कळा ज्या लागल्या देहा

Submitted by Asu on 31 January, 2019 - 22:29

युरिन स्टोनमुळे कळा येऊन असह्य वेदना होत असताना कविवर्य भा. रा. तांबे यांची ‘कळा ज्या लागल्या जीवा’ ही कविता आठवली. त्यांची क्षमा मागून यांच्या कवितेचे केलेले हे विडंबन -

कळा ज्या लागल्या देहा

कळा ज्या लागल्या देहा, मला की डॉक्टरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या ?

उरी हा हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई ?
मनी म्हणू किती गाणी, वेदना थांबतची नाही

जनांचे कोरडे सल्ले, ना देती मज सांत्वना
मम असह्य वेदनेची, नसे कुणा सहवेदना

वेदनेचा पूर हा लोटे, बुडाल्या सर्व जैवनावा
यमाचा धाकही मागे, वाटले राम राम घ्यावा

जग सोडोनी जे गेले, तयांची हाक ये कानी
ओढ जगण्याची अन् मज खुणविते मानिनी

कसा जाऊ पुढे, जीवाची ओढ मज लागे
तुटलेल्या काळजाचे, धागे राहतील मागे

इथे वळू की तिथे वळू, काय करू मी देवा
तळमळून रात्र सरली, जगाचा वाटे मज हेवा

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि. 24.01.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults