मराठी उच्चपदस्थाकडून नायजेरियन भामट्यांनी उकळले तब्बल अडीच कोटी रुपये!

Submitted by अतुल. on 27 January, 2019 - 00:29

हि बातमी नक्की वाचा. ह्या बातमीमधली व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. थायलंडच्या भारतातील दुतावासात उच्चपदावर ते काम करतात. बातमीत सांगितल्यानुसार, त्यांनी पैशाच्या लोभापोटी नायजेरियन भामट्याना स्वत:चे घर विकून तब्बल अडीच कोटी रुपये दिले.

https://www.loksatta.com/maharashtra-news/lured-with-1-8-million-by-fb-f...

उच्चशिक्षित/उच्चपदस्थ व्यक्ती सुद्धा पैशाच्या लोभापोटी फसवल्या जातात. नायजेरियन भामट्यांना सुद्धा मानलेच पाहिजे असेच दुर्दैवाने म्हणावे वाटते. मेंदू हॅक कसा करायचा याचे तंत्र त्यांना चांगलेच अवगत झाले आहे असे म्हणावे लागेल. कारण अशा घटना पूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत.

१. https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/cyber-crime-nigerian-f...

२. https://www.loksatta.com/thane-news/nigerian-person-who-was-deceiving-th...

३. https://m.dailyhunt.in/news/india/marathi/mpc+news-epaper-mpcnews/pune+b...

४. https://www.loksatta.com/aurangabad-news/two-nigerian-are-arrested-in-ch...

केवळ अविश्वसनीय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हे मी वाचलं काल मुंबई मिरर मध्ये. फार वाइट वाटले. फेसबुक किंवा कुठेच फ्रेंड रिक्वेस्ट घेउ नये. ते माणूस प्रत्यक्षात ओळखीचे असल्या शिवाय. हे तर आहेच पण पार घर विकले एल आयसी काढली एफ्डी तोडली. तोपरेन्त एकदा पण शंका आली नाही का?

>> पार घर विकले एल आयसी काढली एफ्डी तोडली. तोपरेन्त एकदा पण शंका आली नाही का?

हो ना. तेसुद्धा हे उच्चशिक्षित अधिकारी आहेत. कमाल वाटते. मती गुंग होते कि काय कळत नाही. म्हणूनच म्हटले मेंदू हॅक कसा करायचा याचे तंत्र नायजेरियन भामट्यांना अवगत असावे Sad

माझ्या मते या गृहस्थाचीही नीट चौकशी करायला हवी. दुतावासात काम करणाऱ्या व्यक्तीला परदेशी अनोळखी व्यक्तीसोबत कसे वागायचे हे माहीत नसावे का? त्याने कुणाची रिक्वेस्ट ऍक्सेप्त केली हे ठीक, खूप जण करतात, ओळख वाढवतात. पण unverified परदेशी माणसाकडून अनोळखी पॅकेट घेणे, माहीत नसलेली केमिकल्स विकत घेण्यासाठी पैसे देणे वगैरे सगळे गुन्ह्यात मोडायला हवे.

>> Submitted by साधना on 27 January, 2019 - 12:00

अगदी सहमत आहे. "फुकट/विनासायास/गुपचूप/झटपट पैसे मिळतात" यावर विश्वास ठेवण्याची वृत्ती म्हणजे फ्रौड करण्याकडे कल दिसून येतो. Integrity issue. अशा व्यक्तीला सध्या सहानभूतीची गरज असली तरी त्यांनी दूतावासासारख्या ठिकाणी उच्चपदावर काम करत राहणे सुद्धा लोकांमध्ये चुकीचा संदेश देणारे आहे.

तसेच या व अशा बातम्यां येतात तेंव्हा त्यामागे "दुसरी काही शक्यता" असू शकते का हे सुद्धा पहावे लागेल.

तसेच या व अशा बातम्यां येतात तेंव्हा त्यामागे "दुसरी काही शक्यता" असू शकते का हे सुद्धा पहावे लागेल>>>>

पेपरात सगळे डिटेल्स येत नाहीत. त्यामुळे जे छापून येते त्यावरून पूर्ण कल्पना येत नाही.

या केसमध्ये नायजेरियन व्यक्ती आहेत, या प्रकारच्या केसेस या आधी भरपूर प्रसिद्ध असूनही पावणेदोन करोड इतकी रक्कम स्वतःच्या खिशातून घालणे हे कुणी केवळ अडलेल्या स्त्रीला मदत म्हणून करणार यावर बिश्वास ठेवणे कठीण जाते.

हा डॉलर काळे असणे आणि त्यासाठी केमिकल विकत घेणे हा खूप जुना स्कॅम आहे. सामान्यपणे लोकांना स्कॅमचे विविध प्रकार अजिबात माहित नसतात. त्यामुळे ते सहज फसतात. आपल्या अवतीभवती कित्येक लिगलाइज्ड स्कॅम्स चालू असतात, कोणाला तरी कळतात का?

>> पावणेदोन करोड इतकी रक्कम.... यावर बिश्वास ठेवणे कठीण जाते.

अगदी हेच. एकतर बातमीची सत्यासत्यता हा एक भाग. तो पूर्ण वेगळाच विषय होईल.
दुसरे म्हणजे प्रत्येकाची रिस्क घेण्याची मर्यादा असते. काही जण शे पाचशे रुपयांची रिस्क घेऊ शकतात. तर काहीजण लाखो रुपयांची. इथे यांनी दोनअडीच कोटींची रिस्क घेतलेली आहे. बातमी खरी आहे असे मानले तर इतकी रिस्क ते घेऊ शकतात म्हणून त्यांनी तितके पैसे दिले असे म्हणता येईल. नाजेरीयन भोंदूबाबांनी चांगला रिसर्च करून सावज हेरले आहे म्हणायचे Happy

नायजेरियन फसवणुकीची गिर्हाईकं नेहमीच अतिशय भोळी पण लालूच असलेली असतात. त्याचे ई-मेल देखील थोडाही विचार करणाऱ्या माणसाला कळू शकतात इतके सहज असतात. याचा एक कारण चांगले ई-मेल लिहिले तर येणाऱ्या हजारो रिप्लाय ला टार्गेट करणे फायद्याचा नाही.

https://www.youtube.com/watch?v=_QdPW8JrYzQ

हेच सुत्र कुठलाही कल्ट गिऱ्हाईके शोधायला वापरतो यात धार्मिक संतांचे चमत्कार का इतके उघडउघड मूर्खपणा असतात ते लक्षात येईल. मध्यंतरी जीझस ने स्टेज वर बऱ्या केलेल्या लोकांचे बरेच विडिओ येत होते. ह्यामागचे तत्व हेच आहे.

पैशांची जास्त हाव आणि अंगात ठासून भरलेला मूर्खपणा माणसाच्या अंगी असला की त्यांच्यासोबत नेहमी असंच होतं आणि व्हायलाच पाहिजे.

मला यासंदर्भात अशीच पण एक अतिशय दुर्दैवी बातमी खूप पूर्वी वाचल्याचे आठवते आहे. सन २००० च्या आसपासची गोष्ट असेल. त्याकाळात आपल्याकडे इमेल वर बहुतेकजण नुकतेच आलेले होते. स्पॅम वगैरे शब्द फार माहित सुद्धा नव्हते. एका नवोदित डॉक्टरसाहेबांना नायजेरिया का कुठूनसा एक इमेल आला होता. (तेंव्हा हे डॉक्टर एका मोठ्या इस्पितळात नोकरीस होते). अमुक इतके पैसे घेऊन या. नाजेरीयात भारतीय डॉक्टर्सना खूप मागणी आहे. तुम्हाला मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख केले जाईल. वगैरे वगैरे आमिषे दाखवली होती. त्याकाळात हे प्रकार नवीन होते. बिचाऱ्यानी पट्कन विश्वास ठेवला. आहे ती नोकरी सोडून कर्ज काढून आणि मित्रांकडून वगैरे उसने पैसे घेऊन ते नायजेरियाला गेले. तिथे यांच्याकडून पैसे काढून घेतले आणि मारहाण करून हाकलून दिले. अक्षरशः भिक मागून आणि तिथल्या भारतीय दूतावासाशी कसाबसा संपर्क करून वगैरे कसे भारतात परत आले त्यांचे त्यांनाच माहित. इथे आल्यानंतर खूप मोठा मानसिक धक्का बसलेल्या अवस्थेत होते. शिवाय कर्जदारांनी तगादा लावला. इतके कर्ज फेडायचे कसे याची चिंता. अखेर एक दिवस विमनस्क अवस्थेत आत्महत्या करून त्यांनी आपले जीवन संपवले.

https://www.thehindu.com/news/national/karnataka/woman-duped-of-34-lakh/...
ही एक आणि
https://www.thehindu.com/news/cities/bangalore/man-claiming-to-be-doctor...
ही एक अशा दोन बातम्या अलीकडच्या काही दिवसांत वाचल्या. शिकली सवरलेली माणसंही फसतात खरी!

ती बाई १.८ मिलिअन डॉलर आपल्याला कशाला देइल हा विचार पहिले यायला पाहिजे होता. घर विकणे टूमच इशाबाबा लेव्हल वाटले. काळे पडलेले डॉलर साफ कसे होतील ते कुठे अ‍ॅक्सेप्ट होतील आपण बँकेत थोडे ना डिपॉझिट करो शकतो? हा माणूस दूतावासात असल्याने त्याला मनी एक्क्ष् चेंज वगैरे माहीत असेल. अर्थात मुंबई आहे कुठे ही करून मिळत असतील.

ह्या बातमीत लिहिलेय ते जर खरे असेल, तर हा उच्चपदस्थ मराठी माणूस डोक्याने एकदम बधीर असावा, असे वाटते. >>>>> बधिर, मंद आणि माठ Angry

न पाहिलेल्या स्त्रीसाठी स्वतःच घर विकून टाकायचं? पैसे मिळवण्याची हाव इतक्या टोकाला घेऊन जाते ? की chat वर दोघांचे वेगळे संबंध प्रस्थापित झाल्याने दोघांनी दुसरेच काही प्लॅन केले होते? तिने खोटी आश्वासने दिली असतील आणि त्याने कोणत्याही परिस्थितीत तिला भारतात आणायचे म्हणून वाट्टेल तेवढा खर्च केला असेल. शिवाय खर्च करताना, तिचे 18 लाख डॉलर्स नंतर दोघांना मिळतील ही आशा असणार. खूप शक्यता असू शकतात. नाही तर इतक्या सहज कोण मूर्ख बनेल? आणि एवढी मोठी रक्कम अनोळखी व्यक्तीवर कशी उधळेल?

Atuldpatil, व्हिसा ऑफिसर म्हणजे उच्चपदस्थ नाही. ठीक ठीकच पद आहे ते. अशा पदावरच्या (ते ही सरकारी नोकरी) माणसाकडे अडीच करोड इतक्या सहजतेने उडवायची कपॅसिटी कुठून आली असेल, हा अजून एक प्रश्न.

थायलंडच्या दूतावासात होता ना हा मनुष्य ? क्लरिकल काम असेल. विदेशी नोकरी असल्याने पगार जास्त असेल (पाच माणसांचे काम असल्याने). शिवाय जुने कधी काळी घेतलेले घर आता भाव वाढल्याने पैसे आले असावेत विकून.

http://www.lokmat.com/nashik/sinnar-68-thousand-rupees-were-defiled-youth/
सिन्नर : येथील स्टेट बॅँक इंडियाच्या शाखेतून पैसे घेवुन बाहेर पडत असताना तरूण व्यापाऱ्याची अज्ञात लुटारूंनी ६८ हजार रूपयांना गंडावल्याचा प्रकार बुधवारी (दि.२३) दुपरी एकच्या सुमारास घडला.
खोपडी खुर्द येथील तरूण व्यापारी ईश्वर नामदेव दराडे स्टेट बॅँकेतून ६८ हजारांची रक्कम काढून घेवून जात असताना दोघा अज्ञात व्यक्तींनी त्याला हिंदी भाषेत ‘मै मुंबईसे आया हू, सात महिनेसे मेरे मालिक ने पगार नही दिया है, इसलिए मै मालिकसे एक लाख ३० हजार रूपये चोरी करके लाया हू, मुझे मदत करो. मेरे गाव पोस्टसे पैसे भेजना है और मेरे पास के पैसे गाव नही भेज सकता तुम तुम्हारे पैसे मुझे दो और मेरे पास के पैसे तुम रखलो. मै जब पोस्ट से आऊंगा तब तुम्हारे पैसे वापस दुंगा, तब तक मेरे पैसे तुम्हारे पास रखलो. असे खोटे सांगून दराडे यांच्याकडून ६८ हजार रूपये घेतले. १ लाख ३० हजार रूपये रोख असल्याचे भासवत अज्ञात लुटारूंनी रूमालात ५०० रूपयांच्या नोटेच्या आकाराचे कागद असलेला बंडल व त्याच्यावर ५०० रूपये किमतीची नोट असे देवून दराडे यांची फसवणूक केली. बनावट बंडल पाहिल्यावर त्यांना फसवले गेल्याचे लक्षात आले. सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गणेश परदेशी पुढील तपास करीत आहेत.

माझा असा तर्क आहे की याआधी काही डॉलर्स त्याला दिले असतील नायजेरियन्स नी. ही गोष्ट तो आता सांगत नसेल.
आधी छोटी रक्कम द्यायची म्हणजे विश्वास बसेल आणि मग मोठ्या रकमेचा स्क्याम करायचा...
लालच बुरी बला है.

नायजेरियन स्कॅमचाच प्रकार दिसतो, इतक्या स्टेजेस मधे हे फ्रॉड असेल हे लक्षात आले नाही याचे आश्चर्य वाटते.

मात्र या लोकसत्ताच्या व इतर बातम्यांमधे त्या व्यक्तीचे नाव, बायका मुलांची नावे, सोसायटीचे नाव इतकी वैयक्तिक माहिती देण्याची काय गरज आहे? त्याने बातमीत नक्की काय भर पडली कोणास ठाउक.

>> बातम्यांमधे त्या व्यक्तीचे नाव, बायका मुलांची नावे, सोसायटीचे नाव इतकी वैयक्तिक माहिती देण्याची काय गरज आहे?

खरं आहे. माझ्या समजानुसार, बातमी पोलिसांकडून दिली जाते. पण बातमी देण्यापूर्वी पोलीस सादर व्यक्तीला नाव प्रसिद्ध करण्याबाबत विचारतात कि नाही (विचारायला हवे खरेतर) याची कल्पना नाही. चंद्रावरील जमीन पुण्यातील एका महिलेने खरेदी केल्याने त्यांची फसवणूक झाल्याची बातमी परवा त्यांच्या नावासहित आली होती तेंव्हाही माझ्या मनात हाच प्रश्न आला होता.