्य ती ट्रीटमेंट देताना दिसत नाहीत. विनाकारण भांडण उकरून काढणे, टोचून बोलणे, पराचा कावळा करणे हे नित्याचे झाले आहे. स्त्री वाद माहीत असणे हे जणू आधुनिकतेचे चिन्ह झाले आहे. ज्यामुळे अनेक बेगडी पुरूष या स्त्रियांची बाजू घेऊन प्रामाणिक पुरूषांवर हीणकस शेरे मारतात.

मानव जन्म हा सोळा लक्ष योनीतून गेल्यावर तर पुरूष जन्म चौसष्ट लक्ष योनींतून गेल्यावर मिळतो असे म्हटले जाते. असा पुरूष जन्म मिळून स्त्रियांची शाबासकी मिळवण्यासाठी नाही त्याच गोष्टींना पाठिंबा देणारे स्युडो स्त्री वादी पुरुष एकतर गेल्या जन्मी स्त्री असावेत किंवा या जन्मात पुरूष देहात कैद झाल्यासारखे वाटून लवकरच काही तरी करण्याच्या बेतात असावेत असे वाटते.

स्त्री वाद आणि स्त्री मुक्ती हे भांडवलशाहीचे अपत्य आहे. ( हा अत्यंत महत्वाचा भाग प्रशासनाने काढून टाकल्याने दु:ख झाले. प्रशासनाने कृपया विचार करून डिलीट करावे).

भांडवली बाजाराला सोयीचे होते तेव्हां त्यांनी स्त्री ला घरी बसवले आणि पुरूषासाठी बाजार मांडला. हळू हळू सामाजिक बदल झाले. तसे भांडवली बाजाराला व्यापार अपुरा आणि मंद गतीने विस्तारणारा वाटला. त्यांच्या लक्षात आले की पुरूषा सोबत स्त्री ने ही खरेदी केली तर बाजारपेठ वाढेल. त्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री मुक्तीचे वारे वाहू लागले. लक्षात घ्या हे खूळ पश्चिमेकडे आले. इथेच औद्योगिक क्रांती झाली. हे लोक पक्के व्यापारी होत. व्यापारासाठीच वैज्ञानिक क्रांती झाली. व्यापारासाठीच चर्चने माघार घेत लोकशाहीला पाठिंबा दिला.

या व्यापा-यांनी स्त्रियांना घराबाहेर पडून अर्थार्जन करायला भाग पाडले. मग तिच्या हाती पैसा आला. झाले, बाजारपेठ स्त्री केंद्रीत झाली. त्यांच्या लक्षात येत गेले की बाजारपेठ पुरूषकेंद्रीत असण्यापेक्षा स्त्री केंद्रीत असण्याने तिच्या विस्ताराचा वेग कैक पटीने वाढतो. कारण पुरूषाच्या हाती खरेदीचे अधिकार असतील तर तो सणावाराला साडी घेतो. मात्र स्त्री ला अधिकार आणि स्वातंत्र्य दिले तर ती शेजारणीने साडी आणली तरी हेवा वाटल्याने घेते, लग्नासाठी घेते, बाराशासाठी घेते तर कधी कधी नुसतीच आवडली म्हणूनही घेते. अनेकदा कुणी नातेवाईकाने आणली म्हणून परतफेड म्हणूनही घेते. तसेच कुणी घरगुती विक्रीसाठी आणल्या तरी एक तरी ठेवून घेतेच. हे फक्त साडीच्या बाबतीत. दागिने, पर्स, सौंदर्यप्रसाधने अशी अमाप मोठी बाजारपेठ स्त्रियांमुळे व्यापा-यांच्या हाती आलेली आहे. तसेच मुलांची काळजी हे भय दाखवून स्त्रियांना खरेदीला उद्युक्त केले जाते.

टीव्ही ही सुद्धा बाजारपेठ आहे. टीव्हीचे ग्राहकही महिलावर्गच असतो दुर्दैवाने. त्यामुळे मालिका सुद्धा स्त्री केंद्रीत असतात. जगभरच्या महिला एकसमानच वागतात हे एक कोडंच आहे .

हे जाणून न घेता फक्त स्त्री वाद एके स्त्रीवाद आणि स्त्री मुक्ती एके स्त्री मुक्ती करणा-यांना पुरूष बावळट, मंद किंवा लोचट (दुसरी कॆटेगरीच नाही) वाटले नाहीत तरच आश्चर्य !

पुरूष असा खरेदीच्या सापळ्यात अडकत नाहीत म्हणून त्याला बैल वगैरे म्हणणे हा ऑनलाईन स्त्रियांचा आगाउपणा आहे.
पुरूषाची विचार करण्याची पद्धत ही भविष्याचा वेध घेणारी असते. भविष्यात जगात, आजूबाजूला होणारे बदल व त्याचा आपल्यावर कुटुंबियांवर होणारा परिणाम त्याला अस्वस्थ करतो. मुलांच्या शिक्षणाचे भविष्यात कसे होईल, आजचे शिक्षण उद्या कालबाह्य होईल का, राजकारणाचे पुढे कसे परिणाम होतील हे पुरूषांचे विषय असतात. त्यामुळे घरातल्या समस्यांच्या बारीक नक्षीकामाकडे त्य़ाचे लक्ष जात नाही.

हा विचार न करता ऑनलाईन परिसंवाद भरवून तुम्ही घरात स्वयंपाक करता का, बायकोला मदत करता का असे प्रश्न विचारून सापळे लावणे हा पुढारी महिलांचा आवडता उद्योग असतो. यात काही व्रात्य महिला अग्रेसर असतात. एरव्ही शांत महिलांना ही या महिला वात्रटपणा करून पुरूषांना चावे घेण्य़ास भाग पाडत असतात. हे असे प्रश्न असतात की उत्तर द्यायला गेले तरी बाद आणि नाही दिले तरी बाद. कारण प्रतिसाद दिला नाही तरी टोमणे येतच असतात.

ऑनलाईन जगात बायकांचे टोमणे विनाकारण सहन करणे हे नित्याचे झाले आहे. ते सहन करण्याचे सुद्धा एक लिमिट असते. अनेक जण त्यामुळे हे जग सोडून गेले (आभासी). काही महिला घरचा राग ऑनलाईन येऊन दिसेल त्या पुरूषावर काढतात हे योग्य नाही. अशाने पुरूष नेटवर यायला घाबरतील.

त्यांनाही आपले म्हणणे मांडू द्या. त्यांनाही विचार स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचे मत मांडू द्या. प्रत्येकाने स्त्री वादी, स्त्री मुक्ती वादी असावे ही कसली भलतीच सक्ती ?
अनेक बायका तर केवळ अमेरिकेत चालते म्हणून.. या सदराखाली या विचारांचे गोडवे गात असतात. या महिलांना धर्माभिमान देखील जरा कमीच असतो. महिला आणि संस्कृती यांचे घट्ट नाते आहे. महिलांनीच ते सैल केले तर संस्कृतीचे डोलारे कोसळून नाहीत पडणार का ? खरे म्हणजे आधुनिक विचारांच्या मागे संस्कृतीला तडा देण्याचे छुपे कारस्थान देखील असते. त्यासाठी महिलांना हाताशी धरले जाते. कारण महिलांना स्वत:चे व्यक्तीमत्व नसते. त्यांना संस्कृती, धर्म या विषयी आपलेपणा वाटत नाही. म्हणूनच तो सातत्याने त्यांच्या मेंदूत ठाकून ठोकून बसावावा लागतो.

स्त्री वादाच्या नावाखाली स्त्रियांनी बाहेर पडावे आणि पुरूषांनी घरात बसावे असे काही करायचे आहे काय ?
तर मग थेट गुहेतच जाऊन का राहू नये ? त्या वेळी स्त्री प्रधान होती आणि पुरूष सेवक. पुरूष शिकारीला जाई तर स्त्री कुटुंब प्रमुख असे. पण नंतर आपसात भांडणे होऊ लागली तशी पुरूषांची गरज रक्षणासाठी भासू लागली. अशा पद्धतीने पुरूषाला महत्व येत गेले.
इतिहासात खिलजी, घौरी, तुघलक, बाबर, इब्राहीम गोदी, आदिल शहा, सिकंदर, निजाम शहा, टिपू सुलतान यांची भारतावर आक्रमणे झाली. या सर्वांनी महिलांवरच आक्रमण केले आणि त्यांना पळवून नेले. त्यामुळेच पुढे सुरक्षा म्हणून स्त्रियांवर बंधने आली. ही काळजी म्हणून आली. विवाह संस्था देखील स्त्रियांच्या रक्षणासाठी आली.

आता विवाह संस्था मोडीत काढली जात आहे. विवाह बाह्य संबंधात काही चुकीचे नाही असे वाटते. वन नाईट स्टॅंड म्हणजे त्यात काय असे उद्दामपणे विचारले जाते. विवाहाशिवाय लिव्ह इन आले आहे. आणि आता तर विवाहाशिवाय मूल. त्यासाठी आयव्हीएफ नावाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान. हे जगाचा विनाष करणारे आहे.

अनुभवातून शहाणे होऊन आपण इथवर आलो आहोत. पण आपण आता चंगळवादाच्या विळख्यात भयकाराकडे चाललो आहोत.
स्त्रियांकडे आता माध्यमे आली आहेत. त्य़ांना विरोध चालत नाही.
विरोध करणा-यांना विनोदी ठरवले जात आहे. त्यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र त्यामुळे गंभीर समस्येकडे लक्ष वेधणे कठीण होत चालले आहे.

इथून मागे अनेकांनी या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जी ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे कुणी उघड समोर येत नाही. मी गटगला अनेकांना भेटलो. अनेकांना ऑनलाईन मुस्कटदाबीबद्दल चीड आहे. पण हे लोक निषेध नोंदवत नाहीत. कारण बायकांचे विषारी हल्ले पाहून ते गांगरून जातात. या मूठभर महिला आहेत ज्या आपले मत सेट करत असतात. हळू हळू त्यांना समर्थ देणारे दोन चार शिखंडी येतात. बास्स ~ मग हेच मत सर्वांचे मत म्हणून गृहीत धरले जाते.

या विरोधात बोलाल तर तुमचा आभासी खात्मा केला जातो. मान खाली घालून संन्यास घ्यावा लागतो. कारण तुम्ही प्रामाणिक मत मांडत आहात आणि ते या पुढारी महिला आयड्यांशी जुळत नाही म्हणजे काय ? केव्हढा मोठा गुन्हा ! घोर अपराध !

पण यामुळे अनेक पुरूष घुसमटून जात आहेत. उद्विग्न आहेत. अस्वस्थ आहेत. त्यांना ख-या नावाने येण्याची भीती आहे.
हो, म्ह्णूनच मी पण ख-या आयडीने नाही आलो. काय करू ? प्रचंड दहशतीखाली वावरावे लागते.

पण हे कधी तरी सांगायलाच हवे. स्फोट होईल नाहीतर.

पुरूषांचा विचार करा कधी तरी !
सुधरा रे !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शालीजी, आपणास भेटीचा योग आला नाही, मात्र आपल्या भावना पोहोचल्या.
सगळेच लिहीले असते. पण त्याला तक्रारीचे स्वरूप येऊ नये यासाठी थोडक्यात लिहावे असा विचार केला. यावरून नेमका विषय पोहोचावा ही अपेक्षा आहे. असे न झाल्यास नंतर लिहीता येईल.

>>हे जे वर लिहिलेय ते कुणी पूर्ण वाचले का??>> नाही. वाचायचं असतं का? ठराविक आयडींनी लिहिलेलं दिसलं की फक्त प्रतिसादच वाचायचे.

तुम्ही पुरुष असून सुद्धा जर स्त्रियांची बाजू घेत असाल तर तुम्ही शिखंडी आहात असा लेखात सूर आहे.

टिपू सुलतान हा परकीय आक्रमणकर्ता होता ही नवीन माहिती लेखात मिळते

लेखक घुसमटून जात आहेत. उद्विग्न आहेत. अस्वस्थ आहेत. त्यांना ख-या नावाने येण्याची भीती आहे.

स्त्री वाद आणि स्त्री मुक्ती हे भांडवलशाहीचे अपत्य आहे
मी फक्त स्त्री वाद हे भांडवलशाहीचे अपत्य आहे ह्याच्याशी सहमत आहे (उगाच, लेखकाला बरं वाटावं म्हणून)

इब्राहिम गोदी (लोदी होता एक, एक गोदोही ऐकून माहीत आहे. ही गोदी कोण आहे? असो.) सारख्या आक्रमकांपासून स्त्रियांना संरक्षण देऊ शकणारे आणि वर सणावाराला साडीही घेऊन देणारे पुरुष मूठभर स्त्रियांची दहशत वाटण्याइतके दुर्बल करून सोडणार्‍या पाश्चिमात्य भांडवलशाहीचा धिक्कार असो!
स्वतःचं व्यक्तिमत्वसुद्धा नसलेल्या स्त्रिया दुसर्‍यांची मुस्कटदाबी करतात म्हणजे काय! छे!!
भविष्याचा वेध घेणार्‍या पुरुषांना लिव्हइन आणि आयव्हीएफ सर्रास होण्याइतकी वेळ येईपर्यंत हे सगळं थांबवावं हे कळलं कसं नाही म्हणते मी!
उद्विग्न, अस्वस्थ, गांगरून जाणारे, मान खाली घालून संन्यास घेतलेले आणि दहशतीखाली वावरणारे पुरुष हेच खरे पुरुष असून बाकी सगळ्या स्त्रियाच आहेत, कुठल्याही शरीरात कैद असल्या तरीही - असं मी जाहीर करू इच्छिते.
तसंच सगळ्या स्त्रियांनी आत्ताच्या आत्ता संस्कृतीचे कोसळलेले डोलारे उचलून पुन्हा घट्ट आवळून घ्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करते.
लक्षात ठेवा, आयडीचा खात्मा झाला तरी त्यामागचा आत्मा कुठ्ठे जात नाही!

इंटरनेट आल्यापासून महिला अत्यंत सक्रीय होत आहेत. >> त्या आधी मेंदी लावून आणि बांगड्या भरून रिकामटेकड्या बसलेल्या असत. पुरुषच सर्व घरची आणि बाहेरची कामे करत असत नैक्का ?

मानव जन्म हा सोळा लक्ष योनीतून गेल्यावर तर पुरूष जन्म चौसष्ट लक्ष योनींतून गेल्यावर मिळतो असे म्हटले जाते. >> कुठे म्हटलंय असं ? संदर्भ द्या पाहू .

भांडवली बाजाराला सोयीचे होते तेव्हां त्यांनी स्त्री ला घरी बसवले आणि पुरूषासाठी बाजार मांडला. हळू हळू सामाजिक बदल झाले. तसे भांडवली बाजाराला व्यापार अपुरा आणि मंद गतीने विस्तारणारा वाटला. त्यांच्या लक्षात आले की पुरूषा सोबत स्त्री ने ही खरेदी केली तर बाजारपेठ वाढेल. त्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री मुक्तीचे वारे वाहू लागले. लक्षात घ्या हे खूळ पश्चिमेकडे आले. इथेच औद्योगिक क्रांती झाली. हे लोक पक्के व्यापारी होत. व्यापारासाठीच वैज्ञानिक क्रांती झाली. व्यापारासाठीच चर्चने माघार घेत लोकशाहीला पाठिंबा दिला. >> इंटरनेटच्या आधीच्या काळात हे सर्व झालेले असल्याने त्याकाळात स्त्रिया काही सक्रीय नव्हत्या. मग ही सर्व पुरुषांचीच कारस्थाने नव्हेत काय ? स्त्रियांचा काय दोष ? भांडवलशाही मुळे होणारा स्टॉक मार्केट मधला फायदा तेव्हढा हवा ?

बाजारपेठ स्त्री केंद्रीत झाली. >> कशावरुन अशी जनरल विधानं करताय ? कुठल्या देशात ? कुठल्या प्रॉडक्ट्सची बाजार पेठ स्त्री केंद्रित आहे - कंस्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरिंग , ऑटो , डिफेंस , या सर्व स्त्री केंद्रित आहेत ?

पुरूषाची विचार करण्याची पद्धत ही भविष्याचा वेध घेणारी असते. भविष्यात जगात, आजूबाजूला होणारे बदल व त्याचा आपल्यावर कुटुंबियांवर होणारा परिणाम त्याला अस्वस्थ करतो. मुलांच्या शिक्षणाचे भविष्यात कसे होईल, आजचे शिक्षण उद्या कालबाह्य होईल का, राजकारणाचे पुढे कसे परिणाम होतील हे पुरूषांचे विषय असतात. >> मग भांडवल शाही लोकांची कारस्थाने कशी काय निसटली ब्वा या पुरुषांच्या निरिक्षणातून ? की भांडवलशाही लोकांनी बारीक नक्षीकाम केलेल्या कागदांवर सिक्रेट मॅनिफेस्टो लिहिले होते स्त्रियांना घराबाहेर काढण्यासाठी आणि सर्व बाजारपेठा स्त्रियांच्या हाती देण्यासाठी ?

इथून मागे अनेकांनी या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जी ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे कुणी उघड समोर येत नाही. >> जगाची लोख संख्या किती ? भारताची, मराठी भाषिकांची किती असेल ? त्यातले किती टक्के स्त्री / पुरुष इथे येत असतील ? मायबोलीवर येणार्‍यांपैकी किती लोक गटग ला येत असतील ? मायबोलीवर अगदी झाडून सगळ्यांनी तुम्हाला समर्थ ( तुमचाच शब्द) दिले तरी कितीसा फरक पडेल. मायबोलीवर उगाच धुरळा उडवण्यापेक्षा प्रत्यक्ष जगात काहीतरी प्रयत्न करा .

त्या एक रामतीर्थकर बाई आहेत. त्यांची व्याख्याने ऐका. शक्य असल्यास त्यांच्या जोडीने कार्यक्रम करता येतील का ते पहा . तुमच्या विचारांशी मिळते जुळते विचार असलेले श्रोते त्यांच्या व्याखांनाना आलेले दिसतील तुम्हाला.

आणि आता तर विवाहाशिवाय मूल. >> कोणत्या पोपाने अ‍ॅडम-ईव्हचा विवाह लावला होता म्हणे? "आता" लिहीलं आहे म्हणून प्रश्न पडला..

<<तसंच सगळ्या स्त्रियांनी आत्ताच्या आत्ता संस्कृतीचे कोसळलेले डोलारे उचलून पुन्हा घट्ट आवळून घ्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करते.>>
अनुमोदन. स्वतःपासून सुरुवात करा! म्हणजे आम्हा पुरुषांना बीअर पीत टीव्ही बघत बसता येईल.
<<लक्षात ठेवा, आयडीचा खात्मा झाला तरी त्यामागचा आत्मा कुठ्ठे जात नाही!>>
सत्यवचन.

पुरुष आहेत भित्रट. ओनलाइन ओरडा आणि हॅशटॅग्ज काढा.
बायका जगात कैदेत आहेत,पण पुरुष एका टिचभर घराच्या अंडासेलमध्ये.

वन नाईट स्टॅंड म्हणजे त्यात काय असे उद्दामपणे विचारले जाते.
ही तर पुरुषांची अनादिकालापासन सुप्त इच्या होती ती पूर्ण होते आहे म्हणजे आनंद झाला पाहिजे .
जी मागणी मोर्चे काडून सुधा मान्य नसती झाली ती काही ही न करता मान्य होते केवढा आनंदाचा क्षण आहे

घर जमाई वगैरे थीम बद्दल पिक्चर बघितल्यावर मानसिक आघातातून हां लेख जन्मास आला असावा काय !

खरंच पुरूष म्हणून ऑनलाईन वावरताना गळचेपी होते. यावर बरंच लिहायचं होतं पण भीती वाटते.

डोळ्या समोर ऐक दृश्य घ्या सर्व समस्त स्त्रीवर्ग सकाळी लवकर ऑफिस ल जातोय .
पुरुष घरी घरकाम करत आहेत .
मुळातच पुरुष मैत्रिप्रिय आणि मदत प्रिय असल्या मुळे सर्व मित्र मिळून aikmeka ल मदत करून घरातील काम 1/2 तासात उरकून दुपारी मस्त मैफिलीला बसलेत काही tention नाही .
नुसत्या कल्पनेने किती बरं वाटतं आहे .स्त्री मुक्ती ल विरोध करून कशाला येणाऱ्या सुखाच्या काळाला अपशकून करताय

माणसाला ही गोष्ट करू नको आस सांगितलं की तो तीच गोष्ट करतो हा मानवी स्वभाव आणि पुरुषांच्या master plan cha ऐक भाग आहे किरण .
त्या मुळे हा प्रश्न पुरुष हितासाठी परत विचारू नये

खरे म्हणजे एव्हढी वाईट अवस्था नाहीये. उग्गाच आपले काहीतरी बारिक सारिक गोष्ट घेऊन त्याला आणिबाणी म्हणायचे!
आमच्या अमेरिकेत सध्या तसेच चालले आहे. त्याबद्दलच उपरोधात्मक असा हा लेख आहे की काय असे वाटले.
मला एकट्यालाच हे कळले का?

कामाच्या गडबडीमुळे इकडे येता आला नाही. क्षमस्व !
काही प्रश्नांकित प्रतिसाद आहेत. त्यांना उत्तर देईन. काही शेरे बाजी आहे. तिकडे अर्थात दुर्लक्ष. पॉपकॉर्न वगैरे कमेण्ट्स हे आता खूप कॉमन झाले आहे. एखाद्या विषयावर चर्चा करायची नसेल तर नका करू. पण दर वेळी हे असे ताशेरे का ? चालायचंच. पुढच्या प्रतिसादातून उत्तर देण्याचा प्रयत्न (जमेल तसा) करणार आहे.

Pages