उरी चित्रपटाच्या निमित्ताने

Submitted by योग on 30 January, 2019 - 11:50

'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट ईथे लंडन मध्ये पाहण्याचा योग आला. ते देखिल २६ जानेवारीला मित्र परिवारा समवेत. चित्रपट पाहून अर्थातच काही दिवस हँग ओव्हर (भारावलेलेपणा) होताच. चित्रपट आवडलाच पण त्या निमित्ताने अनेक गोष्टी लक्षात आल्या व अनेक प्रश्ण ऊत्तरांची मनात पुन्हा नव्याने गर्दी जमली. चित्रपट मूल्ये, चित्रीकरण, अभिनय, पटकथा ई. सर्व अतीशय ऊत्तम वाटलेच. किंबहुना बॉर्डर, LOC या आधी येऊन गेलेल्या मसालेपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच फारच ऊजवा ठरतो. पण चित्रपट परिक्षण, राजकीय संदर्भ, ई. बद्दल चर्चा करण्यापेक्षा उरी च्या निमित्ताने जे अनुभवले व जाणवले ते लिहून, ईतरांना देखिल तसेच काही वाटले असेल का हे जाणून घेण्या साठी हा प्रपंच.

मुळात भारता बाहेर अनेक वर्षे राहिले की भारत, मातृभूमी ई. बद्दलची ओढ, आस्था, आदर, अभिमान वगैरे जरा कणभर जास्तच असतो. (भारतात गेल्यावर मात्र अनेक दुरावस्था पाहून आपण नाके मुरडतो तो भाग वेगळा). त्यातही उरी सारख्या काळजाला हात घालणार्‍या घटनेमूळे व त्यानंतर थेट पाक व्याप्त काश्मिर मध्ये 'घुसून' त्याला चोख प्रत्त्युत्तर देण्याची कारवाई केलेल्या आपल्या सैन्य व सरकारी यंत्रणेच्या बातम्या, कथा, ई. ऐकल्यावर हा चित्रपट पाहिल्यावर आत साठलेला असा कणभर जास्त देशाभिमान वे देशप्रेम हे ऊकळ्या फुटून बाहेर न पडते तरच नवल. पण यात मी एकटा नव्हतो हे नक्की. कारण चित्रपटाच्या क्लायमॅक्स्ला संपूर्ण चित्रपट गृहात वाजणार्‍या ऊस्फूर्त टाळ्या, जल्लोश, जय हिंद च्या घोषणा याची साक्ष होत्या. त्याही पुढे श्रेय नमावाली व शेवटचे गीत सुरू असताना चित्रपटग्रुहात आवर्जून थांबलेले प्रेक्षक पाहता एक नक्की जाणवले की चित्रपटाच्या विषयाने नक्कीच खोलवर परिणाम केला आहे. चित्रपट सुरू असताना देखिल प्रेक्षागृहात स्पष्ट जाणवलेली स्तब्धता, ऊत्कटता, राग, जल्लोष, दु:ख्ख या सर्व भावना याची साक्ष देतात.

अशा प्रकारचा चित्रपट समोर येणे आवश्यक होते. अक्षरशः जान हथेली वर घेऊन रोज कामावर जाणार्‍या आपल्या तरूण जवानांकडे पाहिले की तुमच्या आमच्या दैनंदीन सुख समाधानासाठी स्वताच्या शाश्वत व सुखी आयुष्याचा त्याग केलेल्या या आपल्या बांधवांकडे पाहून नतमस्तक व्हायला होते. खेरीज भारतीय लष्कर, व सैन्य हे जगातील ईतर कुठल्याही बलाढ्य सत्तेपेक्षा अजीबात कमी नाही हा विश्वास बळावतो. खेरीज राजकारणाचा कितीही धुरळा ऊडो, कुणिही कितीही दिशाभूल करो, सैन्यात धार्मिक व ईतर फूट पाडल्याच्या वल्गना करोत, वा भ्रष्टाचाराचे आरोप करोत. त्या सर्व धुरळ्यात मात्र आपले जवान, सैन्य, व एकूणात लष्कर हे आप्ल्या देशाच्या सुरक्षेसाठी सुसज्ज आहे, एकजूट आहे हा संदेश दिला जातो, जो एक सामान्य माणसा करीता मोलाचा आहे. सरकार कुणाचेही असो, मात्र अशा प्रकारच्या अत्यंत धोकादायक पण अतीशय गरजेच्या ठोस कारवाईस संमती देउन, सहकार्य करणे व आपले सैन्य व जवान यांचा आत्मविश्वास व कर्तबगारी वाढवण्यास पाठींबा देणे या साठी त्यांचे अभिनंदन करावेच लागेल. ईतकी वर्षे ऊघडपणे अतीरेक्यांना पाठींबा देऊन भारतात घुसखोरी करायला मदत करणे, सीमारेषे नजिक भारतीय नागरीक व सैन्य यांचेवर गोळीबार करणे, या असल्या कारवाया करणार्‍या पाकीस्तानी सत्ता व सैन्यास या कारवाई मार्फत थेट ऊत्तर देणे ही आपल्या सैनिकी कारवाई च्या इतीहासात एक नक्कीच मोठी महत्वपूर्ण घटना आहे. राष्ट्रवाद हा नुसता झेंडा वंदनातून, वा राष्ट्रगीत गाण्यातून सिध्ध होत नसतो (त्यावर देखिल काही बुध्धीभ्रष्ट लोक आक्षेप घेत असतात.), तर स्वताचे सैन्य, नागरीक, व जनता यांच्या जीवावर ऊठलेल्या प्रत्त्येक परकीय आक्रमकाला सडेतोड ऊत्तर देऊन तो कायम जिवंत ठेवावा लागतो. तरिही अशा घटनांचे पुरावे व स्पष्टीकरण आपल्या सैन्य व सरकारकडे मागणारे कपाळ करंटे लोकही आपल्याच देशात पहायला मिळाले हे पाहून दु:ख्ख व संतापही होतो. फुकट मिळालेल्या स्वातंत्र्य व सुरक्षेच्या पंचपक्वांन्नावर समाधानाचे ढेकर देऊन दुसरीकडे मात्र नक्षलवादी, माओवादी, ई. अंतर्गत अतीरेक्यांच्या मानवी हक्काच्या वा कधी ईनटॉलरंस च्या नावाने ऊर पिटणार्‍या अशा नालायक ढेकळांचा थयथयाट पाहिल्यावर मात्र अनेक प्रश्ण मनात निर्माण होतात. आजही स्वातंत्र्य ऊपभोयाची किंमत काय हे जाणून घ्यायचे असेल तर काही काळ अरबी, आफ्रिकी, आणि ईतर कंगाल देशातून राहून पहावे.

आपल्या आधीच्या पिढीच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या बळावार आपल्या पिढीला स्वातंत्र्य अनुभवता व ऊपभोगता आले. मात्र ते आप्ल्या पुढील पिढीस अधिक संपूर्णपणे व सुंदरपणे ऊपभोगास द्यायचे असल्यास ते स्वातंत्र्य आपल्याला कायम जपावे लागेल, त्याची मूळे अधिक घट्ट करावी लागतील. त्यासाठी राष्ट्रप्रेम, राष्ट्र भावना यांना खतपाणी घालावे लागेल. मिळवणे जितके कठीण त्यापेक्षा कठीण ते जतन करणे आहे व त्याही पेक्षा कठीण त्याचे संवर्धन आहे.

दुर्दैवाने आमच्या पिढीच्या डोळ्यासमोर निव्वळ 'लोकप्रीय' आदर्श नाचवले गेले. रातोरात श्रीमंतीची व प्रसिध्धीची स्वप्ने दाखवणार्‍या फुटकळ धंदेवाईक कार्यक्रमातून आमची दिशाभूल केली गेली. दुसर्‍याला सेवा देण्यापेक्षा, स्वता:च्या तुंबड्या भरून घेण्याचे मार्ग कुठले याचे प्रशीक्षण देणारे अभ्यासक्रम व संस्थाचे पेव फुटले. चिल्लर चोर्‍या, मार्‍यामार्‍या, राडा, यातून जन्माला आलेला वार्डाचा नगरसेवक पुढे मंत्री देखिल होवू शकतो याची जिवंत ऊदाहरणे डोळ्यापूढे पहावी लागली. आरक्षण च्या बळावर ज्या घटकाला फायदा होणे अपेक्षित होते तो मागेच पडला मात्र अक्षरधः अपात्री, अकुशल आणि नालायक वर्गाच्या हाती मात्र अधिकार आले. मी आणि माझे या दोन शब्दात आमचे स्वातंत्र्य ऊपभोग व संवर्धन संपले. आणि मग या संकुचीत कोशाला हादरवणार्‍या घटना घडल्या की मेणबत्त्या पेटवून आपली जबाबदारी पार पाडण्याचे मार्ग आम्हाला ऊपलब्ध झाले. आता तर मेणबत्त्या देखिल फोन मधून पाठवणे ईथवर सोपे झाले आहे. या सर्वावर कळस म्हणजे अतीशय ऊच्चशिक्षीत, धुरंदर, व धोरणी व्यक्तीमत्वांचा सुळसुळाट असलेल्या या देशाला अजूनही निर्बुध्ध व नाकर्त्या कुटूंबांच्या (अनेक आहेत) लांगूलचालनातून तयार होणार्‍या होणार्‍या विरोधी पक्षांच्या कडबोळ्या खेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. कुठेतरी काहीतरी चुकतय?

उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा काही उपाय समोर आले.
१. शाळांतून सैनिकी प्रशीक्षण सक्तीचे करायलाच हवे. शिस्त, एकजूट, राष्ट्र भावना, सांघिक कार्य या सर्वाची बीजे ही नेमकी शालेय वयात पेरली तर निश्चीतच जास्ती खोलवर रूजतील.
२. २५ ते ४० अशा वयोगटातील प्रत्येक नागरीकाला एक वर्ष सैन्य सेवा (प्रत्यक्ष रणांगणात नव्हे) सक्तीची असावी.
३. जमेल तसे एखादी तरी सहल मित्र परिवार, नातेवाईक यांचे बरोबर एखाद्या सैन्य स्थळाच्या ठिकाणी करावी.
४. देश्/राष्ट्र प्रथम मग बाकी सर्व. हा नियम स्वतापुरता घालून घ्यावा. खेरीज जिथे जिथे या नियमाची पायमल्ली करणारे लोक दिसतील तिथे अशा लोकांना मुळीच पाठींबा देऊ नये.
५. धर्म, जात या अशा वेळ व शक्ती व्यर्थ घालणार्‍या विषयांबद्दल कुठल्याही चर्चेस खतपाणी घालू नये. जिथे जिथे या विषयाला धरून संवाद व काम होत असेल तिथे सहभाग टाळणे.
६. आपला परिसर, आपला समाज किमान आपले शहर कसे अधिक सुरक्षीत, स्चच्छ व सुंदर होईल या साठी जमेल तसे विधायक कार्य करणे. म्हणजे नुसते मी कचरा करत नाही ईथवर थांबण्यापेक्षा, पुढे अधिक काही करता येईल का वैयक्तीक वा सामूहीक तत्वावर यासाठी प्रयत्न करणे.
७. बाबा, बुवा, महाराज या असल्या फालतू लोकांना वा समुदायांना महत्व देणे वा त्यांच्या आधीन होणे थांबवून संस्कार, कर्तव्य, मेहेनत या मूल्यांवर आधारीत जीवन जगणे. त्यातून जे मिळेल त्यावर समाधान मानणे आणि आपल्या पुढील पिढी पुढे तोच आदर्श ठेवणे.
८. निव्वळ ऊपभोगा पेक्षा, निर्मिती चा हव्यास धरणे. आर्थिक समृध्धी व संपन्नतेचा हा मुख्य पाया आहे. आपल्या पुढील पिढीस त्या करता प्रवृत्त करणे, मदत करणे.

"हे राज्य व्हावे ही तो श्रींची ईच्छा.." इथून ते "स्वराज्य हा माझा जन्मसिध्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच... पासून ते आता "स्वातंत्र्य ऊपभोगणे हा माझा अधिकार आहे " ईथवर आमचा प्रवास झाला आहे.

उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधिकारां बरोबरच कर्तव्यांची देखिल जाणीव झाली/होणे आवश्यक आहे असे वाटले. स्वातंत्र्य हा अधिकार नसून सुविधा आहे, आणि ते ऊपभोगण्याची, जतन व संवर्धन करण्याची किंमत आपाल्या व पुढील पिढीला देणे आवश्यक आहे.

जाता जाता: प्रत्येक भारतीयाने (भारतातील व भारता बाहेरील) व योग्य वयात आलेल्या मुला मुलांनी हा चित्रपट आवर्जून पहायलाच हवा.

जय हिंद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिरून फिरून पक्षीय राजकारण भोवती चर्चा ghutmaltey.
आणि आशि चर्चा करणारी लोक असतील तर bjp १००
Percent योग्य राजकारण करतेय बिलकुल शंका नाही

<< कोण ते म्हणत होते हल्ल्याचे राजकारण करू नका?? >>

----- शवपेटीला खांदा देताना भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह. सोशल मधे सध्या फिरत आहे. " बर्‍याच जणांना हा पोलिटिकल स्टंट वाटेल... भारताच्या इतिहासातील राजनाथसिंह हे कदाचित पहिलेच गृहमंत्री असतील ज्यांनी हुतात्मा सैनिकाच्या पार्थिव देशाला खांदा दिला" .

https://timesofindia.indiatimes.com/india/rajnath-singh-helps-carry-coff...

याला स्टंट कोण म्हणणार ? आता या आधी असे कधी झाले आहे का? असेल तर दाखवा त्यांचे फोटो?

२०१४ मधे यांना बूट घालता येत नव्हते म्हणुन जवान (तो "जवान" नव्हता असे BSF ला पत्रकाद्वारे सांगावे लागले) त्यांना हे स्पेशल जोडे घालायला मदत करत होता. फोटो मधे हे काही तेव्हढेही स्पेशल (उंच डोंगर चढण्यासाठीचे) जोडे नव्हते असे मोदी यांच्यावर जळणार्‍यांना वाटेल.

राजेश, तुमचा प्रवास
१. यावर राजकारण नको. सगळ्यांनी सरकारच्या पाठिशी उभं राहावं.
२ दुसर्‍यांच्या चुका काढू नका. (इथे दुसरे म्हणजे अमित शहा)
३. भाजप जे करतोय ते बरोबरच करतोय.

तीन वर यायला इतका वेळ का लावलात?

पहिल्या पॉइंट हेच माझं अजून सुधा आहे .
विद्यमान सरकार कोणाचं सुधा आसात तरी आता त्या सरकार वर टीका न करता पाठिंबा दिला असता .
आता सारखं सारखं मुळ प्रश्न बाजुला ठेवून सरकार वर. टीका karyachya पोस्ट येवू लागल्या त्या मुळे माझ्या पोस्ट ची दिशा थोडी बदलली

सैन्य दलांची आशि हानी होणे देशाच्या आरोग्य ल नक्कीच चांगलं नाही .
इथे काही कोण्ही साधू संत नाही सैन्य दल कमजोर होत गेले आणि मानसिक दृष्ट्या खचू लागलं तर बाकीचे देश त्याचा फायदा उचलायला survat करतील आणि होवू नये म्हणून बलाढ्य सैन्य देशा जवळ आसावाच लागत

म्हणून बलाढ्य सैन्य देशा जवळ आसावाच लागत
नवीन Submitted by Rajesh188 on 18 February, 2019 - 12:50
<<

भारतीय सैन्याची दुराअवस्था कॉंग्रेसच्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात जितकी झाली तेवढी कोणत्याच सरकारमधे झाली नाही. भारतीय वायुसेनेला लढाऊ विमानांची गरज सर्वाधिक असताना कॉंग्रेसने स्वत:ला मिळणार्‍या कमिशनच्या लालसेने वायुदलाला एकही अत्याधुनिक लढाऊ विमान उपलब्ध करुन दिले नाही. आज भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीय सेनेला ज्याप्रकारे फ्रि हॅंड दिला आहे तसा कॉंग्रेसने दिला असता तर काश्मिर प्रश्न केंव्हांच निकाली निघाला असता.

मात्र व्होटबॅंकच्या लाचारीमुळे व मुस्लिम लांगुलचालन पंरपरेला जागत कॉंग्रेसने काश्मिरमधे, हिरव्या सापांची पैदास इतकी वाढवून ठेवली कि आज ही हे साप हिंदूस्थानी जवानांना चावे घेत आहेत.

भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीय सेनेला ज्याप्रकारे फ्रि हॅंड दिला आहे तसा कॉंग्रेसने दिला असता तर काश्मिर प्रश्न केंव्हांच निकाली निघाला असता.>>>
आत्ता पर्यंत 4 मोठे हल्ले झालेत आणि प्रत्येक हल्ल्यानंतर सेनेला फ्री हॅन्ड दिल्याच्या गप्पा सरकारने आणि त्यांच्या
पित्त्यानी केल्या आहेत.
इराक वेळ फ्री हॅन्ड देऊनही जर असे हल्ले होत असतील तर कठीण आहे भारताचे

इराक वेळ फ्री हॅन्ड देऊनही जर असे हल्ले होत असतील तर कठीण आहे भारताचे
नवीन Submitted by सिम्बा on 18 February, 2019 - 13:21
<<
<<
दहा वर्षाच्या सत्ताकाळात कॉंग्रेसने मोठ्या प्रेमाने वाढवलेली पाकिस्तानी पैदास आहे ती, इतक्या सहजा-सहजी संपणार नाही.
--
भाजपाच्या कणखर सरकाने सैन्याला फ्रि हॅंड दिल्यानेच, आज पाकिस्तानी दहशतवाद्यांना काश्मिरच्या बाहेर येऊन संपूर्ण भारतभर दहशतवाद माजवायची संधीच मिळत नाहि कारण तिथेच त्यांना ठोकले जाते. नाहितर कॉंग्रेसच्या दहावर्षाच्या सत्ताकाळात देशभर झालेले दहशतवादी हल्ले पाहा.

मतपेटीच्या लाचारीसाठी व सत्तेच्या लालसेसाठी कॉंग्रेसने पाकपुरस्कृत दहशतवादाला इतके खतपाणी घातलेए कि भाजपा सरकारला त्याचा संपूर्ण सफाया करायला आणखी अनेक वर्षे लागतील.

पाकिस्तान वर कारवाई केली की
भारतीय मुस्लिम समाज नाराज होतो त्या पक्षाला मतदान करत नाही हे लॉजिक कोण्ही लावलं आसेल .
Congress Ch he logic aasel tar मात्र अवघड आहे .कारण तो राष्ट्रीय पक्ष आहे

कॉंग्रेसच्या दहावर्षाच्या सत्ताकाळात देशभर झालेले दहशतवादी हल्ले पाहा. >>>>
आणि भाजप च्या कार्यकाळात झालेले लष्करी तळावरील हल्ले पहा,
लाज वाटली पाहिजे भक्तांना, हायली सेक्युअर्द भागात हल्ले होतायत, डझनाच्या संख्येने ट्रेंड जवान, अधिकारी शहीद होतायत आणि भक्त देशात दहशदवादी हल्ले झाले नाहीत म्हणून तोंड वर करून सांगतायत. गुरदासपुर,ऊरी, हे सगळे भारताचे भाग नाहीयेत का?

कॉंग्रेसच्या सत्ताकाळात काश्मिरमधे, भारतीय सैन्याचे हात बांधून ठेवणार्‍या कॉंग्रेसी नेतृत्वाला व भाटांना कधी लाज वाटल्याचे ऐकिवात नाही. भारतात लोकतांत्रिक प्रक्रियेने निवडुन आलेले सरकार उलथवुन टाकायची मदत मागायला, कॉंग्रेसी मण्या अय्यर जेंव्हा पाकिस्तानात गेला त्यावेळी देखील कॉंग्रेसी भाटांना लाज वाटली नाही. काश्मिर प्रश्न युनोत नेऊन ज्या कॉंग्रेसने काश्मिर प्रश्नाचा विचका केला त्याच पक्षाचे भाट आज दुसर्‍यांना लाज वाटते का हा प्रश्न विचारत आहे.

कॉंग्रेसची सत्ता लालसा व मुस्लिम लांगुलचालनच्या परंपरेला जागत मोठ्या प्रेमाने पोसलेल्या भारतातील काही गद्दारांनी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करुन उरी व पुलवामा येथील सैनिकी तळावरिल हल्ले घडवून आणले. पुलवामा हल्ल्यात वापरलेली गाडी त्यांनी पाकिस्तानातून आणली नव्हती ती इथल्याच गद्दारांनी त्यांना उपलब्ध करुन दिली होती. कॉंग्रेसने वेळीच सैन्याला मोकळीक दिली असती तर आज शहिद होणार्‍या बहुतांश जवानांचे प्राण वाचले असते.

चला, उरी आणि पुलवामासाठी नेहरू आणि कॉंग्रेस जबाबदार होते हे म्हटलं एकदाचं.
म्हणजे इथेही मोदींकडून काही होण्यासारखं नाही हे मान्य झालं.

Pages