मुख्य धारेतला भारतीय चित्रपट हा नेहमीच पलायनवादी राहिला आहे. लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातून दोन घटिका मनोरंजन मिळावं, हाच त्याचा मुख्य हेतू राहिला आहे. चित्रपट बनवणारे आणि पाहणारे, दोघेही मुख्य धारेतल्या चित्रपटाकडे ह्याच विचाराने पाहात आले आहेत. ह्या मनोरंजनात नाट्याची बाजू सांभाळण्यासाठी सगळ्यात आवडता विषय 'प्रेम' आणि मग त्याच्या जोडीने देशभक्ती, कर्तव्यभावना, कौटुंबिक कलह वगैरे कथानकं असतात.
मात्र चित्रपटाचा हा पारंपारिक चेहरा हळूहळू बदलत चालला आहे. (खरं तर, मुखवटाच. पण पिढ्यांनंतर पिढ्या जपलेला मुखवटा एक चेहराच बनल्यासारखा झाला असल्याने, 'चेहरा'.) आजचा मुख्य धारेतला चित्रपट वेगळे विषय हाताळायला पाहतो आहे. गेल्या काही वर्षांतले चित्रपट पाहिले, तर 'चित्रपटात उपकथानक म्हणून का होईना एक प्रेमकहाणी असलीच पाहिजे', ह्या आत्यंतिक उथळ, तरी प्राथमिक मताला अनेक चित्रपट सर्रास छेद देत आहेत. अनावश्यक गाण्यांना चित्रपटात स्थान राहिलेलं नाहीय आणि कथानकाची मांडणी मुख्य विषयाला अधिकाधिक धरून होताना दिसते आहे.
'समांतर चित्रपट' ही धारा कधीच लुप्त झाली असली, तरी अजूनही काही चित्रपट वेगळ्या विषयांची मांडणी करताना दिसतात किंवा वेगळ्या मांडणीने कथा सांगताना दिसतात. ते अगदी ठळकपणे मुख्य धारेला सोडूनच असतात. व्यावसायिक गणितं त्यांनी गृहीत धरलेली नसतात, हेही जाणवतं.
एखादा चित्रपट मधूनच येतो, जो व्यावसायिक गणितं सांभाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतच वेगळं कथानक किंवा वेगळी मांडणी समोर आणतो. गेल्या काही वर्षांत चांगले/ वाईट, जमलेले/ फसलेले असे अनेक व्यावसायिक प्रयोगही झाले आहेत, ही एक खूप चांगली बाब आहे. 'एक लडकी तो देखा तो ऐसा लगा' असाच एक प्रयोग करतो. तो चांगला आहे की वाईट, जमला आहे की फसला आहे; हा भाग निराळा. मात्र एक व्यावसायिक चित्रपट काही तरी वेगळेपणा समोर घेऊन येण्याचं धाडस करतो आहे, हीच बाब मुळात खूप स्तुत्य वाटते. एक असा विषय ज्याला अगदी खाजगी गप्पांतही पद्धतशीरपणे फाटा दिला जातो, झटकलं जातं; त्याला एक व्यावसायिक चित्रपट लोकांसमोर खुलेआम घेऊन येतो, इतकीच गोष्ट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आवर्जून पाहण्यासाठी पुरेशी आहे, असं मला वाटतं.
चित्रपटाची कथा 'गजल धालीवाल' हिने लिहिली आहे. 'गजल' भारतातील मोजक्या ट्रान्स-वूमन्सपैकी एक आहे. स्वत:च्या लैंगिकतेच्या शारीरिक व मानसिक घडणीतली असमानता समजून घेऊन, स्वीकारून आणि मग प्रयत्नपूर्वक त्यांत समतोल साधून घेण्याचा मोठा संघर्ष तिने स्वत:शीही केला आहे आणि उर्वरित जगाशीही. चित्रपटातील 'एक लडकी' म्हणजेच 'स्वीटी' (सोनम कपूर) हाच संघर्ष अनुभवते आहे. तिचा हा संघर्ष चित्रपटाचा बहुतांश भाग खूप समर्थपणे मांडतो. हा विषय मांडणं म्हणजे एक कसरत होती. जर तो अगदी गंभीरपणे मांडला असता, तर पचायला अवघड होता. कडवट औषध शुगरकोट करून घ्यायचं असतं म्हणून हा विषय हलक्या-फुलक्या शैलीत मांडला आहे. पण असं करतानाही त्यातलं गांभीर्य जपणं अनिवार्य होतं, कुठलाही थिल्लरपणा येऊ न देणं महत्वाचं होतं. ही कसरत उत्तम निभावली गेली आहे. कथानकाची मांडणी, पात्रं, घटना, चित्रण खूप वास्तववादी वाटतं. अनेक प्रसंग पाहताना, हे आपण प्रत्यक्षातही पाहिलं असल्याचं जाणवत राहतं. अश्या मुलांचं वेगळं वागणं, एकटं पडणं, त्यांनी स्वत:च्या कोशात शिरणं, त्यांच्या आवडी-निवडी हे सगळं छोट्या छोट्या प्रसंगांतून प्रभावीपणे मांडलं आहे. स्वीटीच्या कपड्यांच्या रंगसंगतीतही हा विचार केलेला दिसतो.
शेवटच्या भागात मात्र कथानकातला हा वास्तववाद मागे पडत जातो आणि नेहमीचा फिल्मी उथळपणा त्याची जागा घेतो. आधी घेतलेल्या मेहनतीवर, जसजसं आपण शेवटाकडे सरकत जातो, तसतसा बोळा फिरायला लागतो, ही 'एक लडकी को..' ची मोठी उणीव आहे.
मात्र ही एकच उणीव नाही. ह्यापेक्षा मोठी उणीव आहे 'सोनम कपूर'. एका अतिशय प्रभावी व्यक्तिरेखेला साकारण्यासाठी आवश्यक ठहराव तिच्या क्षमतेबाहेरचा असावा, असं 'नीरजा'मध्ये वाटलं होतं, इथे त्यावर शिक्कामोर्तबच होतं. जिथे जिथे कथेची तिच्याकडून लक्षणीय सादरीकरणाची अपेक्षा होती, तिथे तिथे तिच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. पण जिथे जिथे सोनम कपूर कमी पडते, तिथे तिथे सहाय्यक कलाकार सांभाळून घेतात असं चित्र पुन्हा पुन्हा दिसून येतं. तिचा एकटीचा असा कुठलाही प्रसंग चित्रपटात नाही किंवा तिला लांबलचक मोनोलॉगसुद्धा नाही. मुख्य व्यक्तिरेखा इतकी फुसकी झाल्यामुळे बाकीच्यांच्या मेहनतीचं चीज फक्त सांभाळून घेण्यातच होतं.
'राजकुमार राव सुंदर काम करतो', हे म्हणून (लिहून) आता कंटाळा यायला हवा ! पण त्याने साकारलेला स्ट्रगलिंग लेखक, निरपेक्ष प्रेमी, मित्र खूप कन्व्हीन्सिंग आहे. त्याला भावनिक उद्रेकाचे असे कुठले प्रसंग नाहीत. मात्र दारू पिऊन स्वीटीच्या खोलीत जाणं, किचनच्या खिडकीतून पत्र देणं व अजून काही साध्याश्या प्रसंगांतही तो मजा आणतो. स्वीटीचं सत्य ऐकतानाच्या प्रसंगात स्वत: स्वीटी (सोनम) जितकी उथळ वाटते तेव्हढाच साहिल (राजकुमार) मनाला पटतो. तो एक अतिशय महत्वाचा प्रसंग केवळ राजकुमारमुळे तरला तरी आहे.
अनिल कपूरने कॅरेक्टर रोल्स करायला सुरु करण्याचं कारकिर्दीतलं एक महत्वाचं वळण अगदी बेमालूमपणे घेतलं आहे. त्याचा भावनिक संघर्ष दाखवण्यासाठी कथानकात फारसा वाव त्याला मिळाला नाहीय, तरी जितका आहे त्यात त्याने छाप सोडली आहे. खरं तर अनिल कपूरने वाईट काम केलंय, असा एकही चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेलाच नाही. त्या दृष्टीने तो खरोखरच (क्रिटीकल अक्लेमच्या बाबत) खूप अंडररेटेडही असावा.
जुही चावला चित्रपटात नसती, तरी चाललं असतं. मूळ कथानकाला तिचा काही फारसा हातभार नाहीय. मात्र तिच्या असण्याने अनेक हलके-फुलके प्रसंग दिले आहेत. खासकरून अनिल कपूर आणि ती एकत्र जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा ते धमाल करतात !
तमिळ, तेलुगु चित्रपटातला लोकप्रिय चेहरा 'रेजिना कॅसेन्ड्रा' प्रथमच हिंदीत दिसला आहे. तिचा टवटवीत मिश्कीलपणा आणि सहजाभिनय मुख्य व्यक्तिरेखेसाठी साजेसा होता. येत्या काळात तिला चांगल्या भूमिका नक्कीच मिळायला हव्या.
'रोचक कोहली'च्या संगीताची बाजूही कमजोर वाटते. आरडीचं '१९४२ अ लव्ह स्टोरी'मधलं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' रिक्रिएट केलं आहे. ते कम्पोजिशन आवडलं. मूळ मेलडीला हात लावलेला नाहीय आणि ओरिजिनलमध्ये जे म्युझिक पीसेस होते त्यांनाही शब्दांत बांधलंय. एरव्ही रिमेक/ रिक्रिएट करताना ऱ्हिदम आणि कम्पोजिशनमध्ये गोंधळ घातला जातो, तसं तरी नाहीय. पण कॉन्स्टीपेटेड आवाजात गायची फॅशन गलिच्छ आहे. असो. त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही कारण सगळेच आजकाल कुंथत कुंथत गाताना दिसतात !
दिग्दर्शिका 'शेली चोप्रा' ह्यांचा (बहुतेक) हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्या कामात अनुभवी सफाईदारपणा ठळकपणे जाणवतो. कथानकाने शेवटच्या भागात खाल्लेल्या गटांगळ्या आणि सोनम कपूरने टाकलेल्या पाट्या वगळल्या तर दिग्दर्शिकेचा एक पहिला प्रयत्न आणि वेगळ्या विषयाची हाताळणी म्हणून 'एक लडकी को..' हा एक स्वागतार्ह प्रयोग आवडायला हरकत नसावी.
रेटिंग - * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2019/02/movie-review-ek-ladki-ko-dekha-to...
किमान मी तरी इतर मुलींनां असं
किमान मी तरी इतर मुलींनां असं बोलताना ऐकलेलं नाही अजून. >>>>. प्रियांका चोप्राचा सुद्धा असाच एक व्हिडिओ आहे.
बाकी सोनम कपूर दिसते तरी छान. अगदीच भारत भूषण, प्रिया राजवंश आणि प्रदीप कुमारशी तुलना करायला नको. खूबसुरत किंवा आयेशा सारखे मठ्ठड सुंदर रोल बरे असतात तिच्यासाठी. कंगना रानावतचा आवाज आणि सतत काँट्रवर्सरीज सोडता ती चांगली ऍक्टरेस आहे.
आपण जन्माला येऊन, बोलून,
आपण जन्माला येऊन, बोलून, acting करून जगावर अतिप्रचंड उपकार केले आहेत अशा समजुतीत वावरते सोनम कपूर.
ती viral झालेली पोस्ट मी पण वाचली होती. पण काही आदर वगैरे वाटला नाही तिच्याबद्दल
सोनम कुठचाही appearance
सोनम कुठचाही appearance देताना, मग तो सिनेमात असो की TV वर, " माझी fashion (केस, lipstick वगैरे) बिघडत तर नाही ना" असा विचार करत देत असावी असे वाटते. ह्याचमुळे नीरजासारख्या रोलची वाट लावली.
कंगना आणि राकुराव होते की
कंगना आणि राकुराव होते की क्वीनमध्ये एकत्र. सोनमबरोबर पण राकुचा एक सिनेमा आहे जिथे ती खोटं लग्न करून श्रीमंंत मुलांना फसवत असते. तिची ती बिना मेकप पोस्टपण चांगली होती.
इतकी पण वाईट नाहीये सोनम.फॅशन
इतकी पण वाईट नाहीये सोनम.फॅशन सेन्सही चांगला आहे.मुख्य म्हणजे तिची 'मी फोटोत जी दिसते ती दिसायला मला अनेक निर्बंध पाळावे लागतात, चेहर्यावर 3 तास अमुक रोज फासावे लागते, तुम्ही तसे फोटोत दिसत नाही म्हणून न्यूनगंड बाळगू नका' अशी एक पोस्ट फिरते ती मला खूप आवडली होती
नवीन Submitted by mi_anu on 5 February, 2019 - 18:57
>>
हे असले व्हिडियो, पोस्ट्स, इंटरव्ह्यूज इमेज मेकिंगसाठी जाणीवपूर्वक केले जात असतात. सल्लागार सांगतात तसं हे लोक बोलतात. ह्यात त्यांचं क्रेडीट असेलच असं काही नाही, ते त्यांना खरोखर वाटत असेलच असंही अजिबातच नाही. एक व्यक्ती म्हणून कोण कसं आहे, हे ओव्हर द पिरिअड ऑफ टाईम वेगवेगळ्या घटना, इंटरव्ह्यूज वगैरेंच्या एकत्रित परिणामानुसार ठरवता येऊ शकेल. पण तेव्हढा वेळ सोनम इथे टिकली पाहिजे. तिचं आत्तापर्यंतच्या सगळ्या सिनेमांमधलं काम पाहिलं, तर ती आत्तापर्यंत तरी कशी टिकली हेच आश्चर्य आहे. मोठ्या बापाची मठ्ठ (कामाबाबत) पोरगी म्हणूनच टिकली आहे. पण असा डोक्यावर हात असणं आयुष्यभर पुरत नाही, हे गेल्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्सनी स्व-कर्तृत्वाने सिद्ध केलं आहेच.
असो.
सांगायचं इतकंच आहे की एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे कोण काय बोललंय ह्यावरून मतं बनवू नयेत. आणि बनली तरी त्याचा कामाशी संबंध जोडूच नये. सोनम कपूर एक सुमार अभिनेत्री आहे.
सांगायचं इतकंच आहे की एखाद्या
सांगायचं इतकंच आहे की एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे कोण काय बोललंय ह्यावरून मतं बनवू नयेत. आणि बनली तरी त्याचा कामाशी संबंध जोडूच नये. सोनम कपूर एक सुमार अभिनेत्री आहे.
>>> करेक्ट!
ती व्यक्ती म्हणून असेल आदर्श इत्यादी; पण सिनेमात आपण तिला पाहणार अभिनेत्री म्हणून; आणि तिथे ती बापाच्या १०% गुणही दाखवू शकत नाही.
कंगना राणावत उत्तम अभिनेत्री आहे.
अर्र! मला कंगना आवडत नाही
अर्र! मला कंगना आवडत नाही लिहिल्यावर सोनम विरुद्ध कंगना पोस्टी येउ लागल्यात का?
कुणी सिनेमा पाहिला असल्यास लिहा.
अवांतर: सर्वात भयंकर ती
अवांतर: सर्वात भयंकर ती एंटरटेनमेंट मधली पापा ला फापा म्हणणारी अभिनेत्री आहे.कदाचित ती साऊथ मध्ये खूप चांगला वगैरे अभिनय करत असेल.एंटरटेनमेंट मुलांमुळे जबरदस्ती पहावा लागतो.प्रत्येक वेळी ते फापा स्क्रू ड्राइवर सारखं कानात घुसतं.
सोनम नीरजा मध्ये ओके वाटली होती.मीडिया मध्ये चर्चा तिच्या अभिनयाची नसते, फॅशन सेन्स ची असते.(मीडिया आणि फॅशन पोलीस ची काही दैवतं आहेत.त्यांना कायम प्रसिद्धी देत राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे.
झांवी कपूर विमानतळावरून येत होती.तिने घातलेला साधासा 50000 चा गुची चा विटका फाटलेला टीशर्ट आणि डोल्स गबाना ची सव्वा लाखाची 2 इंच उंचीची जीन्स ची जळकी पॅन्ट यात ती एखाद्या देवतेप्रमाणे प्रसन्न आणि डिव्हाईन दिसत होती.
फक्त विद्याबा असली की हेच वर्णन कॉपी पेस्ट करून सब्यासाची साडी आणि बोल्ड स्टेटमेंट ज्वेलरी टाकली की झालं.
सोनम किंवा सुनबाई जेनेलिया असली तर यात 'पेअर्ड विथ ब्युटीफुल स्किन टाईट बॉडीस, स्वेप्ट हेअर 'कॉम्प्लिमेंटिंग हर पेटाईट फ्रेम' असे शब्द टाकून कॉपी पेस्ट चालू ठेवायचा. ☺️☺️☺️)
(मी फॅशन पोलीस खूप वाचते.)
सोनम अभिनेत्री म्हणून सुमार
सोनम अभिनेत्री म्हणून सुमार आहेच पण आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? तिच्या बहुतांशी चित्रपटात तिला गुडीगुडी दिसत, आडवे केळे जाईल इतकी जिवणी फाकत हसायचे असते. हे जमले म्हणजे झाली acting ही तिची समजूत आहे. तिच्या भक्कम खानदानाची भक्कम पीआर टीम तिच्यामागे उभी असल्याने सोनम ग्रेट दिसते, फॅशन सेन्स तर खूपच ग्रेट वगैरे गोष्टी मीडियात सहज पसरवता येतात. फॅशन Godess आणि काय काय उपाध्या नावामागे लावता येतात. (जान्हवी कपूरच्या बाबतीतही सध्या हे होतेय)
फक्त प्रॉब्लेम इतकाच की तसल्या गुडी गुडी चित्रपटात एखादा प्रसंग येतो जिथे तिला काहीतरी करणे भाग असते व अशा वेळी तिचा अभिनयशून्य दगडी चेहरा बघून जीव हळहळतो, माती केली प्रसंगाची म्हणून.
रांझनामध्ये ती गुडीगुडीच होती पण धनुष तिला पंजाबात का कुठे अभयशी लग्न करून द्यायला घेऊन जातो व तिथे ती वधूवेशात असताना अभयच्या मृत्यूची बातमी येते त्या प्रसंगात तिने चेहऱ्यावर काहीतरी भाव आणायचा जराही प्रयत्न न केलेला बघून जीव असाच हळहळला होता.
परीक्षण खूप छान लिहिलेय.
परीक्षण खूप छान लिहिलेय. इतरही अनेक टॅब्यु विषयांवर चित्रपट यायला हवेत.
आडवे केळे जाईल इतकी जीवणी ला
आडवे केळे जाईल इतकी जीवणी ला फॅ करून मोठ्याने हसलेय
पण जिवणी तितकी फाकली नसणार...
पण जिवणी तितकी फाकली नसणार.... ते वरदान फार थोड्यांना मिळते. आणि सोनमच्या मते तेच तिचे बलस्थान आहे.

च्या बहुतांशी चित्रपटात तिला
च्या बहुतांशी चित्रपटात तिला गुडीगुडी दिसत, आडवे केळे जाईल इतकी जिवणी फाकत हसायचे असते.
>>

फुटलो !
हे असले व्हिडियो, पोस्ट्स,
हे असले व्हिडियो, पोस्ट्स, इंटरव्ह्यूज इमेज मेकिंगसाठी जाणीवपूर्वक केले जात असतात. सल्लागार सांगतात तसं हे लोक बोलतात. ह्यात त्यांचं क्रेडीट असेलच असं काही नाही, ते त्यांना खरोखर वाटत असेलच असंही अजिबातच नाही. >> अगदीच! ह्याच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे बीइन्ग ह्युमन च ब्रॅन्डीन्ग आणी सलमान ,फक्त सलमानच्या खान्द्यावर जे डोक आहे त्यातला मेन्दु सोनम पेक्षा शतपटिने तल्ल्ख आहे, सोनम च्या मुलाखती बघितल्या तर तिथेही तीचा उजेडच होता/आहे.
अर्थात कितिही कुणाला लॉन्च केल , खान्द्यावर धरुन नाचल तरी इथे नुसत आडात असुन उपेग नाहिच पोहर्यात यावच लागत.
सगळ्यांची गाडी सोनम च्या
सगळ्यांची गाडी सोनम च्या तारीफवरच
अडकलीये म्हणजे सगळे चित्रपटाचं नाव सार्थ करताहेत वाट्टं 
मला सोनम पेक्षा तिच्या
मला सोनम पेक्षा तिच्या पिताश्रींची तारीफ करणं केव्हाही प्रिफर्ड असेल
@मी अनु, कधीही केव्हाही
@मी अनु, कधीही केव्हाही एनीटाईम
अनिल कपूर माझा बालवयापासुनचा आवडता हिरो आहे.
तिला रांजणा मधल्या सारखे रोल
तिला रांजणा मधल्या सारखे रोल जमतात.>>>>
अनुची पोस्ट असल्याने सोनमच्या 'अभिनयात माठ' असण्यावरुन काही कोटी केली आहे असे वाटले आधी
रांजणा नाही ग, रांझणा
आता फॅशनबद्दल बोलताहातच तर...
आता फॅशनबद्दल बोलताहातच तर.... दिपीका, शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय यांचे कपडे फार आवडतात. श्रीदेवीच्या मुलींचे गाऊन्स पण सुंदर असतात.
सध्याची माझी फेव्हरीट फक्त
सध्याची माझी फेव्हरीट फक्त आणि फक्त सारा अली खान
सारा ही सारा म्हणून मला दिसतच
सारा ही सारा म्हणून मला दिसतच नाही, तिच्या जागी फक्त व फक्त अमृताच दिसते.
माझ्या मुलीने अमृताचा टू स्टेटस हा एकमेव चित्रपट पाहिलाय . तिची हिरोईन म्हणून करियर तिला माहीतही नाही. तरीही तिला अमृताच दिसते साराच्या जागी

सारा ही सारा म्हणून मला दिसतच
सारा ही सारा म्हणून मला दिसतच नाही, तिच्या जागी फक्त व फक्त अमृताच दिसते.+१११
सारा ही सारा म्हणून मला दिसतच
सारा ही सारा म्हणून मला दिसतच नाही, तिच्या जागी फक्त व फक्त अमृताच दिसते. >>>>. हो, खूप साम्य आहे दोघीमध्ये. साराला पाहिलं की बेताब मधली अमृता आठवते. (मी बेताब बराच उशीरा पाहिला, जोपर्यंत अमृता अगदी धिप्पाड झाली होती).
सारा ही सारा म्हणून मला दिसतच
सारा ही सारा म्हणून मला दिसतच नाही, तिच्या जागी फक्त व फक्त अमृताच दिसते. >>> + १११
मी अमृताची फक्त गाणी बघितलीत, मुव्ही नाही, तरी मला पण सारा अमृतासारखी वाटते
सत्यमेव जयते मध्ये गझल
सत्यमेव जयते मध्ये गझल धलीवालचा इंटरव्ह्यू पाहिला होता, आज परत फेसबुकवर पाहिला. ती अतिशय हुशार, सोबर आणि ग्रेसफुल आहे. शिवाय तिला समजूतदार आणि सुसंस्कृत कुटुंबाचं बॅकग्राऊंड आहे. तिने इन्ट्रो देईपर्यंत ती ट्रान्सजेंडर आहे हे कळत नाही. बाकी ट्रान्सजेंडर्स स्वतःचे भडक मेकअप आणि चित्रविचित्र कपडे आणि बॉडी लँग्वेजमुळे स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवून देतात, पण गझल खूपच वेगळी आहे. तिचा इंटरव्ह्यू युट्यूबवर आहे, नक्की पहा. मी खूपच प्रभावित झाले.
साराचे इंटर्व्यूज बघा, बर्
साराचे इंटर्व्यूज बघा, बर्यापैकी सुलझी हुई वाटते, चांगली शिकलेली आहे आणि व्यवस्थित बोलते.
मला सारा अली खान चे ivs खूप
मला सारा अली खान चे ivs खूप आवडतात. पोरगी भन्नाट आहे. येस. ती खूप खूप अमृता आहे. पण ती जेव्हा मिनीज घालून नाचते तेव्हा मला तिच्यात जुडवा (१) मधल्या करिष्मा कपूरचा भास होतो. सैफ आणि अमृता दोघेही मला कधीच फारसे आवडले नाहित. पण सारा मात्र माझी फार आवडती झालिये.
या चित्रपटाबद्दल काहीच माहित
या चित्रपटाबद्दल काहीच माहित नव्हतं. चांगला वाटतोय. बघायला हवा.
> गेल्या काही वर्षांतले चित्रपट पाहिले, तर 'चित्रपटात उपकथानक म्हणून का होईना एक प्रेमकहाणी असलीच पाहिजे', ह्या आत्यंतिक उथळ, तरी प्राथमिक मताला अनेक चित्रपट सर्रास छेद देत आहेत. > नावं कृपया.
नावं कृपया.
नावं कृपया.
नवीन Submitted by ॲमी on 8 February, 2019 - 17:53
>>
देतो उद्या वगैरे.
रिलीज झालेल्या सिनेमांचे विकीपिडिया वाचता आल्यास पहा तोपर्यंत.
नावं कृपया.
नावं कृपया.
>>>
अ वेनस्डे
दंगल
इंदू सरकार
अंधाधुन
Pages