'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट ईथे लंडन मध्ये पाहण्याचा योग आला. ते देखिल २६ जानेवारीला मित्र परिवारा समवेत. चित्रपट पाहून अर्थातच काही दिवस हँग ओव्हर (भारावलेलेपणा) होताच. चित्रपट आवडलाच पण त्या निमित्ताने अनेक गोष्टी लक्षात आल्या व अनेक प्रश्ण ऊत्तरांची मनात पुन्हा नव्याने गर्दी जमली. चित्रपट मूल्ये, चित्रीकरण, अभिनय, पटकथा ई. सर्व अतीशय ऊत्तम वाटलेच. किंबहुना बॉर्डर, LOC या आधी येऊन गेलेल्या मसालेपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच फारच ऊजवा ठरतो. पण चित्रपट परिक्षण, राजकीय संदर्भ, ई. बद्दल चर्चा करण्यापेक्षा उरी च्या निमित्ताने जे अनुभवले व जाणवले ते लिहून, ईतरांना देखिल तसेच काही वाटले असेल का हे जाणून घेण्या साठी हा प्रपंच.
मुळात भारता बाहेर अनेक वर्षे राहिले की भारत, मातृभूमी ई. बद्दलची ओढ, आस्था, आदर, अभिमान वगैरे जरा कणभर जास्तच असतो. (भारतात गेल्यावर मात्र अनेक दुरावस्था पाहून आपण नाके मुरडतो तो भाग वेगळा). त्यातही उरी सारख्या काळजाला हात घालणार्या घटनेमूळे व त्यानंतर थेट पाक व्याप्त काश्मिर मध्ये 'घुसून' त्याला चोख प्रत्त्युत्तर देण्याची कारवाई केलेल्या आपल्या सैन्य व सरकारी यंत्रणेच्या बातम्या, कथा, ई. ऐकल्यावर हा चित्रपट पाहिल्यावर आत साठलेला असा कणभर जास्त देशाभिमान वे देशप्रेम हे ऊकळ्या फुटून बाहेर न पडते तरच नवल. पण यात मी एकटा नव्हतो हे नक्की. कारण चित्रपटाच्या क्लायमॅक्स्ला संपूर्ण चित्रपट गृहात वाजणार्या ऊस्फूर्त टाळ्या, जल्लोश, जय हिंद च्या घोषणा याची साक्ष होत्या. त्याही पुढे श्रेय नमावाली व शेवटचे गीत सुरू असताना चित्रपटग्रुहात आवर्जून थांबलेले प्रेक्षक पाहता एक नक्की जाणवले की चित्रपटाच्या विषयाने नक्कीच खोलवर परिणाम केला आहे. चित्रपट सुरू असताना देखिल प्रेक्षागृहात स्पष्ट जाणवलेली स्तब्धता, ऊत्कटता, राग, जल्लोष, दु:ख्ख या सर्व भावना याची साक्ष देतात.
अशा प्रकारचा चित्रपट समोर येणे आवश्यक होते. अक्षरशः जान हथेली वर घेऊन रोज कामावर जाणार्या आपल्या तरूण जवानांकडे पाहिले की तुमच्या आमच्या दैनंदीन सुख समाधानासाठी स्वताच्या शाश्वत व सुखी आयुष्याचा त्याग केलेल्या या आपल्या बांधवांकडे पाहून नतमस्तक व्हायला होते. खेरीज भारतीय लष्कर, व सैन्य हे जगातील ईतर कुठल्याही बलाढ्य सत्तेपेक्षा अजीबात कमी नाही हा विश्वास बळावतो. खेरीज राजकारणाचा कितीही धुरळा ऊडो, कुणिही कितीही दिशाभूल करो, सैन्यात धार्मिक व ईतर फूट पाडल्याच्या वल्गना करोत, वा भ्रष्टाचाराचे आरोप करोत. त्या सर्व धुरळ्यात मात्र आपले जवान, सैन्य, व एकूणात लष्कर हे आप्ल्या देशाच्या सुरक्षेसाठी सुसज्ज आहे, एकजूट आहे हा संदेश दिला जातो, जो एक सामान्य माणसा करीता मोलाचा आहे. सरकार कुणाचेही असो, मात्र अशा प्रकारच्या अत्यंत धोकादायक पण अतीशय गरजेच्या ठोस कारवाईस संमती देउन, सहकार्य करणे व आपले सैन्य व जवान यांचा आत्मविश्वास व कर्तबगारी वाढवण्यास पाठींबा देणे या साठी त्यांचे अभिनंदन करावेच लागेल. ईतकी वर्षे ऊघडपणे अतीरेक्यांना पाठींबा देऊन भारतात घुसखोरी करायला मदत करणे, सीमारेषे नजिक भारतीय नागरीक व सैन्य यांचेवर गोळीबार करणे, या असल्या कारवाया करणार्या पाकीस्तानी सत्ता व सैन्यास या कारवाई मार्फत थेट ऊत्तर देणे ही आपल्या सैनिकी कारवाई च्या इतीहासात एक नक्कीच मोठी महत्वपूर्ण घटना आहे. राष्ट्रवाद हा नुसता झेंडा वंदनातून, वा राष्ट्रगीत गाण्यातून सिध्ध होत नसतो (त्यावर देखिल काही बुध्धीभ्रष्ट लोक आक्षेप घेत असतात.), तर स्वताचे सैन्य, नागरीक, व जनता यांच्या जीवावर ऊठलेल्या प्रत्त्येक परकीय आक्रमकाला सडेतोड ऊत्तर देऊन तो कायम जिवंत ठेवावा लागतो. तरिही अशा घटनांचे पुरावे व स्पष्टीकरण आपल्या सैन्य व सरकारकडे मागणारे कपाळ करंटे लोकही आपल्याच देशात पहायला मिळाले हे पाहून दु:ख्ख व संतापही होतो. फुकट मिळालेल्या स्वातंत्र्य व सुरक्षेच्या पंचपक्वांन्नावर समाधानाचे ढेकर देऊन दुसरीकडे मात्र नक्षलवादी, माओवादी, ई. अंतर्गत अतीरेक्यांच्या मानवी हक्काच्या वा कधी ईनटॉलरंस च्या नावाने ऊर पिटणार्या अशा नालायक ढेकळांचा थयथयाट पाहिल्यावर मात्र अनेक प्रश्ण मनात निर्माण होतात. आजही स्वातंत्र्य ऊपभोयाची किंमत काय हे जाणून घ्यायचे असेल तर काही काळ अरबी, आफ्रिकी, आणि ईतर कंगाल देशातून राहून पहावे.
आपल्या आधीच्या पिढीच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या बळावार आपल्या पिढीला स्वातंत्र्य अनुभवता व ऊपभोगता आले. मात्र ते आप्ल्या पुढील पिढीस अधिक संपूर्णपणे व सुंदरपणे ऊपभोगास द्यायचे असल्यास ते स्वातंत्र्य आपल्याला कायम जपावे लागेल, त्याची मूळे अधिक घट्ट करावी लागतील. त्यासाठी राष्ट्रप्रेम, राष्ट्र भावना यांना खतपाणी घालावे लागेल. मिळवणे जितके कठीण त्यापेक्षा कठीण ते जतन करणे आहे व त्याही पेक्षा कठीण त्याचे संवर्धन आहे.
दुर्दैवाने आमच्या पिढीच्या डोळ्यासमोर निव्वळ 'लोकप्रीय' आदर्श नाचवले गेले. रातोरात श्रीमंतीची व प्रसिध्धीची स्वप्ने दाखवणार्या फुटकळ धंदेवाईक कार्यक्रमातून आमची दिशाभूल केली गेली. दुसर्याला सेवा देण्यापेक्षा, स्वता:च्या तुंबड्या भरून घेण्याचे मार्ग कुठले याचे प्रशीक्षण देणारे अभ्यासक्रम व संस्थाचे पेव फुटले. चिल्लर चोर्या, मार्यामार्या, राडा, यातून जन्माला आलेला वार्डाचा नगरसेवक पुढे मंत्री देखिल होवू शकतो याची जिवंत ऊदाहरणे डोळ्यापूढे पहावी लागली. आरक्षण च्या बळावर ज्या घटकाला फायदा होणे अपेक्षित होते तो मागेच पडला मात्र अक्षरधः अपात्री, अकुशल आणि नालायक वर्गाच्या हाती मात्र अधिकार आले. मी आणि माझे या दोन शब्दात आमचे स्वातंत्र्य ऊपभोग व संवर्धन संपले. आणि मग या संकुचीत कोशाला हादरवणार्या घटना घडल्या की मेणबत्त्या पेटवून आपली जबाबदारी पार पाडण्याचे मार्ग आम्हाला ऊपलब्ध झाले. आता तर मेणबत्त्या देखिल फोन मधून पाठवणे ईथवर सोपे झाले आहे. या सर्वावर कळस म्हणजे अतीशय ऊच्चशिक्षीत, धुरंदर, व धोरणी व्यक्तीमत्वांचा सुळसुळाट असलेल्या या देशाला अजूनही निर्बुध्ध व नाकर्त्या कुटूंबांच्या (अनेक आहेत) लांगूलचालनातून तयार होणार्या होणार्या विरोधी पक्षांच्या कडबोळ्या खेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. कुठेतरी काहीतरी चुकतय?
उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा काही उपाय समोर आले.
१. शाळांतून सैनिकी प्रशीक्षण सक्तीचे करायलाच हवे. शिस्त, एकजूट, राष्ट्र भावना, सांघिक कार्य या सर्वाची बीजे ही नेमकी शालेय वयात पेरली तर निश्चीतच जास्ती खोलवर रूजतील.
२. २५ ते ४० अशा वयोगटातील प्रत्येक नागरीकाला एक वर्ष सैन्य सेवा (प्रत्यक्ष रणांगणात नव्हे) सक्तीची असावी.
३. जमेल तसे एखादी तरी सहल मित्र परिवार, नातेवाईक यांचे बरोबर एखाद्या सैन्य स्थळाच्या ठिकाणी करावी.
४. देश्/राष्ट्र प्रथम मग बाकी सर्व. हा नियम स्वतापुरता घालून घ्यावा. खेरीज जिथे जिथे या नियमाची पायमल्ली करणारे लोक दिसतील तिथे अशा लोकांना मुळीच पाठींबा देऊ नये.
५. धर्म, जात या अशा वेळ व शक्ती व्यर्थ घालणार्या विषयांबद्दल कुठल्याही चर्चेस खतपाणी घालू नये. जिथे जिथे या विषयाला धरून संवाद व काम होत असेल तिथे सहभाग टाळणे.
६. आपला परिसर, आपला समाज किमान आपले शहर कसे अधिक सुरक्षीत, स्चच्छ व सुंदर होईल या साठी जमेल तसे विधायक कार्य करणे. म्हणजे नुसते मी कचरा करत नाही ईथवर थांबण्यापेक्षा, पुढे अधिक काही करता येईल का वैयक्तीक वा सामूहीक तत्वावर यासाठी प्रयत्न करणे.
७. बाबा, बुवा, महाराज या असल्या फालतू लोकांना वा समुदायांना महत्व देणे वा त्यांच्या आधीन होणे थांबवून संस्कार, कर्तव्य, मेहेनत या मूल्यांवर आधारीत जीवन जगणे. त्यातून जे मिळेल त्यावर समाधान मानणे आणि आपल्या पुढील पिढी पुढे तोच आदर्श ठेवणे.
८. निव्वळ ऊपभोगा पेक्षा, निर्मिती चा हव्यास धरणे. आर्थिक समृध्धी व संपन्नतेचा हा मुख्य पाया आहे. आपल्या पुढील पिढीस त्या करता प्रवृत्त करणे, मदत करणे.
"हे राज्य व्हावे ही तो श्रींची ईच्छा.." इथून ते "स्वराज्य हा माझा जन्मसिध्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच... पासून ते आता "स्वातंत्र्य ऊपभोगणे हा माझा अधिकार आहे " ईथवर आमचा प्रवास झाला आहे.
उरी च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधिकारां बरोबरच कर्तव्यांची देखिल जाणीव झाली/होणे आवश्यक आहे असे वाटले. स्वातंत्र्य हा अधिकार नसून सुविधा आहे, आणि ते ऊपभोगण्याची, जतन व संवर्धन करण्याची किंमत आपाल्या व पुढील पिढीला देणे आवश्यक आहे.
जाता जाता: प्रत्येक भारतीयाने (भारतातील व भारता बाहेरील) व योग्य वयात आलेल्या मुला मुलांनी हा चित्रपट आवर्जून पहायलाच हवा.
जय हिंद!
ऊरी च्या आधी पर्यंत असेच
ऊरी च्या आधी पर्यंत असेच चित्र होते. पण आता मात्र ऊरी नंतर याचा पुरेपूर हिशेब चुकता केला जाईल हे जनतेला माहिती आहे, नव्हे खात्री आहे. लोकांचा विश्वास ऊडाणर नाही ऊलट अशा नतद्रष्ट प्रव्रुत्ती व शक्तींना व त्यांना मदत करणार्या सर्वांना कायमचा धडा शिकवण्याची आपल्या देशातील जनतेची भावना, निग्रह अजून बळकट होईल. आपण हे करू शकतो हे आता सिध्ध झाले आहे. त्या अर्थाने आपला देश बदलला आहे.>>
आजारी मनुष्या, देव तुझं भले करो.
चाळीस जवानांचा निर्घृण खून
चाळीस जवानांचा निर्घृण खून झाल्या दिवशी तुम्हाला देश बदलला आहे ही प्रतिक्रिया द्यावीशी वाटली!>> कारण जवान मरोत पण प्रचार चालूच राहायला हवा ही घाणेरडी वृत्ती, आणि यांना मायबोलीच्या शुद्ध हवेची काळजी आहे म्हणे.
हल्ल्याचा निषेध आणि यांच्या वृत्तीचाही.
ऊरी च्या आधी पर्यंत असेच
ऊरी च्या आधी पर्यंत असेच चित्र होते. पण आता मात्र ऊरी नंतर याचा पुरेपूर हिशेब चुकता केला जाईल हे जनतेला माहिती आहे, नव्हे खात्री आहे. लोकांचा विश्वास ऊडाणर नाही ऊलट अशा नतद्रष्ट प्रव्रुत्ती व शक्तींना व त्यांना मदत करणार्या सर्वांना कायमचा धडा शिकवण्याची आपल्या देशातील जनतेची भावना, निग्रह अजून बळकट होईल. आपण हे करू शकतो हे आता सिध्ध झाले आहे. त्या अर्थाने आपला देश बदलला आहे.>>
निर्लज्जपणाचा कहर...प्रचंड चिडचिड होतेय हे वाचून. जिथे तिथे प्रचार करणार हे आणि लोकांना सांगणार राजकारण करू नका म्हणे.
परदेशात बसून देशभक्ती शिकवत्तायत.
Dear Admin
Dear Admin
Kindly close this page for further posting
Thanks >> काहो? तुम्ही सर्जिकल स्ट्राईक वर निघालात का??
योग, तुम्हाला तुमच्या पोस्टचा
योग, तुम्हाला तुमच्या पोस्टचा पश्चात्ताप होत असेल तर ती उडवायला सांगा अॅडमिन ना. असा धागा बंद करा सांगून अॅडमिन तो करत नाहीत आणि मायबोलीचं ते धोरणही नाही. व्यवस्थित शब्दांत चर्चा चालू असताना केवळ तुम्हाला वाटते म्हणून अॅडमिन तो धागा कदापि उडवणार नाहीत/ बंद करणार नाहीत याचा विश्वास वाटतो.
योग
योग
उरीच्या आधी कसे चित्र होते याचे ज्ञान तुम्हाला कुठून मिळाले ? मला सोशल मीडीयावर लिहायला मर्यादा आहेत, नव्हे तसे नैतिक दृष्ट्याही बरोबर नाही. इथे ओकसर आहेत त्यांना समजेल ते. तरी तोलून मापून लिहीतो.
कारगिल हल्ल्याच्या वेळी मी कारगिलच्या वरच्या भागात होतो. या पट्ट्यात हल्ल्यांची तीव्रता वाढली होती. युद्ध संपल्याची घोषणा झाल्याचे समजले. पण मृतदेहाची विटंबना झाली, ती अगदी माझ्या पासून जवळचीच घटना. त्यानंतर विमानतळापासून एका लष्करी ट्रक मधे बसून येताना ते सगळे सर्जिकल स्ट्राईक करूनच आल्याचे त्यांच्या गप्पातून समजले. जाट होते. चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. तसेच ट्रिग हिल पर्यंत सरकले होते. तिथे बोफोर्स नेल्या असत्या तर इस्लामाबाद रेंज मधे येणार होते. पण कॉल ऑफ मुळे पुढे काही घडले नाही.
मी इतक्या जवळ असूनही अनेक गोष्टी माहीत पडत नसत. हे जवान आल्यानंतरच काय घडले हे समजत असे. ते ही सहसा सिव्हिलियन्सशी शेअर केलं जात नाही. त्यामुळेच उरीच्या आधी सर्जिकल स्ट्राईक्स झाले नाहीत हे लोकांना कोण सांगतं असा प्रश्न पडतो. ते ही ही बातमी फक्त आमच्याच कडे अधिकृतपणे मिळेल या थाटात असते.
तुम्ही एक सेन्सीबल आयडी आहात याची जाणिव आहे. त्यामुळे याचा नक्की विचार कराल. प्रचारी साहीत्याच्या प्रभावाखाली असाल तर बाहेर पडावे ही विनंती. अनेकदा तुमचे लिखाण आवडते. काही बाबतीत मतभेद मान्यच आहेत.
ज्या ले ज दर्जाच्या व्यक्तीने
ज्या ले ज दर्जाच्या व्यक्तीने प्लॅनिंग केले, कृती करतांना अग्रभागी होते त्यांच्या म्हणण्यानुसार सर्जिकल हल्ल्याची आपण खुप जाहिरातबाजी केली.
जे लोक या कारवाईत सहभागी होते त्यांच्या मताचा आदर करावा असेही वाटत नाही का?
त्यावेळी मायबोलीवर पण काही मोजक्या आय डीं नी 'पहिल्यांदाच...' याला आणि तुफान जाहिरातीला आपत्ती घेतली होती. पण आवाज कमजोर होता.
ऑपरेशन मेघदूत या नावाने केली
ऑपरेशन मेघदूत या नावाने केली गेलेली कारवाई आजही गुप्तच आहे. या कारवाईत एलओसी च्या पलिकडचा भाग आपण जिंकून घेतला आहे. लाईन ऑफ कंट्रोल बनवताना दोन्ही देशाच्या अधिका-यांनी लडाख सेक्टर मधल्या सियाचीन आणि आजूबाजूच्या भागात कुणी कशाला जाईल या विचाराने तिथली ताबा रेषा बनवलीच नाही. याचा फायदा घेत १९८४ च्या दरम्यान ऑपरेशन मेघदूत आखले गेले होते.
अशी ऑपरेशन्स ही अत्यंत गुप्त ठेवावी लागतात. नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते बुमरँग होते. जर या वेळी राजीव गांधींनी बघतोच कसा नाही आमचा भू भाग आम्हाला देत अशी घोषणा आणि जाहीरातबाजी केली असती तर पाकिस्तानने उलट आपल्या भागात शिरून कांगावा सुरू केला असता.
आपण ह्युंडेर या गावात एक हॉस्पिटल उभारले. परतापूरला हेडक्वार्टर बनवले. आणि थॉईस इथला पाकचा विमानतळ ( वापरात नसलेला) जिंकून घेतला. आज इथूनच विमानांची ने आण होते.
ही माहिती कुठेही अधिकृत व्यक्तीने दिलेली पाकला सापडली तर १९८४ पासून पाक करत असलेल्या तक्रारीला त्यामुळे वजन येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा खोटारडा, युद्धखोर आणि कांगावाखोर करण्यात यश येईल म्हणून गुप्तता बाळगणे गरजेचे असते. ती वेळही तशीच होती. अमेरिका भारताच्या विरोधात होती आणि पाकिस्तानच्या फेवरमधे.
असे असतानाही मोठे यश या मोहीमेत मिळाले होते.
उरी पासून भाजपच्या बाजूने जे
उरी पासून भाजपच्या बाजूने जे काही चालू आहे ते वाचून फक्त उद्विग्नता येणे बाकी आहे.
आम्ही म्हणतो ते मान्य करा नाहीतर तुम्ही पाकिस्तानच्या बाजूचे, तुमच्या घराण्यात कधी कुणी सैन्यात गेले होते का ?
अरे हो, हो... इथे काय हळद कुंकू घेऊन येणा-या जाणा-याला सांगायचे का स्वतःबद्दल ?
यांना कल्पना नसेल अशा प्रकारची कामं लोक करत असतात आणि त्याबद्दल उच्चारही करत नाहीत. यांनी सुरक्षेची वाट लावली आहे.
किरणुद्दीन, मस्त पोस्ट्स.
किरणुद्दीन, मस्त पोस्ट्स. ह्या नाण्याला दुसरीही बाजू असेल अशी शंका / आशा नेहमीच होती / असते. आज तुम्ही त्याची पुष्टी केलीत. अर्थात ह्या बाबतीत, least said, the better म्हणावं लागेल.
पुलवामा हल्ल्याचे
पुलवामा हल्ल्याचे स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने केलेले एक चांगले संक्षिप्त विवेचनः https://theprint.in/opinion/here-are-pakistans-new-strategies-behind-the...
All covert military
All covert military operations must be kept secret forever, there is absolutely no need to publicize these highly sensitive and strategic initiatives. Nothing good will ever come out of it.
(No subject)
पाकिस्तानचा most favoured
पाकिस्तानचा most favoured nation हा दर्जा काढून टाकण्यात आला आहे अशा अर्थाची बातमी वाचली. तर most favoured nation म्हणजे नक्की काय?
ऊरी च्या आधी पर्यंत असेच
ऊरी च्या आधी पर्यंत असेच चित्र होते. पण आता मात्र ऊरी नंतर याचा पुरेपूर हिशेब चुकता केला जाईल हे जनतेला माहिती आहे, नव्हे खात्री आहे. लोकांचा विश्वास ऊडाणर नाही ऊलट अशा नतद्रष्ट प्रव्रुत्ती व शक्तींना व त्यांना मदत करणार्या सर्वांना कायमचा धडा शिकवण्याची आपल्या देशातील जनतेची भावना, निग्रह अजून बळकट होईल. आपण हे करू शकतो हे आता सिध्ध झाले आहे. त्या अर्थाने आपला देश बदलला आहे.>>>>>
मृतांच्या टाळूवरच लोणी खाणे, हे अशा बाबतीत म्हणत असतील ना?
तरिही, हा बाफ खरे तर संपूर्णत्वास जात असतानाच पुलवामा घडले हे फार मोठे दुर्दैव! संताप, चीड, दु:ख्ख ...>>>>
इतकं कसं तुम्हाला आंधळं केलंय हो भक्तीने???? ही श्रद्धा नाहीये, अंधश्रद्धा झालीये.
आपल्या शहीद जवानांना श्रध्धांजली. त्यांच्या कुटूंबीयांवर कोसळलेल्या दु:खाची कल्पनाही करवत नाही.
हल्ल्याचा नुसता निषेध नाही तर हल्लेखोर व त्यांचे हस्तक यांना आता आरपार करून ठोकून काढावे एव्हडीच ईच्छा आहे. मग ते काश्मिर असो, वा पाकीस्तान, वा आणखिन कुठे.
'उरी चित्रपटाच्या निमित्ताने' सारखे बाफ पुन्हा भविष्यात काढायलाच लागू नयेत याच आशेने हा बाफ ईथेच बंद करुयात.>>>>
कमीत कमी श्रद्धांजली हा शब्द तर नीट टाईप करायचा. कमीत कमी प्रसंगाची चाड ठेवून तसं वागणं अपेक्षित असतं. कुणी म्हणेल, की काय एवढासा शब्द चुकला म्हणून ऐकवायचं, पण तो शब्द नसतो, भावना असतात. एवढी काय घाई झाली होती, अंधभक्ती दाखवण्याची?
याच आशेने हा बाफ ईथेच बंद करुयात.
>>>>>>
याच आशेने तुमचा दुसरा एक बाफ बंद करूयात!!!
मोस्ट फेवर्ड नेशन
मोस्ट फेवर्ड नेशन व्यापाराबाबत आहे. अन्य देशांशी व्यापार करताना आपण जी बंधने घालतो, तित की बंधने या देशावर नसतात.
quota, tarrif.
इथे वाचा
Article 1 of General Agreement on Tariffs and Trade (GATT), 1994, requires every WTO member country to accord MFN status (or preferential trade terms with respect to tariffs and trade barriers) to all other member countries.
Accordingly, India accorded MFN status to all WTO member countries, including Pakistan, from the date of entry into force of the so called Marrakesh Agreement, establishing the WTO. The WTO is the only global international organisation dealing with the rules of trade between nations and the 164 member countries of the WTO represent 98 per cent of world trade. Only a handful of very small countries are out of the WTO.
पाकिस्तानने भारताला मोस्ट
पाकिस्तानने भारताला मोस्ट फेवर्ड नेशन केलेलं नाही. आपल्या निर्यातीवर प्रतिबंध आहेत.
तरी ही २०१७-१८ मध्ये भारताची पाकिस्तानला निर्यात १९२४ दशलक्ष डॉलर्स होती. तर आयात ४८८ दशलक्ष डॉलर्सची होती. म्हणजे आपली निर्यात आयतीच्या चौपट.
पाकिस्तानच्या एकूण निर्यातीच्या १.५% भारतात होते.
भारता कडून होणारी निर्यात अन्य देशांतून ही वळवली जाते.
<< असा धागा बंद करा सांगून अ
<< असा धागा बंद करा सांगून अॅडमिन तो करत नाहीत आणि मायबोलीचं ते धोरणही नाही. >>
----- धागा बंद Admin करतात.
किंवा अजुन एक सोपा उपाय आहे, मायबोलीवर एक ID आहे, त्याने मनावर घेतले तर धागा एकहाती बंद करण्याचे कसब त्यांच्या लेखणी मधे आहे.
https://lokmat.news18.com
https://lokmat.news18.com/national/one-soldiers-martyred-as-ied-blast-in...
ही बातमी कितपत खरी? याबद्दल कोणाला जास्त माहिती आहे का?
खरी आहे बातमी.
खरी आहे बातमी.
इंजिनिअर कोरचे मेजर चित्रेश बिश्त शहीद झाले.
वाईट बातमी. चीत्रेश बिश्त ना
वाईट बातमी. चीत्रेश बिश्त ना श्रद्धांजली..
सर्वच्या सर्व भगवे ~
.
रंग कोणता होता.. भगवा, हिरवा,
रंग कोणता होता.. भगवा, हिरवा, निळा, पिवळा... मला माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की एक उज्ज्वल भविष्य असलेला, इफिशिअंट ऑफिसर गमावला आपण. सुट्टी वर निघाला होता. ७ मार्चला लग्न होतं त्याचं. पण बॉम्ब डिफ्युज करताना ब्लास्ट होऊन गेला. काही क्षणात त्याचा पालकांचा तरणाताठा मुलगा गेला. वाग्दत वधूची स्वप्ने उधळली गेली.
प्लीज, थोडीतरी संवेदनशीलता बाळगा.
या सगळ्यांची भाषा सारखीच
या सगळ्यांची भाषा सारखीच आहे
https://twitter.com/ANI/status/1097053773657042947
ANI
Verified account @ANI
BJP President Amit Shah in Lakhimpur,Assam: I pay my tributes to Assam's son Maneswar Basumatary, along with the other CRPF personnel. Their sacrifice won't go in vain as it's not the Congress government which is at the Centre, it is the BJP which is at the Centre
कोण ते म्हणत होते हल्ल्याचे
कोण ते म्हणत होते हल्ल्याचे राजकारण करू नका??
अलेक्झांडर नी जग का जिंकले
अलेक्झांडर नी जग का जिंकले आसेल त्याला काय जेवायला मिळत नव्हतं का ?.
छत्रपतींनी पूर्ण आयुष लढाई दगदग ह्या मध्ये का खर्ची केल सरदार पुत्र होते आरामात जगले आस्ते .
भगत सिंग,आणि असंख्य देशप्रेमी फासावर का गेले त्यांना काय जीव नकोसा होता .sadhham हुसैन अमेरिकी ला देशाचं हित विकून किती तरी वर्ष सत्तेवर राहिले आस्ते का फासावर जाण्याचा मार्ग स्वीकारला .आशि खूप लोक आहेत त्यांनी जीवाची बाजी देवून आदर्श निर्माण केला आहे उथळ विचार करून विरोध साठी विरोध करू नका .ज्याला आज भारत म्हणताय तो aasach नाही मिळाला त्या मध्ये आहुती आहे किती तरी जीवांची .सत्याग्रह आणि मोर्चे ब्रिटिश फाट्यावर मारायचे महायुद्ध झालं आणि ब्रिटन कमजोर झाला आणि कडवे जीवाची पर्वा न करणारे हल्ले होवू लागले म्हणून ते गेले
ज्यांचा आत्मा मेला आहे त्यांना ह्या पाठची कारण नाही समजणार .ते फक्त दुसरे कसे चुकले ह्याचीच लिस्ट घेवून फिरणार
राजेश, तुम्ही म्हणताय ते सगळं
राजेश, तुम्ही म्हणताय ते सगळं अमित शहांना कसं कळणार?
एक मनुष्य आहे जो
एक मनुष्य आहे जो प्रधानमंत्र्यांना हल्ला झाला की प्रश्न विचारायचा, चुका दाखवायचा. तो हरवला आहे. तो सापडला की मोदींना सोडणार नाही.
दोन देशांच्या संघर्षात आणि
दोन देशांच्या संघर्षात आणि आत्मप्रौढी मध्ये काश्मिरी जनता भरडली जाते आहे ह्याची जाणीव दोन्ही देश आणि दोन्ही देशातील जनता ह्यांना आहे का ?
मी या व्हिडीओतील वक्त्याशी
मी या व्हिडीओतील वक्त्याशी संपूर्णपणे सहमत आहे... आणि आपणही व्हालच. कुणीही असहमत होऊ शकणार नाही. वक्ताच जबरदस्त आहे.
https://www.youtube.com/watch?v=7VAWjrb7weU
Pages