शेअर बाजारात गुंतवणूक करता येईल का?

Submitted by Mi Patil aahe. on 22 January, 2019 - 08:28

मला गुंतवणूक करायची आहे ती सुद्धा शेअर्स मार्केट मध्ये! त्यासाठी काय करावे लागते? शेअर्स खरेदी करताना अन् विकताना कोणती काळजी घेण्याआधी ते शेअर्स कसे जपावे,हे कळणे महत्वाचे आहे का? कृपया मान्यवरांची योग्य मार्गदर्शन, माहिती हवी आहे,ती मिळाली तर आनंदच होईल तरी मिळावी ही नम्र विनंती!!!!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला सगळ्यात प्रथम डिम्याट अकाउंट लागेल. सध्या आपल्याकडे म्हणजे भारतात शेरखान, अपस्टॉक, झेरोधा यामध्ये तुम्ही हे अकाउंट उघडू शकता, एकदा का तुम्ही सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण केल्यात की तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड मिळेल मग तुम्ही शेअर खरेदी विक्री करू शकता

असे ऑनलाईन सल्ले घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. त्याऐवजी एक चांगला अर्थ सल्लागार गाठा आणि त्याच्या सल्ल्याने स्वत:च्या पैशाची गुंतवणूक अर्थबाजारात करा.

लहान म्हटले तरी किती पर्यंत रक्कम गुंतवावी, सुरूवातीला?>>>>लहान म्हणजे एवढी कमी कि लॉस झाला तरी चार घास सुखाचे जातील आणि शांत झोप लागेल. Happy

आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक बऱ्याच जणांना मोहात पाडते. पण बाजारातील धोके ओळखणे फार कठीण आहे. कमी अवधीच्या लक्ष्यासाठी जमवलेली पूर्ण रक्कम शेअरमध्ये गुंतवण्याचा सल्ला योग्य ठरणार नाही. तसेच चांगल्या कंपन्यांचे शेअर मध्ये पैसे गुंतवणे जास्त जरुरी आहे. सर्वप्रथम थोडी रक्कम चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवून पहा. तसेच आपली जोखीम क्षमता ओळखूनच अतिरिक्त पैशांची गुंतवणूक करा. शेअर बाजारातील गुंतवणूदारांचे अध्ययन करण्यासाठी एक लेख खालील ब्लॉग वर लिहिला आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल.
मला आवडलेले पुस्तक - भाग ४ Stocks to Riches (इंग्लिश)
https://akshargaane.blogspot.com/2019/12/stocks-to-riches.html

गुंतवणूक विश्वात शेअर बाजाराचे एक वेगळे इथं आहे . इथे चांगला परतावा मिळण्याची नेहमी संधी असते . पण काही मूलभूत नियम स्वतःसाठी पक्के करून ठेवले आणि त्यानुसार वागले तर कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त फायदा आपण स्वतःला करून देऊ शकतो. काही नेहमी आढळणाऱ्या चुकांवर खालील ठिकाणी एक लेख लिहिला आहे. कृपया अवलोकन करा.

शेअर बाजारातील संभाव्य नुकसान कसे टाळावे?
https://akshargaane.blogspot.com/2019/12/blog-post_24.html?m=1

कसला टुकार ब्लॉग आहे. पहिलीतलं पोरगं पण जास्त चांगलं सांगेल या ब्लॉगपेक्षा.