धरणा चे पाणी

Submitted by योग on 4 February, 2019 - 09:07

https://timesofindia.indiatimes.com/india/mamata-banerjee-vs-cbi-who-sai...

बंगाल मध्ये नक्की चाललय तरी काय? ज्या प्रदेशाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मह्त्वाचे योगदान दिले, ज्या प्रांताला संस्कृती, परंपरा, कला, व शैक्षणीक वारसा आहे, ज्या प्रदेशाचा भारताच्या राजकीय इतीहासात मोठा सहभाग आहे त्या बंगाल चे मात्र आज अक्षरशः राजकीय डबके झाल्याचे दृष्य आहे. खरे तर ४० वर्षे कम्युनिस्टांच्या सत्तेत भरडलेल्या जनतेने २०११ मध्ये एकमताने निवडून दिलेल्या ममता बॅनर्जी यांना बंगाल चा चेहेरा मोहरा बदलून नविन विकास साधण्याची एक उत्कृष्ट संधी होती. पण दुर्दैवाने गेले दहा वर्षात बंगला मध्ये नकारात्मक व अहंकाराचे वारेच जास्त वाहिले. आजही कलकत्ता सारख्या शहराची दुरावस्था व दारीद्र्य रेषेखाली राहणार्‍या मोठ्या मजदूर वर्गाची अवस्था पाहता बंगाल पुन्हा एकदा एका चूकीच्या नेत्रूत्वाखाली भरडला जाण्याची लक्षणे आहेत.

हे जनतेचे दुर्दैव म्हणायचे का निव्वळ राजकारण? पण ईथे काहितरी वेगळेच शिजते आहे.

राज्याच्या एका शहराच्या पोलिस कमिशनर ची CBI चौकशी सुरू आहे ईथवर तर सर्व ऊघड होते. पण त्या अधिकाराच्या घरी CBI चे अधिकारी चौकशी ला गेल्यानंतर जे काही नाट्य घडत गेले त्याचा आता जो काही तमाशा मांडला आहे ते लज्जास्पद नाही तर अत्यंत संतापदायक आहे. एरवी पोलिस दलातील अधिकारी व राजकीय नेते यांचे विशेष जमत नसते हा इतीहास आहे. आणि ईथे मात्र बंगाल सारख्या एका मोठ्या प्रांताची मुख्यमंत्री, बाकी सर्व कामे सोडून तातडीने धरणे धरून बसते? काय तर म्हणे हा बंगाल च्या सर्वभौमत्वार घाला आहे? बर, पोलिसांना संरक्षण देणे, त्यांना मदत करणे हे नक्कीच सरकारचे कर्तव्य असले तरिही ज्या अधिकार्‍याची चीट फंड घोटाळ्यात चौकशी सुरू आहे त्याच्या बचावासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात ऊतरतात, वर पोलिस दलाचे अधिकारी CBI विरुध्द तैनात केले जातात. ईथवर हे थांबलेले नाही तर आता या तमाशाला सरकार (मोदी) वि. लोकशाही बचाव चा रंग दिला जात आहे.

कलकत्त्यात शाम बाजार सारख्या अतीशय गर्दीच्या व दाट वस्तीतील रहाणीच्या ठिकाणी पूल पडतो पण कुणावरही ठोस कारवाई होत नाही. शेतकर्‍यांच्या हिताच्या नावाखाली नंदीग्राम चा नॅनो प्लांट गुजराथेत जातो, बंगाल चे नुकसान होते. पण कुणालाही त्याची तमा नाही. भाजपा ला राजकीय सभा घ्यायची परवानगी नाकारली जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना डावलून आपल्या हस्तकांची पाठराखण केली जाते. नेमकी लोकशाही च्या जीवावर कोण ऊठले आहे हे स्पष्ट आहे. भारताच्या आजवरच्या इतीहासात एका पोलिस अधिकार्‍यासाठी धरणे धरून बसलेल्या ममता बॅनर्जी या पहिल्याच मुख्यमंत्री असाव्यात? किंबहुना ही पहिलीच घटना असावी. केजरीवाल, अण्णा या नेहेमीच्या टोळक्यांना व त्यांच्या नाटकांना सरावलेल्या जनतेला हा प्रकार मात्र नविन व धक्कादायक आहे. या मुख्यमंत्री बाई ईथवर थांबलेल्या नाहीत तर त्या पोलिस अधिकार्‍यांना थेट धरणे मंचावर बोलावून तिथे त्यांना मेडल्स दिली जात आहेत. अहंकार व उन्मत्तपणा एकीकडे पण हे तर कीव करण्याच्या ही पलिकडचे कृत्त्य आहे. अशी मेडल्स व पदके ही फक्त राज्याच्या कार्यकारिणी समारंभ व मंचावरून दिली जातात ईतके किमान भानही असू नये? राज्य वि. केंद्र हा संघर्ष नविन नाही पण त्याचे जे स्वरूप ममता बॅनर्जी यांनी ऊभे केले आहे ते मात्र आपल्या लोकशाहीच्या व घटनेच्या मुळावरच ऊठण्याची शक्यता अधिक आहे. आणि सर्वावर कळस म्हणजे ममता बॅनर्जी यांना वैयक्तीक व बंगाल सरकारला पाठींबा देणारी टोळधाड अचानक ऊगवली आहे. जसे काही निवडणूकांच्या आधी आता मोदी वि. करो या मरो ची लढाई असल्या सारखी परिस्थिती तयार केली जात आहे. ते होणारच होते म्हणा. किमान दीदी हा एक चेहेरा त्या निमित्ताने विरोधकांना मिळाला आहे एव्हडेच काय ते हाशील. अर्थात तेही तात्पुरते फायद्यासाठी. तिकडे कॉ. ची ऊगवती तारका विंगेत वाट पहात ऊभीच आहे. पण असे करताना मात्र लोकशाहीतील ज्या व्यवस्था, घटक, व मूळ (आचार) संहितेच्या पायावर आपण ऊभे आहोत त्यावर आपणच कुर्‍हाड मारत आहोत याचे भान या सत्तापिपासूंना राहिलेले नाही.

मुळात जी गोष्ट कायद्याच्या अखत्यारीत आहे, ज्याची चौकशी प्रक्रीया सुरू आहे त्याच्या साठी एव्हडा बवाल? याचे अनेक अर्थ निघतात. या सर्वांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. किंवा यांना मोदी पुन्हा निवडून येण्याची भयंकर चिंता आहे. किंवा या चौकशीतून जे बाहेर येईल त्याने फारच मोठा राजकीय स्फोट होण्याची (दीदींचा सफाया) भिती आहे. जे काही आहे ते नक्कीच भयावह व चिंताजनक आहे. कारण अशा प्रकारच्या तमाशांमूळे एकूणातच सर्वत्र अविश्वासाचे व असुरक्षीततेचे वातावरण पसरते. याचे परिणाम दूरगामी असतात, ज्यात अंतर्गत सुरक्षा पासून ते परकीय गुंतवणूकी पर्यंत सर्वच मुद्दे येतात. दुर्दैव एव्हडेच आहे की या सर्वात पुन्हा एकदा भरडला जातो तो सामान्य मनुष्यच. ज्यांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे, ज्यांना स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यायला देखिल पुरेसा वेळ मिळत नाही अशा लोकांना व त्यांच्या दैनंदीन व्यवहारांना या अशा तमाशांमूळे वेठीस धरले जाते.

देशांतर्गत सगळेच महत्वाचे प्रश्ण सोडवायला दर वेळी सर्वोच्च न्यायालयाला धाव घ्यावी लागत असेल तर मग मुळात निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते, संसद यांची गरजच काय? ईथे कुणिच कुणालाच जुमानत नाही. बिचारे पोलिस, CBI , न्याय व्यवस्था हे मात्र काम केले तरी दोषी, नाही केले तरी दोषी अशा कचाट्यात अनेक वर्षे पडून आहेत, सरकार कुणाचेही असो. कुठेतरी हे थांबायलाच हवे. अन्यथा हा अविश्वासाचा वेताळ आपल्या मानगुटीवर कायमचा बसून राहणार यात शंका नाही. एकदा हा चूकीचा पायंडा पडू दिला तर ऊद्या प्रत्त्येक प्रांत व राज्य या मार्गाचा अवलंब करून तमाम व्यवस्थेला वेठीस धरण्याच्या घटना वारंवार घडत राहतील.

नेहेमी प्रमाणेच याही गोष्टीला राजकीय रंग देऊन दोन्ही बाजूने अजूनही धुरळा ऊडणार यात शंका नाही. दोन्हीकडून प्रतीवाद व वार करताना नेमकी यात कुणाचे भले आहे हे मात्र कुणिच सांगू शकणार नाही. बटाट्या मधून सोने ऊगवणार्‍या; वा दलितांच्या शोषणावर सत्ता भोगणार्‍या; शेतजमिनी घशात घालून त्यावर विमानतळे बांधणार्‍या; निव्वळ स्वताच्या अस्तित्व व अहंकरासाठी विकासाच्या कामांना विरोध करणार्‍या, ई. विचारसारणीच्या कडबोळ्यां कडून दुसरे काहीच अपेक्षित नाही. त्याच्प्रमाणे, सर्वंकष सत्ता हाती आहे म्हणून लोकांच्या आचार, विचार, खान पान ई. वर बंधने घालणार्‍या व सोयीस्कर पणे राम रहीम मुद्दे ऊकरून काढणार्‍या गोटांकडून देखिल फारशा अपेक्षा नाहीत. वैयक्तीक मोदीजी स्वतः गुजराथ चे मुख्यमंत्री असताना 'गोदरा हत्त्याकांड' प्रकरणी तब्बल नऊ तास सिबीआय कडून कसून चौकशीला सामोरे गेले अशी घटना मात्र या आजच्या घटनेपूढे अचानक एकदम विशेष वाटू लागते. तसे वाटायचे कारण नाही. कारण चौकशीला सामोरे जाणे हे कर्तव्य आहे. पण ते गेले ही वस्तूस्थिती आहे. ईथे अजून चौकशी धड सुरू देखिल झालेली नाही, तेही एका पोलिस अधिकार्‍याची, आणि आभाळ कोसळ ल्या प्रमाणे ममता दिदींचा थयथयाट सुरू आहे.

खरे तर मोठी जलसंपदा ऊपलब्ध असलेल्या बंगाल मध्ये धरणे बांधून खूप मोठी क्रांती घडवता येऊ शकते. आज जेमेतेम तीन मुख्य धरणे असलेल्या या राज्यातील शेतकरी व ऊद्योगांची अवस्था मात्र बिकट आहे. पण ममतांच्या 'या' धरणामागे नक्की कुणाचे व कुठले पाणी अडवले जात आहे हे येणारा काळच सांगू शकेल. तोपर्यंत मात्र लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेला तमाशा बघणे एव्हडेच आपल्या नशिबी आहे.

ममता बॅनर्जी ऊर्फ दिदी या त्यांच्या राग, वाचाळपणा, व मनस्वीपणासाठी चांगल्याच प्रसिध्ध आहेत. कम्युनिस्टांच्या विळख्यातून बंगाल ला मुक्त करणार्‍या या fire brand व्यकतीमत्वाने मात्र सत्ता हाती आल्यावर त्यांच्या मर्जी व हितसंबंध विरोधात ऊभे राहिलेल्यांवर आगपाखड केली आहे. चीट फंड घोटाळा चौकशी निमित्ताने केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत आहे असा कांगावा करणार्‍यांच्या व जनतेची दिशाभूल करणार्‍यांच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम फक्त (पुन्हा एकदा) जनताच करू शकते. unfortunately, they can only chose from lesser evils..!

ताकः ईकडे महाराष्ट्रात अण्णांचे ऊपोषण सुरू आहे. साधारण माणसे आरोग्यासाठी ऊपवास करतात. ईथे मात्र स्वताचे अस्तित्व सिध्ध करण्या साठी अधून मधून ऊपोषणाला बसले जाते. यावेळी दळायला मत्रा लोकपाल नावाचे जुनेच दळण घेतले आहे. त्यांच्या दुर्दैवाने सध्या देशाचे लक्ष बंगाल च्या राज्यपालाकडे आहे लोकपालाकडे नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अहो पटेलांच्या पुतळ्याचा पण कितीतरी मोठा खर्च आहे. तो स्वतः केंद्रसरकारनेच केला आहे. खरे तर कोणाचाही पुतळा उभारण्या आधी नेत्यांपेक्षा लोकांचेच ( जनमत ) मत घ्यायला हवे आणी त्यावरच अंमलबजावणी हवी. सामान्य जनतेला नको आहेत असे पुतळे. उलट याचा जो खर्च आहे त्यात रस्ते, रेल्वे आणी बाकी लोकोपयोगी कामे होऊ शकतील. बुलेट ट्रेनची पण गरज नव्हतीच. उलट याच पैशात प्रत्येक स्टेशन वरची कामे डिजीटल करता आली असती, ट्रेन मध्ये खान पान व्यवस्था, सुरक्षा यात सुधारणा करता आली असती. मी स्वतः रेल्वेची पँट्री कार बघीतलीय, अतीशय गचाळ व गलथान कारभार असतो तो. काही माननीय अपवाद असतीलही.

सरदार पटेलांच्या पुतळ्याचा खर्च वसूल व्हायला सुरुवात देखील झाली. तिकीटे काढून लोक दर्शनाला येत आहेत. मायावतींच्या पुतळ्याचा खर्च कसा वसूल होणार?

आणी तसेही कोणी त्या हत्तींवर बसुन हत्ती हत्ती खेळणार नाहीत, जशी लहान मुले नकली घोड्यावर बसुन घोडा घोडा खेळतात तसे.

काँग्रेसची प्रचंड गोची झालेली दिसते. ममताला सपोर्ट करावं तर ती रागाची स्पर्धक बनते.
विरोध करावा तर मोदिंचं ऐकून घेतल्यासारखं होतं.

आय टी सेलचं नॅरेटिव्ह - कन्हैया कुमार आणि इतरांविरुद्धच्या दडपशाहीला विरोध केला म्हणजे टुकडे गँगला पाठिंबा दिला.
भीमा कोरेगाव प्रकरणीच्या पाच सहा विचारवंतांविरुद्धच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह लावले म्हणजे तुम्ही अर्बन नक्षल.

बंगालमधल्या आताच्या दडपशाहीला विरोध केला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराला पा ठिंबा दिला.
सर्जिकल स्ट्राइकच्या ढोलताशांना आक्षेप घेतला म्हणजे तुम्ही सैन्याचा अपमान केला.

लेटेस्ट - मोदींविरोधात उभे ठाकलात म्हणजे राष्ट्रविरोध करताय. (इंदिरा इज इंडिया ची परिणती कशात झाली होती, त्या इतिहासाची आठवण हेच करून देत असतात म्हणून बरं)

तिनं स्टेट लेव्हलला केलं म्हणून ह्यानं नॅशनल लेव्हलला केलं असं म्हणणं दिसतं तुमचं.>>>>> आत्ता !! आता आम्ही काय मोदींना सांगायला गेलो का ? """ ओ मोदीजी ओ मोदीजी ऐका ना आमचे जरा, ऐका ना ! आमाला किनई सरदार पटेल आणी असे बर्‍याच राजकीय नॉन -राजकीय नेत्यांचे असे पुतळे उभारायचे आहेत, तुम्ही खर्च करता का जरा? """ मग मोदींनी आमचे पटकन ऐकले आणी चटकन पुतळा उभारला गेला, मज्जा !

काय कुठेही जोडणी चाललीय ! धन्य हो !!

आता आम्ही काय मोदींना सांगायला गेलो का

>>

तुम्ही मत दिलं नाही का त्यांना पंप्र होण्यासाठी?
तुमचं मत म्हणजेच त्यांचं मत
आणि त्यांचं मत म्हणजेच तुमचं!
लोकशाही न्हवं?

पटेलांचा पुतळा आधी जनवर्गणीतून उभारणार होते. गावो गाव फिरून लोखंड गेळा केलेलं. मग पं प्र झाल्यावर सरकारी पैशाने उभारला.
पी एस यूंना यासाठी जबरदस्तीने पैसे द्यायला लावलेत.
आता तिथे पर्यटन स्थळ करायचं म्हणून ति थल्या मगरी सुसरींना दुसरीकडे नेऊन सोडलंय. बोला पर्यावरणाच्या नावाने चांगभलं.

मोदींचा ता जमहाल पक्षी बुलेट ट्रेनसाठी मुंबईच्या फुफ्फुसांवर म्हणजे आरेतल्या वृक्षराजीवर कुर्‍हाड चालवली जाणार आहे.बोला पर्यावरणाच्या नावाने चांगभलं.

ABP News
‏Verified account @abpnewstv

#PMModi in #WestBengal: I have a very special connection with North Bengal. This connection is of tea. You people grow tea, I make tea.

चो च्वीट

<< सरदार पटेलांच्या पुतळ्याचा खर्च वसूल व्हायला सुरुवात देखील झाली. तिकीटे काढून लोक दर्शनाला येत आहेत. मायावतींच्या पुतळ्याचा खर्च कसा वसूल होणार? >>
----- काहीतरी वेगळे करायचे आहे.... टोलेजंग पुतळा उभारायच...

आपल्या पक्षात अशी एकही व्यक्ती नाही ज्याचे स्वातंत्र्य लढ्यात काहीतरी योगदान असेल... खारीचा वाटा. आता आमच्या पक्षाची स्थापनाच अगदी अलीकडच्या काळातली आहे, पण विचारसरणीचा मागोवा १९२५ पर्यंत जातो.

सुरवाती पासुन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वार्थाने काँग्रेस विचारसरणीच्या व्यक्तीचा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारावा लागणे काय दर्शवते ?

<< मोदींविरोधात उभे ठाकलात म्हणजे राष्ट्रविरोध करताय. >>
------ मोदी यांच्या नोटबंदीला विरोध केला म्हणजे तुमच्या कडे काळा पैसा असलाच पाहिजे... विचार करायला परवानगीच मिळाली नाही, संधी दिल्या गेली नाही... त्यामुळे प्रश्नच विचारयचे नाही. कुणी विचारलेच तर सर्वांनी त्या आय डी वर हल्ले करायचे.

फेक भाऊ तू पण मालकासारखेच.
Submitted by Filmy on 8 February, 2019 - 18:31

माझा मालक मीच आहेरे. स्वतःच्या पैशाने टेंट सिटीत जाऊन तिकीट काढून पुतळा पाहिला. तू काँग्रेसी गुलाम असल्याने मालक नोकर असले शब्द तुझ्या लेखणीतून पाझरावे यात नवल ते काय?

तुम्हि बघुन आलात! छान!
पण त्या पुत्ळ्याची खरच गरज होती का?
कर्ज काढुन दिवाळी साजरी करन्यासारखा हा प्रकार बघुन तुम्हाला चीड आली नाही का?

कर्ज काढुन दिवाळी साजरी करन्यासारखा हा प्रकार बघुन तुम्हाला चीड आली नाही का?
Submitted by जावेद_खान on 9 February, 2019 - 12:20

अभिमान वाटला. हा वृत्तांत वाचा. मी नाही पण दुसर्‍या एका पर्यटकाने लिहिलाय.

http://www.misalpav.com/node/43851

बाकी खानसाहेब आपल्या मृत बेगमच्या यादमध्ये जनते ला नाडून कमावलेला इतका प्रचंड पैसा ओतून बनविलेला ताजमहाल पाहून तुम्हाला चीड आली होती का हो? शिवाय त्या कारागीरांचे हात तोडून टाकले तो अपराध तर अजुनच निंद्य.

तुमचंच लॉजिक Foreign exchange earnings (FEEs) from tourism $27.7 billion in 2017
for foreign visitors, Taj Mahal was the most visited monument followed by Agra Fort and Qutub Minar,

आपल्या मृत बेगमच्या यादमध्ये जनते ला नाडून कमावलेला इतका प्रचंड पैसा ओतून बनविलेला ताजमहाल पाहून तुम्हाला चीड आली होती का हो

>>

एक हुकूमशहा आणि लोकशाही मार्गाने निवडून दिलेले पंप्र, यात तुम्ही गफलत करताय.

माझ्याबद्दल सांगायचं तर दोनदा आग्र्याला जाऊन आलोय आणि अजूनही ताज महाल बघितला नाहीये. बघायची इच्छा ही नाहीये.

बादवे,
त्या शाह जहान कडे अमाप पैसा होता आणि त्याने ओतला ताज महाल आणि तत्सम स्मारके, किल्ले बनवण्यात. त्याच्या काळात अर्थव्यवस्थेने २२% वाढ घेऊन चीन ला ही मागे टाकले होते, अगदी १६३२ चा दुष्काळ जमेस धरून सुद्धा.

आणि त्याने जनतेला पीळलं होतं वगैरे म्हणत असाल, तर आयुष्याच्या सरते शेवटी सडून सडून मेला तो.

{{{एक हुकूमशहा आणि लोकशाही मार्गाने निवडून दिलेले पंप्र, यात तुम्ही गफलत करताय.}}}

मग झालं तर, पटेलांचा पुतळा उभा करणार अशी आधीच घोषणा केल्यावरही मोदींना जनतेने निवडून दिलं म्हणजे जनतेचा या निर्णयाला पाठिंबाच आहे हे स्पष्ट होतंय.

तुमचंच लॉजिक Foreign exchange earnings (FEEs) from tourism $27.7 billion in 2017
for foreign visitors, Taj Mahal was the most visited monument followed by Agra Fort and Qutub Minar,
Submitted by भरत. on 9 February, 2019 - 17:29

याच लॉजिकने पटेलांच्या पुतळ्याचा खर्च भरुन निघेल हेच लिहिलंय मी. मायावतींच्या पुतळ्यांचं काय हा खरा प्रश्न आहे.

पटेलांचा पुतळा लोकवर्गणीतून उभा राहणार होता. गावोगाव फिरून लोखंड गोळा केलेलं. आता सरकारी पैशाने एक पर्यटन स्थळ साकार झालंय. आणि ते पाहायला लोकांकडूनच पैसे वसूल केले जातील.
मायावतींच्या पुतळ्यांचा खर्च त्यांच्याकडून वसूल करा असा आदेश न्यायालयाने दिलाय की. अतिशय चांगला निर्णय आहे तो.

मी मोदींचा ताजमहाल म्हटलं ते बुलेट ट्र्रेनला. आता मोदींचाच दुसरा ताजमहाल म्हणावं लागेल.

धरणा चे पाणी बंगाल मध्ये अडवले पण पूर मात्र भलतीकडेच आलेला दिसतोय.. Wink
असो.
मोदी विरोधकांना पुन्हा एकदा विनंती की एक वेगळा बाफ खास त्यासाठी काढा आणि यथेच्छ धुरळा ऊडवा. म्हणजे कसे सगळा राडा एकाच ठिकाणी वाचायला मिळाला तर जास्त करमणूक होईल.

Pages