धरणा चे पाणी

Submitted by योग on 4 February, 2019 - 09:07

https://timesofindia.indiatimes.com/india/mamata-banerjee-vs-cbi-who-sai...

बंगाल मध्ये नक्की चाललय तरी काय? ज्या प्रदेशाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मह्त्वाचे योगदान दिले, ज्या प्रांताला संस्कृती, परंपरा, कला, व शैक्षणीक वारसा आहे, ज्या प्रदेशाचा भारताच्या राजकीय इतीहासात मोठा सहभाग आहे त्या बंगाल चे मात्र आज अक्षरशः राजकीय डबके झाल्याचे दृष्य आहे. खरे तर ४० वर्षे कम्युनिस्टांच्या सत्तेत भरडलेल्या जनतेने २०११ मध्ये एकमताने निवडून दिलेल्या ममता बॅनर्जी यांना बंगाल चा चेहेरा मोहरा बदलून नविन विकास साधण्याची एक उत्कृष्ट संधी होती. पण दुर्दैवाने गेले दहा वर्षात बंगला मध्ये नकारात्मक व अहंकाराचे वारेच जास्त वाहिले. आजही कलकत्ता सारख्या शहराची दुरावस्था व दारीद्र्य रेषेखाली राहणार्‍या मोठ्या मजदूर वर्गाची अवस्था पाहता बंगाल पुन्हा एकदा एका चूकीच्या नेत्रूत्वाखाली भरडला जाण्याची लक्षणे आहेत.

हे जनतेचे दुर्दैव म्हणायचे का निव्वळ राजकारण? पण ईथे काहितरी वेगळेच शिजते आहे.

राज्याच्या एका शहराच्या पोलिस कमिशनर ची CBI चौकशी सुरू आहे ईथवर तर सर्व ऊघड होते. पण त्या अधिकाराच्या घरी CBI चे अधिकारी चौकशी ला गेल्यानंतर जे काही नाट्य घडत गेले त्याचा आता जो काही तमाशा मांडला आहे ते लज्जास्पद नाही तर अत्यंत संतापदायक आहे. एरवी पोलिस दलातील अधिकारी व राजकीय नेते यांचे विशेष जमत नसते हा इतीहास आहे. आणि ईथे मात्र बंगाल सारख्या एका मोठ्या प्रांताची मुख्यमंत्री, बाकी सर्व कामे सोडून तातडीने धरणे धरून बसते? काय तर म्हणे हा बंगाल च्या सर्वभौमत्वार घाला आहे? बर, पोलिसांना संरक्षण देणे, त्यांना मदत करणे हे नक्कीच सरकारचे कर्तव्य असले तरिही ज्या अधिकार्‍याची चीट फंड घोटाळ्यात चौकशी सुरू आहे त्याच्या बचावासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात ऊतरतात, वर पोलिस दलाचे अधिकारी CBI विरुध्द तैनात केले जातात. ईथवर हे थांबलेले नाही तर आता या तमाशाला सरकार (मोदी) वि. लोकशाही बचाव चा रंग दिला जात आहे.

कलकत्त्यात शाम बाजार सारख्या अतीशय गर्दीच्या व दाट वस्तीतील रहाणीच्या ठिकाणी पूल पडतो पण कुणावरही ठोस कारवाई होत नाही. शेतकर्‍यांच्या हिताच्या नावाखाली नंदीग्राम चा नॅनो प्लांट गुजराथेत जातो, बंगाल चे नुकसान होते. पण कुणालाही त्याची तमा नाही. भाजपा ला राजकीय सभा घ्यायची परवानगी नाकारली जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना डावलून आपल्या हस्तकांची पाठराखण केली जाते. नेमकी लोकशाही च्या जीवावर कोण ऊठले आहे हे स्पष्ट आहे. भारताच्या आजवरच्या इतीहासात एका पोलिस अधिकार्‍यासाठी धरणे धरून बसलेल्या ममता बॅनर्जी या पहिल्याच मुख्यमंत्री असाव्यात? किंबहुना ही पहिलीच घटना असावी. केजरीवाल, अण्णा या नेहेमीच्या टोळक्यांना व त्यांच्या नाटकांना सरावलेल्या जनतेला हा प्रकार मात्र नविन व धक्कादायक आहे. या मुख्यमंत्री बाई ईथवर थांबलेल्या नाहीत तर त्या पोलिस अधिकार्‍यांना थेट धरणे मंचावर बोलावून तिथे त्यांना मेडल्स दिली जात आहेत. अहंकार व उन्मत्तपणा एकीकडे पण हे तर कीव करण्याच्या ही पलिकडचे कृत्त्य आहे. अशी मेडल्स व पदके ही फक्त राज्याच्या कार्यकारिणी समारंभ व मंचावरून दिली जातात ईतके किमान भानही असू नये? राज्य वि. केंद्र हा संघर्ष नविन नाही पण त्याचे जे स्वरूप ममता बॅनर्जी यांनी ऊभे केले आहे ते मात्र आपल्या लोकशाहीच्या व घटनेच्या मुळावरच ऊठण्याची शक्यता अधिक आहे. आणि सर्वावर कळस म्हणजे ममता बॅनर्जी यांना वैयक्तीक व बंगाल सरकारला पाठींबा देणारी टोळधाड अचानक ऊगवली आहे. जसे काही निवडणूकांच्या आधी आता मोदी वि. करो या मरो ची लढाई असल्या सारखी परिस्थिती तयार केली जात आहे. ते होणारच होते म्हणा. किमान दीदी हा एक चेहेरा त्या निमित्ताने विरोधकांना मिळाला आहे एव्हडेच काय ते हाशील. अर्थात तेही तात्पुरते फायद्यासाठी. तिकडे कॉ. ची ऊगवती तारका विंगेत वाट पहात ऊभीच आहे. पण असे करताना मात्र लोकशाहीतील ज्या व्यवस्था, घटक, व मूळ (आचार) संहितेच्या पायावर आपण ऊभे आहोत त्यावर आपणच कुर्‍हाड मारत आहोत याचे भान या सत्तापिपासूंना राहिलेले नाही.

मुळात जी गोष्ट कायद्याच्या अखत्यारीत आहे, ज्याची चौकशी प्रक्रीया सुरू आहे त्याच्या साठी एव्हडा बवाल? याचे अनेक अर्थ निघतात. या सर्वांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. किंवा यांना मोदी पुन्हा निवडून येण्याची भयंकर चिंता आहे. किंवा या चौकशीतून जे बाहेर येईल त्याने फारच मोठा राजकीय स्फोट होण्याची (दीदींचा सफाया) भिती आहे. जे काही आहे ते नक्कीच भयावह व चिंताजनक आहे. कारण अशा प्रकारच्या तमाशांमूळे एकूणातच सर्वत्र अविश्वासाचे व असुरक्षीततेचे वातावरण पसरते. याचे परिणाम दूरगामी असतात, ज्यात अंतर्गत सुरक्षा पासून ते परकीय गुंतवणूकी पर्यंत सर्वच मुद्दे येतात. दुर्दैव एव्हडेच आहे की या सर्वात पुन्हा एकदा भरडला जातो तो सामान्य मनुष्यच. ज्यांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे, ज्यांना स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यायला देखिल पुरेसा वेळ मिळत नाही अशा लोकांना व त्यांच्या दैनंदीन व्यवहारांना या अशा तमाशांमूळे वेठीस धरले जाते.

देशांतर्गत सगळेच महत्वाचे प्रश्ण सोडवायला दर वेळी सर्वोच्च न्यायालयाला धाव घ्यावी लागत असेल तर मग मुळात निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते, संसद यांची गरजच काय? ईथे कुणिच कुणालाच जुमानत नाही. बिचारे पोलिस, CBI , न्याय व्यवस्था हे मात्र काम केले तरी दोषी, नाही केले तरी दोषी अशा कचाट्यात अनेक वर्षे पडून आहेत, सरकार कुणाचेही असो. कुठेतरी हे थांबायलाच हवे. अन्यथा हा अविश्वासाचा वेताळ आपल्या मानगुटीवर कायमचा बसून राहणार यात शंका नाही. एकदा हा चूकीचा पायंडा पडू दिला तर ऊद्या प्रत्त्येक प्रांत व राज्य या मार्गाचा अवलंब करून तमाम व्यवस्थेला वेठीस धरण्याच्या घटना वारंवार घडत राहतील.

नेहेमी प्रमाणेच याही गोष्टीला राजकीय रंग देऊन दोन्ही बाजूने अजूनही धुरळा ऊडणार यात शंका नाही. दोन्हीकडून प्रतीवाद व वार करताना नेमकी यात कुणाचे भले आहे हे मात्र कुणिच सांगू शकणार नाही. बटाट्या मधून सोने ऊगवणार्‍या; वा दलितांच्या शोषणावर सत्ता भोगणार्‍या; शेतजमिनी घशात घालून त्यावर विमानतळे बांधणार्‍या; निव्वळ स्वताच्या अस्तित्व व अहंकरासाठी विकासाच्या कामांना विरोध करणार्‍या, ई. विचारसारणीच्या कडबोळ्यां कडून दुसरे काहीच अपेक्षित नाही. त्याच्प्रमाणे, सर्वंकष सत्ता हाती आहे म्हणून लोकांच्या आचार, विचार, खान पान ई. वर बंधने घालणार्‍या व सोयीस्कर पणे राम रहीम मुद्दे ऊकरून काढणार्‍या गोटांकडून देखिल फारशा अपेक्षा नाहीत. वैयक्तीक मोदीजी स्वतः गुजराथ चे मुख्यमंत्री असताना 'गोदरा हत्त्याकांड' प्रकरणी तब्बल नऊ तास सिबीआय कडून कसून चौकशीला सामोरे गेले अशी घटना मात्र या आजच्या घटनेपूढे अचानक एकदम विशेष वाटू लागते. तसे वाटायचे कारण नाही. कारण चौकशीला सामोरे जाणे हे कर्तव्य आहे. पण ते गेले ही वस्तूस्थिती आहे. ईथे अजून चौकशी धड सुरू देखिल झालेली नाही, तेही एका पोलिस अधिकार्‍याची, आणि आभाळ कोसळ ल्या प्रमाणे ममता दिदींचा थयथयाट सुरू आहे.

खरे तर मोठी जलसंपदा ऊपलब्ध असलेल्या बंगाल मध्ये धरणे बांधून खूप मोठी क्रांती घडवता येऊ शकते. आज जेमेतेम तीन मुख्य धरणे असलेल्या या राज्यातील शेतकरी व ऊद्योगांची अवस्था मात्र बिकट आहे. पण ममतांच्या 'या' धरणामागे नक्की कुणाचे व कुठले पाणी अडवले जात आहे हे येणारा काळच सांगू शकेल. तोपर्यंत मात्र लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेला तमाशा बघणे एव्हडेच आपल्या नशिबी आहे.

ममता बॅनर्जी ऊर्फ दिदी या त्यांच्या राग, वाचाळपणा, व मनस्वीपणासाठी चांगल्याच प्रसिध्ध आहेत. कम्युनिस्टांच्या विळख्यातून बंगाल ला मुक्त करणार्‍या या fire brand व्यकतीमत्वाने मात्र सत्ता हाती आल्यावर त्यांच्या मर्जी व हितसंबंध विरोधात ऊभे राहिलेल्यांवर आगपाखड केली आहे. चीट फंड घोटाळा चौकशी निमित्ताने केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत आहे असा कांगावा करणार्‍यांच्या व जनतेची दिशाभूल करणार्‍यांच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम फक्त (पुन्हा एकदा) जनताच करू शकते. unfortunately, they can only chose from lesser evils..!

ताकः ईकडे महाराष्ट्रात अण्णांचे ऊपोषण सुरू आहे. साधारण माणसे आरोग्यासाठी ऊपवास करतात. ईथे मात्र स्वताचे अस्तित्व सिध्ध करण्या साठी अधून मधून ऊपोषणाला बसले जाते. यावेळी दळायला मत्रा लोकपाल नावाचे जुनेच दळण घेतले आहे. त्यांच्या दुर्दैवाने सध्या देशाचे लक्ष बंगाल च्या राज्यपालाकडे आहे लोकपालाकडे नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२०११ मधे पण अण्णांनी उपोषण केले. तेव्हा ते भाजपाच्या फायद्याचे होते म्हणुन जोरदार पाठिंबा.... आज अण्णांवर आणि त्यांच्या उपोषणावर FB, WA तसेच मायबोलीवर पण घाणाघाती टिका.>>>>>अहो उदय, हे माझ मत नाहीये. आमच्या इथल्याच एका नगरसेवकाचे मत आहे, काल त्यांची चर्चा- बैठक होती, आमच्या कॉलनीतले एक जण त्या बैठकीला जाणार होते पण अण्णांच्या उपोषणामुळे ते कॅन्सल झाले. कारण या सगळ्यांना अण्णांना भेटायला जायचे होते.

साधनाताईंच्या भाऊ तोरसेकरांनी मुकुल रॉयचा उल्लेख का टाळला असावा बरे?
३ राज्ये हातातून गेल्यावर अचानक सीबीआय सक्रीय कसे काय झाले बरे??
बाबु बजरंगी खोटे बोलला का?

ह्या बंगाल मधील डाव्यांनी, चिडफंड घोटाळ्याची चौकशी सिबिआय मार्फत केली जावी, म्हणून २०१३ साली सर्वौच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. व आज तेच डावे, ममताबानोच्या बरोबरीने सिबिआय चौकशीचा विरोध करत आहेत. या घटनेवरुन एक लक्षात येते, की महाठगबंधनमधे सामिल झालेले सर्व भ्रष्टाचारी व घोटाळेबाज पक्ष सत्तेसाठी किती हापहापलेले आहेत ते.
--

Why Is Rajeev Kumar Avoiding CBI": Congress West Bengal Chief Asks.
The Congress state unit's position is a contrast to that of party president Rahul Gandhi, who on Sunday called up Chief Minister Mamata Banerjee and extended support.

(Source: NDTV)

ही अजून एक गंमत. किंवा नालायकपणा. आता काँग्रेसमधून एकीकडे ममताला विरोध आणि दुसरीकडे ममताला सपोर्ट असं दोन्ही एकाच वेळी सुरु आहे. कोणत्याही विषयावर दहा तोंडी रावणाप्रमाणे वेगवेगळ्या बाजूंनी बोलणे हे केंब्रिज अनालिटीकाने शिकवलेलं दिसतं.
सबरीमाला, सवर्ण आरक्षण, ममता , गोरक्षण, राम
मंदिर सगळीकडे हेच.

<< अण्णा स्वतःला असे वापरू का देतात? त्यांना कळत नाही असे नाहीये, मग ते का वापरू देतात स्वतःला??? >>
------- सहमत... वाईट वाटते, २०११ मधे खुप आशा होती.

<< ही अजून एक गंमत. किंवा नालायकपणा. आता काँग्रेसमधून एकीकडे ममताला विरोध आणि दुसरीकडे ममताला सपोर्ट असं दोन्ही एकाच वेळी सुरु आहे. कोणत्याही विषयावर दहा तोंडी रावणाप्रमाणे वेगवेगळ्या बाजूंनी बोलणे हे केंब्रिज अनालिटीकाने शिकवलेलं दिसतं.
सबरीमाला, सवर्ण आरक्षण, ममता , गोरक्षण, राम
मंदिर सगळीकडे हेच. >>
------- सनव, त्यांचा सामना भाजपा सारख्या अत्यंत बलवान अशा पक्षासोबत आहे. भाजपाशी सामना करता करता त्या पक्षाचे काही गुण शिकले म्हणायचे... ते वाण नाही पण गुण आला.

उदय, जुना अनूभवी पक्ष कोण आहे? काँग्रेस की भाजप? राजकारणात कोण जास्त मुरलयं?

एकीकडे तुम्ही स्वतः न्युट्रल असल्याचे सांगताय मग प्रत्येक वेळा काँग्रेसची बाजू कशी घेता? कारण हे दोन्ही पक्ष नालायक आहेत.

<< उदय, जुना अनूभवी पक्ष कोण आहे? काँग्रेस की भाजप? राजकारणात कोण जास्त मुरलयं?

एकीकडे तुम्ही स्वतः न्युट्रल असल्याचे सांगताय मग प्रत्येक वेळा काँग्रेसची बाजू कशी घेता? कारण हे दोन्ही पक्ष नालायक आहेत.
>>
---------- काँग्रेस पक्ष जुना आहे (स्थापना १८८५), अनुभवी आहे पण तुलनेने भाजपा नवा आहे... पण भाजपा कडे पण शिकण्यासारखे आहेच आणि ते काँग्रेस शिकणार. कालच म. प्र. सरकारचा निर्णयावरुन एक झलक दिसली.

मी काँग्रेसची बाजू घेणार नाही... (आता घेतो आहे असे दिसत असेल तर तो भाजपा ने घोर निराशा केली म्हणुन) कॉग्रेस पक्ष सत्तेवर होता तेव्हा त्या पक्षावर टिका केलीच आहे. सत्ताधार्‍या कडुन सामान्यांच्या अपेक्षा असतात (कोणाच्या काय अपेक्षा असाव्यात या सापेक्ष आहेत), आणि त्या पुर्ण झाल्या नाही तर निराशा येते.

उद्या काँग्रेस किंवा भाजपा किंवा अजुन कुठले गोंडस तिसरे कडबोळे (चौथी आघाडी) पक्ष सत्तेवर आले तर मी अभिनंदन करणार आणि दोन- तिन वर्षे बदलाची वाट बघणार.

उदय, बदल घडु शकत नाही. कारण पं. लालबहादूर शास्त्री, स. पटेल, बाळासाहेब भारदे अशी काँग्रेसमधली मंडळी तर भाजपातले वाजपेयी सोडले तर बाकी राजकारणी त्यांच्या येणार्‍या १४ पिढ्यांची सोय करण्यात गुंतलेत. आज काँग्रेस मध्ये पृथ्वीराज चव्हाण सोडले तर कोणीच स्वच्छ चारित्र्याचा नेता नाही. आपली भारतीय मानसीकता सीक आहे, भारतातले लोक व्यक्तीपूजा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे कोणी कितीही भ्रष्ट् असला तरी तो निवडुन येणारच.

याचे कारण परत भ्रष्टाचारात आहे. आज अशी स्थिती आहे की जो वर जातोय तो भ्रष्टाचाराची शिडी वापरूनच जातोय. एक ओळखीतला मुंबई जवळच्या एका नागरातल्या नगरसेवकाच्या जागेसाठी उभा होता, माणूस चांगला शिकला सवरलेला, mnc IT मध्ये नोकरी करणारा. मी मूर्खासारखे ' उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात यावे असे मला खूप वाटायचे' अशी सुरवात करून त्याच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर त्याने त्याला निवडणुकीचा किती खर्च होतोय हे सांगितले, निवडून आल्यावर 5 वर्षात सगळा खर्च भरून निघून काही करोड हातात राहतील असा हिशेब सांगितला. नगरसेवकापासून सुरवात होऊन वर जाताना प्रत्येक पायरीवर काय होत असेल? स्वच्छ राहू इच्छिणारा माणूस त्या दलदलीत टिकुच शकत नाही. आणि मतदार हे सगळे बघून
न बघितल्यासारखे करतात. नोटाचा उपयोग शून्य आहे.

As of now NOTA is only symbolic. Any number (percentage) of votes in NOTA does not affect results of election, I mean even if NOTA gets majority of vote then also it will not have any impact on candidate who gets highest vote after NOTA,he will be declared Winner.

ie if out 100 votes, NOTA gets 60, candidate A gets 30 and other candidates get totally 10 votes then candidate A will be announced as winner.

------ सनव, त्यांचा सामना भाजपा सारख्या अत्यंत बलवान अशा पक्षासोबत आहे. भाजपाशी सामना करता करता त्या पक्षाचे काही गुण शिकले म्हणायचे... ते वाण नाही पण गुण आला.
<<

काय हास्यास्पद युक्तिवाद आहे हा. Rofl

https://theleaflet.in/attempted-arrest-of-the-kolkata-commissioner-of-po...
he Supreme court while doing so had directed the States to “cooperate” with the investigation, an expression which must be understood in its ordinary meaning, that is that the State should facilitate the investigation.

The West Bengal State Police wrote to the CBI offering cooperation. However, the CBI issued summons under Section 60 CrPC. The State moved the Calcutta High Court against the summons against its officers. The Calcutta High Court kept the summons in abeyance.

By no stretch of imagination did it mean that the CBI has the power to make the raid at the office of the Kolkata Police Commissioner in relation to the investigation, when the High Court is seized of the matter and has passed an order keeping in abeyance the CBI summons to the Kolkata the police in relation to the investigation.

न्यायालयाचा आदेश धुडकावून तेलतुंबडें ना केलेली अटक हे आणखी उदाहरण.

cbi.jpg
सच्छ भारत मोहिमेत सगळा कचरा साफ करणं शक्य नसलं तरी तो एका जागी गोळा होतोय, हेही नसे थोडके

पावन करून घेतलेल्या रत्नावलीतली दोन नावे - मुकुल रॉय, हेमंत बिस्वा सर्मा (सारदा मौक्तिक)

>>भारतातले लोक व्यक्तीपूजा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे कोणी कितीही भ्रष्ट् असला तरी तो निवडुन येणारच.
(धाग्या च्या विषयाला अवांतर होते आहे तरिही) आणि हे चित्र मोदींच्या कारकीर्दीत थोडे फार बदलताना दिसत आहे.. (accountability and transeprency) हा चांगला बदल अजूनही पूर्ण तळागाळापर्यंत हवा असेल तर मोदी राज किमान पुढील १० वर्षे तरी असायला हवे. पुढील टर्म मध्ये मोदी सरकार पुन्हा काही धडाडीचे पण अत्यावश्यक निर्णय घेतील अशी आशा करुयात.

ताकः निदान महाराष्ट्रात तरी भाजपा ला संपूर्ण बहुमताने निवडून देऊन आपण एक ऊदाहरण घालू शकतो. नुसतेच मराठी माणसाच्या नावाने घोषणाबाजी करत फिरणार्‍या व एरवी सत्तेसाठी कुठलेही सौदे करणार्‍या ईतर सर्व पक्षांना एक सणसणीत चपराक देण्याची हीच वेळ आहे.

योग सहमत.
चित्र मोदींच्या कारकीर्दीत थोडे फार बदलताना दिसत आहे.. (accountability and transeprency) हा चांगला बदल अजूनही पूर्ण तळागाळापर्यंत हवा असेल तर मोदी राज किमान पुढील १० वर्षे तरी असायला हवे. पुढील टर्म मध्ये मोदी सरकार पुन्हा काही धडाडीचे पण अत्यावश्यक निर्णय घेतील अशी आशा करुयात.>>>+10000

भाजपाच्या चांगल्या कामांचा उल्लेख कुठे होत नाही पण नको तिथे तोंड उघडायला मात्र ते स्वतःच तयार असतात.

संपूर्ण सत्ता मिळणे एक गोष्ट आहे, काँग्रेसला मिळालीय खूपदा, भाजपाला पहिल्यांदा मिळाली. ती येनकेनप्रकारे वर्षानुवर्षे टिकवणे वेगळी गोष्ट, जी काँग्रेसला जमली, कॉंग्रेसेतर कुणालाही जमली नाही. आणि चांगली कामे करून सत्ता टिकवणे हे त्याहूनही वेगळे. सुरवातीला काँग्रेसने केले असेल, पण गेल्या 20-25 वर्षात करताना दिसली नाही. भाजपाने हे करावे ही अपेक्षा व आशा आहे.

योग सहमत.
चित्र मोदींच्या कारकीर्दीत थोडे फार बदलताना दिसत आहे.. (accountability and transeprency) हा चांगला बदल अजूनही पूर्ण तळागाळापर्यंत हवा असेल तर मोदी राज किमान पुढील १० वर्षे तरी असायला हवे. पुढील टर्म मध्ये मोदी सरकार पुन्हा काही धडाडीचे पण अत्यावश्यक निर्णय घेतील अशी आशा करुयात.>>>+10000

भाजपाच्या चांगल्या कामांचा उल्लेख कुठे होत नाही पण नको तिथे तोंड उघडायला मात्र ते स्वतःच तयार असतात.

संपूर्ण सत्ता मिळणे एक गोष्ट आहे, काँग्रेसला मिळालीय खूपदा, भाजपाला पहिल्यांदा मिळाली. ती येनकेनप्रकारे वर्षानुवर्षे टिकवणे वेगळी गोष्ट, जी काँग्रेसला जमली, कॉंग्रेसेतर कुणालाही जमली नाही. आणि चांगली कामे करून सत्ता टिकवणे हे त्याहूनही वेगळे. सुरवातीला काँग्रेसने केले असेल, पण गेल्या 20-25 वर्षात करताना दिसली नाही. भाजपाने हे करावे ही अपेक्षा व आशा आहे.

>>आणि चांगली कामे करून सत्ता टिकवणे हे त्याहूनही वेगळे.
बरोबर.
दुर्दैवाने काँ ने अनेक दशके वाईट सवयी पोसून (फुकट सबसिडी मिळवणे, कर चुकवणे, बेनामी व बेहिशेबी मालमत्ता गोळा करणे, कॅश एकॉनॉमी, वोट फॉर नोट, पेट्रोल चे भाव कमी करून देशाचे कर्ज वाढवणे, अल्पसंख्यांक बोटचेपे धोरण, ई.) सत्ता टिकवली... आता या सवया एक एक करत मोडायच्या शिवाय देशाचा आर्थिक व सामाजिक गाडा देखिल व्यवस्थित हाकायचा हे सोपे काम निश्चीतच नाही. आणि त्याच बरोबर काही ठोस धोरणात्मक निर्णय राबवाय्चे (जीएस्टी, नोटबंदी, बँक खाती, ई..) आणि जमेल तितका फायदा जनतेच्या वाट्याला ऊपलब्ध करून देणे हे तर हिमालयाची शिखरे लांघण्या एव्हडे अवघड आहे.. प्रवास तर सुरू झाला आहे. 'बेस कॅंप' व्यवस्थित प्रस्थापित झाला आहे. आता पुढील वाटचाल करायला हवी.
अर्थमंत्री मनमोहन सिंग यांसारखे कुशल अर्थतज्ञ जर भाजपा च्या साथीला ऊभे राहिले तर हा देश पुढील पाच वर्षात पुढील १० वर्षाची वाटचाल करू शकतो. पण दुर्दैवाने ते देखिल मोदी विरोधी वक्तव्यातच धन्यता मानत आहेत.
एव्हड्यात मात्र एक चमत्कार घडला आहे: भाजपा व मोदी व एन्डीए यांच्यावर कायम तोफ डागणार्‍या तज्ञ मिडीयापैकी, काँ. ची भलावण करणार्‍या शेखर गुप्ता यांनी चक्क मोदी सरकराची गेल्या पाच वर्षाच्या यशस्वी कार्याबद्दल पुष्टि देणारा, पुरोगामी व विकसनशील योजनांचे फायदे समजावून देणारा व आगामी निवडणूकात भाजप पुन्हा बहुमताने येण्याचे स्पष्ट संकेत देणारा व्हिडीयो/मुलाखत प्रसिध्द केला आहे. मला वाटते हे पुरेसे बोलके आहे.
संपूर्ण लेख वाचायचा नसेल तर खालील व्हिडीयो बघितला तरी पुरेसे आहे:
https://theprint.in/national-interest/modi-has-been-smarter-braver-on-po...

<मोदींच्या कारकीर्दीत थोडे फार बदलताना दिसत आहे.. (accountability and transeprency) हा चांगला बदल > Rofl Rofl Rofl

भारताच्या इतिहासातलं आणि जगभरातल्या सध्याच्या (लोकशाही) सरकारांत सगळ्यांत जास्त लपवाछपवी सरकार म्हणून मोदी सरकारची नोंद होऊ घातली आहे.

अबकी बार मोदी सरकार आणि अबकी बार फिर मोदी सरकार म्हणणार्‍या आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोदींच्या नावे मते मागणार्‍या पक्षाचे (की व्यक्तीचे?) समर्थक व्यक्तीपूजेला नावं ठेवताहेत. Lol

<सत्तेसाठी कुठलेही सौदे करणार्‍या ईतर सर्व पक्षांना एक सणसणीत चपराक देण्याची हीच वेळ आहे> अगदी. सत्तेसाठी सगळ्या पक्षांतले भ्रष्टाचारी - सुखराम-येडियुरप्पा ते मुकुल रॉय (क्रमशः पुढे चालू) निवडून आपल्या पक्षात घेऊन आपण कुठले ही सौदे करत नाही हे भाजपने सिद्ध केलंय.

<< अर्थमंत्री मनमोहन सिंग यांसारखे कुशल अर्थतज्ञ जर भाजपा च्या साथीला ऊभे राहिले तर हा देश पुढील पाच वर्षात पुढील १० वर्षाची वाटचाल करू शकतो. पण दुर्दैवाने ते देखिल मोदी विरोधी वक्तव्यातच धन्यता मानत आहेत. >.
-------- मनमोहन सिंग हे कुशल अर्थतज्ञ आहेत हे मान्य केल्या बद्दल तुमचे अभिनंदन.... ते कुशल प्रशासक तसेच अत्यंत मितभाषी आणि कार्यक्षम पंतप्रधान पण होते...
पक्षिय राजकारण बाजूला करुन मनमोहन सिंग यांच्या ज्ञानाचा वापर मोदी यांना करता आला नाही. तसे केले असते तर नोट बंदी सारखे अघोरी उपाय योजण्यापासुन त्यांनी सतर्क केले असते. नोटबंदी म्हणजे 'आली लहर आणि केला कहर ' असे एका सुजाण मायबोलीकराने मोजक्या शब्दात मांडले आहे.

<<(accountability and transeprency) हा चांगला बदल अजूनही पूर्ण तळागाळापर्यंत हवा असेल >
------ कुठली accountability and transeprency
मोदी यांच्याकडे पारदर्षकतेचा तसेच विश्वासाचा प्रचंड अभाव आहे. बहुतेक विकासाची आकडेवारी खोटी असते असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. "मित्रो.... " असे त्यांचे वजनदार भारदस्त शब्द कानावर आल्यावर आता पुढे अजुन काय खोटे वाढुन ठेवले असेल या विचाराने धस्स होते.

काही काळ सर्व लोकांना मुर्ख बनवले, सर्व काळ काही लोकांना मुर्ख बनवले पण तुम्ही सर्व काळ सर्व लोकांना मुर्ख नाही बनवू शकत.

मनमोहन एक कुशल अर्थतज्ञ होते याच्याशी सहमत.

पण ते कार्यक्षम पंतप्रधान व व कुशल प्रशासक होते याबद्दल सहमत नाही. कुशल प्रशासक तोच जो सगळी दडपणे झुगारून स्वतःची जबाबदारी नीट पार पडतो. कार्यक्षम पंतप्रधान ही तोच जो पंतप्रधानाची कर्तव्ये नीट पार पाडतो.

काँग्रेसने मनमोहनसिंगांना पंतप्रधानपदी निवडले ते त्यांच्या मितभाषी हा एकमेव गुणामुळे. हा माणूस आपल्या कह्यात राहणार हा श्रेष्ठींचा अंदाज सिंगांनी खोटा पडू दिला नाही.
नरसिंहराव बिगर गांधी परिवारातील असून काँग्रेसचे पंतप्रधान झाले परंतु त्यांनी काँग्रेसला स्वतःला हवे तसे वापरू दिले नाही. त्यांनी खमकेपणाने कारभार केला. अर्थात त्याची परतफेड काँग्रेसने त्यांचे पूर्ण विस्मरण करून केलीच म्हणा. काँग्रेस काय आहे व नारसिंहानी दडपणे कशी व कितपत झुगारली हे सिंगांनी नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात असताना जवळून बघितले असणारच, त्यावरून आपण कसे वागायचे हे ते ठरवू शकले असते. मनमोहन सिंगांनी मनात आणले असते तर त्यांनाही खमकेपणे कारभार करता आला असता , पक्ष काहीही करू शकला नसता, केले असते तर पक्षाचे हसे झाले असते. पण सिंग मौनी बाबा रुपात राहिले.

मोदींनी संसदेत 'आता सर्व मतभेद विसरून एकदिलाने देशासाठी काम करूया' हे आवाहन केले होतेच. त्याला प्रतिसाद म्हणून मनमोहन सिंगानी मदतीचा हात पुढे केला असता तर त्यांचीच प्रतिमा उजळली असती. पण त्यांनी गेल्या पाच वर्षात सोनिया व राहुलने हु... केल्यावरच तोंड उघडण्यात धन्यता मानलीय.

https://www.bloomberg.com/opinion/articles/2019-01-22/india-s-narendra-m...
Are India’s Budget Numbers Bogus?

The government’s own auditor has raised questions about the many strategies it’s using to disguise the extent of fiscal spending.
पारदर्शकतेच्या नावाने चांगभलं.

पारदर्शकतेची सुरुवात मोदींच्या डिग्रीपासून होते.

मोदींनी संसदेत 'आता सर्व मतभेद विसरून एकदिलाने देशासाठी काम करूया' हे आवाहन केले होतेच >> जब्बरदस्त!! मोदी म्हणजे बोले तैसा चालेच नही का?

मोदींनी संसदेत 'आता सर्व मतभेद विसरून एकदिलाने देशासाठी काम करूया' हे आवाहन केले होतेच >> जब्बरदस्त!! मोदी म्हणजे बोले तैसा चालेच नही का?>>>>>

काँग्रेसने 'देशासाठी एकत्र काम करू' म्हणून हात पुढे करायला हवा होता, म्हणजे मोदी बोले तैसा चाले नसते तर तोंडघशी पडले असते. राहुलने संधी गमावली.

आणि ती संधी गमावून केले काय ? तर संसदेत मोदींना जादू की झप्पी देऊन लगेच आपल्या चमच्यांना डोळा मारत आम्ही जे करतो त्याच्या बरोबर उलट आमच्या मनात असते याचा पुरावा कॅमेऱ्यासमोर हाती दिला. असो. काय बोलायचे!!!

आणि ती संधी गमावून केले काय ? तर संसदेत मोदींना जादू की झप्पी देऊन लगेच आपल्या चमच्यांना डोळा मारत आम्ही जे करतो त्याच्या बरोबर उलट आमच्या मनात असते याचा पुरावा कॅमेऱ्यासमोर हाती दिला. असो. काय बोलायचे!!!>>>>> Lol राहुलने मोदींना मिठी मारल्यावर सगळा देश अवाक झाला. मला पण राहुलच्या भाबडेपणावर आश्चर्य वाटले, पण दुसर्‍या मिनीटाला त्याने आंख मारे हो लडका आंख मारे केल्यावर, हा बाबाजी तितका भोळा- भाबडा नाही हे लक्षात आले.

"तरिही निदान काही काळ तरी, जी जी प्रकरणे गंभीर आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, ज्यात एक व्यक्ती नाही तर समाज, देश यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा प्रकरणांवर कुठल्याही प्रकारचा निव्वळ चर्चेचा बाफ ऊघडण्याची संमती दिली जाऊ नये. किंबहुना बंदी घालावी"
वरील वाक्ये आपणच लिहिली आहेत. मायबोलीची हवा दूषित वगैरे होते असे आपले म्हणणे होते. आता हा जो बाफ तुम्ही काढला आहे त्याने हवा शुद्ध होते का? की आपली इतर काही मजबूरी आहे? आता कोणते हितसंबंध गुंतलेले आहेत?
माझा अंदाज असा की ज्या बाफवरील चर्चेमुळे तुम्हाला मायबोलीच्या हवेची काळजी वाटू लागली होती ती चर्चा तुमच्या विचारसरणीला अडचणीत आणणारी असावी (अंदाज अशासाठी की तो धागा अस्तित्वात नाही, त्यावरचे कवित्व आहे). मात्र आता असा धुरळा उडण्यास योग्य काळ आला असावा.

काँग्रेसने 'देशासाठी एकत्र काम करू' म्हणून हात पुढे करायला हवा होता,>> जसं जीएसटी,आधारसाठी आदरणीय मोदीबाबांनी गुजरातचे मुमं असताना केला होता तसा म्हणताय का?

मोदींनी संसदेत 'आता सर्व मतभेद विसरून एकदिलाने देशासाठी काम करूया' हे आवाहन केले होतेच. >>
जोक ऑफ द डे.

Pages